Shri Mahesh Vidyalaya, Shirur Tajband

Shri Mahesh Vidyalaya, Shirur Tajband Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Mahesh Vidyalaya, Shirur Tajband, High School, Latur-Nanded Road Shirur Tajband Tq. Ahmadpur, Shirur Tajband.

श्री महेश शिक्षण संस्था द्वारे संचलित ,
१.श्री महेश प्राथमिक विद्या मंदिर,शिरूर ताजबंद
२.श्री महेश विद्यालय, शिरूर ताजबंद.
३.श्री महेश कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान,कला,एम.सी.वी.सी.),शिरूर ताजबंद.

राज्य महामार्ग कृ.३
मु.पोस्ट.शिरूर ताजबंद,
तालूका अहमदपूर,
जिल्हा लातुर.
४१३ ५१४

12/05/2026
श्री महेश माध्यमिक  विद्यालयाची SSC-10 वी बोर्ड परीक्षेतील  यशाची परंपरा कायम दि. 08मे 2026, शिरूर ताजबंद येथील  श्री मह...
08/05/2026

श्री महेश माध्यमिक विद्यालयाची SSC-10 वी बोर्ड परीक्षेतील यशाची परंपरा कायम
दि. 08मे 2026, शिरूर ताजबंद येथील श्री महेश माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाने माध्यमिक प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले आहे . दि.08 मे 2026 रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला . यामध्ये शाळेचा निकाल 97.30% इतका लागला असून शिरूर ताजबंद येथील दोन्ही केंद्रातून सर्वप्रथम कु . सिद्धी उदय डोंगरगावे (97.60%), सर्वद्वितीय चि .भुंबर शाम सुरेश ( 95.00%) सर्वतृतीय कु . समरिन युनूस पठाण(94.00%) आले आहेत. परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 260, उत्तीर्ण विद्यार्थी 253, 90 टक्केपेक्षा अधिक गुण घेणारे एकूण 18 विद्यार्थी,विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण 95 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मिळवलेले-94 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मिळवलेले-64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . असे यश संपादन करून विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक,
उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , सर्व शिक्षकवृंद व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पूढील वाटचालीस शुभेच्या दिल्या .

विन्रम अभिवादन, 💐सचिव श्री महेश शिक्षण संस्था , शिरूर ताजबंद
06/01/2026

विन्रम अभिवादन, 💐
सचिव श्री महेश शिक्षण संस्था , शिरूर ताजबंद

श्री महेश शिक्षण संस्थेचे मा सचिव कै चंद्रशेखरजी पाटील साहेब यांचे आज चौथे पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आज शाळेत त्यां...
06/01/2026

श्री महेश शिक्षण संस्थेचे मा सचिव कै चंद्रशेखरजी पाटील साहेब यांचे आज चौथे पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आज शाळेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

🎖️🎖️🏆🏆अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! 🏆🏆🎖️🎖️श्री महेश विद्यालयाचे शिष्यवृती परीक्षेत नेत्रदिपक यश .🌹 महाराष्ट्र राज्य श...
27/04/2025

🎖️🎖️🏆🏆अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! 🏆🏆🎖️🎖️
श्री महेश विद्यालयाचे शिष्यवृती परीक्षेत नेत्रदिपक यश .🌹 महाराष्ट्र राज्य शिक्षण परीषद पूणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे पाच विद्यार्थी पात्र ठरले आहेत तर इयत्ता ५ वी वर्गातून तब्बल ४३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आशोकरावजी सांगवीकर साहेब, सचिव मा. श्री . मंगेशजी पाटील साहेब, सहसचिव मा. श्री . अण्णारावजी पाटील साहेब, कोषाध्यक्ष मा . श्री . तुळशीरामजी भोसले साहेब, जेष्ठ संचालक मा. श्री . सुरेंद्रजी पाटील साहेब व संस्थेचे सर्व संचालक शाळेच मुख्याध्यापक मा . श्री मरतुले साहेब, प्राथमिक शाळेचे मुख्याधापक मा . श्री . महाजन सर उप मु. अ . श्री . यरनाळे सर, पर्यवेक्षक प्रा . मजगे सर, पर्यवेक्षक श्री . लवटे सर, शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख श्री . वलसे एस . पी . आणि श्री . परतवाघ ए . ए ., कार्यालयीन प्रमुख श्री . संगम स्वामी सर शिष्यवृत्ती परीक्षा वर्गाला मार्गदर्शन केलेले सर्व अध्यापक, अध्यापिका यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील काळात यापेक्षाही मोठे यश मिळावे याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या .💐💐💐

💐 श्री महेश विद्यालयाचा 2009-10 चा माजी विद्यार्थी, (कै.तोडकरी आबा यांच्या हॉस्टेलचा) नायगाव मयूर नगरीचे सुपुत्र चि.डॉ.प...
22/04/2025

💐 श्री महेश विद्यालयाचा 2009-10 चा माजी विद्यार्थी, (कै.तोडकरी आबा यांच्या हॉस्टेलचा) नायगाव मयूर नगरीचे सुपुत्र चि.डॉ.पंकज नारायण औटे यांनी वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवल्यानंतर देखील न थांबता अविरत मेहनत व अथक परिश्रम घेऊन देशाच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत All India Rank 653 मिळवुन आई-वडिलांचे कुटुंबाचे व त्यांच्या मयूर नगरीचे नाव उज्वल करून केंद्रीय लोकसेवा आयोग सेवामधे आपले नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे.. नक्कीच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे🌸 त्याबद्दल डॉ पंकजचे व त्याला या यशाच्या मार्गावर जाण्यासाठी सतत प्रोत्साहित करणारे गुरूजन, आई वडील ,भाऊ व संपूर्ण कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन व डॉ पंकजच्या पुढील वाटचालीसाठी श्री महेश विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा...*🌸

यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
31/03/2025

यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

नमस्कार बालकहो,मी श्री महेश विद्यालय शाळा बोलतेय, हो तुमची शाळाच बोलतेय… अस अनोळखी होवून पाहू नका. खरच मी तुमची शाळा बोल...
14/11/2024

नमस्कार बालकहो,
मी श्री महेश विद्यालय शाळा बोलतेय, हो तुमची शाळाच बोलतेय… अस अनोळखी होवून पाहू नका. खरच मी तुमची शाळा बोलतेय, ओळखलत नाही का मला? पण मी मात्र ओळखते तुम्हाला… आता बरेचसे चेहरे बदललेत…. ज्या बालवयात मी तुम्हाला पाहिलं होत… ते चेहरे बदलले. तुम्ही मोठे झालात, आपापल्या संसारात रमलात. मी मात्र आहे तशीच गावच्या मध्यभागी… तरीही एकाकी.… पण मी बदलले नाही…. आहे तशीच आहे.
पण मला आजही आनंदच वाटतो… मी एकाकी कसली हो….!!
अजिबात नाही. वाटलं होत कि तुम्ही माझ्या अंगणात वाढलात, शिकलात, पडलात, रडलात आन घड्लात ही… अगदी तशीच तुमची मुल ही माझी पायरी चढतील. माझ्या अंगणात बगडतील. पण नाही… कदाचित हे माझ दुर्भाग्य असावं. वाईट या गोष्टीच वाट्त की, तुम्ही माझ्या बाजूने जातानाही अभिमानाने आपल्या मुलांना सांगत ही नाही की, बाळा ही माझी शाळा… मी या इथे शिकलो, इथे घडलो… चल तुला मी माझी शाळा दाखवतो…
अस बोलला असतात तरी माझ समाधान झाल असत. मी तृप्त झाले असते.

असो, हा माझ्या दुर्भाग्याचा विषय…
पण अजूनही वेळ गेली नाही. आजही तुमच्या भावाची, काकाची, नातवाची, पुतण्याची, बहिणीची मुले माझ्या अंगणात घड्तायत… मोठी होतायत, खूप हुशारही आहेत. विविध क्षेत्रात पारंगत आहेत. त्याना मी तुमची मुले… तुमचच रूप समजते.

Address

Latur-Nanded Road Shirur Tajband Tq. Ahmadpur
Shirur Tajband
413514

Opening Hours

Monday 9am - 4:05pm
Tuesday 9am - 4:05pm
Wednesday 9am - 4:05pm
Thursday 9am - 4:05pm
Friday 9am - 4:05pm
Saturday 9am - 12:30pm

Telephone

+912381220028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Mahesh Vidyalaya, Shirur Tajband posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category