Yashwantrao chavan vidyalay vadjal

Yashwantrao chavan vidyalay vadjal Yashwantrao chavan vidyalay vadjal .

"कधी अस वाटतं किआपण उगाचच मोठे झालो !रम्य ते बालपण सोडूनउगाच तारुण्याच्या कवेत आलो !!तूटलेले मन आणिअपुर्ण स्वप्न यापेक्ष...
17/12/2014

"कधी अस वाटतं कि
आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून
उगाच तारुण्याच्या कवेत आलो !!

तूटलेले मन आणि
अपुर्ण स्वप्न यापेक्षा,
तूटलेली खेळनी आणि
अपुर्ण गृहपाठच बरा होता !!

BOSSचा ओरडा आणि
WARK LODE यापेक्षा,
बाईँच्या छड्या आणि
क्षणभंगुर रागच बरा होता !!

PROJECT, FILE आणि
PRESENTATION चा धाक यापेक्षा,
चिञकलेची वही आणि
भाषनाची स्पर्धाच बरी होती !!

प्रेस केलेला FORMAL आणि
SUITABLE TIE यापेक्षा,
चुरगळलेला गणवेश आणि
सुटलेली बूटाची लेसच बरी होती !!

OFFICE ची भरगच्च BAG
आणि LAPTOP यापेक्षा,
अर्धवट भरलेली WATERBAG आणि
शाळेच दप्तरच बर होतं !!

रजेच APPLICATION आणि
LEAVE साठीचा FORM यापेक्षा,
शाळेला मारलेली दांडी आणि
आजारपणाच नाटकच बर होतं !!

CANTEEN मधल जेवन
आणि थंडगार COLDRING यापेक्षा,
डब्याच रींगन आणि
बर्फाचा गोळाच बरा होता !!

घड्याळाचे वेध आणि
कामाची वेळ यापेक्षा,
वंन्दे मातरमचे बोल आणि
शाळेचा घंटानादच बरा होता !!

खरचं ! आता अस वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो !
रम्य ते बालपण सोडून
उगाच तारुण्याच्या कवेत आलो.....!!!

शाळेपासून बापाच्या,धाकात तो राहत असतो.कमी मार्क पडलेलं,प्रगतीपुस्तक लपवत असतो.आईच्या पाठी लपून तो,बापाशी बोलत असतो.डोळा ...
19/09/2014

शाळेपासून बापाच्या,
धाकात तो राहत असतो.
कमी मार्क पडलेलं,
प्रगतीपुस्तक लपवत असतो.
आईच्या पाठी लपून तो,
बापाशी बोलत असतो.
डोळा चुकवून बापाचा,
हुंदडायला जात असतो...
शाळा संपते, पाटी फुटते,
नवं जग समोर येतं.
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात,
मन हरखून जात असतं.
हाती असलेले मार्क घेऊन,
पायरया झिजवत फिरतअसतं.
बाप पाहतो स्वप्नं नवी,
हे मुखडा शोधत असतं...
सुरू होतं कॉलेज नवं,
दिवस भुर्रकन उडून जातात.
एटीकेटीच्या चक्रातून,
वर्षं पुढे सरत जातात.
ग्रुप जमतो, दोस्ती होते,
मारामाऱ्या दणाणतात.
माझा बाप ठाऊक नाही,
अशा धमक्या गाजतअसतात.
परीक्षा संपते, अभ्यास सरतो,
डिग्री पडते हाती याच्या.
नोकरी मिळवत, आणि टिकवत,
कमावू लागतो चार दिडक्या.
आरामात पसरणारे बाजीराव,
घोड्यावरती स्वार होतात,
आणि नोकरीच्या बाजारात,
नेमानं मोहिमा काढू लागतात...
नोकरी जमते, छोकरी सापडते,
बार मग उडतो जोरात.
एकट्याचे दोघे होतात,
सुखी संसार करू लागतात.
दोघांच्या अंगणात मग,
बछडं तिसरं खेळू लागतं.
नव्या कोऱ्या बापाला,
जुन्याचं मन कळू लागतं...
नवा कोरा बाप मग,
पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने,
आजोबाच्या कायेत शिरतो.
पोराशी खेळता खेळता,
दोघेही जातात भूतकाळात.
एकाला दिसतो दुसरा लहान,
दुसरा पाहतो गोष्ट महान...
रंगलेल्या गोष्टीत या,
मग शिरतो फ्लॅश बॅक.
बापाच्या भूमिकेतून,
पोर पाहतो भूतकाळ.
लेकरासाठी मग त्याला,
कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो,
उरात घेऊन फिरत असतो...
कडकपणाच्या आवरणाखाली,
झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या,
झगडणारं हाड असतं.
दोन घास कमी खाईल;
पण पोरांना गोड देतो.
हट्टासाठी पोरांच्या,
ओव्हरटाईम करत असतो...
डोक्यावरती उन्ह झेलत,
सावली तो देत असतो.
दणाणत्या पावसापासून,
कुटुंब आपलं जपत असतो.
घर नीट चालण्यासाठी,
स्वतः बाहेर फिरत असतो.
आईच्या मऊशार तळव्यामागचा,
तोच राकट हात असतो...
बाप कधी रडत नाही,
बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही,
बाप कधी मातत नाही.
पोरं सोडतात घरटं अन्,
शोधू लागतात क्षितिजं नवी.
बाप मात्र धरून बसतो,
घरट्याची प्रत्येक काडी...
पोरांच्या यशासोबत,
त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना,
मात्र आतून रडत असतं.
काही झालं, कितीही झालं,
तरी कणा ताठ असतो.
खचलेल्या पोराला,
तोच तर उभारी देत असतो...
सारी कथा समजायला,
फार मोठं व्हावं लागतं.
बापाचं मन कठीण फार,
चटकन हाती लागत नसतं.
आकाशाहून भव्य अन्,
सागराची खोली असते.
बाप या शब्दाची,
महतीच मोठी न्यारी असते...
कळत नाही बापाचं मन,
स्वतः बाप झाल्याशिवाय.
बापमाणूस असतो तो,
कसा कळणार बापांशिवाय ?
असतं न्यारंच रसायन,
त्याची फोड उकलत नाही.
म्हणून तर बापावर कविता,
कधी कोणी करत नाही...
करणार कशी कविता कोणी ?
तो त्यात मावत नाही.
चार ओळीत सांगण्यासारखा,
बाप काही लहान नाही.
सोनचाफ्याचं फूल ते,
सुगंध कुपीत ठरत नाही.
बाप नावाच्या देवाचा,
थांग कधी लागत नाही...
केला खरा आज सायास,
त्याला थोडं शोधण्याचा.
जमेल तेवढा सांगितला,
आधार आमच्या असण्याचा.
एक मात्र अगदी खरं,
त्याच्याशिवाय जमत नाही.
आईमार्फत बोललं तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही...
बाप नावाच्या पारिजातकाचं,
असंच काहीसं जिणं असतं.
ते समजून घेण्यासाठी,
बापच होणं भाग असतं

हे सुरखे,मने सुने,संगे,वने,धने,रुकी अन पिंट्या,माह्द्या,दत्त्या,निल्या,धन्या,बाळ्या,आर ऐकर लय भारी जोक झालार,हाहाहा ख्या...
17/08/2014

हे सुरखे,मने सुने,संगे,वने,धने,रुकी अन पिंट्या,माह्द्या,दत्त्या,निल्या,धन्या,बाळ्या,आर ऐकर लय भारी जोक झालार,हाहाहा ख्याख्या....................
गावाकडल्या मुलाचं हास्य ........ एक निरागस हास्य ........ दगडालाही पाझर फोड़ते एक विकट हास्य ...... काळजालाही पोखरुन काढते एक प्रेमळ हास्य . ... एक मोहक हास्य ...... डोळ्यांची झोपच उड़वते एक स्मित हास्य ....... गर्दीतही आपलेपणा देते कोमल हास्य .......इतके दिलखुलास मन, निरागस हास्य आपण लहान मुलाच्या चेहऱ्यावरच पाहू शकतो. आणि ते निरागस हास्य टिपण्याची किमया केली आहे

थांब बाळा चाललास कुठ ?अजून तुला पंख फुटल्यात कुठ ?शाळत चाललास वाटेत कुठ थांबू नगससांच्याला घरट्यात तुझ्या लवकर ये .....!...
05/10/2013

थांब बाळा चाललास कुठ ?
अजून तुला पंख फुटल्यात कुठ ?
शाळत चाललास वाटेत कुठ थांबू नगस
सांच्याला घरट्यात तुझ्या लवकर ये .....!!

शाळत गुरुजी म्हणल काही तर
मनाला लावून घेवू नगस
ढसढसून अन उसासून रडून
घराकड पाठ फिरवू नगस ......!!

पेन अन पुस्तक नाय म्हणून
मनाला नाग घेवू लावून
तुझ मास्तरबी गरीबच हाय
वाटल तर बग इचारून जावून ......!!

शाळत तुला ग्यान मिळतंय
भल अन बुर भी कळतंय
गुरुजी म्हणजी ग्यानाच पुस्तक हाय
त्यांना तू इसरशील म्हणून माझ मनं मला छळताय.....!!१

पोर ! शाळ्तन तुला कालिजात जायचं हाय
बापाचं नाव मोठ करायचं हाय
नोकरीच्या जीवावर तुझ्या
माझ म्हातारपण घालवायच हाय ....!!!

परवा म्हण शाळ्तल्या पोरान गळ्याला लावला फास
आधीच मुकल्या तुझ्या बापाला
तसला इचारही मनात आणून
कोंडू नको माझा स्वाश.....!१

शाळा,लहानपणी वस्तीवरून शाळेत यायला मजा वाटायची, येताना तालीच्या बोरीची बोर गोळा करायची,ते आणून शाळेत १ रुपयाला २० याप्रम...
24/07/2013

शाळा,लहानपणी वस्तीवरून शाळेत यायला मजा वाटायची, येताना तालीच्या बोरीची बोर गोळा करायची,ते आणून शाळेत १ रुपयाला २० याप्रमाणे विकायची,चिंचा असल्या कि त्या गाभाळलेल्या चिंचा खायला जाम मजा यायची,दिवसभर दात आंबून जायचं,दुपारच्या सुट्टीत चटणी भाकरी अन जोडीला चिंगळी कांदा फोडून खायला बर वाटायचं,राहिलेली भाकरी संध्याकाळी घरी येताना त्याचा लाडू करून घरी खात खात येत असायचो,घरन एखाद्या दिवशी चपाती दिली तर ती रस्त्याने चालत खात खात शाळेत यायचो,पण गेले ते दिवस आता उरल्या त्या फक्त आठवणी
मला श्री.माधव सावंत यांची शाळा कविता फार आवडली,आमच्या ग्रामीण भागातील शाळेच यतार्थ वर्णन त्यांनी केले आहे
|| शाळा ||

तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो अन पाटी-दप्तराच ओझ,
पाठीवरती वाह्याचो.......|| धृ ||

घर माझ शाळेपासून,
होत लई दूर.....!
प्रार्थनेला उशीर झाला की,
गुरुजी करायचे कुरकुर.....!
मग हिवाळा असो कि उन्हाळा,
मी अनवाणीच पळायचो ......||१||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

माय माझी मजुरीच्या,
कामावरती जायाची.....!
शाळेमधी चटणी-भाकर,
बांधून फडक्यामधी द्यायची.....!
मग दुपारच्या सुट्टीत मी,
ती आवडीन खायाचो .......||२||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

नाही विचारलं कधी कुणी मला,
तुला शाळेत काय येत......!
तरी जवळ घेऊन माय म्हणायची,
लेकरू माझ शाळेमधी जात......!
लाड-लाड मग मी तीला,
चार-आठ आणे मागायचो......||३||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

आठवड्याच्या बाजारातून आईन मला,
एक सदरा अन चड्डी घेतली होती.......!
रोज-रोज तीच-तीच घालून,
ती नको तिथ फाटली होती......!
तरी मी तीला मोठ्या,
आवडीने घालायचो.....||४||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

गुरुजी माझे लई कडक,
त्यांची शिस्त होती भारी.......!
नजरेच्या धाकानेच नुसती,
मुले गप्प बसायची सारी.......!
तरी नजर चुकवून त्यांची,
मुला-मुलिंची खोडी काढायचो.......||५||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

खेळ खेळतांना अशी,
ताकद अंगात यायची.....!
आट्या-पाट्या नि विटी-दांडूची,
रंगत वाढत जायची......!
कधी व्हायचा रडीचा डाव,
मग एकामेकासंगे भांडायचो......|| ६||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

रविवारची सुट्टी तर,
भारीच मला आवडायची.....!
गाई-म्हशी चारतांना,
चिंचा नि बोरे खायाची......!
नदी मधल्या खोल डोहात,
मनसोक्त पोहायचो......|| ७||

तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

गण्या,सुक्या,मोहन्या शाम्या,
माझे मित्र होते कोळ्याचे.....!
मासे धरतांना ओले कपडे,
नेहमी अंगावरच वाळायचे.....!
माशासंग खेकड्याच्या नांग्या,
नदीलाच भाजून खायाचो......||८||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

पाचवीत गेल्यावर मला,
नवीन भाषा इंग्रजी आली......!
तेव्हा पाढ्यासारखी घोकून-घोकून,
ए-बी-सी-डी पाठ केली......!
कधी-कधी यू नंतर व्ही एवजी व्ह्यू म्हणायचो,
अन छडीचा मार खायाचो......||९||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!

परीक्षा जवळ आली की,
माझ्या पोटात यायचा गोळा......!
गुरुजी म्हणायचे नेहमी,
मुलांनो अभ्यास करून खेळा......!
समजून अस सांगतांना,
त्यांच्यात मी माझी माय पाहायचो......||१०||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!!.

पूर्वी सारखे नाही राहिले आता,
शिक्षण आणि शाळा......!
नवनविन धोरणांनीच घोटलाय,
आज विद्यार्थ्यांचा गळा......!
इतक हसत खेळत शिकलो तरी,
चांगल्या मार्कांनी पास व्हायाचो....||११||
तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो......!
अन पाटी-दप्तराच ओझ,
पाठीवरती वाह्याचो.......|| धृ |

22/07/2013
"घड्याळा मध्ये तीनकाटे असतात, तेतीनही काटेएकमेकांना एका तासा मध्येफक्त एकदाच भेटतातआणि ते सुद्धा फक्तएका सेकंदा साठीच, प...
13/06/2013

"घड्याळा मध्ये तीन
काटे असतात, ते
तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये
फक्त एकदाच भेटतात
आणि ते सुद्धा फक्त
एका सेकंदा साठीच, पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले
आहेत,
नाही का ? ............... ........
आपली मैत्री अशीच आहे,
आपण
एकमेकांना कधीतरीच
भेटतो, पण
तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून
राहिलो आहोत"..........
त्या गोड
भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी .

व्हयरे पक्क्या बारावीतल्या पोरासनी लय टेन्शन असतं कार,.....................................................................
06/06/2013

व्हयरे पक्क्या बारावीतल्या पोरासनी लय टेन्शन असतं कार,...................................................................................................................................
मित्रानो माझे वकील मित्र श्री,उदय क्षीरसागर यांचा एक मोलाचा सल्ला
आज तुमचा निकाल . पालकाच्या आणि शिक्षकांच्या आणि इतर नातेवाईकांच्या आज आपल्याकडून खूप अपेक्षा असतील कारण इथून तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे . पण एक कळकळीची विनंती. हे जीवन सरळ नाही , इथे पावलापावलावर खाच खळगे आहे. आपण जो विचार करतो ते होईलच असे नाही तेव्हा आपल्या मना प्रमाणे निकाल आला नाही तर निराश होऊ नका . खर्या अर्थाने शिक्षण कधीच संपत नाही . मिळेल त्या मार्गाने शिक्षण घ्यायचे असते ज़े आवडते ते शिक्षण घ्या . एक मार्ग देवाने बंद केला कि तो आपल्याला सुखदायक व्हावे म्हणून दुसरा मार्ग उघडतोच. त्यामुळे जीवनात आपला मार्ग बंद झाला असे समजू नका नशिबाला दोष न देत ह्यातून काहीतरी चांगलेच घडले असा विचार करा . तसे पहिले तर ह्या विश्वत्तील प्रत्येक वस्तू , प्राणी , मानव ह्याकडून शिकण्यासारखे आहे . ते शिका .शिक्षण असे घेतले पाहिजे कि त्याच्यातून एका बाजूने पोट भारता आले पाहिजे तर दुसर्या बाजूने त्याला शहाणपण प्राप्त झाले पाहिजे . तेव्हा शिक्षणाचे यथार्थ महत्व मानव जातीला न समजल्याने मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात . तेव्हा आई वडील म्हणतात म्हणून एखादी शाखा घेऊन मोकळे होऊ नका . इंजिनियर किंव्हा डॉक्टर हाच एकमेव मार्ग नाही तर ब्यांक अधिकारी , यु . पी . एस . सी . , एम . पी . एस . सी . अश्या परीक्षा द्या मेहनत करा य़शस्वि व्हा पण निराश होऊ नका . आज तुम्ही निकाल सकारात्मक नजरेने स्वीकारालं हि ईश्वरचरणी प्रार्थना .

कोणे एके काळी मीदेखील शाळेत जात होतो.शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्येमी देखील मिसळून जात होतो.इतिहास आणि भूगोल, शिक्षकांच्...
15/02/2013

कोणे एके काळी मीदेखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्येमी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल, शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, चटनी आणि बाजरीची भाकरी आणि कांदा सर्वजन खात होतो,
फाडकयातील चपाती मात्र, लपून ठेवत होतो .

तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला होता,
माझ्या आठवणीच्या कोपऱ्यात कुठेतरी "शिरोडकर" ला शोधत होता,

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार,
आता दुकानात म्हणजे धंद्यात सार जीवनच अडकून राहणार .

काल बपुन्य फुटाने च्यात वड़ापाव खाताना शाळेतील न्याहरी आठवली .

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो .....

आठवते मला ती शाळा,आठवतो तो फळा,आठवते शाळेतजाण्यासाठी होणारी घाई,उशिरा आल्यावरओरडनार्या बाई,आठवतात अपूर्ण अभ्यासामुळेदिले...
13/02/2013

आठवते मला ती शाळा,
आठवतो तो फळा,
आठवते शाळेत
जाण्यासाठी होणारी घाई,
उशिरा आल्यावर
ओरडनार्या बाई,
आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे
दिलेले ते रट्टे,
शाळेतले ते कट्टे .....
आठवते मधल्या सुट्तीची ती बेल,
खेळून कसा जायचा तो वेळ,
आठवतो तो मधल्या सुट्टी नंतरचा आळस,
अभ्यासाचा वाटणारा तो कळस,
आठवते ती घरी जाण्याची घाई,
न आपली घरी वाट
पाहणारी ती आई,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Address

At-post Vadjal Tal-man Dist-Satara
Satara
415509

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwantrao chavan vidyalay vadjal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Yashwantrao chavan vidyalay vadjal:

Shortcuts

Share

Category