19/02/2025
सय्यद सादात एज्युकेशन सोसायटी, उर्दू-इंग्रजी बालवाडी आलास चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
सय्यद सादात एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू-इंग्रजी बालवाडी आलास ने अत्यंत उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जोमाने सहभाग घेतला, तर पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या आनंददायी सोहळ्याला चेअरमन, व्हाईस चेअरमन व मौलाना यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालवाडी मॅडम व सन्माननीय अध्यक्षांचे विशेष आभार मानण्यात आले.
त्याचप्रमाणे, इशाअतुल उलूम उर्दू हायस्कूल आलास ने देखील विद्यार्थ्यांना वार्षिक सहशालेय उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित केले. याप्रसंगी मुख्याध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते.