19/12/2021
*ढाकणे पॉलिटेक्निकमध्ये ३६६ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड*
शेवगाव- मौजे राक्षी ता. शेवगाव जि. अहमदनगर येथील कै. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक, शेवगाव आणि समर्थ प्रायव्हेट आय.टी.आय यांच्या संयुक्त विद्यमाने ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये दि.१९ डिसेंबर, २०२१ रोजी कॅम्पस इंटरव्युव दरम्यान ३६६ विद्याथ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये बजाज ऑटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, धुत ट्रान्समिशन, एन्ड्युरन्स टेक्नोलॉजी, आयजीएम ऑटो, बडवे इंजिनिअरिंग, पर्किन इंडिया, देवगिरी फोर्जीन, कॅनपॅक इंडिया, एक्सुड इंडस्ट्रिज, जगदंबा ऑटो, एवीडी, कोरॉक इंजिनिअरिंग, ड्युराव्होल्स ऑटोमोटिक, एलअॅण्डटी, केएसपीजी ब्रिटानिया, युनी मिंडां, फ्रान्की फेवर अशा विविध २४ कंपन्यांच्या पुणे, औरंगाबाद, अहमदनगर येथील युनिटसाठी ही भरती प्रक्रीया राबविण्यात आली. यासाठी सर्व कंपन्यांचे एच आर अधिकारी उपस्थित होते.
कॅम्पस इंटरव्यूवच्या उदघाटन सोहळ्यास प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. संजय सानप, केदारेश्वर शुगर फॅक्टरीचे संचालक रणजीत घुगे, जामखेड पॉलिटेक्निकचे प्राचार्य विकी घायतडक, मॅजिक बसचे अधिकारी योगेश कावरा, प्राचार्य डॉ. आर. एच अत्तार, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड आदि उपस्थित होते. यावेळेस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या कंपन्यांमधून उपलब्ध असलेल्या नोकरीबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एकनाथरावजी ढाकणे, सचिव श्रीमती जया राहाणे, समन्वयक प्रा. ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. आर. एच अत्तार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि संस्था प्रतिनिधींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.