न्यू इंग्लिश स्कुल, सातारा.

  • Home
  • India
  • Satara
  • न्यू इंग्लिश स्कुल, सातारा.

न्यू इंग्लिश स्कुल, सातारा. New English School Satara (NESS) . !!!!!!!!! UNITY IS STRENGTH !!!

THE NAME IS SUFFICIENT..''SHALA MAULI'' GIVES US THE INSPIRATION,LOVE,CULTURE,TRUTH AND ALL THAT A HUMAN BEING NEED..AND WE ARE HAVING WILL TO FEED OUR FULFILLED NEED IN SOCIETY THAT WE GET FROM ''SHALA MAULI''....WE WANT PEACE...WE RULE !!!!!!!!!

!!!

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रहीमुद्दीन शेख यांची न्यू इंग्लिश स्कूल ला सदिच्छा भेट.खेळाडूंना दिले प्रत्यक्ष रग्बी खेळाचे प्र...
18/01/2020

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रहीमुद्दीन शेख यांची न्यू इंग्लिश स्कूल ला सदिच्छा भेट.
खेळाडूंना दिले प्रत्यक्ष रग्बी खेळाचे प्रशिक्षण.

भारतीय रग्बी संघाचे प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रहीमुद्दीन शेख सर यांनी न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना रग्बी खेळाचे प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले.यावेळी सातारा जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष वीरभद्र कावडे सर,उपाध्यक्ष प्रा मनोज चव्हाण सर,शाळेचे शाळा प्रमुख शिवले सर,रग्बी प्रशिक्षक ऋतुराज घाटगे सर,सुधाकर गुरव सर ,संग्रामजीत उथळे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी रहीम उद्दीन शेख यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की या खेळात तुम्हाला शाळेच्या वतीने चांगले मार्गदर्शन मिळत आहे ही सुवर्णसंधी तुम्हाला करियर घडविण्यासाठी मोलाची आहे.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले सर यांनी आज पर्यंत या शाळेतून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर खेळाडू चमकले हाच वसा आपण पुढे घेऊन संस्थेचे नाव उज्वल करा आपल्या खेळासाठी सर्व ती मदत करण्याचे शाळेचे आहे.यावेळी स्लाईड शो मधून शेख सरांनी नामांकित संघातील सामन्यातील काही अटकली पडद्यावर दाखवून उपस्थितांना माहिती दिली या कार्यक्रमात शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच ऋतुराज घाटगे सरांनी शेख सरांना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली.
गेल्या तीन वर्षापासून शाळेमध्ये रग्बी खेळाचा नियमित सराव होत असून आतापर्यंत सात मुली व चार मुले यांनी राज्यस्तरावर तर एका मुलीने राष्ट्रीय स्तरावर शाळा माऊली चे नाव उज्वल केले आहे. अशी माहिती रग्बी खेळाचे मार्गदर्शक ऋतुराज घाटगे सरांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप जाधव यांनी केले शाळेच्या मैदानावर रहीमुद्दीन शेख यांनी खेळाडूंना मैदानावर खेळताना कोणत्या कसबी वापरायच्या समोरच्या खेळाडूला कसे चकवायचे याबाबत स्वतः खेळून दाखवत मार्गदर्शन केले यावेळी वीरभद्र कावडे यांनी शाळेच्या वतीने रग्बी खेळासाठी होणाऱ्या कायमस्वरूपी सहकार्याबद्दल शाळेचे ऋण व्यक्त केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेमध्ये सातारा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाळा माऊलीच्या सिद्धी पिसाळ, वेदिका जाधव ,वैष्णवी जाधव ,प्रेरणा डांगरे,कुणाल साळुंखे.कुणाल बेलकर ,
वरद रेळेकर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेली कुमारी प्रांजली दीपक शेडगे हिचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या.
=============================================

*On this special day,*  *let's promise* our motherland that we'll do everything to enrich our *culture* and *heritage;* ...
26/01/2019

*On this special day,*
*let's promise* our motherland that we'll do everything to enrich our *culture* and *heritage;*
preserve our national treasures;
and *keep our country clean* of *filth* and *corruption....*
🇮🇳 *Happy Republic Day* 🇮🇳

🙏 अक्षय सुनिल काटकर 🙏

30/11/2017

न्यू इंग्लिश स्कूल, सातारा
माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
दि. ६ डिसेंबर २०१७
*स्मृतिगंध*
शालामाऊलीवर प्रेम करणाऱ्या असंख्य माजी विद्यार्थी बांधवांनो..
शाळकरी वयात तुम्ही सगळे शालामाऊलीच्या अंगाखांद्यावर तुमच्या शाळा सोबत्यांसमवेत खेळलात, बागडलात, धडपडलात, रडलात, हसलात. अनेक वेळा ज्या शिक्षकांच्या छड्या खाल्ल्या, त्याच शिक्षकांच्या पायाला हात लावून वंदन करताना पाठीत प्रेमाचा धपाटाही खाल्लात. आजही जुने शाळा सोबती भेटल्यानंतर या सर्व आठवणींना उजाळा मिळत असेल. त्या मंतरलेल्या दिवसांचे स्मृती पाखरु आजही तुमच्या मनात रुंजी घालत असेल. आठवत असेल आपला वर्ग, पाण्याची टाकी, ओंजळीने प्यायलेले पाणी, गोल जिना, पितळी घंटा, प्रेक्षागृह, गणेश हाॅल, मैदानातील मस्ती, कडक शिस्तीचे पण तितकेच प्रेमळ शिक्षक, गमतीदार लकबी असणारे शिपाई मामा. . . आणि अशा कितीतरी गोष्टी.
शाळा सोडल्यानंतर या सर्व आठवणी मनात साठवल्यात. शालामाऊलीने दाखविलेली वाट, दिलेले शिक्षण, रुजविलेले संस्कार या आधारे आयुष्याची यशस्वी वाटचाल करत आहात. पुन्हा एकदा शालामाऊली तुम्हाला साद घालत आहे. पुन्हा एकदा आठवणींचे ताजे लोणी घुसळून काढण्यासाठी शाळेच्या प्रांगणात या. निमित्त अर्थातच शालामाऊलीच्या वर्धापनदिनाचे.
*बुधवार दि. ६ डिसेंबर २०१७ * रोजी *सायंकाळी ५ ते ८* या वेळेत *सन २००० किंवा त्या पूर्वी १० वी उत्तीर्ण* झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. आपल्या काळातील सर्व आदरणीय गुरुजनांनाही निमंत्रित केले आहे. आपण आपल्या शाळेतील मित्र मैत्रीणींसह या. तुम्ही म्हणाल कार्यक्रम काय आहे?
*आपली भेट हाच कार्यक्रम*, तेव्हा अवश्य या आणि शाळेबरोबरचा स्नेहबंध अधिक दृढ करा.
धन्यवाद
आपले नम्र
*माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजन समिती*

मित्रानो आठवला का
26/05/2016

मित्रानो आठवला का

आता आली आहे सातारा बझार वेबसाईट जी तुम्हाला मदत करेल तुमच्या वस्तू विकण्यासाठी अधीक माहितीसाठी इथे क्लीक करा http://goo....
20/02/2015

आता आली आहे सातारा बझार वेबसाईट जी तुम्हाला मदत करेल तुमच्या वस्तू विकण्यासाठी अधीक माहितीसाठी इथे क्लीक करा http://goo.gl/Wb6gB1
आपल्या साताऱ्या साठी खास website proud to be सातारकर जास्तीत जास्त शेअर करा आणि ad पोस्ट करा.
फेसबुक पेज:-https://www.facebook.com/satarabazar

सर्व शाळा माऊलीच्या 10 वी च्या विद्यार्थ्यान्ना शुभेच्छा .....
12/02/2015

सर्व शाळा माऊलीच्या 10 वी च्या विद्यार्थ्यान्ना शुभेच्छा .....

मित्रानो आठवला का हे तळ, जुन्या आठवणी.
10/02/2015

मित्रानो आठवला का हे तळ, जुन्या आठवणी.

Coloured Prekshagraha is ready for celebrating upcoming republic day & gathering.so rush towards our SHALAMAULI...
21/01/2015

Coloured Prekshagraha is ready for celebrating upcoming republic day & gathering.so rush towards our SHALAMAULI...

 .
01/01/2015

.

Address

Somwar Peth
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

02162 238 563

Alerts

Be the first to know and let us send you an email when न्यू इंग्लिश स्कुल, सातारा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category