Mbvpsमातोश्री बनुमाय विकास प्राथमिक शाळा शिरपूर

  • Home
  • India
  • Shirpur
  • Mbvpsमातोश्री बनुमाय विकास प्राथमिक शाळा शिरपूर

Mbvpsमातोश्री बनुमाय विकास प्राथमिक शाळा शिरपूर मातोश्री बनुमाय विकास सेमी प्राथमिक शाळा शिरपूर ता. शिरपूर जि.धुळे

किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर आयोजित व्यंकटेश कला व क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये मातोश्री बनुमाय विकास प्राथमिक विद्या...
08/01/2025

किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर आयोजित व्यंकटेश कला व क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये मातोश्री बनुमाय विकास प्राथमिक विद्या मंदिर शिरपूर येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवून घवघवीत यश संपादन केले व विविध खेळत मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्राप्त केले ते काही क्षण

29/12/2023

आज दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी मातोश्री बनुमाय विकास प्राथमिक विद्यामंदिर शिरपूर व सौ सावित्री ताई रंधे माध्यमिक विद्यालय...
02/12/2023

आज दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी मातोश्री बनुमाय विकास प्राथमिक विद्यामंदिर शिरपूर व सौ सावित्री ताई रंधे माध्यमिक विद्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात , ज्यांच्या अंगी धैर्य, परोपकार , शौर्य , निर्भयता अश्या सर्वगुण संपन्न ,अशा आपल्या आजी लोकमाता मातोश्री बनुमाय यांच्या स्मृतीदिनामित्त विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात गीत गायन , वकृत्व , व निबंध लेखन स्पर्धा हे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाला आमच्या मार्गदर्शिका , प्राचार्या आदरणिय ताईसाहेब सारीका रंधे तसेच पर्यवेक्षक देसले बापु , मातोश्री बनुमाय प्राथ . शाळेचे मुख्याध्यापक श्री आर बी पाटील या प्रमुखांची उपस्थिती लाभली, नियोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोपाल जाधव सर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध कला, क्रीडा ,शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला

28/09/2023
आज दि . 26/09/2023 रोजी मातोश्री बनुमाय प्राथ विकास विद्या मंदीर शिरपुर या विद्यालयात पालक व्यवस्थापन समिती पुनर्गठन 202...
26/09/2023

आज दि . 26/09/2023 रोजी मातोश्री बनुमाय प्राथ विकास विद्या मंदीर शिरपुर या विद्यालयात पालक व्यवस्थापन समिती पुनर्गठन 2023 निमित्ताने माता पालक सभा आयोजित करण्यात आली , सभेला प्रमुख पाहुणे म्हणुन कि .वि .प्र . संस्थेचे व्यवस्थापक व आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब ए. ए . पाटील व कार्यकुशलता व उपक्रमशिलता आणि कुशल नेतृत्व असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका , प्राचार्या ताईसाहेब सारीकाताई रंधे यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली , विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री .आर.बी. पाटील सर यांनी प्रस्ताविक सादर केले व कार्यक्रमाचे सुत्र संचन उपशिक्षक श्री महेश ठाकरे यांनी केले तसेच वर्ष भरातील राबवलेल्या उपक्रमाचे स्लाइडिंग प्रेझेंटेशन सुयोग माळी यांनी केले कार्यक्रमाला माता व पालकांचा उत्तम प्रदिसाद मिळाला त्याच प्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या ताईसाहेब रंधे यांनी सर्व पालकांना मोलाचे मार्गदर्शन करून स्त्री शिक्षणाचे महत्व आणि त्यात पालकांचे योगदान याबाबत् सर्वांशी चर्चा करून जागृत माता पालकांच्या अडचणीचे समाधान होईल असे मार्गदर्शन लाभले तसेच मातोश्री बनुमाय प्राथ. विद्यामंदीर शिरपुर येथील सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. व पालक , शिक्षक, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या सर्वांच्या संमतीने पालक व्यवस्थापन समिती 2023-24 चे अध्यक्ष म्हणून आदरणिय अण्णासाहेब ए .ए . पाटील यांची नेमणुक करण्यात आली🌹🌹👏

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे अभियंता दिन व स्नेह मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्...
21/09/2023

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे अभियंता दिन व स्नेह मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे अधीक्षक अभियंता विवेकजी नवले होते प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे संदीप तात्या महाले शीतलभैया नवले कार्यकारी अभियंता आर आर पाटील संदीपजी पंडागळे मुकेशजी ठाकूर ए बी वाघजी पांडव जी हे होते यावेळी जिल्ह्यातील सर्व कंत्राटदार व अभियंता बांधव उपस्थित होते.

आज दि. १९/०८/२०२३ रोजी तृणधान्यातून तिरंगा निर्मिती स्पर्धेत इ.४थी अ च्या वर्गातील प्रथम,द्वितीय, व तृतीय आलेले विद्यार्...
19/08/2023

आज दि. १९/०८/२०२३ रोजी तृणधान्यातून तिरंगा निर्मिती स्पर्धेत इ.४थी अ च्या वर्गातील प्रथम,द्वितीय, व तृतीय आलेले विद्यार्थी यांना बक्षीस सौ.सावित्रीताई रंधे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या व आमच्या मार्गदशिका श्रीम.सारिकाताई रंधे व उप प्राचार्य कापडे बापू सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर बी पाटील सर यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले यात सर्व शाळेतील शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले.

आज १४ ऑगस्ट २०२३ रोजी मातोश्री बनुमाय विकास प्राथमिक विद्या मंदिर शिरपूर शाळेत तृनधान्यातून तिरंग्या झेंड्याची निर्मिती ...
14/08/2023

आज १४ ऑगस्ट २०२३ रोजी मातोश्री बनुमाय विकास प्राथमिक विद्या मंदिर शिरपूर शाळेत तृनधान्यातून तिरंग्या झेंड्याची निर्मिती हा कार्यक्रम घेण्यात आला त्यात इ.४ थी अ च्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कृतीतून उत्कृष्ट ३ नंबर काढण्यात आले. कार्यक्रमाला आमच्या मार्गदर्शिका व सौ.सावित्रीताई रंधे कन्या विद्यालयाच्या प्राचार्य सौ.सारिकाताई रंधे व उपप्राचार्य श्री.कापडे बापू पर्यवेक्षक श्री.देसले बापू व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.बी.पाटील सर यांची उपस्थिती लाभली.सर्वांचे धन्यवाद

18/04/2023

उत्तम,दर्जेदार व आधुनिक युगातील शिक्षणासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आमच्या शाळेत निश्चित करा 🙏🙏 shirpur

*महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत किसान विद्या प्रसारक संस्थेचे माजी विद्यार्थी डाॅ. अर्जुन पावरा यांची 'उपजिल्हाधिकारी'पदी...
01/03/2023

*महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत किसान विद्या प्रसारक संस्थेचे माजी विद्यार्थी डाॅ. अर्जुन पावरा यांची 'उपजिल्हाधिकारी'पदी निवड*
शिरपूर - येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मातोश्री बनुमाय प्राथमिक विद्यालय येथे प्राथमिक व क्रांतिवीर शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय, वरवाडे शिरपूर येथून माध्यमिक शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी डाॅ. अर्जुन गुंजार्‍या पावरा हे महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत 'उप जिल्हाधिकारी' पदासाठी अनुजमातीतून राज्यात 'प्रथम क्रमांका'ने उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. भाऊसाो. डाॅ. तुषारराव रंधे, संस्थेचे सचिव तथा कवयित्री बहिणाबाई उमविचे सिनेट सदस्य, शिक्षकनेते मा. नानासाो. निशांतजी रंधे, संस्थेच्या खजिनदार, समाजसेविका मा. आईसाो. आशाताईजी रंधे यांचे सह संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

Address

शिरपूर
Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mbvpsमातोश्री बनुमाय विकास प्राथमिक शाळा शिरपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mbvpsमातोश्री बनुमाय विकास प्राथमिक शाळा शिरपूर:

Shortcuts

Share