Senior Arts Mahila Mahavidyalaya, Shahada

Senior Arts Mahila Mahavidyalaya, Shahada Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Senior Arts Mahila Mahavidyalaya, Shahada, Education, Shahada.

Senior Arts Mahila Mahavidyalaya, Shahada affiliated with Shreemati Nathibai Damodar Thackersey University, Mumbai which offers BCA, BA in Marathi, History, and Economics.

Admissions Open Now!
02/04/2024

Admissions Open Now!

02/04/2024
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात महिला महाविद्यालयाचा सहभाग
30/12/2022

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात महिला महाविद्यालयाचा सहभाग

शहादा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची जैन लेणीला भेट लोकमत न्यूज नेटवर्क शहादा शहरातील वरिष्ठ महिला महाविद्यालयाच...
16/10/2022

शहादा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची जैन लेणीला भेट लोकमत न्यूज नेटवर्क शहादा शहरातील वरिष्ठ महिला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या विद्यार्थिनींनी तालुक्यातील लोणखेडा येथील ऐतिहासिक जैन तीर्थंकर लेणीला भेट दिली . २५ विद्यार्थिनींनी माहितीचे संकलन केले . प्राचार्य डॉ . कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला . यावेळी इतिहास विभागप्रमुख प्रा . देवचंद पाडवी , प्रा.योगेश भुसारे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले . येथील नेमिनाथ लेण्यांच्या संदर्भात पवन जैन यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली . लोणखेडा येथील लेण्या या तिसऱ्या शतकातील असून , जैन धर्मातले २२ वे तीर्थंकर नेमिनाथ भगवान यांच्या चिन्हांची ओळख देत असल्याची माहिती पवन जैन यांनी दिली . या ठिकाणी एकूण तीन लेण्या असून , दोघींचा शोध लागला आहे , तर तिसऱ्या लेणीचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले . यावेळी विद्यार्थ्यांनीनी प्रा . देवानंद पाडवी यांनी मार्गदर्शन केले .

16/10/2022

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोहिणी सोनवणे प्रथम

शहादा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळे संचलित , शहादा येथील कला व विज्ञान महिला महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत शहादा येथील शहादा तालुका एज्युकेशन आणि को - ऑफ एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड संचलित सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.सी.ए. ची विद्यार्थिनी रोहिणी योगेश सोनवणे हिने सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळविला . सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र , रूपये २००१ रु . रोख देऊन तिचा सन्मान करण्यात आला . स्वातंत्र्य लढ्यात नंदुरबार जिल्ह्यातील क्रांतिकारांचे योगदान या विषयावर तिने निबंध सादर केला होता . प्रा . योगेश भुसारे , बी.सी.ए. शाखेतील प्रा . रवींद्र खेडकर , प्रा . दीपिका पटेल , प्रा . कविता चौधरी , प्रा.योगेश पाटील यांचे तिला मार्गदर्शन लाभले . तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन वनश्री मोतीलाल पाटील , व्हा . चेअरमन हिरालाल पाटील , संचालक अभिजित पाटील , महाविद्यालयीन विकास समिती सदस्या प्रिती पाटील , प्राचार्य डॉ . कैलास चव्हाण तसेच संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या . पुन

अर्थशास्त्र विभागातर्फे उद्योजकीय क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.ही क्षेत्रभेट वनश्री फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिम...
16/10/2022

अर्थशास्त्र विभागातर्फे उद्योजकीय क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.ही क्षेत्रभेट वनश्री फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड व मत्स्य शेती उत्पादन नांदरखेडा व महागीत ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड डेअरी उत्पादन, लांबोळा येथील उद्योगांना महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्या संदर्भातील माहिती संकलित केली... त्या भेटीची काही क्षणचित्रे...👆🏻

'सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा' येथील सर्व विद्यार्थीनी व प्राध्यापक सहकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या ...
04/09/2022

'सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा' येथील सर्व विद्यार्थीनी व प्राध्यापक सहकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयात नविन प्रवेशित एफ.वाय.बी.ए/ बी.सी.ए च्या विद्यार्थीनींचे मोठ्या जल्लोषात आपल्याला दिनांक ०६ सप्टेंबर रोजी स्वागत करायचे आहे. तरी महाविद्यालयात प्रवेशित सर्वच विद्यार्थीनी आणि प्राध्यापक सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आपणा सर्वांना विद्यार्थी विकास विभागातर्फे सादर निमंत्रण आहे.
द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनींनी आपल्या यथाशक्ती प्रमाणे सभागृहाची सजावट आणि इतर आयोजनाची जबाबदारी पार पाडायची आहे.

सहकार्य
विद्यार्थी विकास विभाग

Address

Shahada

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919049614647

Alerts

Be the first to know and let us send you an email when Senior Arts Mahila Mahavidyalaya, Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Senior Arts Mahila Mahavidyalaya, Shahada:

Shortcuts

Share

Category