Sadashivsheth R. Baviskar International School, Dahivad

Sadashivsheth R. Baviskar International School, Dahivad We have well equipped smart classrooms with well trained and experienced teachers.

We impart quality education based on activities, creativity, exploration, analysis and research in an pollution free green lush campus maintaining international standard.

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे बालिका दिवस व एन्थुसिया क्रीडामहोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी...
03/01/2026

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे बालिका दिवस व एन्थुसिया क्रीडामहोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी दि.०३ जानेवारी २०२६ शनिवार रोजी दहिवद येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूल येथे बालिका दिवस आणि दोन दिवशीय एन्थुसिया क्रीडामहोत्सव निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंपालाल पाटील केंद्रप्रमुख करवंद, प्रमुख पाहुणे म्हणून श्री रणजितसिंह ठाकूर केंद्रप्रमुख दहीवद, श्री चंद्रशेखर पाटील सर केंद्रप्रमुख पळासनेर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले श्री मयुर बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची सांगता पाहुण्यांच्या प्रत्येक हाउस प्रमुखाला बॅचेस लाऊन करण्यात आली. यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या समक्ष हेड गर्ल, हेड बॉयज हाउस प्रमुख यांच्या सोबत सर्व विद्यार्थांनी मार्च पास सादर केला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मयूर बोरसे क्रीडा शिक्षकाने वार्षिक शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.
यावेळी या एन्थुसिया क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष श्री चंपालाल पाटील केद्रप्रमुख करवंद श्री रणजितसिंह ठाकूर केंद्रप्रमुख दहीवद श्री चंद्रशेखर पाटील केंद्रप्रमुख पळासनेर चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले यांच्या हस्ते चार हाऊसप्रमाणे वर्गानुसार विद्यार्थांच्या वेगवेगळ्या मैदानी स्पर्धा खो-खो, कबड्डी, १०० मी ५० मी धावणे शर्यत, लिंबू चमचा, बुक ब्यलेंस,वाॅटर बाॅटल रस्सीखेच व्हाॅलीबाॅल बास्केटबॉल क्रिकेट या क्रीडा प्रकारांतील सर्व विजेत्यांचे मेडल प्रमाणपत्र ट्राफी भरघोस बक्षिसे देऊन अभिनंदन करण्यात आले.
या दोन दिवसीय एन्थुसिया क्रीडामहोत्सव प्रसंगी एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर, संचालिका सौ मानसी बाविस्कर, शाळेचे प्राचार्य सुभाषनाथ पटले, पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका निवेदिता दुबे, शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य परिश्रम लाभले.

एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये एन्थुसिया क्रीडामहोत्सवाचे शानदार उदघाटन दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी दि.०२ जानेवारी २०२६ ...
02/01/2026

एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये एन्थुसिया क्रीडामहोत्सवाचे शानदार उदघाटन
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी दि.०२ जानेवारी २०२६ शुक्रवार रोजी दहिवद येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूल येथे दोन दिवशीय क्रीडा महोत्सव या शानदार सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुहास अहिरे केंद्रप्रमुख श्री प्रवीण ठाकरे वरिष्ठ शिक्षक श्री दुष्यंत पाटील क्रीडा विभाग प्रमुख खो खो राज्यस्तरीय पंच श्री प्रज्वल महाले श्री तेजस पाटील संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले श्री मयुर बोरसे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून तसेच प्रत्येक हाउस प्रमुखाला बॅचेस लाऊन करण्यात आली. यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या समक्ष हेड गर्ल, हेड बॉयज हाउस प्रमुख यांच्या सोबत सर्व विद्यार्थांनी शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मयूर बोरसे क्रीडा शिक्षकाने वार्षिक शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.यावेळी या क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे श्री दुष्यंत पाटील यांनी भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अतिशय लयबद्ध सुंदररित्या रेड ब्लू येलो ग्रीन हाऊसेने मार्च पास सादर केला अप्रतिम असे विविध खेळांवर आधारित नृत्य सादर केल्याबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी शाळेतील जिल्हा, विभाग राज्य पातळीवर खेळाणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली. त्यानंतर चार हाऊसप्रमाणे वर्गानुसार विद्यार्थांच्या वेगवेगळ्या मैदानी स्पर्धा खो-खो, कबड्डी, शर्यत, लिंबू चमचा, बुक ब्यलेंस, रसीखेच या क्रीडा प्रकारांना सुरुवात झाली.
या क्रीडा महोत्सवाला एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर, संचालिका सौ मानसी बाविस्कर, शाळेचे प्राचार्य सुभाषनाथ पटले, पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका निवेदिता दुबे, शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत आहेत.

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बावीस्कर यांची ७५ वी जयंती साजरी दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: येथील...
16/10/2025

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बावीस्कर यांची ७५ वी जयंती साजरी
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: येथील टी एस बी फार्मसी कॉलेज आणि एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५/१०/२०२५ रोजी स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बावीस्कर यांची ७५ यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती डॉ आशाताई रंधे खजिनदार किविप्रसारक संस्था ,समाजसेवक श्री संजय सोनवणे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर,चेअरमन डॅा. धीरज बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले, टी. एस.बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ तुषार साळुंके प्रा चेतन भावसार सर या मान्यवरांचे हस्ते स्व. तुकारामशेठ सदाशिवशेठ बाविस्कर यांचे स्मारकावर पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
विद्यालयातील इ.९ वी - विद्यार्थी पार्थ बाविस्कर भावपूर्ण आदरांजली देताना सांगितले की स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बावीस्कर यांच्या कार्याविषयी माहितीपर भाषणे दिली. यात पार्थ बावीस्कर यांनी पप्पाजींच्या थोर व्यक्तिमत्व स्पष्ट केले तसेच फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि प्राचार्य डॉ तुषार साळुंके सरांनी स्व.पप्पाजी यांनी पाहिलेले ध्येय साकार करण्याची शपथ घेऊन पोस्टर प्रदर्शन आयोजित केले समाजसेवक श्री संजय सोनवणे यांनी सांगितले की गोरगरिबांचे शिक्षणाचे जे स्वप्न पप्पाजींनी पाहिले होते ते आज प्रत्यक्षात चेअरमन डॉ धीरज बाविस्कर सरांनी साकार केले याबददल त्यांचे कौतुक केले.यावेळी त्यांनी स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बावीस्कर यांचे जीवनचरित्र थोडक्यात मुलांना समजावून सांगितले.
त्यानंतर संस्थेचे चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर यांनी स्व तुकारामशेठ बाविस्कर यांनी स्वातंत्र्यसैनिक आदरणीय व्यंकटराव आण्णांचा ध्येय तत्वांचा वारसा वसा घेऊन बाविस्कर परिवाराला समाजसेवेचे जीवनध्येय दिले आज स्व पप्पाजींच्या आर्शीवादाने एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 1070 विद्यार्थी शिक्षण घेत असून टी एस बी फार्मसी कॉलेजचे 75 टक्के विद्यार्थी गोरगरीब आदिवासी समाजाचे असून सर्वाधिक गुणवत्ता यादीत येत आहेत.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती आशाताई रंधे यांनी बाविस्कर परिवाराने जो शिक्षणाच्या वसा हातात घेतला आहे त्याबद्दल कोतुक केले व त्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व सागिंतले व तसेच मुलांना यशाचा गुरुमंत्र देखील दिला. तसेच स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बावीस्कर यांची ७५ वी जयंती निमित्ताने शाळेत व्याख्यान करिअर मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात ८ प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत यात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सुनैना धनगर आणि आभार प्रदर्शन नरेश पाटील सर यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी टी एस बी फार्मसी कॉलेजचे व एस आर बी इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूल येथे  स्वातंत्र्यसैनिक स्व. सदाशिवशेठ रामदासशेठ बावीस्कर यांची १४३ वी जयंती साजरी दहिवद ता शिरप...
11/10/2025

एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्यसैनिक स्व. सदाशिवशेठ रामदासशेठ बावीस्कर यांची १४३ वी जयंती साजरी
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: येथील एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ११/१०/२०२५ रोजी स्वातंत्र्यसैनिक स्व. सदाशिवशेठ रामदासशेठ बाविस्कर यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष थाळनेरचे एपीआय आदरणीय श्री शत्रुघ्न पाटील साहेब सीनिअर पोलिस कांन्स्टेबल श्री उमाकांत वाघ सर आणि समाजसेवक आदरणीय श्री कांतीलाल बाविस्कर समाजसेवक श्री जी एल दादा समाजसेवक श्री दिलीप सावळे सर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर,चेअरमन डॅा. धीरज बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले, टी. एस.बी फार्मसी विभाग प्रमुख तुषार साळुंके प्रा चेतन भावसार सर उपस्थित होते.यावेळी आलेल्या या मान्यवरांचे हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्व.सदाशिवशेठ रामदासशेठ बाविस्कर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली .यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
विद्यालयातील इ.९ वी - विद्यार्थी पार्थ बाविस्कर विद्यार्थिनी अनुष्का पावरा निकीता पावरा इ.१० वीतील नंदिनी ठाकरे शालिनी चौरे यांनी स्वातंत्र्यसैनिक स्व.आप्पाजींच्या कार्याविषयी माहितीपर भाषणे दिली. यात पार्थ बावीस्कर यांनी आप्पाजींच्या थोर व्यक्तिमत्व स्पष्ट केले तसेच प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सरांनी स्वातंत्र्यसैनिक सदाशिवशेठ बाविस्कर यांनी गोरगरिबांसाठी कशाप्रकारे संघर्ष याबद्दल माहिती सांगितली.समाजसेवक श्री कांतीलाल बाविस्कर यांनी सांगितले की गोरगरिबांचे शिक्षणाचे जे स्वप्न आप्पाजींनी पाहिले होते ते आज प्रत्यक्षात चेअरमन डॉ धीरज बाविस्कर सरांनी साकार केले .याबददल त्यांचे कौतुक केले.यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक आप्पाजींचे जीवनचरित्र थोडक्यात मुलांना समजावून सांगितले तसेच .
संस्थेचे चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर यांनी अतिथी व विद्यार्थी समवेत आप्पाजींचे स्वप्न प्रकट केले व आप्पाजींचे आशीर्वादाने स्वप्न शिखराची एक-एक पायरी चढत आहोत, त्यामागे शिरपूरनगरीचे शिल्पकार आदरणीय आ.अमरिशभाई साहेब पटेल यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मिळणऱ्या मार्गदर्शनाच्या खूप मोठा हात आहे,त्यावेळी जर आप्पाजींनी हे स्वप्न बघितले नसते व पप्पाजींनी ते साकार करायला हिम्मत व मार्गदर्शन केले नसते आज हे साकार झाले नसते . त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष एपीआय आदरणीय श्री शत्रुघ्न पाटील सरांनी बाविस्कर परिवाराने जो शिक्षणाच्या जो वसा हातात घेतला आहे त्याबद्दल कोतुक केले व त्यांनी मुलांना शिक्षणाचे महत्व सागिंतले व तसेच मुलांना यशाचा गुरुमंत्र देखील दिला. तसेच स्व. सदाशिवशेठ रामदासशेठ बावीस्कर यांचा १४३ वी जयंती निमित्ताने शाळेत रंग मोहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात ८ प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले यात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री बी आर महाजन सर आणि आभार प्रदर्शन श्री तुषार साळुंके सर यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी एस आर बी इंटरनॅशनल स्कूल शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे गरबा दांडिया नवरात्र उत्सवाचे आयोजन दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: -एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध...
03/10/2025

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल येथे गरबा दांडिया नवरात्र उत्सवाचे आयोजन
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: -एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'गरबा दांडिया'चा जल्लोष; विद्यार्थ्यांनी अनुभवला पारंपरिक उत्साहाचा रंग नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वावर एस आर बी इंटरनॅशनल स्कूल (SRB International School) मध्ये भव्य गरबा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषा, उत्साहाचे वातावरण आणि संगीताच्या तालावर थिरकणारी विद्यार्थ्यांची पाऊले यामुळे शाळेचा परिसर एका मोठ्या उत्सव मंडपात बदलला होता.
संस्कृती आणि परंपरेचा संगम कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सौ ज्योत्स्ना पाटील सौ रेवती बडगुजर सौ सुनिता चौधरी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर यांच्या हस्ते दुर्गा मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करुन गरबा दांडिया नृत्य स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मैदानावर आयोजित या उत्सवात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गरबा आणि दांडियासाठी खास सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पारंपारिक गुजराती वेशभूषा परिधान केली होती. मुले-मुली रंगीबेरंगी चनिया चोली आणि केडियामध्ये खूपच सुंदर दिसत होते. त्यानंतर, पारंपारिक गरबा गीतांच्या आणि आधुनिक बीट्सच्या तालावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी गरबा आणि दांडियाच्या विविध स्टेप्स सादर करत प्रचंड उत्साह दाखवला.
उत्सवाचे मुख्य आकर्षण:* पारंपरिक गरबा: पहिला गट इयत्ता 1 ली ते 5 वी लहान मुलांनी गोल गरबा आणि पारंपरिक स्टेप्स सादर केल्या.दांडिया रास:दुसरा गट इयत्ता सहावी सातवी आणि तिसरे गटात आठवी ते दहावी मोठ्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दांडिया खेळत, लयबद्ध आणि आकर्षक नृत्य सादर केले. **उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार: उत्सवामध्ये पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'बेस्ट ड्रेस्ड' (उत्कृष्ट वेशभूषा) आणि 'बेस्ट डान्सर' (उत्कृष्ट नर्तक) या श्रेणीतील विजेत्यांना गरबा दांडिया नृत्य स्पर्धांचे परिक्षक सौ ज्योत्स्ना पाटील सौ रेवती बडगुजर सौ सुनिता चौधरी संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सर यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र ट्राॅफी देण्यात आले.
* पालकांचा सहभाग : स्वातंत्र्य पणे पालकांचा गटात काही पालकांनीही या उत्साहात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.यावेळी बोलताना शाळेचे प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सरांनी सांगितले, "या उत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि परंपरांची ओळख होते. गरबा-दांडियामुळे शारीरिक आणि मानसिक उत्साह वाढतो. शिक्षण आणि मनोरंजनाचा हा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे."
एस आर बी इंटरनॅशनल स्कूलचा हा नवरात्रोत्सव केवळ नृत्य-संगीताचा कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, सांस्कृतिक वारसा आणि एकोपा वाढवणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'जनजातीय गौरव दिन' उपक्रम अंर्तगत होळी नृत्य स्पर्धा दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: येथील स...
29/09/2025

एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'जनजातीय गौरव दिन' उपक्रम अंर्तगत होळी नृत्य स्पर्धा
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: येथील सदाशिव शेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूल येथे 'जनजातीय गौरव दिन'या उपक्रम अंर्तगत विशेष कार्यक्रमांचे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने जनजातीय गौरव दिन उपक्रम अंर्तगत शाळेतील आठवी ते बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी 'होळी नृत्य स्पर्धा' सादर करून आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे मनोहारी दर्शन घडवले.
दिनांक १७ सप्टेंबर रोजी आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सर यांच्या हस्ते होळीचे पूजन करुन वंदन करून करण्यात आले.यानंतर आठवी ते बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी नृत्याचे विविध प्रकार सादर केले. त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक नृत्यात आदिवासी समाजाच्या जीवनशैली, चालीरीती आणि सण-उत्सवांचे प्रतिबिंब दिसून आले. नृत्याच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी बांधवांच्या शौर्याची गाथा आणि निसर्गाशी असलेले त्यांचे अतूट नाते कलात्मकरीत्या व्यक्त केले.
'जनजातीय गौरव दिन' हा उपक्रम साजरा करण्याचा मुख्य उद्देश आदिवासी स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण करणे आणि त्यांच्या योगदानाला आदराने गौरवणे हा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थ्यांना देशाच्या विविध संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून दिली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या उत्कृष्ट नृतीकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे उपस्थितांनी कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे शाळेतील शिक्षक, पालक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस आर बी इंटरनॅशनल स्कूलला 'माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत तालुकास्तरीय तृतीय बक्षीस दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: महाराष्ट...
20/09/2025

एस आर बी इंटरनॅशनल स्कूलला 'माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत तालुकास्तरीय तृतीय बक्षीस
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित 'माझी शाळा, सुंदर शाळा' या राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार धुळे येथे आयोजित या शानदार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित धुळ्याचे खासदार डॉ.शोभा बच्छाव धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे सोनी कदम योजना शिक्षणाधिकारी पुष्पलता पाटील या मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले यांना एस आर बी इंटरनॅशनल स्कूलसाठी तालुकास्तरीय तृतीय पारितोषिक देण्यात आले.यावेळी मान्यवरांनी एक लाख रुपयांचे बक्षीसासह स्मृती चिन्ह प्रमाणपत्र शाळेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या अद्वितीय कामगिरीसाठी दिले.
शाळेने राबविले अनेक उपक्रम याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अध्ययन अध्यापनसाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञान सोयी सुविधांसह डिजीटल बोर्डांचे क्लासरुम दर्जेदार शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.यासह शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळण्यासाठी आणि परिसरात हिरवीगार जागा तयार करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले यासाठी अथक परिश्रम घेतले.या शाळेला मिळालेल्या बक्षिसाने शाळेने शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचे महत्त्वही जपले आहे. शाळेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर सरांनी या यशाचे श्रेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले आहे. यानंतर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत यशस्वी अनुष्का पावरा या नववीच्या विद्यार्थीनीस आणि शाळेचा कबड्डी खोखो संघांना जिल्हा स्तरावर मिळालेल्या यशासाठी पारितोषिक वितरण करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सरांनी सर्व विद्यार्थी शिक्षक पालकांचे अभिनंदन केले आहे.शाळेने पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन उत्कृष्ट कामगिरी केली.

एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कुलमध्ये स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बाविस्कर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन दहिवद ता शिरपूर प्...
07/09/2025

एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कुलमध्ये स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बाविस्कर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी:-येथील एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये टी एस बी फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ /०९/२०२५ रोजी स्व.तुकारामशेठ सदाशिवशेठ बाविस्कर यांची ५वी पुण्यातिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली व अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरव फाऊंडेशनचे संचालक व प्रसिद्ध लेखक श्री एम के भामरे सर, प्रमुख पाहुणे सी ए श्री किरण शेवाळे सर डाॅ रवि बाविस्कर समाजसेवक श्री अर्जुनजी चौधरी दहिवदचे सरपंच श्रीमती स्मिताताई पाटील संस्थेचे अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर,चेअरमन डॅा. धीरज बाविस्कर, संचालिका सौ. मानसी बाविस्कर, कु.सिद्धीका बाविस्कर पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे टी एस बी फार्मसी कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ तुषार साळुंके प्रा चेतन भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या ईशास्तवनाने केली. स्व. तुकारामशेठ सदाशिवशेठ बाविस्कर यांचे स्मारकावर पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
विद्यालयातील इ.९ वी तील विद्यार्थी पार्थ बाविस्कर, अनुराधा पावरा,आरुषी पावरा, नेहा अहिरे यांनी स्व.पपाजींच्या जीवनशैली विषयी माहितीपर भाषणे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम के भामरे सरांनी स्व.पप्पाजींचे जीवनचरित्र थोडक्यात मुलांना समजावून सांगितले तसेच उत्तम जीवन घडणा-या ह्या चिमुकल्यांना आशिर्वाद दिले. यानंतर संस्थेचे चेअरमन डॉ. धीरज तुकाराम बाविस्कर ह्यांनी अतिथी व विद्यार्थी समवेत पप्पांजींचे स्वप्न प्रकट केले व पप्पाजींच्या आशीर्वादाने स्वप्न शिखराची एक-एक पायरी चढत आहोत असे सांगितले. प्रमुख पाहुणे श्री किरण शेवाळे सरांनी आपल्या भाषणात मा. डॉ. धीरज बाविस्कर ह्यांनी आधुनिक युगास साजेल अशी अत्याआधुनिक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करून समाजात वेगळी ओळख निर्माण केली असुन शिक्षण क्षेत्रातील त्यांची प्रगती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थाच्या संचालिका सो मानसी बाविस्कर यांनी स्व .पप्पांजींचा आठवणींना उजाळा दिला. यानंतर सिद्धीका बाविस्कर समाजसेवक श्री अर्जुनजी चौधरी डॉ रवि बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मार्केट कमिटी चेअरमन श्री के डी पाटील सर यांनी यावेळी भावपूर्ण सदिच्छा संदेश पाठवला या कार्यक्रमाला एस आर बी इंटरनॅशनल स्कूल आणि टी एस बी फार्मसी कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामचे सुत्रसंचलन श्री हर्षवर्धन जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सुनैना धनगर मॅडम यांनी केले.

एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक द...
06/09/2025

एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या खास दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले याच्या हस्ते भारताचे पुर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास तयार केलेले गाणी आणि कविता सादर केल्या.काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे महत्त्व आणि समाजात त्यांचे योगदान यावर भाषणे दिली.शिक्षकांनी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल आणि निस्वार्थ सेवेबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर शाळेचे प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रसंगी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी आणि शाळेच्या सांस्कृतिक समितीने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीरा राजपूत आणि आभार प्रदर्शन श्री भटू धाकड सर यांनी केले.

एसआरबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेशोत्सवाचे उत्साहात आगमन दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी:येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेश ...
01/09/2025

एसआरबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेशोत्सवाचे उत्साहात आगमन
दहिवद ता शिरपूर प्रतिनिधी:येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून गणेशाची मूर्ती ढोल-ताशांच्या गजरात शाळेत आणली. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संचालिका सौ मानसी बाविस्कर यांच्या हस्ते श्री गणेश वंदना आणि आरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व सांगणारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात पारंपरिक नृत्ये, भक्तिगीते आणि गणेशाच्या जन्मावर आधारित एक छोटी नाटिका सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः मातीपासून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
यानंतर शाळेच्या प्राचार्य श्री सुभाषनाथ पटले यांनी विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना सांगितले, "गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही, तर तो एकता, कला आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी या उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी जोडले जावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे."या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सणांचा आनंद आणि सांस्कृतिक मूल्यांविषयीची आवड निर्माण झाली.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल आणि टी एस बी फार्मसी कॉलेज येथे श्रीकृष्ण मंदिराचे नूतनीकरण व गोकुळाष्टमी उत्साहाने साजरादहिवद ...
16/08/2025

एस आर बी इंटरनॅशनल स्कूल आणि टी एस बी फार्मसी कॉलेज येथे श्रीकृष्ण मंदिराचे नूतनीकरण व गोकुळाष्टमी उत्साहाने साजरा
दहिवद ता शिरपूर दि. १६ प्रतिनिधी - येथील एस आर बी इंटरनॅशनल स्कूल आणि टी एस बी फार्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या प्रांगणात श्रीकृष्ण मंदिराचे नुतनीकरण शुभारंभ आणि गोकुळाष्टमी सण चैतन्यमय भक्तीमय वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उद्योगपती आदरणीय श्री भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिराचे नूतनीकरण शुभारंभ आणि गोकुळाष्टमीच्या उत्सवाच्या आरंभ करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल आणि सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल तसेच परमपूज्य राजू बाबा भोजने संस्थेचे अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर राष्ट्रउदयचे संपादक श्री सुभाषजी कुळकर्णी सौ सुषमाताई कुळकर्णी पिपल्स बॅंकेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ चौधरी सौ कल्पनाताई चौधरी प्रसिद्ध अभियंता श्री योगेशजी गुजराथी सौ रुपल गुजराथी चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारित गीत नृत्य नाट्य एस आर बी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कान्हा सो जा रे आणि टी एस बी फार्मसी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी रणछोड रंगीला हे गीत नृत्य नाट्य सादरीकरण करुन भक्तीमय प्रसंग चैतन्यमय वातावरण निर्माण केले.यानंतर शिरपूरचे माजी नगराध्यक्ष श्री भुपेशभाई पटेल साहेब व सौ कृतीबेन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते श्रीकृष्णाची आरती पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षवर्धन जाधव सुनैना धनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बी आर महाजन सरांनी केले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर संस्थेचे चेअरमन डॉ धीरज बाविस्कर संस्थेच्या संचालिका सौ मानसी बाविस्कर प्राचार्य सुभाषनाथ पटले पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे टी एस बी फार्मसी कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा तुषार साळुंके प्रा चेतन भावसार व एस आर बी इंटरनॅशनल स्कूल आणि टी एस बी फार्मसी कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Address

Chopada Fata, Dahiwad Tal. Shirpur Dist. Dhule – (Maharashtra – India)
Shirpur
425405

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadashivsheth R. Baviskar International School, Dahivad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category