Sawantwadi Education Society

Sawantwadi Education Society Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sawantwadi Education Society, Savantvadi.

16/04/2022

*कळसुलकर च्या प्राथमिक*
*शाळेसह अमुलाग्र बदल*
शाळेचा चेहरामोहरा बलणार🏫
देणगीदारांना सहकायाँचे आवाहन🙏🏻

येत्या जून 2022पासून सुरु होणाऱ्या नविन शैक्षणिक वषाँत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीने केला आहे.
'कळसुलकर'चा संपूर्ण शैक्षणिक परिसर नव्या रुपात विद्यार्थ्यांच्या भेटीस येईल. त्यासाठी सभासद, पालक वगँ, माजी विद्यार्थी, देणगीदार यांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष शैलेश पै यांनी केले आहे.
प्राथमिक शाळेच्या नव्या वगँ खोल्यांचे 3 लाख 75 हजार रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट बैठक व्यवस्था, प्रकाश योजना, विद्यार्थ्यांनसाठी संवादी बोलक्या भिंती असे प्राथमिक शाळेचे स्वरूप आहे.
उन्हाळ्यात काही अंशी जाणवणारी पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी सोय होईल अशी अंदाजे 3 लाख 87हजार खचाँची विहीर प्रस्तावित आहे.
शाळेचा संपूर्ण परिसर कपाऊंड वाँलने बंदिस्त होईल. त्या ठिकाणी शाळा कपाऊंड वाँल नजिक शैक्षणीक उठावाला प्रोत्साहन देणारे गाळे प्रस्तावित आहेत. त्या करीता अंदाजे 3 लाख 85 हजार खर्च अपेक्षित आहे.
'कळसुलकर'चे क्रिडांगण सपाटीकरण करुन विद्यार्थ्यांना मैदानी खेळांच्या व्यवस्थेसाठी अंदाजे 3 लाख 50हजाराचे अंदाजपत्रक आहे.
ग्रामीण भागातून कळसुलकर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनचा ओघ वाढतो आहे. ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांनची येण्या- जाण्याची सोय करण्याच्यादृष्टीने देणगीदारांनी सहकार्य केल्यास अंदाजे 9 लाख 87हजाराची स्कूल बस प्रस्तावित आहे. यासंदर्भात शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, माजी विद्यार्थी, सभासद, देणगीदार यांनी सहकायाँचा हात पुढे केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनची घरपोच येण्या जाण्याची सोय होईल. शाळेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, पालक यांनी वाहन पुरस्क़त केल्याची त्याची उचित नोंद संस्था घेईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीने कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सभागृह नूतनीकरण करण्याचे ठरवले आहे.आवश्यकतेनुसार छप्पर डागडुजी, खिडक्या , प्लास्टरींग, रंगकाम,बैठक व्यवस्था, प्रोजेक्टर , विद्युत व्यवस्था इत्यादी कामे करावयाची आहेत. या कार्यासाठी निधी संकलन करण्याचे असून दातृत्वाचा सन्मान व्हावा या दृष्टीने
1)रुपये 1लाख आणि त्यापेक्षा जास्त देणगी देणार्यांचे नाव संस्था कार्यालयात दर्शनी भागात बोर्ड वर लिहिले जाईल
2) वैयक्तिक अथवा समूहाने 5 लाख रुपये देणगी देणार्यांचे नाव वर्ग खोलीस दिले जाईल
3)वैयक्तिक अथवा समूहाने रुपये 15 लाख रुपये देणगी देणार्यांचे नाव इनडोअर क्रीडासंकुलास देण्यात येईल
4) वैयक्तिक अथवा समूहाने रुपये 25लाख रक्कम देणाऱ्याचे नाव शाळेतील सभागृहास देण्यात येईल
सदर देणगी ही संस्था अकाउंट वर जमा करावी
*सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीला 12A आणि 80G प्रमाण पत्र मिळाल्याने देणगीदारांना त्यांच्या देणग्यांवर कर सवलत मिळेल*.

प्रशालेची विद्यर्थिनी कु.तन्वी दिलीप शितोळे (मार्च २०२०) हिस एस् .एस्. सी. बोर्डाकडून मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषा विषय...
18/09/2021

प्रशालेची विद्यर्थिनी कु.तन्वी दिलीप शितोळे (मार्च २०२०) हिस एस् .एस्. सी. बोर्डाकडून मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषा विषयामध्ये सर्वोत्तम गुण मिळावल्याबद्दल रु.१,००,०००/- (एक लाख) चे "अग्रलेखाचे बादशहा कै. निळकंठ खाडिलकर परितोषिक प्राप्त झाले. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी ,माजी विद्यार्थी संघ व प्रशालेतर्फे कु.तन्वी दिलीप शितोळे हिचे हार्दिक अभिनंदन..!!!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर् इंग्लिश स्कुल मध्ये आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स...
15/08/2021

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर् इंग्लिश स्कुल मध्ये आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्यध्यापक श्री. मानकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री.अण्णा म्हापसेकर आणि कुटुंबियांतर्फे त्यांचा मुलगा  चि.श्रील याच्या पहिल्या वाढ...
20/07/2021

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री.अण्णा म्हापसेकर आणि कुटुंबियांतर्फे त्यांचा मुलगा चि.श्रील याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या आनंद शिशुवटीकेला पुस्तके आणि खेळणी अशी 11,000 रू देणगीदाखल दिले. यावेळी म्हापसेकर कुंबियांतर्फे चि. श्रील, श्री. अण्णा म्हापसेकर, सौ.अक्षया म्हापसेकर, श्री. धिरेंद्र म्हापसेकर, श्री.अविनाश पडते, सचिव डॉ.प्रसाद नार्वेकर, खजिनदार श्री.मुकुंद वझे, मुख्याध्यापक श्री.नारायण मानकर, बालवाडी शिक्षिका सौ. वेंगुर्लेकर, सौ. कोरगावकर, सौ.वारंग उपस्थित होते. संस्थेतर्फे म्हापसेकर कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले तसेच त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुवाटिका लवकरचं एका नव्या रूपात सुरु होत आहे. आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहचवण...
14/03/2021

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुवाटिका लवकरचं एका नव्या रूपात सुरु होत आहे. आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य करा.

21/09/2020

सावंतवाडी एज्यूकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये *अंगणवाडी शिक्षिका* पदभरती करायची आहे. इच्छुक उमेदवारांनी स्व हस्ताक्षरात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संस्था कार्यालयात देि ३०-९-२०२० संध्याकाळी ५वाजेपर्यंत आणून द्यावेत.

*कळसुलकर हायस्कूल मध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा*( संस्थेचा अभिनव उपक्रम.)*सावंतवाडी-५*           येथी...
05/09/2020

*कळसुलकर हायस्कूल मध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा*( संस्थेचा अभिनव उपक्रम.)
*सावंतवाडी-५*
येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या कळसुलकर हाय. सावंतवाडी येथे आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा सर्व गुरुजनाना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी मुलांच्या सहभागातून शिक्षक दिन या शाळेमध्ये साजरा करण्यात येतो,मात्र यावर्षी कोरोना चा संसर्ग असल्याने या शाळेमध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा झाला, अर्थात पुरेसे शारीरिक अंतर ठेवून व टाळेबंदी चे नियम पाळून कार्यक्रमाची सुरुवात झाली.दरवर्षी विविध स्पर्धा राबून शिक्षक दिन या शाळेत संपन्न होत असतो परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुले शाळेमध्ये प्रत्यक्षपणे उपस्थित राहू शकत नाहीत,हे लक्ष्यात घेता संस्थेने यावर्षी शिक्षक दिन शिक्षक आणि संस्था यांच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केला. नेहमीची शैक्षणिक कामे, प्रशिक्षणे, टारगेटस, पटसंख्या वाढ आदी शासकीय, प्रशासकीय कामांच्या पारंपारिक धबडग्यातून बाहेर येत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालक व शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. संस्था संचालक आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी असे कार्यालयीन नाते न ठेवता कौटुंबिक स्नेहसंमेलन घडवून आणले.
यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष शैलेश पै, सचिव प्रसाद नार्वेकर, सदस्य मुकुंद वझे, रवींद्र स्वार ,गौरांग चिटणीस ,राजश्री टिपणीस, अण्णा म्हापसेकर, दत्तप्रसाद गोठोस्कर तसेच माध्यमिक मुख्याध्यापक नारायण मानकर, प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप सावंत, पर्यवेक्षिका पी. पी. चव्हाण व इतर गुरुजन शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. नार्वेकर यांनी केले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थाध्यक्ष यांनी अर्पण केला.
कार्यक्रमाला संबोधित करताना श्री. वझे यांनी संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, प्रत्येक शिक्षकाने टेक्नोसेव्ही झालेच पाहिजे असा आग्रह धरला. प्रसाद नार्वेकर यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल आणि सद्यस्थितीत शिक्षकांकडून चालू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.शाळेच्या सर्व शिक्षकांचे वार्षिक कामगिरीचे मूल्यमापन करून एखाद्या कार्यक्षम, होतकरू शिक्षकाला किंवा शिक्षिकेला आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी दिला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. त्यासोबतच मुख्याध्यापक मानकर सर ,ज्येष्ठ शिक्षक वैज सर ,पावसकर मॅडम यांनी विचार मांडले.

कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील 2000 च्या बॅच ने प्रशालेस अत्याधुनिक प्रिंटर भेट दिला. त्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. ...
16/08/2020

कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील 2000 च्या बॅच ने प्रशालेस अत्याधुनिक प्रिंटर भेट दिला. त्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मानकर यांचेकडे सोपवताना 2000 च्या बॅच चे श्री.गौतम नाटेकर, राजीव कासार, राकेश गवंडळकर, हर्षल नाडकर्णी, संदीप टोपले,राजेश काणेकर, विराग मडकईकर, प्रथमेश कशाळीकर तसेच संस्था सचिव तथा बॅच चे प्रसाद नार्वेकर, संस्था संचालक अण्णा म्हापसेकर, खजिनदार श्री.मुकुंद वझे, पर्यव्यक्षिका सौ. प्रेरणा चव्हाण, कर्मचारी श्री. कोंडुरकर उपस्थित होते.मुख्याध्याकांनी यावेळी 2000 बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले

शालांत परीक्षेत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...!!!सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांच...
29/07/2020

शालांत परीक्षेत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...!!!
सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन..!!!

हार्दिक अभिनंदन सुहानी..!!!सुहानी नाईक हि आपल्या कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थीनी आहे. सर्वोत्तम ...
13/06/2020

हार्दिक अभिनंदन सुहानी..!!!
सुहानी नाईक हि आपल्या कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थीनी आहे. सर्वोत्तम २५ स्पर्धकांमध्ये ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव स्पर्धक ठरली.

जगभर कोरोनाची विषाणूची  दहशत असतांना शाळा ही बंद आहेत. अशा स्थितीत कळसुलकर इंग्लिश  स्कूल सावंतवाडीच्या (जि.सिंधुदुर्ग) ...
10/04/2020

जगभर कोरोनाची विषाणूची दहशत असतांना शाळा ही बंद आहेत. अशा स्थितीत कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या (जि.सिंधुदुर्ग) विद्यार्थ्यांनी घरी बसून आपल्या कलेला वाव देत(social distancing) सोशल डिस्टंन्सिगचा संदेश चित्रकलेच्या माध्यमातून समाजमनावर बिंबविला आहे.
कळसुलकर इंग्लिश स्कूल मधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी जयराम जयेश राऊळ याने सोशल डिस्टंसिंग कसे आणि कुठे कुठे पाळावे, याचा संदेश देणारे चित्र रेखाटले आहे. ज्यामधे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा दुकान, दूध डेअरी यांच्या बाहेर गर्दी न करता किमान 1 मीटर अंतर ठेऊन ग्राहक मास्क लावून उभे आहेत. ग्राहकांनसाठी खास चौकोन आखले आहेत. दुकानदारही मास्क वापरत आहेत, अशा प्रकारच्या सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारीचे संदेश देणारे, हे चित्र अतिशय बोलके आहे. शाळा बंद असल्या तरी सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून कळसुलकर शाळेचे शिक्षक मुलांच्या संपर्कात आहेत. घरच्या घरी मुले चित्रकलेसारखे वेगवेगळे छंद जोपासत आहेत. त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीचे सामाजिक भान देखील हे विद्यार्थी स्वतः राखत असून आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला ही तसा संदेश देत आहेत.

Address

Savantvadi
416510

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sawantwadi Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share