Kalsulkar English School, Sawantwadi

Kalsulkar English School, Sawantwadi the sko0l van.,van me bhi tarfiyan karna..sko0l ja kar assembly ke lia gr0und mai jana...subha subha ..1-2-3 karke excersise .. w0h nuturing 0f teachers!

sk0ol lyf ws awes0me!!..the g0lden part 0f lyf!... it all used t0 strt wid a vry gud m0rning ..then meethi neend se jaagna..,skul jane ki tyari..hair style me tym lagana..n0 brkfast.. nati0nal anthem mai tafryan karna the giggling of sweet gurls ..w0h mas0omiat w0h tafriyan !! p0litness, humbleness! n0 fake atititudes!!..n0 fake actin of wannabes.., sharing in lunch tym!! running ar0und in sk0ol

awl day l0ng!!...teachers ke lye Ch0wks aur registers bhag bhag ke lana ... hair chking day .. even Nails chk day... .. kiaa din thay !! n0 tensi0n!! h0mew0rks! .. being scared 0f tests and teachers! unf0rgettable part..g0lden dayss!!! new new buks new c0pies khareedne jana! sh0pping 0f sk0ol bags , p0uches, sh0es, n sh0es k sath tennis ki ball bhi milte thee.. d0se were d days...

16/04/2022

*कळसुलकर च्या प्राथमिक*
*शाळेसह अमुलाग्र बदल*
शाळेचा चेहरामोहरा बलणार🏫
देणगीदारांना सहकायाँचे आवाहन🙏🏻

येत्या जून 2022पासून सुरु होणाऱ्या नविन शैक्षणिक वषाँत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीने केला आहे.
'कळसुलकर'चा संपूर्ण शैक्षणिक परिसर नव्या रुपात विद्यार्थ्यांच्या भेटीस येईल. त्यासाठी सभासद, पालक वगँ, माजी विद्यार्थी, देणगीदार यांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष शैलेश पै यांनी केले आहे.
प्राथमिक शाळेच्या नव्या वगँ खोल्यांचे 3 लाख 75 हजार रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट बैठक व्यवस्था, प्रकाश योजना, विद्यार्थ्यांनसाठी संवादी बोलक्या भिंती असे प्राथमिक शाळेचे स्वरूप आहे.
उन्हाळ्यात काही अंशी जाणवणारी पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी सोय होईल अशी अंदाजे 3 लाख 87हजार खचाँची विहीर प्रस्तावित आहे.
शाळेचा संपूर्ण परिसर कपाऊंड वाँलने बंदिस्त होईल. त्या ठिकाणी शाळा कपाऊंड वाँल नजिक शैक्षणीक उठावाला प्रोत्साहन देणारे गाळे प्रस्तावित आहेत. त्या करीता अंदाजे 3 लाख 85 हजार खर्च अपेक्षित आहे.
'कळसुलकर'चे क्रिडांगण सपाटीकरण करुन विद्यार्थ्यांना मैदानी खेळांच्या व्यवस्थेसाठी अंदाजे 3 लाख 50हजाराचे अंदाजपत्रक आहे.
ग्रामीण भागातून कळसुलकर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनचा ओघ वाढतो आहे. ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांनची येण्या- जाण्याची सोय करण्याच्यादृष्टीने देणगीदारांनी सहकार्य केल्यास अंदाजे 9 लाख 87हजाराची स्कूल बस प्रस्तावित आहे. यासंदर्भात शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, माजी विद्यार्थी, सभासद, देणगीदार यांनी सहकायाँचा हात पुढे केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनची घरपोच येण्या जाण्याची सोय होईल. शाळेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, पालक यांनी वाहन पुरस्क़त केल्याची त्याची उचित नोंद संस्था घेईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीने कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सभागृह नूतनीकरण करण्याचे ठरवले आहे.आवश्यकतेनुसार छप्पर डागडुजी, खिडक्या , प्लास्टरींग, रंगकाम,बैठक व्यवस्था, प्रोजेक्टर , विद्युत व्यवस्था इत्यादी कामे करावयाची आहेत. या कार्यासाठी निधी संकलन करण्याचे असून दातृत्वाचा सन्मान व्हावा या दृष्टीने
1)रुपये 1लाख आणि त्यापेक्षा जास्त देणगी देणार्यांचे नाव संस्था कार्यालयात दर्शनी भागात बोर्ड वर लिहिले जाईल
2) वैयक्तिक अथवा समूहाने 5 लाख रुपये देणगी देणार्यांचे नाव वर्ग खोलीस दिले जाईल
3)वैयक्तिक अथवा समूहाने रुपये 15 लाख रुपये देणगी देणार्यांचे नाव इनडोअर क्रीडासंकुलास देण्यात येईल
4) वैयक्तिक अथवा समूहाने रुपये 25लाख रक्कम देणाऱ्याचे नाव शाळेतील सभागृहास देण्यात येईल
सदर देणगी ही संस्था अकाउंट वर जमा करावी
*सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीला 12A आणि 80G प्रमाण पत्र मिळाल्याने देणगीदारांना त्यांच्या देणग्यांवर कर सवलत मिळेल*.

प्रशालेची विद्यर्थिनी कु.तन्वी दिलीप शितोळे (मार्च २०२०) हिस एस् .एस्. सी. बोर्डाकडून मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषा विषय...
18/09/2021

प्रशालेची विद्यर्थिनी कु.तन्वी दिलीप शितोळे (मार्च २०२०) हिस एस् .एस्. सी. बोर्डाकडून मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषा विषयामध्ये सर्वोत्तम गुण मिळावल्याबद्दल रु.१,००,०००/- (एक लाख) चे "अग्रलेखाचे बादशहा कै. निळकंठ खाडिलकर परितोषिक प्राप्त झाले. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी ,माजी विद्यार्थी संघ व प्रशालेतर्फे कु.तन्वी दिलीप शितोळे हिचे हार्दिक अभिनंदन..!!!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर् इंग्लिश स्कुल मध्ये आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स...
15/08/2021

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर् इंग्लिश स्कुल मध्ये आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्यध्यापक श्री. मानकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी उपस्थित होते. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी मात्र उपस्थित राहू शकले नाहीत.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री.अण्णा म्हापसेकर आणि कुटुंबियांतर्फे त्यांचा मुलगा  चि.श्रील याच्या पहिल्या वाढ...
20/07/2021

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री.अण्णा म्हापसेकर आणि कुटुंबियांतर्फे त्यांचा मुलगा चि.श्रील याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या आनंद शिशुवटीकेला पुस्तके आणि खेळणी अशी 11,000 रू देणगीदाखल दिले. यावेळी म्हापसेकर कुंबियांतर्फे चि. श्रील, श्री. अण्णा म्हापसेकर, सौ.अक्षया म्हापसेकर, श्री. धिरेंद्र म्हापसेकर, श्री.अविनाश पडते, सचिव डॉ.प्रसाद नार्वेकर, खजिनदार श्री.मुकुंद वझे, मुख्याध्यापक श्री.नारायण मानकर, बालवाडी शिक्षिका सौ. वेंगुर्लेकर, सौ. कोरगावकर, सौ.वारंग उपस्थित होते. संस्थेतर्फे म्हापसेकर कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले तसेच त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

सावंतवाडी:जंगल बुकची सफर घडविणा-या नव्या लुक मधील बालवाडी नंतर आता कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागाचे रंग रूप प...
27/05/2021

सावंतवाडी:जंगल बुकची सफर घडविणा-या नव्या लुक मधील बालवाडी नंतर आता कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागाचे रंग रूप पालटले आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने सज्ज आहे.
कोवीडने प्रत्येक क्षेत्रात आव्हाने उभी केली आहेत. तशी ती शैक्षणिक क्षेत्रातही आहेत. प्रत्यक्ष शाळा कधी आणि कशी सुरु होईल, हे आज सांगता येत नाही. कोवीडने आर्थिक स्थिती अडचणीची केली आहे, हे सवँच क्षेत्रात आहे. पण स्वप्नांना मयाँदा नसतात. इच्छाशक्ती आणि संघटित प्रयत्नांनी निरंतर बदल घडू शकतो, हे कळसुलकर शाळेने दाखवून दिले आहे.
लाँकडाऊनमुळे शाळा बंद असतांना याच संकटाचे शाळेने संधीत रुपांतर केले आणि बालवाडीची भव्यदिव्य सुसज्ज वास्तू उभी राहिली. बच्चेकंपनीला खिळवून ठेऊ शकेल, अशी जंगल बुक स्वरुपातील ही वास्तू अनेकांचे लक्ष वेधून घेते. बालवाडीला हा नवा लुक माजी विद्यार्थी साईश वाडकर यांच्या कुंचल्यातून मिळाला आहे.
त्या पाठोपाठ आता प्राथमिक विभाग ही सुसज्ज होत आहे. शाळेचेच माजी विद्यार्थी श्री.साईल(कारिवडे) यांनी तोक्ते वादळाच्या संकटातही शाळा रंगविण्याचे आव्हान स्विकारत ते पूणँ केले. प्राथमिक शाळेच्या वगँ खोल्यांना आज नवे रंग रूप प्राप्त झाले आहे.
प्राथमिक विभाग अनेक स्वप्नांनसह सज्ज होत आहे. त्यामध्ये ओझ्या विना शिक्षण या संकल्पनेतील नवा प्रयोग, आँनलाईन स्पधाँ असे उपक्रम प्रस्तावित आहेत. त्या शिवाय नव्याने साकारलेल्या रमेश चिटणीस ग्रंथालयास प्राथमिक विभागातील मुलांना जोडून दिले जाईल. त्यामुळे नवे ग्रंथ दालन विद्यार्थ्यांनसाठी खुले होईल.
पहिलीच्या वगाँतील भिंती ही मुलांनशी संवाद साधतील, अशा बोलक्या होणार आहेत. अथाँत या सवाँनसाठी माजी विद्यार्थी संघ आणि माजी विद्यार्थी यांचे खूप मोठे पाठबळ शाळेला आहे. आताच्या काळातही आँनलाईन पध्दतीने विविध उपक्रम माजी विद्यार्थी राबवत आहेत. त्यामध्ये कला क्षेत्रातील संधी याबाबत अमित नाईक यांचे आँनलाईन मागँदशँन, विष्णू शिरोडकर, श्रेयस आपटे टिमकडून साँफ्ट स्किल आणि व्यक्तीमत्व विकास याबाबत मागँदशँन असे विविध प्रयोग सुरु आहेत.
माजी विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने नव्या पिढीसाठी राबविलेले हे उपक्रम नव्या नव्या स्वरूपात विद्यार्थ्यांन समोर येत आहेत. कळसुलकर शाळा विद्यार्थीन च्या स्वागतासाठी आतुरतेने सज्ज आहे.अथाँत कोवीडसंबधी शासनाचे सवँ नियम पाळून.
प्राथमिक शाळेतील प्रवेशासाठी इच्छुकांनी मुख्याध्यापक
प्रदीप सावंत9420733602 हायस्कूल व ज्युनिअर काँलेजसाठी मुख्याध्यापक एन.पी.मानकर9421148561 यांच्याशी संपर्क साधावा. खालील आँनलाईन लिंक वरून प्रवेश अजँ भरावा असे आवाहन संस्था अध्यक्ष शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नावेँकर, खजिनदार मुकूंद वझे यांनी केले आहे.

प्रवेश अर्ज २०२१-२०२२

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुवाटिका लवकरचं एका नव्या रूपात सुरु होत आहे. आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहचवण...
14/03/2021

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुवाटिका लवकरचं एका नव्या रूपात सुरु होत आहे. आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करा.

21/09/2020

सावंतवाडी एज्यूकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये *अंगणवाडी शिक्षिका* पदभरती करायची आहे. इच्छुक उमेदवारांनी स्व हस्ताक्षरात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संस्था कार्यालयात देि ३०-९-२०२० संध्याकाळी ५वाजेपर्यंत आणून द्यावेत.

कळसुलकर हायस्कूल मध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा( संस्थेचा अभिनव उपक्रम.)सावंतवाडी-५           येथील सा...
05/09/2020

कळसुलकर हायस्कूल मध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा( संस्थेचा अभिनव उपक्रम.)
सावंतवाडी-५
येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या कळसुलकर हाय. सावंतवाडी येथे आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा सर्व गुरुजनाना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी मुलांच्या सहभागातून शिक्षक दिन या शाळेमध्ये साजरा करण्यात येतो,मात्र यावर्षी कोरोना चा संसर्ग असल्याने या शाळेमध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा झाला, अर्थात पुरेसे शारीरिक अंतर ठेवून व टाळेबंदी चे नियम पाळून कार्यक्रमाची सुरुवात झाली.दरवर्षी विविध स्पर्धा राबून शिक्षक दिन या शाळेत संपन्न होत असतो परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शाळेमध्ये प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकत नाहीत,हे लक्ष्यात घेता संस्थेने यावर्षी शिक्षक दिन शिक्षक आणि संस्था यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केला. नेहमीची शैक्षणिक कामे, प्रशिक्षणे, टारगेटस, पटसंख्या वाढ आदी शासकीय, प्रशासकीय कामांच्या पारंपारिक धबडग्यातून बाहेर येत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालक व शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. संस्था संचालक आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी असे कार्यालयीन नाते न ठेवता कौटुंबिक स्नेहसंमेलन घडवून आणले.
यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष शैलेश पै, सचिव प्रसाद नार्वेकर, सदस्य मुकुंद वझे, रवींद्र स्वार ,गौरांग चिटणीस ,राजश्री टिपणीस, अण्णा म्हापसेकर, दत्तप्रसाद गोठोस्कर तसेच माध्यमिक मुख्याध्यापक नारायण मानकर, प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप सावंत, पर्यवेक्षिका पी. पी. चव्हाण व इतर गुरुजन शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. नार्वेकर यांनी केले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थाध्यक्ष यांनी अर्पण केला.
कार्यक्रमाला संबोधित करताना श्री. वझे यांनी संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, प्रत्येक शिक्षकाने टेक्नोसेव्ही झालेच पाहिजे असा आग्रह धरला. प्रसाद नार्वेकर यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल आणि सद्यस्थितीत शिक्षकांकडून चालू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.शाळेच्या सर्व शिक्षकांचे वार्षिक कामगिरीचे मूल्यमापन करून एखाद्या कार्यक्षम, होतकरू शिक्षकाला किंवा शिक्षिकेला आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी दिला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. त्यासोबतच मुख्याध्यापक मानकर सर ,ज्येष्ठ शिक्षक वैज सर ,पावसकर मॅडम यांनी विचार मांडले.

कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील 2000 च्या बॅच ने प्रशालेस अत्याधुनिक प्रिंटर भेट दिला. त्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ...
16/08/2020

कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील 2000 च्या बॅच ने प्रशालेस अत्याधुनिक प्रिंटर भेट दिला. त्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मानकर यांचेकडे सोपवताना 2000 च्या बॅच चे श्री.गौतम नाटेकर, राजीव कासार, राकेश गवंडळकर, हर्षल नाडकर्णी, संदीप टोपले,राजेश काणेकर, विराग मडकईकर, प्रथमेश कशाळीकर तसेच संस्था सचिव तथा बॅच चे प्रसाद नार्वेकर, संस्था संचालक अण्णा म्हापसेकर, खजिनदार श्री.मुकुंद वझे, पर्यव्यक्षिका सौ. प्रेरणा चव्हाण, कर्मचारी श्री. कोंडुरकर उपस्थित होते.मुख्याध्याकांनी यावेळी 2000 बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

शालांत परीक्षेत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...!!!
29/07/2020

शालांत परीक्षेत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...!!!

हार्दिक अभिनंदन सुहानी..!!!सुहानी नाईक हि आपल्या कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थीनी आहे. सर्वोत्तम ...
13/06/2020

हार्दिक अभिनंदन सुहानी..!!!
सुहानी नाईक हि आपल्या कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थीनी आहे. सर्वोत्तम २५ स्पर्धकांमध्ये ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव स्पर्धक ठरली.

Address

Salaiwada
Savantwadi
416510

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalsulkar English School, Sawantwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category