18/09/2021
दिनांक 17 /9/2021 ते 20/ 9 /2021 या दरम्यान औरंगाबाद येथे स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया साई सेंटरमध्ये महाराष्ट्र राज्य सीनियर गटाच्या सिलेक्शन ट्रायल स्पर्धा घेतल्या गेल्या यामध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमी सातारा यांच्या दोन खेळाडूंची कंपाउंड राउंड या इव्हेंट मधून राष्ट्रीय वरिष्ठ गट धनुर्विद्या स्पर्धा झारखंड (टाटानगर )या ठिकाणी निवड झालेली असून यशस्वी खेळाडूं ना मानद प्रशिक्षक प्रवीण सावंत तसेच सहाय्यक प्रशिक्षक शिरीष नानावरे सर यांचे मार्गदर्शन लाभले
टाटानगर झारखंड येथे होणाऱ्या वरिष्ठ गट स्पर्धेमध्ये सिलेक्शन झालेल्या ऋषिकेश अरविंद गुजर व प्रथमेश भालचंद्र फुगे या दोन्ही यशस्वी खेळाडूंचे दृष्टी आर्चरी अकॅडमी सातारा चे अध्यक्ष माननीय सुजीत शेडगे सर उपाध्यक्ष धन्वंतरी वांगडे मॅडम सचिव सायली सावंत व खजिनदार राजेंद्र देवकर सर यांनी अभिनंदन केले तसेच सातारा जिल्हा आर्चरी असोसिएशनचे सचिव माननीय चंद्रकांत भिसे सर व भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर सर त्यासोबत दृष्टी अकॅडमी सातारा च्या सर्व सदस्यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या 👍🏼