BKC Social

BKC Social Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BKC Social, Education, Charathe, Savantwadi.

14/01/2025
YBIT मध्ये  'A.I.रिव्होल्यूशनवर' राष्ट्रीय कार्यशाळा .....एक्सपर्ट म्हणून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ होणार सहभागी.....येथील यश...
06/01/2025

YBIT मध्ये 'A.I.रिव्होल्यूशनवर' राष्ट्रीय कार्यशाळा .....

एक्सपर्ट म्हणून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ होणार सहभागी.....

येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये 'AI रिव्होल्यूशन : फ्रॉम मशीन लर्निंग टू जनरेटिव्ह AI' या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील अभियांत्रिकी शिखर संस्थेने ही राष्ट्रीय कार्यशाळा पुरस्कृत केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून दीडशेपेक्षा अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. याचे उदघाटन आज सायंकाळी करण्यात येणार असून पुढील सहा दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकंदरीत प्रवास आणि सद्यस्थितीतील प्रगती या बद्दल शिक्षकांना अद्ययावत माहिती देणे असे आहे. यामध्ये मशीन लर्निंग संकल्पनेचा आढावा, अत्याधुनिक जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचे बदललेले स्वरूप तसेच चालू संशोधनाद्वारे निर्माण होणारी परिस्थिती यांचा समावेश आहे.

एआयसीटीई मार्फत ऑनलाइन अटल अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. देशभरातील शिक्षकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. ही अकादमी शिक्षकांना अपडेट राहण्यास मदत करते आणि अशा प्रशिक्षण वर्गाद्वारे संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी मदत करते. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून एनआयटी, सी-डॅक, एमआयटी, टॅम्पर युनिव्हर्सिटी फ्लोरीडा, ऍगडर युनिव्हर्सिटी, नॉर्वे येथील नामवंत प्राध्यापक तसेच कॉगनिझन्ट-पुणे आणि क्वान्टिफाय-बेंगलुरु या कंपन्यांचे एक्सपर्ट्स मार्गदर्शन करतील.

कार्यशाळेचे मुख्य समन्वयक म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे व सहसमन्वयक म्हणून प्रा. मनोज खाडिलकर जबाबदारी सांभाळत आहेत. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यातील शिक्षकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकांना या कार्यशाळेचा चांगला उपयोग होईल असा विश्वास डॉ.बाणे यांनी उदघाटनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.

जेव्हा तुमचा 'विद्यार्थी' बनतो तुमचाच 'ट्रेनर'....एका माजी विद्यार्थ्याची यशोगाथा....कल्पना करा की तुम्ही एक शिक्षक आहात...
12/12/2024

जेव्हा तुमचा 'विद्यार्थी' बनतो तुमचाच 'ट्रेनर'....

एका माजी विद्यार्थ्याची यशोगाथा....

कल्पना करा की तुम्ही एक शिक्षक आहात. विशेष प्रशिक्षणासाठी तुम्ही गेला आहात आणि तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून तुमचाच विद्यार्थी जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय बरं असेल...? होय! असा प्रसंग खरोखरच घडला असून वरील कल्पनेतील शिक्षक आणि विद्यार्थी, दोघेही आपल्या भोसले पॉलिटेक्निकचेच आहेत.

तर त्याचं झालं असं की YBIT सिव्हिल विभागाच्या शिक्षिका नंदिता यादव मॅडम एमएसबीटीई बोर्डाच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी मढ, मुंबई येथे गेल्या आहेत. ९ ते १४ डिसेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण एल अँड टी कंपनीच्या स्किल सेंटरमध्ये सुरु आहे. ट्रेनिंगच्या दुसऱ्या दिवशी तज्ञ प्रशिक्षक म्हणून मयूर महेश पवार हा संस्थेचा माजी विद्यार्थी समोर उभा राहिला आणि नंदिता मॅडमना आश्चर्याचा धक्काच बसला.

मयूर हा भोसले पॉलिटेक्निकच्या २०१८ सिव्हिल बॅचचा पास-आऊट विद्यार्थी. सध्या एल अँड टी मध्ये डिझाईन हेड म्हणून कार्यरत आहे. त्याच्या हाताखाली आर्किटेकट्स व डिझाईनची टीम काम करते. सॉफ्टवेअरच्या सहाय्याने प्रोजेक्ट डिझाईन्स आणि मॉडेल्स बनवणे हे त्याच्या विभागाचे मुख्य काम. 'इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग' या विषय शिकवण्यासाठी तो ट्रेनर म्हणून उभा राहिला आणि स्वतःची ओळख करून देताना आवर्जून यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकचे नाव घेतले. पुढे त्याने पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले असले तरी भोसले पॉलिटेक्निकमुळेच आपण याठिकाणी उभा असल्याचे अभिमानाने सांगितले.

सेशन संपल्यानंतर नंदिता मॅडम व मयूरची भेट झाली. त्याच्या अचिव्हमेंट बद्दल मॅडमनी त्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काही वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजमध्ये शिकत असलेला एक सर्वसाधारण विद्यार्थी आज एल अँड टी सारख्या कंपनीत मोठ्या पदावर पोचला आहे. संस्थेसाठी व त्याच्या शिक्षकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील अशा असंख्य विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे संस्थेचे प्रयत्न आज यशस्वी होताना दिसत आहेत. मयूरचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

शिवसेना पक्षाचे संस्थापक, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या मार्मिक टोल्याने वाचा फोडणारे व्यंगचित्रकार आणि मुत्सद...
17/11/2024

शिवसेना पक्षाचे संस्थापक, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला आपल्या मार्मिक टोल्याने वाचा फोडणारे व्यंगचित्रकार आणि मुत्सद्दी राजकारणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#बाळासाहेबठाकरे

ब्रिटिश सत्तेविरोधात लढण्यासाठी तरुणांना प्रेरणा देणारे, 'लायन ऑफ पंजाब' ख्याती असणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतरा...
17/11/2024

ब्रिटिश सत्तेविरोधात लढण्यासाठी तरुणांना प्रेरणा देणारे, 'लायन ऑफ पंजाब' ख्याती असणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#लालालजपतराय

भोसले फार्मसी कॉलेजच्या चार विद्यार्थिनींना 'रिसर्च स्कॉलरशिप' जाहीर.....यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या चार विद्यार...
15/11/2024

भोसले फार्मसी कॉलेजच्या चार विद्यार्थिनींना 'रिसर्च स्कॉलरशिप' जाहीर.....

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या चार विद्यार्थिनींना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि उद्‌योजकता या तीन प्रकारांमध्ये भारत सरकारकडून रिसर्च स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकणाऱ्या नेहा चव्हाण व जान्हवी बगळे यांना रुपये तीस हजार तीन महिन्यांसाठी, एम.फार्मसी अभ्यासक्रम शिकणाऱ्या अमिता भालेकर हिला रुपये नव्वद हजार सहा महिन्यांसाठी आणि नुकतीच बी.फार्म पदवी उत्तीर्ण झालेल्या तेजस्वी कडू हिला उद्योजकता गटातून रुपये नव्वद हजार सहा महिन्यांसाठी व रुपये दोन लाख स्वतंत्र अनुदान जाहीर झाले आहे.

प्रधान वैज्ञानिक शाश्वत सल्लागार कार्यालय, पुणे क्लस्टर व बीएएसएफच्या सहयोगाने आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही रिसर्च स्कॉलरशिप देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे प्रेझेंटेंशन व मुलाखती पार पडल्यावर शासकीय समितीमार्फत पात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येतात. या प्रक्रियेनुसार भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.

या संशोधनासाठी त्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, फार्मास्युटीक्स विभागप्रमुख डॉ. रोहन बारसे, फार्मास्युटिकल केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ.गौरव नाईक आणि फार्मास्युटीक्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक मयुरेश रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'बालदिन' उत्साहात....‘टेस्ट क्वेस्ट-द बाईट बाश’ चे आयोजन....यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्...
15/11/2024

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'बालदिन' उत्साहात....
‘टेस्ट क्वेस्ट-द बाईट बाश’ चे आयोजन....

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘टेस्ट क्वेस्ट-द बाईट बॅश’ या संकल्पने अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः निरनिराळे खाद्यपदार्थ व रेसिपीज बनवल्या होत्या. त्याला सर्व मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलांनी मुलांसाठी बनवलेल्या चविष्ट पदार्थांची रेलचेल सर्वत्र दिसत होती. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या आवाजाने गजबजून गेल्याने वातावरण उत्साही व आनंदी बनले होते.

कार्यक्रमाला शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका प्रियांका देसाई, सर्व शिक्षक तसेच पालक वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

YBIT मध्ये सिव्हिल शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन.....यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ...
14/11/2024

YBIT मध्ये सिव्हिल शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन.....

यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने सिव्हिल शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. 'रिसेंट ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग' या विषयावर आधारित या कार्यशाळेत संपूर्ण राज्यातून ४९ शिक्षक सहभागी झाले होते. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींबद्दल माहिती यावेळी देण्यात आली.

तज्ञ् मार्गदर्शक म्हणून डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथील सिव्हिल विभाग प्रमुख डॉ.अशोक मोरे, यशदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील सिव्हिल विभाग प्रमुख डॉ.अभिजित झेंडे, सीओईपीचे प्राध्यापक डॉ.साहिल साळवी आणि बाटू विद्यापीठाच्या सिव्हिल विभागाचे प्राध्यापक डॉ.एस.आर.भगत उपस्थित होते._

शिक्षकांमध्ये नवीन कौशल्ये विकसित होण्यासाठी व विद्यार्थ्यांना अद्ययावत घडामोडी शिकवता येण्यासाठी या कार्यशाळेचा नक्की उपयोग होईल असा विश्वास कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. यावेळी उपप्राचार्य गजानन भोसले, सिव्हिल विभागप्रमुख प्रसाद सावंत, समन्ववयक पार्थ नाईक व सहसमन्वयक हवाबी शेख आदी उपस्थित होते.

17/10/2024

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 'वाचन प्रेरणा दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली..

यावेळी कॉलेजच्या लायब्ररी विभागातर्फे "सजग वाचक" ही विविध भाषातील साहित्य व चालू घडामोडी यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.

यावेळी इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख दीपक पाटील, मेकॅनिकल विभाग प्रमुख अभिषेक राणे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉम्प्युटर विभागाच्या संचिता कोलापते यांनी तर आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास ग्रंथालय सल्लागार समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.

चित्रकला स्पर्धेत भोसले स्कूलची मिनिष्का कुमार प्रथम......आंबोली सैनिक स्कूल आणि पी.एफ डान्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त व...
17/10/2024

चित्रकला स्पर्धेत भोसले स्कूलची मिनिष्का कुमार प्रथम......

आंबोली सैनिक स्कूल आणि पी.एफ डान्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी अशा दोन गटात पार पडली. पाचवी ते आठवी गटातून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मिनिष्का विकास कुमार हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांचे मार्गदर्शन तिला लाभले. मनिष्का हिच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष, अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले.

राजभाषा हिंदी परीक्षेत भोसले स्कूलचे सुयश: तीन विद्यार्थ्यांना हिंदी प्रतिभा पुरस्कार….....महात्मा गांधी राजभाषा हिंदी प...
17/10/2024

राजभाषा हिंदी परीक्षेत भोसले स्कूलचे सुयश: तीन विद्यार्थ्यांना हिंदी प्रतिभा पुरस्कार….....

महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था आयोजित अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला पहिली ते दहावीतील एकूण १५० विद्यार्थी बसले होते. यापैकी दुसरीतील अयान डिसोजा, चौथीतील अर्णा सावंत आणि नववीतील वरदा केरकर यांनी अ श्रेणीत उत्तीर्ण होत राष्ट्रीय राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्कार प्राप्त केला.

एकूण विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थी प्रथम तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये झाले. विद्यार्थ्यांना शाळेच्या हिंदी शिक्षिका प्राची कुडतरकर, रसिका कंगराळकर व महादेवी मलगर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले.

Address

Charathe
Savantwadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when BKC Social posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category