अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी, ता-शिरपुर,जि-धुळे

  • Home
  • India
  • Shirpur
  • अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी, ता-शिरपुर,जि-धुळे

अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी, ता-शिरपुर,जि-धुळे educational

26/01/2026

77 वा प्रजासत्ताक दिन.......

आज तालुका पोलीस स्टेशन सांगवी, शिरपूर, जि-धुळे येथे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथील विद्यार्थ्यांना ...
06/01/2026

आज तालुका पोलीस स्टेशन सांगवी, शिरपूर, जि-धुळे येथे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी येथील विद्यार्थ्यांना पोलिस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्थानक कामकाज, ड्रग्ज पासून होणारे नुकसान याबरोबरच शस्त्रांची माहिती दिली.

पालक मेळावा 31 डिसेंबर 2025
04/01/2026

पालक मेळावा 31 डिसेंबर 2025

आज दिनांक 26/11/2025 रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी, ता -शिरपूर, जि -धुळे येथे *संविधान दिन* उत्साह...
26/11/2025

आज दिनांक 26/11/2025 रोजी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी, ता -शिरपूर, जि -धुळे येथे *संविधान दिन* उत्साहात साजरा करण्यात आला......
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगवी गावातून *संविधान जागृती पर रॅली* काढण्यात आली..... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या *पुतळ्यास अभिवादन* केले प्रसंगी सांगवी गावाचे *लोकनियुक्त सरपंच* कानिलाल दादा पावरा,ग्रामविस्तार अधिकारी संजय बागुल, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, सांगवी आश्रम शाळेचे माध्य मुख्याध्यापक विठोबा चौधरी, प्राथ मुख्यध्यापक कल्पेश मावची, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते...
शाळेतील कार्यक्रमात *भारतीय संविधानाच्या पुस्तकाचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन* दिलीप दहिवदकर, अशोक पवार, चिंतामण मास्तर, शाळेचे मुख्यध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले,
शाळेच्या विद्यार्थिनींनी *संविधानावर आधारित गीत* सादर केले संविधानाची उद्दिष्टे व मार्गदर्शक तत्वे कल्पेश मावची प्राथमिक मुख्याध्यापक यांनी समजावून सांगितले, इतिहास काळापासून आजपर्यंत संविधानाचा संविधानाचे महत्त्व यावर मनोहर वाल्हे सर यांनी प्रकाश टाकला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवदास वसावे तर आभार प्रदर्शन अर्जुन गवळी यांनी केले. तसेच संविधाना प्रति आदरभाव म्हणून राहुल चकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली *विद्यार्थी साखळीने संविधान दिन* असे नाव रेखाटण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास पाटील, योगिता वळवी, महेश सोनी, मनीषा सोलंकी,अनिल गावित व रमेश बंजारा यांनी सहकार्य केले....

अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी येथे आद्य क्रांतिकारक,जननायक राघोजी भांगरे यांची आज रोजी जयंती साजरी करण्...
08/11/2025

अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी येथे आद्य क्रांतिकारक,जननायक राघोजी भांगरे यांची आज रोजी जयंती साजरी करण्यात आली...

ज्ञान संवर्धन प्रकल्प
12/07/2025

ज्ञान संवर्धन प्रकल्प

12/07/2025

विद्यार्थी सामूहिक कवायत,अनुदानित आश्रम शाळा सांगवी,तालुका शिरपूर, जिल्हा धुळे,

https://youtu.be/YkQgBn2asKU
16/09/2024

https://youtu.be/YkQgBn2asKU

आश्रम शाळा सांगवी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा

*आश्रम शाळा सांगवी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्...
14/09/2024

*आश्रम शाळा सांगवी येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 *राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त* हिंदी भाषा विषय प्रमुख श्री कल्पेश मावची (प्राथमिक मुख्याध्यापक) यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात *अध्यक्ष:- श्री योगेश बादल* (जि. प.सदस्य, धुळे) हे उपस्थित होते तर *प्रमुख पाहुणे* म्हणून *श्री विठोबा चौधरी सर* (माध्यमिक मुख्याध्यापक) उपस्थित होते. *श्री.कल्पेश मावची* यांनी आपल्या *प्रास्ताविकेत* विचारांचे आदान प्रदान करण्याकरिता राष्ट्रभाषा हिंदी किती महत्त्वाची भूमिका निभावते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी *डॉ. अब्दुल कलाम, स्वामी* *विवेकानंद ,सुनिता* *विल्यम,गॅलिलिओ, जगदीश चंद्र* *बोस, राजमाता जिजाबाई* , *शेतकरी,डॉक्टर,शिक्षक, पोलीस* यांची वेशभूषा परिधान करीत प्रत्येकाची माहिती दिली. तसेच *हिंदू धर्म, इसाई* *धर्म ,कबीर के दोहे* व त्यांचे अर्थ सांगण्यात आले. लहान वर्गातील मुलांनी हिंदीची कृतीयुक्त गीते सादर केली. यावेळी शिक्षक मनोगतातून श्री. विजय ब्राह्मणे( पद. प्राथमिक शिक्षक) यांनी हिंदी भाषा न बोलता येण्याने होणारी फजिती कशी होते याचे मार्गदर्शन केले. तसेच श्री विठोबा चौधरी सरांनी विविध उदाहरणे व दाखले देत हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना आवाहन केले की आपल्या दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करावा. यावेळी *श्री योगेशजी बादल*( जि. प. सदस्य धुळे) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा व शिक्षकांचे स्तुत्य उपक्रमामुळे कौतुकांचा वर्षाव केला व आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. तसेच हिंदी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे उत्तम *सूत्रसंचालन कुमारी काजल* *पावरा कुमारी मोगीता पावरा* या इयत्ता-१० वी च्या विद्यार्थ्यांनी केले तर *आभार* *रितेश पावरा* यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, अधिक्षक, अधिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली व हिंदी दिवसाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

15/08/2024

Dance

Address

Sangavi
Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी, ता-शिरपुर,जि-धुळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share