17/07/2020
*वै. पुरुषोत्तम हरी (गणेश) पाटील शिक्षण संस्थेच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा*
*माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, माऊली ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शेगाव ने शंभर टक्के निकालाची परंपरा ठेवली कायम*
सेवाभाव व सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून संस्थेच्या व्यवस्थापकाने संस्थाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या कल्पक व दूरदृष्टीवादी विचारसरणीतून माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ची स्थापना साकारली आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार व मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणाली राबवणारे उत्कृष्ट दालन उपलब्ध करून दिले.
वै. पुरुषोत्तम हरी (गणेश) पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत, माऊली ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ची सुरवात सन 2014-2015 पासून शेगाव येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केली. या वर्षी महाविद्यालयाचा बारावीचा 100 टक्के निकाल लागला असून स्थापनेपासून आजपर्यंत सलग पाचव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा महाविद्यालयाने चोख जोपली आहे.
शिस्तप्रिय व उत्कृष्ट निकाल असलेले कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेमार्फत आजपर्यंत 49 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करीता, 15 विद्यार्थ्यांना मेडिकल करीता, 5 विद्यार्थ्यांना बीसीए करीता तसेच ड्रेस डिझाईन, ॲनिमेशन, एग्रीकल्चर प्रवेशा करता नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळून उच्चशिक्षणाचे स्वप्न साकारता आले.
यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व प्राध्यापकवृंद यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरदादा पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एम. जाधव यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.