S.G.Vidyalay Vikharan - साने गुरुजी विद्यालय विखरण

  • Home
  • India
  • Shirpur
  • S.G.Vidyalay Vikharan - साने गुरुजी विद्यालय विखरण

S.G.Vidyalay Vikharan - साने गुरुजी विद्यालय विखरण साने गुरुजी सेमी प्राय.(तांत्रिक) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विखरण

    साने गुरुजी विद्यालयात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन "साजरा*विखरण- येथील साने गुरुजी सेमी प्राथ....
06/12/2024


साने गुरुजी विद्यालयात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन "साजरा*

विखरण- येथील साने गुरुजी सेमी प्राथ.तांत्रिक माध्य. उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.६ डिसेंबर २०२4 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर "महापरिनिर्वाण दिन" साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एच.ए.हिरे होत्या.यावेळी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व गीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.याप्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.एस.आर.बच्छाव ,उपशिक्षक श्री.एस.बी.विखरणकर यांनी आपल्या मनोगतातुन बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.एम.शिरसाठ यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. आर.सी.सिसोदे, पर्यवेक्षक श्री वाय.एम.पाटील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.

*साने गुरुजी विद्यालयात "कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर" पुण्यतिथी साजरी* विखरण - येथील साने गुरुजी सेमी प्राथ.तांत्रिक,...
30/11/2024

*साने गुरुजी विद्यालयात "कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर" पुण्यतिथी साजरी*
विखरण - येथील साने गुरुजी सेमी प्राथ.तांत्रिक,माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात किसान विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,थोर स्वातंत्र्यसेनानी,शिक्षण महर्षी,कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधिर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षकश्री.एस.आर.बच्छाव होते.यावेळी अध्यक्षांच्या हस्ते कर्मवीर अण्णा बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्तानेइ.8वी ची विद्यार्थिनी कु.मोहिनी मनोज पाटील हिने आपल्या भाषणातून " *स्वर्गीय अण्णा बाबांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान"* याविषयी आपले विचार मांडले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक श्री.एस.आर.बच्छाव यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय बाबांना अभिवादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.एम.शिरसाठ यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.सी.सिसोदे पर्यवेक्षक श्री.वाय एम पाटील, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.

 *साने गुरुजी विद्यालयात "संविधान दिन "साजरा* विखरण- येथील साने गुरुजी सेमी तांत्रिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया...
26/11/2024


*साने गुरुजी विद्यालयात "संविधान दिन "साजरा*
विखरण- येथील साने गुरुजी सेमी तांत्रिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 26 नोव्हेंबर *भारतीय संविधान दिन* उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.सी.सिसोदे होते.याप्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री एस.बी.विखरणकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व याविषयी सखोल माहिती दिली. यानिमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.एम. शिरसाठ यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.वाय.एम.पाटील,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

      *साने गुरुजी विद्यालयात 'वाचन प्रेरणा' दिन उत्साहात साजरा*विखरण-येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक,तांत्रिक, माध्यमिक...
15/10/2024


*साने गुरुजी विद्यालयात 'वाचन प्रेरणा' दिन उत्साहात साजरा*

विखरण-येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक,तांत्रिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर.सी.सिसोदे होते.यावेळी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री आर.पी.पवार यांच्या हस्ते करण्यात आले."*वाचन प्रेरणा दिन*" अंतर्गत वाचन कौशल्याचा विकास व्हावा, म्हणून पुस्तकांच्या निवडक पानांचे सामुहिक वाचन करण्यात आले व निवडक विद्यार्थ्यांकडून वाचलेल्या पुस्तकांची समीक्षा करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस.बी.विखरणकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. वाय.एम.पाटील,सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी उपस्थित होते.

*साने गुरुजी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी*विखरण- येथील साने गुरुजी सेमी प्राथम...
15/10/2024

*साने गुरुजी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी*

विखरण- येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक,तांत्रिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.सी.सिसोदे होते.यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्रा.श्री.एम. बी. पाटील श्री.वाय. एस.सावंत यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सेमी प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.यानिमित्ताने "श्रमदानातुन स्वच्छता" याद्वारे विद्यार्थ्यांनी शाळा व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री.एस.बी.विखरणकर यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री वाय.एम.पाटील,विद्यालयाचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना स्वच्छता प्रतिज्ञा देण्यात आली.
15/10/2024

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना स्वच्छता प्रतिज्ञा देण्यात आली.

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक विद्यालयात 14 सप्टेंबर राष्ट्रभाषा दिन साजरा करण्यात आला.
15/10/2024

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक विद्यालयात 14 सप्टेंबर राष्ट्रभाषा दिन साजरा करण्यात आला.

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे याचा कार्यक्रम घेतला गेला.
15/10/2024

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे याचा कार्यक्रम घेतला गेला.

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विखरण येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, किसान विद्या प्र...
15/10/2024

साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विखरण येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती, किसान विद्या प्रसारक संस्थेचे माजी सचिव स्व. दादासाहेब विश्वासरावजी रंधे यांचा स्मृतिदिन ,तसेच भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जयंती साजरी करण्यात आली.

*साने गुरुजी विद्यालयात पालक सभा संपन्न*विखरण- येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक, तांत्रिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या...
15/10/2024

*साने गुरुजी विद्यालयात पालक सभा संपन्न*
विखरण- येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक, तांत्रिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी पालक- शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तात्यासो.श्री.धोंडू झिंगा पाटील होते. याप्रसंगी गावातील आजी-माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
पालक सभेचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.सी.सिसोदे यांनी केले. तर उपशिक्षक श्री.एस.बी.विखरणकर यांनी पालकांशी संवाद साधून विद्यार्थी उपस्थिती, विविध शिष्यवृत्ती परीक्षा,विद्यार्थ्यांकडून होणारा मोबाईलचा अतिवापर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात राबवले जाणारे उपक्रम, इ.अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करून पालकांच्या समस्या समजून घेतल्या. या विचार सभेत दादासो श्री.तुषार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर तात्यासो.श्री.धोंडू झिंगा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून पालकांना मार्गदर्शन केले.या सहविचार सभेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पालक-शिक्षक संघ कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.दादासो श्री प्रवीण मार्तंड पाटील यांची पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.एम.शिरसाठ यांनी केले. सदर सभेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. वाय. एम.पाटील,विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

*साने गुरुजी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*विखरण- येथील साने गुरुजी सेमी,प्राथमिक, तांत्रिक माध्यमिक व उच...
15/10/2024

*साने गुरुजी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*
विखरण- येथील साने गुरुजी सेमी,प्राथमिक, तांत्रिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.९ ऑगस्ट २०२४ " *जागतिक आदिवासी दिन"* उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.सी.सिसोदे होते.याप्रसंगी विदयालयातील जेष्ठ शिक्षक श्री.ए.आर.पाटील यांच्या हस्ते जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी गीतांवर आधारित नृत्याचा कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदवला.इ.८ वी चा विद्यार्थी कु.मनीष दिनेश पाटील याने जननायक बिरसा मुंडा यांची वेशभूषा साकारली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सी. एम. शिरसाठ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.एस.बी.विखरणकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.वाय.एम.पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

  साने गुरुजी विद्यालयात "स्वातंत्र्य दिन" उत्साहात साजरा* विखरण - येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक,तांत्रिक, माध्यमिक व ...
15/10/2024


साने गुरुजी विद्यालयात "स्वातंत्र्य दिन" उत्साहात साजरा*

विखरण - येथील साने गुरुजी सेमी प्राथमिक,तांत्रिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट २०२४ "स्वातंत्र्य दिन "उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.सी.सिसोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने साने गुरुजी सेमी प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य केले तर इ.१० वी च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर लेझीम डान्स चे सादरीकरण गावातील मुख्य चौकात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.विखरणकर यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.वाय. एम.पाटील,विखरण गावाचे आजी -माजी सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Address

A/P Vikharan
Shirpur
425427

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.G.Vidyalay Vikharan - साने गुरुजी विद्यालय विखरण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category