प्रयोगातून विज्ञान

प्रयोगातून विज्ञान प्रयोग व विज्ञान यांची सांगड घालण्याचा छोटासा प्रयत्न

26/04/2020
राष्ट्रीय विज्ञान दिन व रामन परिणामरामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले.लोकसत्ता टीम | ...
28/02/2017

राष्ट्रीय विज्ञान दिन व रामन परिणाम

रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले.
लोकसत्ता टीम | February 28, 2017 3:38 AM

पदार्थावर प्रकाशकिरण टाकले असता पदार्थाची संरचना व गुणधर्मानुसार त्यांचे विकिरण (Diffractc) होते. सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी आपल्या के. एस. कृष्णन, के. आर. रामनाथन व अन्य सहकाऱ्यांबरोबर विविध पदार्थावर प्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणावर संशोधन केले.
रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले. त्या पदार्थातून बाहेर पडणारा प्रकाश तपासून पाहिला असता, त्यांना प्रकाशाच्या तरंगलांबीत बदल झालेला दिसला.
पारदर्शक माध्यमातून प्रकाश जात असताना माध्यमाच्या अणूत किंवा रेणूत प्रकाशाची ऊर्जा काही प्रमाणात शोषली जाते. या शोषलेल्या ऊर्जेची अणूत किंवा रेणूत आंतरक्रिया होते. अणुरेणूंतील ऊर्जास्तरात बदल घडून येतात. हे बदल कायम स्वरूपाचे नसले तर शोषलेली ऊर्जा परत उत्सर्जति केली जाते. विकिरित प्रकाश हाही ऊर्जा उत्सर्जनाचाच एक प्रकार आहे. विकिरित प्रकाशाची तरंगलांबी (वेव्हलेंथ) मूळ प्रकाशापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. त्यानुसार विकिरित प्रकाशाच्या वर्णपटात मूळ प्रकाशाच्या रेषांच्या आधी किंवा नंतर अतिक्षीण अशा रेषा आढळतात. या क्षीण रेषांच्या स्थानांवरून आणि त्यांच्या दीप्ती (इंटेसिटी)वरून अणुरेणूंमधील ऊर्जेच्या स्तराविषयी माहिती मिळते. रेणूतील वेगवेगळ्या अणूंमधील बंध कशा प्रकारचे आहेत याचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे रेणूंच्या संरचनेचे आकलन होऊ शकते. प्रा. रामन यांनी ही बाब प्रत्यक्ष पुराव्यानिशी ती सिद्ध केली.
हा शोध त्यांनी ‘नेचर’ या ब्रिटिश नियतकालिकास फेब्रुवारी १९२८ मध्ये पत्राद्वारे कळविला. रामन यांचे हेच संशोधन ‘रामन-परिणाम’ या नावाने जगद्विख्यात आहे. या शोधाकरिताच त्यांना नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. रेणवीय संरचना व प्रारण यासंबंधी पुढे झालेल्या संशोधनावर रामन परिणामाचा इतका मोठा प्रभाव पडला की, रामन यांना आधुनिक भौतिकीच्या इतिहासातील एक आद्य विचारवंत म्हणून मान्यता मिळाली.
भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा सरकारने त्या वेळचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. वसंतराव गोवारीकरांकडे यासाठी सुयोग्य दिवस कोणता याची चौकशी केली. डॉ. गोवारीकरांनी कोणाचा जन्मदिन-मृत्युदिन न निवडता भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी जगासमोर मांडला तो दिवस निवडला; तोच तो आजचा विज्ञान दिन २८ फेब्रुवारी.

जय हिंद
15/02/2017

जय हिंद

28/08/2016

आय बी बोर्ड वैज्ञानिकशिक्षण पद्धतीचे नवे दालन( स्रोत- दैनिक सकाळ)

पहिली ते आठवी परीक्षा बंद' असा नियम निघाला आणि विविध शिक्षणतज्ज्ञांनी यावर आपली मते मांडली.. काहींनी त्यावर प्रखर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी (बळजबरीने) स्वागत केले. जागतिकीकरणाच्या बदलांमध्ये शिक्षण क्षेत्रातही अनेक बदल होत आहेत. 'शालेय पातळीवर परीक्षा नको' हा त्यापैकीच एक बदल. प्रचलित परीक्षा पद्धत खरंच सर्वोत्कृष्ट आहे की नाही, वा त्याला उपलब्ध असलेले पर्याय यांवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.

माझ्या मते, 'विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास' हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट परीक्षा पद्धतीतून क्वचितच सफल होते. परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्‍यात बदाबदा माहिती ओतणे म्हणजेच 'शिकवणे' आणि ती माहिती जशीच्या तशी परीक्षेमध्ये उतरवणे म्हणजे 'ज्ञानप्राप्ती'! यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीत विधाने, व्याख्या, नियम यांची घोकंपट्टी रुजली. विज्ञानात प्रयोगांचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही प्रयोगांना विज्ञान शिक्षणाचे माध्यम बनविण्याची गरज वाटली नाही.

सर्वसाधारणत:, 60 संख्या असलेल्या आपल्या वर्गांमध्ये एक-दोन विद्यार्थी उत्तम आकडेमोड अथवा स्मरणशक्तीच्या जोरावर परीक्षेत गुण मिळवित असतील, तर त्यांना आपल्याकडे 'हुशार' मानले जाते आणि इतर विद्यार्थी 'सर्वसाधारण' किंवा 'ढ' म्हणून विभागले जातात. स्मरणशक्ती किंवा उत्तम आकडेमोडीच्या आधारावर केलेली विभागणी 'सर्वसाधारण' व 'ढ' समजल्या गेलेल्या मुलांसाठी धोकादायक होऊ शकते. 'तारें जमीन पर'मधली 'एव्हरी चाईल्ड इज स्पेशन' ही आमीर खानने मांडलेली संकल्पना आपल्या प्रचलित परीक्षाकेंद्रीत पद्धतीमध्ये कुठेच समाविष्ट होत नाही.

चाकोरीबद्ध, शिस्तीच्या बडग्याखालची आणि परीक्षाकेंद्रीत पद्धत विद्यार्थ्यांची खरी जिज्ञासा वाढविते का? विद्यार्थी हे खरंच जिज्ञासू असतात. सलग पाच वर्षे परदेशात शालेय शिक्षक म्हणून काम केल्यावर मला आपली विज्ञान शिक्षण पद्धती आणि आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीतील फरक लक्षात आला. आधुनिक विज्ञान शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी फक्त परीक्षा हेच एक माध्यम नाही. परीक्षा पद्धतीला पर्याय काय आणि कसा, याचा उहापोह करण्यासाठीच हा लेख..

दहावी, बारावी बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई आणि आयजीसीएसई याप्रमाणेच शिक्षणक्षेत्रात 'आयबी' (International Baccalaureate) हे नवीन बोर्ड उदयास आले आहे. त्याची सुरवात स्वित्झर्लंडमध्ये झाला. सध्या भारतामध्येही पुणे, मुंबई, बंगळूर, दिल्लीमध्ये काही प्रमाणात या 'आयबी' शाळा आहेत. या 'आयबी' शाळा आणि त्यांच्या विज्ञान शिक्षण पद्धतीची आपण थोडक्‍यात ओळख करून घेऊ.

'प्रचलित परीक्षा पद्धतीला पर्याय' या विचारातून 'आयबी'ची सुरवात 1982 च्या दरम्यान झाली. गेल्या 30 वर्षांत चीन, मलेशिया, जपान आणि आफ्रिकेतील देशांत 'आयबी' शाळांची संख्या वाढत आहे. 'आयबी'मध्ये विज्ञान शिक्षणाची एक विशिष्ट चाकोरी आढळून येत नाही. शिक्षकांना इतर विषयांतील आंतरसंबंध जाणीवपूर्वक साधावा लागतो. 'इतिहासातील विज्ञानाची परिस्थिती' यावर मुलांना खोलवर संशोधन करण्याची मुक्तता आहे. उदाहरणार्थ, '15 व्या शतकातील महिला मासिक पाळीत आपल्या शरीराची वैज्ञानिक पद्धतीने कशी काळजी घेत होत्या' ही इयत्ता सातवीच्या वर्गासाठी संशोधनांतर्गत परीक्षा होती. वर्गातील विद्यार्थ्यांच्या गटाने इंटरनेटच्या मदतीने विविध स्रोतांद्वारे माहिती संकलित केली आणि त्याचे सविस्तर विश्‍लेषण करून त्याचे दिलेल्या वेळेत उत्कृष्ट सादरीकरण केले. गटातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला काहीतरी काम आले पाहिजे, ही त्या परीक्षेमधील सर्वांत महत्त्वाची अट होती. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना नियोजन, कामाची विभागणी, तर्कशुद्ध विचार करणे, सृजनशीलता ही आणि इतर अनेक मूल्ये अप्रत्यक्षरित्या विज्ञान विषयातून शिकविली जातात. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाच्या कामाचे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांनी केलेले कामाचे नियोजन, सादरीकरण, तर्कशुद्ध विचार, कामाची विभागणी आणि सृजनशीलता या पातळ्यांवर केले गेले.

विज्ञान शिक्षणात प्रयोगाचे महत्त्व असल्याने 'आयबी' शिक्षणात प्रयोगाला फारच वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात येते. आमच्या शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून प्रयोगाची आखणी करतात, निरीक्षणाची खातरजमा करतात व चर्चाही करतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे प्रयोगवहीत छापलेले प्रयोग करून घेण्याचा अट्टाहास या 'आयबी' शाळांमध्ये मुळीच नसतो. उदाहरणार्थ, इयत्ता सहावीच्या वर्गात सूक्ष्मजीव शिकवताना आम्ही चक्क 'यीस्ट' सूक्ष्मजीव वापरून ब्रेड बनविण्याचाच प्रयोग करण्याचा बेत आखला. प्रत्येक गटाने वेगवेगळी गृहितके मांडली आणि त्याप्रमाणे काम केले. काम संपल्यानंतर, म्हणजेच प्रयोग झाल्यानंतर आपापले निष्कर्ष तपासून पाहिले. या प्रकारच्या परीक्षेत प्रत्येक गटाने मांडलेली गृहितके, कामाची विभागणी, ब्रेडचा दर्जा आणि प्रत्येक गटाला आलेले निष्कर्ष या पातळ्यांवर मूल्यमापन केले गेले. या परीक्षेमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट झाली, ती विद्यार्थ्यांनी शेवटी आपण स्वत:च तयार केलेले ब्रेड खाल्ले. हे सारे करताना साहजिकच विज्ञान विषय आव्हानात्मक, जिवंत आणि सृजनात्मक आनंद देणारा ठरतो.

'आयबी' शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एखादे मत स्वीकारण्याची व नाकारण्याची रीत यांच्याशीही ओळख करून दिली जाते. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी तयार होते. यासाठीच 'आयबी' शाळांमध्ये मूल्यशिक्षण आणि त्यासाठी स्वतंत्र तास नसतात. 'आयबी' शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एका ठरविलेल्या व्यक्तिमत्वामधून वाढविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. ही ठरविलेली व्यक्तिमत्वे किंवा 'प्रोफाईल्स' पुढीलप्रमाणे :

(Caring) जाणीव, (knowledgeable) ज्ञानात्मक, (Thinker) विचारवंत, (Principled) तत्ववादी,(Responsible) जबाबदार, (Communicator) संवाद साधणारा.

प्रत्येक विषयातील विविध प्रकारच्या परीक्षांमधून (ज्यात आपल्यासारख्या प्रचलित परीक्षा अभावानेच असतात) वर नमूद केलेल्या 'प्रोफाईल्स' साधण्याचे एक रंजक आव्हान शिक्षकासमोर असते. 'आयबी' शिक्षणाची सर्वांत महत्त्वाची आणि जमेची बाब म्हणजे विद्यार्थ्याला 'ग्लोबल नागरिक' बनविण्याचा प्रयत्न. प्रत्येक विषयातील प्रत्येक धडा हा जागतिक पातळीचा विचार करून शिकवावा लागतो. हेदेखील 'आयबी' शिक्षकांसमोर एक मोठे आव्हान असते.

भविष्यकाळ हा नेहमीच आजच्या लहान मुलांचा असतो. कारण, आज शिकणारी मुले दहा-पंधरा वर्षांनी मोठी होणार आहेत. ती स्वबळावर शिकू शकली नाहीत, तर नजरेपलीकडच्या भावी प्रश्‍नांना समर्थपणे कशी भिडू शकतील? त्यांच्याबाबत आपुलकी असेल, तर त्यांना शिकवणाऱ्या आणि त्यांची जिज्ञासा चेतावणाऱ्या वेगळ्या विज्ञान शिक्षणाला पर्याय नाही. अशी जिज्ञासा चेतावणाऱ्या आणि परीक्षा-विरहीत शिक्षणपद्धतीत मला परदेशातील विद्यार्थ्यांनी आजवर विचारलेले प्रश्‍न खरंच मजेशीर होते. उदाहरणार्थ :

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानात गुरुत्वाकर्षणशक्ती नसताना अन्ननलिकेतून अन्न पोटाकडे कसे जाते? (धडा : पचनसंस्था)

दुसऱ्या गुदगुल्या केल्या, की हसू येते; पण स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या, तर हसू येत नाही का? (धडा : ज्ञानेंद्रिये)

स्वत:चा रेकॉर्ड केलेला आवाज इतरांना योग्य वाटतो; पण स्वत:ला नाही. असे का? (धडा : ध्वनी)

एखाद्या 'एचआयव्ही'ग्रस्त रुग्णाला डास चावला, तर डासाला 'एचआयव्ही'ची लागण होते का? नसेल, तर का नाही? (धडा : रोग)

अशा पद्धतीने रंजक विज्ञान शिक्षण देण्याचा प्रयत्न 'आयबी' करत आहे. वर नमूद केलेले प्रयोग व मूल्यमापनाच्या पद्धती प्रत्येक विद्यार्थ्याला निश्‍चितच आत्मविश्‍वासू बनवितात. परीक्षा पद्धत नसल्याने सर्वसामान्य विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नाराज होत नाही आणि शिक्षणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतो. त्यामुळे मला माझ्या 'आयबी' शाळांमध्ये आजवर आलेल्या अनुभवांमुळे विज्ञान शिक्षणात बदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेचा भाग बनल्याचा थोडा अभिमान वाटत आहे.

(लेखक व्हिएतनाममधील एका शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.)
संदीप कुलकर्णी

*रंजक प्रयोगातून वैज्ञानिक सिद्धांताचे धडे*(लोकसत्ता)निसर्ग, शेती आणि पर्यावरणाचाही अभ्यास; मुंबईतील शैक्षणिक संस्थेचा ब...
25/08/2016

*रंजक प्रयोगातून वैज्ञानिक सिद्धांताचे धडे*(लोकसत्ता)

निसर्ग, शेती आणि पर्यावरणाचाही अभ्यास; मुंबईतील शैक्षणिक संस्थेचा बदलापूरमध्ये प्रकल्प
निसर्ग, पर्यावरण आणि शेती या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयांमधील विज्ञान रंजक पद्धतीने समजून देणारा प्रकल्प मुंबईतील एका शैक्षणिक संस्थेने बदलापूरजवळील सोनावळे गावात उभारला असून, त्याद्वारे परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांना विज्ञानातील तब्बल ९० मूलभूत सिद्धांत प्रयोगाने पडताळून पाहण्याची संधी उपलब्ध केली आहे.
अनेकदा शिक्षणाचा भाग म्हणून विद्यार्थी विज्ञानाचे सिद्धांत अभ्यासतात. मात्र प्रत्यक्ष जीवनात त्या सिद्धांताचा उपयोग बहुतेकांना माहीत नसतो. मुंबईतील ज.ल.शिर्सेकर शैक्षणिक संस्थेने बदलापूरपासून सात किलोमीटर अंतरावरील सोनावळे गावात २५ एकर जागेत दोन वर्षांपूर्वी साकारलेला ‘स्वानंद योग प्रकल्प भूमी-विज्ञान वेध’ प्रकल्प म्हणजे दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व पटवून देणारी मोठी प्रयोगशाळा आहे. ५२ फूट व्यास आणि २६ फूट उंचीची पृथ्वीच्या आकाराची वास्तू (डोंब) हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असून त्यावर पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाचा नकाशा सप्रमाण (टू स्केल) देण्यात आला आहे. या वर्तुळाकार वास्तूमध्ये जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारे वैज्ञानिक शोध, त्यामागचे मूलभूत तत्त्व, व्यवहारातील त्याची उपयुक्तता हे सारे शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे सर्व सिद्धांत प्रयोगाने पडताळून पाहण्याची संधी दिली जाते.
मुंबईत नेहरू सेंटर, पुण्यात आयुका या संस्था अशा पद्धतीने वैज्ञानिक संकल्पना सोप्या, रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचे काम करतात. मात्र ठाणे जिल्ह्य़ात अद्याप असे एकही विज्ञान केंद्र नाही. दोन वर्षांपूर्वी शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी प्रकल्पाचे उद्घाटन केले.
या प्रकल्पात विज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांवर पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाचे संस्कारही केले जातात. प्रकल्प परिसरात ऋतूनुसार उपलब्ध असणाऱ्या फळा-फुलांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाते. गोपालन, सेंद्रिय शेती, गोबर गॅस, सापळा पिके, ठिबक सिंचन आदींबरोबरच विविध प्रकारचे कीटक तसेच पक्ष्यांचे अन्नसाखळीतील महत्त्व त्यांना पटवून दिले जाते. विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून जलसंधारणाची कामे करून घेतली जातात. संघभावना वृद्धिंगत करणारे वैशिष्टय़पूर्ण खेळ, इमारतीच्या गच्चीवरून आकाश निरीक्षणाची सोय यातून विद्यार्थ्यांना हसत-खेळत विज्ञान शिकविले जाते.
इमारतीतील वर्गाबरोबरच मोकळ्या जागेत सहज फेरफटका मारतानाही ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांद्वारे बरीच रंजक माहिती विद्यार्थ्यांच्या नजरेस आणून दिलेली आहे.

18/07/2016

उर्जा स्थानांतरण कसे होते हे दाखवणारा छोटा प्रयोग ( source -vYou tube)

09/04/2016

नीलिमा सहस्रबुद्धे यांचा लेख

मी एका नामवंत शाळेत शिकले. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त काही उपक्रम नसले तरी शिक्षक मुलांना मनापासून शिकवत असत असं आठवतं. शाळेला चांगली इमारत, मोठी प्रयोगशाळा होती. विज्ञानाच्या तासाला एकेक वर्ग तिथे जाऊन त्यांना प्रयोग दाखवण्यात येत. समोर बसून पन्नास-साठ जणी ते पाहात असू - निरीक्षण करत असू आणि मग प्रयोग वहीत ते नीट लिहून काढत असू. हवेत ऑक्सिजन २०% असतो, अमुक इतक्या हैड्रोक्लोरिक आम्लात अमुक इतके सोडियम हैड्रॉक्साइड घातले की त्याचे उदासिनीकरण होते. मग ते मोजणं, न सांडता एकत्र करणं, ताटलीत मेणबत्त्या लावणं, तिच्यात पाणी ओतणं - मेणबत्ती विझल्यावर चढलेली पाण्याची पातळी मोजणं सगळं काही शिक्षक करून दाखवायचे. त्यात हुशार मुलींना मदत करायला मिळायची. सगळं नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे ठरल्यासारखं पार पडायचं.

पुस्तकात दिलेलं प्रयोगात दाखवता आलं नाही तर आपलं काहीतरी चुकलं ही १०० टक्के खात्री असायची. इतकी की शाळा संपून कॉलेज, मग इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकल्समधेसुद्धा ‘दिलेल्या सूत्राप्रमाणे उत्तर आलं पाहिजे’, हे मनात इतकं ठसलेलं की प्रयोगातली निरीक्षणं थोडी ‘ऍडजस्ट’ करून उत्तरं बरोब्बर यायचीच.

प्रयोग हा खर्या् अर्थानं करून बघणं जमायचंच नाही. आपल्याला काही वेगळी उत्तरंही सापडण्याची शक्यता आहे असा विचार कधी मनात आलाच नव्हता. सगळं शिक्षण हे ‘सांगितल्याप्रमाणे करून दाखवणे’ यावर व्यवस्थित पार पडलं होतं.

पुढं पालकनीतीत आल्यावर, मुलांची शिक्षणं चालू असताना मला संजीवनीने एक नवीन प्रयोग सांगितला. पूर्वीचा हवेत २०% ऑक्सिजन असतो हाच प्रयोग - थोडा सुधारून वाढवलेला. एकदा एक मेणबत्ती लावून - ती विझल्यावर पातळी मोजायची - नंतर दोन मेणबत्त्या लावून ती विझल्यावर पातळी मोजायची आणि मग तीन मेणबत्त्या लावून. प्रत्यक्ष प्रयोग करून बघितला मुलांबरोबर.

पहिल्या प्रयोगात ग्लासात २०% आकारमानाइतकं पाणी वर चढलं. दोन मेणबत्त्यांनी ३५% चढलं आणि तीन लावल्यावर ४०% ! मुलं म्हणाली, दोन मेणबत्त्या लावल्यावर हवेत ३५% ऑक्सिजन असतो आणि तीन लावल्यावर ४०% !!
नाही... नाही... असं कसं होईल? मग का चढलं पाणी जास्त? तेव्हा डोक्यात एकदम ट्यूब पेटली - हा मूळ प्रयोग भलताच चुकीचा आहे. कितीतरी कारणांनी - एक तर मेणबत्तीच्या ज्वलनामुळे प्राणवायूचा कार्बनडाय ऑक्साईड होणार. तो देखील ग्लासमधेच राहणार. मग आकारमान बदलण्याचं कारण काय? एवढ्याशा आकारमानात वायूंच्या वेगवेगळ्या घनतेमुळे फारसा फरक पडणार नाही. मग?

कारण स्पष्ट होतं - मेणबत्ती जवळची हवा गरम झाली, प्रसरण पावली होती. ती विझल्यावर आणि हवा पुन्हा गार झाल्यावर आकुंचन पावली, त्यामुळे पाणी वर चढलं. दोन - तीन मेणबत्त्या लावल्या तेव्हा जास्त उष्णता निर्माण झाली. जास्त तापल्यानं हवा जास्त प्रसरण पावली होती, म्हणून पाणी जास्त वर चढलं.

अरे बापरे, तीस पस्तीस वर्ष लागली आपल्याला हे समजायला, की शाळेच्या पुस्तकातला छोटासा प्रयोग चक्क संपूर्ण चुकीचा आहे ! जेव्हा वायूचे आकारमान, त्यावर उष्णतेचा परिणाम इ. गोष्टी मी शिकले, तेव्हाच मला हे समजायला हवं होतं. खरं म्हणजे कोणत्याही पुस्तकात छापलेल्या सर्व गोष्टी खर्याे असतात असं काही मी कधीच समजत नव्हते. पण विज्ञानाचं पुस्तक? त्यावर आमची संपूर्ण श्रद्धा ! आपणच इतरत्र शिकलेलं वापरून पाहायची आणि दिलेले प्रयोग नाटकाप्रमाणे किंवा सांगितलेल्या पूजापाठाप्रमाणे पढवलेल्या पद्धतीने न करता, त्याच्याशी खेळायची बुद्धीच कधी झाली नाही. म्हणजे ही केवढी अंधश्रद्धा ! ती देखील छुपी. तेव्हाच वाटायला लागलं - छे हे बदलायला हवं. पुढच्या पिढीपर्यंत आपण ही अंधश्रद्धा अशीच पोचवायला नको.

Address

Shevgaon
414502

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रयोगातून विज्ञान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to प्रयोगातून विज्ञान:

Shortcuts

Share

Category