RC Patel Arts, Commerce and Science College Library, Shirpur

  • Home
  • India
  • Shirpur
  • RC Patel Arts, Commerce and Science College Library, Shirpur

RC Patel Arts, Commerce and Science College Library, Shirpur Its a academic college library situated in Rural area of North Maharashtra, India

नॉट विदाउट माय डॉटर... नवऱ्याच्या फसवणूकीमुळे इच्छेविरुद्ध इराण मध्ये अडकलेल्या असामान्य स्त्रीची कहाणी..अत्यंत खडतर प्र...
05/02/2022

नॉट विदाउट माय डॉटर...
नवऱ्याच्या फसवणूकीमुळे इच्छेविरुद्ध इराण मध्ये अडकलेल्या असामान्य स्त्रीची कहाणी..
अत्यंत खडतर प्रसंगाना सामोरे जाऊन त्यातून वाट काढत,
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुली सहित पुन्हा आपल्या मायभूमीत परंतलेली बेट्टी मेहमूदी.
सर्वांनी एकदा तरी वाचावं असा माझा आग्रह आहे...

आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात हे पुस्तक उपलब्ध आहे.

स्वतःची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आकाशापर्यंत पोहोचण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका युवकाची खिळवून टाकणारी कथ...
25/01/2022

स्वतःची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आकाशापर्यंत पोहोचण्याची जिद्द बाळगणाऱ्या एका युवकाची खिळवून टाकणारी कथा म्हणजे'माती, पंख आणि आकाश...'.स्वातंत्रोत्तर काळात लोकशाहीचा हत्ती गावागावात पोहोचला आणि तो बरोबर शिक्षणाचा परिस घेऊन आला. देशप्रेमाने झपाटलेल्या स्थानिक नेत्यांनी या परिसाच्या बळावर कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी एका नव्या कल्पनेचा वृक्ष लावला. ज्ञानेश्र्वर मुळे हे या वृक्षावरचे गोंडस फळ आहे.
या पुस्तकाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे.तो गावातील माती सुरू होतो आणि दुनियेच्या पसाऱ्यापर्यंत नेऊन सोडतो. ही फक्त एका धडपडणाऱ्या ग्रामिण मुलाची कथा न राहता समग्र समाज व देशाच्या संक्रमणाची कहाणी म्हणून समोर येते. थक्क करून सोडणाऱ्या या प्रवासात सृजनातील आनंद वारंवार अनुभवता येतो. संज्ञाप्रवाह, सर्वात, कथा, कविता, आठवणी, दैनंदिनी या सर्वांचा सुरेख मेळ येथे झाला आहे. एकाच वेळी अनेक पातळ्यांवरचा हा प्रवास एखाद्या सुरस मैफलीसारखा 'वा! व्वा!' म्हणून दाद द्यायला भाग पाडतो. जीवनावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारे व एका झपाटल्यागत वाचले जाणारे पुस्तक म्हणजे 'माती, पंख आणि आकाश'.
या पुस्तकाची अर्पणपत्रिका देखील पुस्तकाइतकीच आसुसून लिहिलेली आहे.

19/03/2021

माझे पुस्तक वाचन 🔥📚

मला अनेक जण विचारतात की तु वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन कश्याप्रकारे करतो ??वाचलेलं ध्यानात कसे ठेवतो ??तुझ्या वाचनाचा वेग किती ??एका दिवसांत किती पृष्ठ वाचून समाप्त करतो ??वाचून त्याचे विश्लेषण कसे करतो ?? पुस्तक वाचताना नोट्स काढतो का ??अभ्यासातून वेळ कसा मिळतो ?? पुस्तक वाचल्यानंतर काय होते किंवा त्याचे फायदे काय ?? वगैरे इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे मी या लेखात द्यायचं प्रयत्न करतो...

✍️ मी पुस्तके का व कशासाठी वाचतो ??

१)जसे गाडी पेट्रोल, मोबाईल चार्जिंग,मनुष्य अन्न/पाणी/हवे शिवाय चालत नाही त्याच प्रकारे माझा मेंदू वाचनाशिवाय चालत नाही यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी मी वाचत असतो..
२)वेगवेगळ्या लेखकांचे भिन्न भिन्न विषय/मुद्द्यांवर त्यांचे अनुभव/विचार जाणून घेऊन स्वतःच एक मत बनवण्यासाठी मी वाचत असतो.
३)एका जागी बसूनच जग फिरण्यासाठी मी वाचत असतो,
४)मनातील/मेंदूतील घाण विचार बाहेर पडून चांगले विचार मेंदूत घर करून बसावे यासाठी मी वाचत असतो,
५)जगात/देशात वाढत चाललेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मी वाचत असतो.
६)जगात जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत ते एक चांगले वाचक आहे यामुळे मी वाचत असतो.
७)वाचनाने काहीही नुकसान होत नाही यामुळे मी वाचत असतो किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी मी वाचत असतो.
८)इतरांच्या अनुभवातून/चुकांतून शिकण्यासाठी मी वाचत असतो किंवा शब्दसंग्रह भाषाकोष वाढवण्यासाठी मी वाचत असतो.
९)माझे व्यक्तिमत्त्व विकासाच्या साठी मी वाचत असतो व मनाच्या शांतीसाठी मी वाचत असतो.
१०)आयुष्य बदलण्यासाठी व घडवण्यासाठी मी वाचत असतो व यासोबत आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी वाचत असतो.
११)एखाद्या विषयावर सखोल ज्ञान घेण्यासाठी व जिज्ञासापुर्ती करण्यासाठी मी वाचत असतो..
१२)स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे यासाठी व विपुल प्रमाणात चांगले लेखन करता यावे म्हणून मी वाचत असतो.
१३)भविष्यात एक चांगला अधिकारी बनण्यासाठी मी वाचत असतो व शेवटी पुस्तके हेच माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर नेहमी बोलण्यासाठी मी त्यांना वाचत असतो..

✍️मी वाचन कसे करतो ??

तुम्ही किती वेळा वाचता यापेक्षा कशाप्रकारे वाचतो हे महत्वाचे ठरते.लिहलेलं वाचून समजून घेण्यावर जास्त भर द्यायला हवा.

१)मी रोज एक पुस्तकाचे ४०-५० पृष्ठ न चुकता वाचत असतो यामुळे ३००-४०० पृष्ठांची कादंबरी सुद्धा मी ६-७ दिवसांत वाचून पूर्ण करु शकतो(काही अपवाद वगळता) एखादे पुस्तक जर खूपच मनात घर करून गेले तर त्या पुस्तकाचे रोज १५० पृष्ठ मी वाचन करतो आणि ते फक्त वाचतच नाही तर त्यावर विचार सुद्धा करत असतो व ते समजून घेण्यावर जास्त भर देतो..
२)एखादा मजकूर न समजल्यावर तो पुन्हा रिपीट वाचत असतो.
३)अवघड/कठीण शब्द/नाव अंडरलाईन करत असतो
४)वाचन मी नेहमी शांत मनाने व मनात चाललेले सारे विचार बाजूला काढून वाचत असतो.
५)समोर/टीव्ही सुरू असल्यावर अथवा गोंगाटामध्ये मी कधीही वाचत नाही मी नेहमी शांत जागेत वाचन करत असतो.
६)पुस्तकातील फक्त काहीच मजकूर मी जोरजोरात वाचत असतो व बाकी मूक वाचनालाच प्राधान्य देतो.
७)मी एकाच जागी बसून कधीही वाचन करत नसून बसून/झोपून/चालत-फिरत वाचत असतो.
८) पुस्तकातील मुख्य पात्राच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन मी वाचन करत असतो (उदाहरण :-रावण कादंबरी वाचत असताना मी स्वतःला रावण समजून वाचत होतो किंवा प्रतिपश्चन्द्र कादंबरी वाचत असताना स्वतःला रवि समजून वाचत होतो)
९)पुस्तक वाचत असताना मी फक्त त्याच पुस्तकावर लक्ष्य केंद्रित करून वाचत असतो.
१०)वाचन समाप्त झाल्यावर मला त्यातून काय शिकायला मिळाले याबद्दल मी विचार करत असतो,
११)फक्त वाचायचं आहे किंवा पुस्तक वाचून संपवायचं आहे म्हणून मी कधीही वाचत नाही.
१२)पुस्तक वाचन झाल्यावर त्या विषयावर गुगल करतो व काही माहिती पुन्हा वाचतो,समीक्षण वाचतो आणि मला जे समजलं/उमजलं ते सरळ सरळ लिहून काढतो..
१३)मी वाचत असताना ओळीवर बोट ठेऊन कधीही वाचत नसतो याने वाचनाचं वेग खूप कमी होतो.
याप्रमाणे मी वाचन करत असतो आणि ते वाचलेलं माझ्या लक्षात सुद्धा राहते..

✍️ वाचनाचे फायदे काय किंवा पुस्तक वाचन केल्यानंतर.....

१)प्रेम आणि वासना यामधील फरक समजतो..
२)गरीब सुद्धा श्रीमंत दिसु लागतो..
३)समाजामध्ये किती दुःख आहे हे समजते..
४)कोणत्या माणसांशी कसे वागावे हे समजू लागते..
५)प्राण्यांशी व निसर्गाशी आपुलकी निर्माण होते..
६)समाजातील भयानक रितीरिवाज,अंधश्रद्धा,रुढीपरंपरा, ढोंग समजू लागते..
७)महापुरुष नेमके कोणास म्हणावे हे समजते..
८)पैसा हाच सर्व नाही या गोष्टीवर आपला विश्वास बसतो..
९)विश्वात आपले अस्तित्व किती किरकोळ आहे हे समजते..
१०)आई वडिलांची खरी किंमत कळते..
११)कोणी आपल्याला कितीही वाईट बोलू द्या आपण त्याला नेहमी प्रेमानेच बोलावे हे समजून चुकते..
१२)आपल्या देशासाठी किती थोरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे हे समजते..
१३)किती इतिहासातील गोष्टी आपल्या पासून लपवल्या गेल्या आहे हे समजते..
१४)प्रत्येक महिलांची नेहमी इज्जत करावी हे समजते..
१५)आयुष्यात पास होणे फक्त हेच जीवनाचे उद्देश्य नाही.. किंवा एकाद्या परीक्षेत नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार सुद्धा मनात येत नाही..
१६)आज जी व्यक्ती आपल्याला उच्च शिखरावर दिसते त्यांनी त्या शिखरावर पोहचण्यासाठी किती मेहनत केली होती हे समजते..
१७)विश्व किती अफाट आहे याची जाणीव होते..
१८)धर्म,जाती हे सर्व ढोंग असून माणुसकी हीच सर्वोपरी आहे याची समज येते..
१९)गौतम बुद्धांनी सांगितलेला "अत दीप भव" हा मार्ग समजतो..हजरत मुहम्मद पैगंबर यांचा खरा शांतीचा मार्ग देणारा इस्लाम समजतो..
२०)माणसांनी निसर्गाचा कशाप्रकारे विनाश केला आहे हे समजते..
२१)गुन्हेगारा मध्ये सुद्धा माणूस दिसू लागते व त्याची मजबुरी समजू लागते..
२२)कोणालाही उपदेश देण्याच्या पहिले आपण काय आहोत हे समजायला लागते..
२३)शिवरायांच्या स्वप्नातला हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे समजते..
२४)बाबासाहेबांनी सांगितलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा'याचा अर्थ कळतो..
२५)डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातील भारत म्हणजे काय हे समजते..
२६)शहीद भगत सिंह यांच्या क्रांतीचा अर्थ कळतो..
२७)मंदिर-मस्जिद या गोष्टी मानवासाठी एवढ्या उपयोगाच्या नसून हॉस्पिटल,शाळा इत्यादीच मानवाच्या मूलभूत गरजा आहे हे समजते..
२८)कोणाकडून चुकी झाली असल्यावर त्याला माफ करण्याची समज येते..
२९)देशभक्तीचा नेमका अर्थ काय हे समजतो..
३०)विश्वाला,समाजाला बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते..
३१)हिंदू मुस्लिम म्हणून न जगता माणूस म्हणून कसे जगावे समजते..
३२)समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांचा असली चेहरा समजतो..
३३)शेतकऱ्यांचे ,कामगारांचे दुःख समजते
३४)बालविवाह,लहान मुलांचे लैंगिक शोषण,कुपोषण,बलात्कार,बंधुवा मजदूरी इत्यादी आपल्या समाजाला लागलेली कीड आहे हे समजते...
३५)पुस्तक वाचनाचे फायदे कळू लागतात..
३६)आत्मविश्वास निर्माण होतो.
३७)विश्वाला/समाजाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो..

लेखक जेव्हा कोणत्याही एका विषयावर/मुद्द्यांवर/व्यक्तींवर ( उदाहरण :-ऐतिहासिक,चरित्र,भौगोलिक, राजकीय अथवा ) पुस्तक/कादंबरी लिहायला घेतो तेव्हा तो त्या विषयासंबंधीत अनेक पुस्तके/ग्रंथ/बखरी खंगाळतो त्याचा अभ्यास व संशोधन करतो,नोट्स काढतो,अनेक तज्ञांना भेटतो त्यांच्याकडून माहिती घेतो,पुरावे गोळा करतो,या विषयावर रात्रंदिवस मेहनत करतो व एकंदरीत आपल्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण वर्षे देऊन तो आपल्या स्वतःच्या अनुभवाने/पात्रतेने पुस्तक वाचकांसमोर ठेवतो...

आता जेव्हा आपण त्याविषयावर पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही कारण त्यावर मेहनत ही लेखकाने अगोदरच घेतलेली असते म्हणून आपल्याला फक्त हे पुस्तक वाचूनच ज्ञान/अनुभव/माहिती मिळून जाते..लेखकाने पुस्तक लिखाणासाठी केलेली मेहनत व अनेक वर्षेदेऊन अभ्यास/संशोधन करून मिळवलेली माहिती/अनुभव आपल्याला फक्त काही दिवसाच्या वाचनानेच मिळून जाते..आणि हीच पुस्तकांची खरी ताकद आहे...पुस्तक वाचनाने आपण विचार करायला शिकतो, आपली इच्छाशक्ती मजबूत होते,आत्मविश्वास येतो,पुस्तके आपल्याला कधीही एकटे पडूच देत नाही ,वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात,आपल्याला अनेक विषयांवर शिकायला मिळते,आपण इतरांच्यापेक्षा वेगळे वागतो आणि नेमकं जगायचं कसे हे आपल्याला शिकायला मिळते...✍️❤️

©️ Moin Humanist ✍️

The Storyteller...
11/12/2020

The Storyteller...

10/05/2020
All book reading fans out there check this new initiative from HRD and IIT KGP. 6.5 million books are now available in o...
16/05/2017

All book reading fans out there check this new initiative from HRD and IIT KGP. 6.5 million books are now available in one single portal, where you can read online, or download the books. There are text books, audio and video content. Just browsing them all may take years! Enjoy. National Digital Library is an initiative by HRD ministry. It is a huge collection of learning resources (68 lakh books) from primary to PG level. Students can use it free of charge.

To register, go to:
https://ndl.iitkgp.ac.in

Education, research & related topics, Metaphysics, Ontology, Cosmology, Teleology, Physiognomy, Psychology, Logic, Ethics

28/12/2016

Address

Shirpur
425405

Alerts

Be the first to know and let us send you an email when RC Patel Arts, Commerce and Science College Library, Shirpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to RC Patel Arts, Commerce and Science College Library, Shirpur:

Shortcuts

Share

Category