P B M M High School Shirpur

P B M M High School Shirpur ११० वर्षाचा इतिहास घडवणारी माझी शाळा

15/06/2024

प्रवेश उत्सव २०२४-२५

19/04/2024
15/04/2024

स्वच्छता पथनाट्य

*स्वच्छता ही एक चळवळ झाली पाहिजे -गिरीश कुलकर्णी.* शिरपूर येथील पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला दि...
15/04/2024

*स्वच्छता ही एक चळवळ झाली पाहिजे -गिरीश कुलकर्णी.*
शिरपूर येथील पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला दि 15 एप्रिल 2023 सोमवार रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव चे समन्वयक श्री गिरीश कुलकर्णी श्री चंद्रशेखर पाटील यांनी स्वच्छ शाळा परीक्षणासाठी भेट दिली.
गांधी स्वच्छ शाळा प्रतियोगिता 2023 ला विद्यालयाने सहभाग नोंदविला.या अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविले.या उपक्रमांचे दस्तऐवज तपासण्यासाठी त्यांनी शाळेला भेट दिली.यावेळी शिक्षकांशी स्वच्छता उपक्रमाविषयी चर्चा केली.यावेळी मुख्याध्यापक श्री एस आर गवळी पर्यवेक्षक श्री आर सी पावरा श्री जे जी महाजन श्री ए ए पाटील श्री ए के गुजर श्री के एस पाडवी श्री बी ए मोरे श्रीमती एम पी चव्हाण श्रीमती एन यु माळी श्रीमती एस व्ही सिसोदे श्रीमती जे एस गायकवाड दिपक जाधव प्रफुल्ल मराठे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी श्री जी एस पावरा श्री ए ए पाटील श्री आर पी गावीत श्री जी एस साळुंखे श्री आर एन चौधरी श्री डी एच राजपूत श्री एच एम माळी

17/02/2024
*दीपोत्सव स्पर्धा*  विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस आर गवळी सर हस्तकला समितीच्या मार्गदर्शिका व ज्येष्ठ पर्यवेक्...
20/10/2023

*दीपोत्सव स्पर्धा* विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस आर गवळी सर हस्तकला समितीच्या मार्गदर्शिका व ज्येष्ठ पर्यवेक्षिका आदरणीय सौ जे एस सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक 20 10 2023 वार शुक्रवार रोजी पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे दीपावली निमित्ताने हस्तकला समितीच्या वतीने दीपोत्सव स्पर्धा संपन्न झाली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर दिवे सजावट करून आणले होते या स्पर्धेत प्रथम क्र. चिरंजीव वंश सुनील करसकर द्वितीय क्र. नैतिक देविदास लोहार पाचवी अ तृतीय क्र.कु.गाव्यांनी आप्पा वाघ इयत्ता पाचवी अ इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आकाश कंदील बनवले. यात प्रथम क्र. आयुष प्रकाश भोई सहावी क द्वितीय क्र. कु चेतना शिवाजी वाडीले सहावी ब तृतीय क्र.अनुष्का शरद भोई सहावी ब इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण अशी भेटकार्ड तयार केले. यात प्रथम क्र, कु दर्शनी शामकांत शिरसाठ द्वितीय क्र, कु.नंदिनी प्रकाश माळी तर तृतीय क्र. कुमारी खुशी राजेंद्र सोनार या विद्यार्थ्यांनी मिळवला. दीपोत्सव स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हस्तकला समितीच्या सर्व सदस्यांनी- हस्तकला समिती प्रमुख श्रीमती जे एन महाजन श्री एस डी माळी श्री एस एन कोळी श्री एच के पाटील श्री जी एस पावरा श्रीमती पी के पाटील श्री वाय एन गिरासे श्री जे जी महाजन श्री एस एस धाकड यांनी अनमोल सहकार्य केले शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी देखील वर्ग सजावटीसाठी मोलाचे सहकार्य केले.

*आपल्याला आनंद देणारे काम म्हणजे केरीअर -* *जयदीप पाटील.* शिरपूर: पां बा मा म्युनिसिपल व कनिष्ठ महाविद्यालय येथे **माजी ...
15/09/2023

*आपल्याला आनंद देणारे काम म्हणजे केरीअर -* *जयदीप पाटील.*
शिरपूर: पां बा मा म्युनिसिपल व कनिष्ठ महाविद्यालय येथे **माजी शालेय शिक्षण मंत्री व शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या विविध वाटा या विषयावर जळगाव येथील नोबेल फाउंडेशन चे संस्थापक श्री जयदीप पाटील सर* यांचे व्याख्यान आयोजित केले होते.विद्यार्थ्यानी केरीअर निवड करताना *आपली आवड,क्षमता या गोष्टींचा विचार करावा तसेच ज्या क्षेत्रात केरीअर करायचं आहे त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींशी बोला असे सांगितले.विद्यार्थीदशेत मेहनत घ्याल तर पुढील आयुष्यात मेहनत करण्याची गरज राहणार नाही व टिव्ही मोबाईल यांच्यापासून दूर गेल्यास यश नक्कीच मिळेल असेही सांगितले.* यावेळी इ.९ वी ते १२ वी चे विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस आर गवळी उपमुख्याध्यापक श्री के एन काजी पर्यवेक्षिका सौ जे एस सोनवणे पर्यवेक्षक श्री आर सी पावरा अधीक्षक श्री जे बी जाधव श्री ए जी तेले शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी श्री जे जी महाजन, श्री बी ए मोरे,श्री पी बी वारुळे,श्री आर पी गावित,श्री जी एस साळुंखे,श्री डी एच शिंदे सेवक भिमा माथने, प्रफुल्ल मराठे, जयश्रीताई यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक श्री ए के गुजर सुत्रसंचलन श्री वाय एन गिरासे तर आभार श्री मजहर पठाण यांनी केले.

*प्रवेश सुरु!   प्रवेश सुरु* ! *शंभरी गाठलेल्या, महाराष्टातील सर्वात मोठ्या नगरपालिका संचलित पां बा मा म्युनिसिपल हायस्क...
19/04/2023

*प्रवेश सुरु! प्रवेश सुरु* !
*शंभरी गाठलेल्या, महाराष्टातील सर्वात मोठ्या नगरपालिका संचलित पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे इ.५ वी ते ९ वी पर्यंतचे वर्ष २०२३-२४ करीता प्रवेश सुरु.*
*लवकरात लवकर प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा...!*
*संपर्क -*
*मुख्याध्यापक*
*पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर जि.धुळे.*
*Please Like Share and Subscribe* 🙏🙏
# # # # # # # # # # # # # # # #

पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल चा एस एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.शिरपूर:मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड ...
17/06/2022

पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल चा एस एस सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.
शिरपूर:मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत पांडू बापू माळी मुन्सिपल हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी घवघवीतत यश संपादन केले. बोर्ड परीक्षेत एकूण 369 बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेचा एकूण निकाल 96% लागला. सोनवणे अश्विनी राजेंद्र 91.20%, भोई हर्षदा सुनील 89.80% माळी विजय सुनील 89.80% महाजन राज तेजस 89% गुण मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार मा.अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल,माजी उपनगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे मुख्याधिकारी तुषार नेरकर माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण मुख्याध्यापक श्री के पी कुलकर्णी उपमुख्याध्यापक श्री ए एस कानडे पर्यवेक्षक श्री के एन काजी श्री एम एम बैसाणे श्री एस आर गवळी अधीक्षक श्री जे बी जाधव यांनी अभिनंदन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील श्रीमती जे एस सोनवणे श्रीमती एस जी वाडीले श्री ए एफ पावरा श्री बी एस राजपूत,श्री जे बी पावरा,श्री एन एन पाटील श्री व्ही पी सोनवणे,श्री एस डी माळी,श्री एस जे पावरा, श्री एस एस धाकड,श्री ए के गुजर श्री एस बी पवार श्री एम एल सैय्यद यांनी मार्गदर्शन केले.

*माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाळेविषयी ऋण*शिरपूर:पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत...
15/08/2021

*माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाळेविषयी ऋण*
शिरपूर:पां बा मा म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण समिती सभापती सौ.रेखा ताई सोनार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यालयाचे १९६६- ६७ वर्षाचे माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला नगराध्यक्ष सौ जयश्री बेन पटेल यांच्या शुभहस्ते झेरॉक्स मशीन भेट म्हणून दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ संगीता ताई देवरे यांच्या हस्ते विद्यालयाचे माजी शिक्षक श्री एस डी गिरासे,जे टी ईशी,ना. सु. चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष श्री प्रभाकर राव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेविका सौ.अरूणा थोरात,सौ.मोनिका शेटे,शेख नाजीराबी ,श्री किरण धाकड, मिर्झा इरफान बेग,माजी उपनगराध्यक्ष श्री गोकुळ सिंह राजपूत,श्री नरेंद्र जैन, डॉ सुभाष भंडारी, श्रीलक्ष्मीचंद अग्रवाल श्री नंदू अग्रवाल श्री नारायण स्वर्गे श्री वसंतभाई गुजराथी श्री मोतीलाल शर्मा श्री उदयसिंग चौधरी सौ.सुवर्णा शहा सौ. प्रमिला भंडारी, मुख्याध्यापक के पी कुलकर्णी उपमुख्याध्यापक ए एस कानडे पर्यवेक्षक के एन काजी एम एम बैसाणे एस आर गवळी अधिक्षक जे बी जाधव श्री बी एस राजपूत,श्री आर जी कोळी श्री एस बी पवार हे उपस्थित होते.
यावेळी डॉक्टर सुभाष भंडारी नरेंद्र जैन व जे टी ईशी यांनी शाळेविषयी आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.श्री प्रभाकर चव्हाण यांनी माजी विद्यार्थ्यांचे शाळेला भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री आर सी पावरा श्री के के पावरा श्री बी ए मोरे, श्री डी एच राजपूत, श्री निलेश गुजर श्री जे जी महाजन, श्रीमती एम पी चव्हाण, श्रीमती जे एन महाजन श्रीमती पी के पाटील श्री शशी माळी, दिपक जाधव,भीमा माथने, प्रफुल्ल मराठे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस व्ही गिरासे व वाय एन गिरासे यांनी केले

28/05/2021

*प्रवेश सुरु!!!!!!!*
११० वर्षे अविरत शिक्षणाचा ज्ञान यज्ञा चा प्रकाश संपूर्ण शिरपूर तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यात पोहचविणारी एकमेव शाळा पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल शिरपूर येथे *इ.५ वी ते १२ वी चे प्रवेश सुरु*....
*विद्यालयाचा अभिमान*-
# महाराष्ट्रात तीन हजार विद्यार्थी संख्या असलेली नगरपालिका संचलित एकमेव माध्यमिक शाळा
# इ १० वी व १२ वी परीक्षेत दरवर्षी घवघवीत यश
# विद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थी जगभर उच्च पदावर कार्यरत
# सर्व शासकीय शिष्यवृत्ती योजना चा लाभ
#भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय,भव्य मैदान, संगणक कक्ष, डिजिटल अध्यापन.
# कोरोना काळात नियमित ऑनलाईन अध्यापन.
* # आणि महत्वाचे कोणतीही प्रवेश फी नाही*
अजून बरेच काही..
म्हणून आजच प्रवेश निश्चित करा.
*संपर्क - मुख्याध्यापक*
*पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शिरपूर*

Address

Main Road
Shirpur
425405

Alerts

Be the first to know and let us send you an email when P B M M High School Shirpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to P B M M High School Shirpur:

Shortcuts

Share

Category