BNKG Waghadi ब ना कुं गुरुजी माध्य विद्या वाघाडी

  • Home
  • India
  • Shirpur
  • BNKG Waghadi ब ना कुं गुरुजी माध्य विद्या वाघाडी

BNKG Waghadi ब ना कुं गुरुजी माध्य विद्या वाघाडी बळीराम नागोजी कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी ता.शिरपूर जि. धुळे

27/07/2024
ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा💐💐...
30/01/2024

ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा💐💐
ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी विद्यालयातर्फे राष्ट्रपिता गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनव माल्या पण श्री बडगुजर सर व पिके पाटील सर यांनी केले .तर हुतात्मा दिन का पाळला जातो या संदर्भात श्री पिके पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले सूत्रसंचालन श्री मोरे सर यांनी केले तत्पूर्वी हुतात्मादिनानिमित्त ठीक अकरा वाजता विद्यालयात एक मिनिट स्तब्ध उभे राहून मौन पाळूनहुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली .याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोठारी मॅडम ,श्री सोनवणे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनी उपस्थित होते💐💐💐

आज दी 27/7/24 रोजी आमच्या ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे कीर्तनातून समाज प्रबोधन करणारी  अर्थें येथील ...
27/01/2024

आज दी 27/7/24 रोजी आमच्या ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे कीर्तनातून समाज प्रबोधन करणारी अर्थें येथील रहिवासी व पा रा घोगरे उच्च माध्यमिक विद्यालय, शिरपूर ची विद्यार्थिनी कु साक्षी पाटील या विद्यार्थिनी स कीर्तनातून शालेय प्रबोधनासाठी आमंत्रित करण्यात आले होते . तिने आपल्या कीर्तनातून शाळा गुरुजन व शिस्त कशी जोपासावी हे विद्यार्थ्या समोर मांडले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कोठारी यांनी तिचा सत्कार करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी पर्यवेक्षक श्री सोनवणे सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी 💐💐भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर विद्यालया...
27/01/2024

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी 💐💐भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वाघाडी गावाच्या मुख्य रस्त्यावरील शिवाजी चौकात बालविवाह प्रतिबंधक कायदा अंतर्गत पथनाट्य सादर करताना.

आज ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्...
26/01/2024

आज ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कोठारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाडी गावातील सर्व सरपंच उपसरपंच विविध पदाधिकारी व सदस्य,शालेय विविध समित्या यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विद्यालयातील पर्यवेक्षक श्री सोनवणे सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी यांच्याउपस्थितत राष्ट्रीय तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली. सदर शपथ शिक्षक श्री शिव मोरे यांच्यानंतर सर्वांनी घेतले व यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित देशभक्ती पर गीते व एक पात्र एकपात्री अभिनय नाटिका घेण्यात आली.

26/01/2024

आज ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या वाघाडी गावाचा सुपुत्र व आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी शहीद मनोज माळी यांच्या आईच्या(सौ सुरेखा) भूमिकेतून शहीद मनोज माळी याचं जीवनपट उलगडणारे एक पात्री प्रयोग सादर करताना आमच्या विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.भाविका अनिल माळी.तिने सादर केलेल्या या मनोगतात विद्यालयातील उपस्थितांची मनी निश्चितच हे लावली व अनेकांनी तिच्यावर बक्षीस देखील दिली.

ब ना कुंभार गुरुजी  माध्यमिक विद्यालय व दादासो  व्हि व्हि रंधे प्रधामिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानेभारता चां 75 व...
26/01/2024

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय व दादासो व्हि व्हि रंधे प्रधामिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानेभारता चां 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचाराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कोठारी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष नगर व वाघाडी गावाचे दोन्ही सरपंच श्री विजय सुकलाल पवार व श्री किशोर माळी तसेच उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित होते हेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सोनवणे सर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनी उपस्थित होते आणि तंबाखूमुक्त अभियान अभियानांतर्गत तंबाखू सेवन विरोध शपथ घेतली.सर्व कार्यक्रमाची सूत्रे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे यांनी घेतली .याप्रसंगी विद्यालयात देशभक्तीपर गीतांचा स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला इयत्ता 5 वी ते 10 च्या गटातून प्रथा तीन क्रमांक निवडण्यात आले .तसेच विद्यालयातील 9 वी चीविद्यार्थिनी कु.भाविकां अनील माळी या विद्यार्थ्यांनी ने ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी या विद्यालयाचा विद्यार्थी शहीद मनोज माळी हिच्या आईची भूमिका करून आपल्या मनोगतातून, एकपात्री अभिनयातून वाघाडी गावचा शहीद मनोज माळी याचा जीवनपट उलगडून दाखवला व याप्रसंगी सर्वच उपस्थित यांची मने हेलावले व त्यांच्या डोळ्यात पाणी देखील आले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे खाऊ वाटप करून व स्वामी विवेकानंद समितीतर्फे लाडू वाटप करून करण्यात आले व नतर शालेय विद्यार्थी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण स उपस्थित होते.

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत नूतन विद्यालयाच्या  इमारतीत वृक्ष...
25/01/2024

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत नूतन विद्यालयाच्या इमारतीत वृक्षारोपण 🌲🌲कार्यक्रम🌹🌹आमच्या ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार माननीय ताईसो आशाताई रंधे यांच्या शुभहस्ते नूतन इमारतीच्या प्रांगणात अशोक वृक्षाच्या झाडांची लागवड करण्यात आली .याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कोठारी मॅडम ,पर्यवेक्षक सोनवणे सर एस पी डी एम महाविद्यालय प्राध्यापिका सौ मनीषा पाटील व विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर वृक्षांचे 🌳🌳योग्य जोपासना करा व या वृक्षांचे निश्चितच विद्यालयाच्या सुशोभीकरणात भर पडेल असे संस्थेच्या विश्वस्त आदरणीय ताईसो आशा ताई यांनी याप्रसंगी सांगितले व व विद्यालयाचे कामकाज बद्दल समाधान व्यक्त केल🌹🌹

ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय मतदार दिवस साजरा 💐💐 ब  ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे येथे आज दिनांक 25...
25/01/2024

ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय मतदार दिवस साजरा 💐💐 ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे येथे आज दिनांक 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात आला या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यालयाचे शिक्षक श्री बड गुजर सर यांनी मतदानाचे महत्त्व विषद केले. तर श्री सी यू मोरे सर यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून मतदार प्रतिज्ञा वदऊन घेतली.तसेच मतदान जनजगृती समाजात निर्माण व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने वाघाडी गावातील व सुभाष नगर येथील परिसरात मतदार दिन संदर्भात विविध घोषणा देत मतदार रॅली काढन्यात आली या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कोठारी मॅडम,पर्यावेंक्षक सोनवणे सर,सर्व सहकारी शिक्षकबंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले💐💐

ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी🌹🌹आज दिनांक 23 जानेवारी रोजी आमच्या कु...
23/01/2024

ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी🌹🌹
आज दिनांक 23 जानेवारी रोजी आमच्या कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे आझाद हिंद सेना ची स्थापना करणारे,तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगाअसे देशाला सांगणारे भारत मातेचे महान उपासक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती ची कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोठारी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयातील आंतरवासिता जयश्री मॅडम व श्री वी पी मोरे सर यांच्या हस्ते श्री सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले या वेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री बडगुजर सर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात त्यांचे राजकीय व स्वातंत्र्यासाठीची कार्य या संदर्भात सखोल माहिती विद्यार्थी ना दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजपूत सर यांनी केले श्रीमती शिरसाठ मॅडम , चित्ते मॅडम , खंडाळकर मॅडम श्री दीपक भाऊसाहेब विलास भाऊ यांची उपस्थिती देखील महत्त्वाची होती💐💐

18/01/2024

ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय हात धुवा प्रात्यक्षिकातून स्वच्छतेचे मार्गदर्शन__ वाघाडी ब ना कुंभार माध्यमिक विद्यालय वाघाडी येथे निरोगी आयुष्यासाठी शरीर स्वच्छतेची आवश्यकता आहे.शरीर स्वच्छता ही हाताच्या स्वच्छते पासूनच होते आणि म्हणूनच ब ना कुंभार माध्यमिक विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आज हात धुण्याचे प्रशिक्षण विद्यालयातील उपशिक्षक श्री मोरे सी यु यांनी मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता कोठारी मॅम व पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा समोर दाखवले. सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी सहकार्य केले .

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघडी येथे मुख्यमंत्री प्रथमोपचार पेटी वापर या संदर्भात प्रबोधन 💐💐 ब  ना कुंभार गुर...
18/01/2024

ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघडी येथे मुख्यमंत्री प्रथमोपचार पेटी वापर या संदर्भात प्रबोधन 💐💐 ब ना कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी येथेआज दिनांक 18/ 1/ 2024 रोजी माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटी त्यातील साहित्य व त्याचा उपयोग या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कोठारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रथमोपचार पेटी ची आवश्यकता, त्यातील साहित्य औषधी, घ्यावयाची काळजी त्याचा वापर का व कसा करायचा या संदर्भात विद्यालयाचे उपशिक्षक श्री सी यु मोरे सर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच ते साहित्य विद्यार्थ्यांना हाताळायला दिले. विद्यार्थ्यांनी ही त्या संदर्भात माहिती जाणून घेतली. या जनी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Address

Waghadi
Shirpur
425405

Telephone

+9673579999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BNKG Waghadi ब ना कुं गुरुजी माध्य विद्या वाघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to BNKG Waghadi ब ना कुं गुरुजी माध्य विद्या वाघाडी:

Shortcuts

Share

Category