Institute of management Research and Development Shahada

Institute of management Research and Development Shahada S.T. Co. op. Edu. Society's Shahada has decided to dedicate their Master in Management Studies (Compu

IMRD महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्नशहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ...
03/04/2026

IMRD महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या PMUSHA – Soft Component (2025–26) अंतर्गत स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता व मार्गदर्शन कार्यशाळा IMRD महाविद्यालय, शहादा येथे उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अनिल आर. पाटील यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार पाटील व पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण सोनवणे उपस्थित होते. तसेच डॉ. एच. एम. पाटील, डॉ. ए. एन. पाटील, डॉ. आय. जे. पाटील व डॉ. उल्हास सोनवणे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यशाळेत डॉ. लीलाचंद पाटले, डॉ. डी. एस. पाटील, युवराज भामरे व श्रीमती कृतिका द्विवेदी यांनी स्पर्धा परीक्षांची माहिती, अभ्यासाचे नियोजन, करिअर निवड व UPSC–MPSC रणनीती या विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. जी. खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जयश्री सोनार यांनी केले.

या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

*आदरणीय वनश्री तात्यासो. मोतीलाल फकिरा पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त**❤️ भव्य रक्तदान शिबिर ❤️**📅 दि. ४ फेब्र...
30/01/2026

*आदरणीय वनश्री तात्यासो. मोतीलाल फकिरा पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त*
*❤️ भव्य रक्तदान शिबिर ❤️*
*📅 दि. ४ फेब्रुवारी २०२६*
*⏰ सकाळी १०:०० वा.*
*📍 विकास कॅम्पस, शहादा*
*🩸 रक्तदान करा – जीवनदान द्या!*
✳️ आयोजक ✳️
गंगोत्री फाउंडेशन शहादा,
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट शहादा,
विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शहादा व
सीनियर आर्ट्स महिला महाविद्यालय शहादा
(संयुक्त विद्यमाने)
🙏 आपली उपस्थिती व सहभाग मोलाचा!

शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी व को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लि. संचलित तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र...
14/01/2026

शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी व को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लि. संचलित तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित आय.एम.आर.डी. (इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट) महाविद्यालय, शहादा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत
🥇 प्रथम क्रमांक – मिथिलेश राठोड
🥈 द्वितीय क्रमांक – पल्लवी पाटील
🥉 तृतीय क्रमांक – सुमित कसाब
या विद्यार्थ्यांनी पटकावला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास प्रा. गायत्री पाटील, प्रा. जयश्री सोनार, प्रा. रविंद्र खेडकर व प्रा. निलेश चव्हाण यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक कौतुक केले.

आय.एम.आर.डी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरीशहादा तालुका एज्युकेशन सोसायटी आणि को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ...
03/01/2026

आय.एम.आर.डी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शहादा तालुका एज्युकेशन सोसायटी आणि को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लिमिटेड व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संचलित आय.एम.आर.डी. (इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट) महाविद्यालय, शहादा येथे डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. आर. खेडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये एस.वाय.बी.सी.ए. विद्यार्थीनी पल्लवी पाटील, पल्लवी चूडामण पाटील व मयुरी गिरासे यांनी आपले विचार मांडले. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणातील योगदानामुळेच आज महिलांना शिक्षणाची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. आर.जी. खेडकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्रीशिक्षणासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्रा. कविता गुलाले, प्रा. कविता चौधरी, प्रा. जयश्री सोनार व प्रा. गायत्री पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिथिलेश राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गुलाले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

🌺 **महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम** 🌺आज महाविद्यालयात *राष्ट्रपिता महात्मा गांधी* आणि *माजी पंतप्रध...
02/10/2025

🌺 **महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम** 🌺

आज महाविद्यालयात *राष्ट्रपिता महात्मा गांधी* आणि *माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री* यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 🇮🇳 कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉ. अनिल पाटील, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे आयक्यूसी समन्वयक डॉ.उल्हास सोनवणे, क्रीडा संचालक हरीश साळुंखे हे उपस्थित होते.

कार्यक्रमात गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा तसेच शास्त्रीजींच्या "जय जवान जय किसान" या घोषणेच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या थोर विभूतींना आदरांजली अर्पण केली.

🙏 अशा महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहो.

02/10/2025
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठ...
05/08/2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत IMRD, शाहादा येथील एकूण ८ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची अध्यक्षता IMRD शहादा चे संचालक डॉ. अनिल आर. पाटील यांनी केली, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित दादा पाटील उपस्थित होते. तसेच विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. पाटील सर देखील उपस्थित होते.

आपल्या भाषणात प्रमुख अतिथी अभिजित दादा पाटील यांनी सांगितले की, “शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे. आर्थिक अडचणींमुळे कुठल्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये. ही मदत केवळ रक्कम नसून, त्यांच्या स्वप्नांना बळ देणारा विश्वास आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात सातत्य ठेवण्याचे व यशाच्या दिशेने प्रगती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अनिल आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य वितरणाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची योग्य दखल घेऊन, या सहाय्य वितरणाने त्यांचे शिक्षण सुगम करण्याचा हेतू ठेवला आहे. यावेळी विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक मदत दिली गेली.

योजना लाभार्थी विद्यार्थी –
प्रथम वर्ष बीसीए – सुमित रवींद्र सोनवणे, हरीश पंढरीनाथ माळी, जयश्री कारभारी बागले
द्वितीय वर्ष बीसीए – शिवानी गणेश पाटील, प्रतीक्षा रवींद्र भामरे, नेहा गुलाबराव पाटील, पल्लवी महिंद्र माळी
तृतीय वर्ष बीसीए – अजय भरत पटेल

डॉ. अनिल आर. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयश्री बी. सोनार आणि प्रमुख अतिथी अभिजित दादा पाटील यांनी लाभार्थी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्किल-अप ट्रेनिंग कार्यशाळाशहादा तालुका एज्युकेशनल अँड को-ऑप एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड संचलित, . आय.एम.आर.डी. महाविद्या...
14/03/2025

स्किल-अप ट्रेनिंग कार्यशाळा
शहादा तालुका एज्युकेशनल अँड को-ऑप एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड संचलित, . आय.एम.आर.डी. महाविद्यालय,व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शहादा. तसेच सेंटम फाऊंडेशन व इन्फोसिस फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संस्थेचे महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रितीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दहा दिवसीय स्किल-अप ट्रेनिंग इम्प्लोयाबिलीटी एन्हान्समेंट प्रोग्राम कार्यशाळेचे प्रमाणपत्र वाटप समारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेंटम फाऊंडेशन व इन्फोसिस फाऊंडेशन, मुंबई येथील श्रीमती ज्योती सूर्यवंशी, डॉ.स्वाती डूमरे व डॉ.मनीशी जव्हेरी तसेच विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. पाटील व आय.एम.आर.डी. महाविद्यालयाचे संचालक डॉ.अनिल पाटील उपस्थित होते.

आय.एम.आर.डी महाविद्यालयात जागतिक महिला दिवस  साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गायत्री पाटील,प्रमुख...
09/03/2025

आय.एम.आर.डी महाविद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गायत्री पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोनाली पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शहादा तसेच कविता गुलाले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन प्रा.जयश्री सोनार यांनी केले.

Address

Shahada
452409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Institute of management Research and Development Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Institute of management Research and Development Shahada:

Shortcuts

Share

Category