Annasaheb Kalyani Vidyalaya, Satara

Annasaheb Kalyani Vidyalaya, Satara रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा

Welcome to अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा Page! We also arrange the alumni events.

This page is for the students, faculties, and the people who share a bond with the Annasaheb Kalyani Vidyalay Satara. If you really like AKV Satara.. Click LIKE above there. :)

16/06/2020

!
Post your picture with friends from school days!

17/12/2014

शाळेत शिकलेल्या कविता, धडे आणि ते तास बरच काही शिकवून जातात.

तुमच्या आवडत्या कविता, धडे व आपल्या त्याबद्दलच्या आठवणी नक्की शेअर करा.

अशीच एक बालभारती मधील कविता तुमच्यासाठी -

'ओळखलत का सर मला?'
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी.

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला वरती पाहून
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.'

माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली.

भिंत खचली,
चूल विझली,
होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे,
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,
चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.'

- कवी कुसुमाग्रज

08/09/2013

Hi everyone, Who is/are/was/were your favorite teacher(s)?
Every teacher has touched our life and has contributed to shape it... however, some of them bear a special place in our hearts... Let's remember that bond... :)

03/09/2013

Thank you very much everyone for proudly liking your school and adding it to your profile.
We have crossed 1,000 likes today!! Congratulations to you all!

Never forget: "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद."
Proud to be an !

30/06/2013

डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील
महान शिक्षणतज्ञ आणि रयत शिक्षण संस्था सातारा | Rayat Shikshan Sanstha Sataraचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राज्यातील सर्वात मोठया शिक्षण संस्थेची स्थापना केली. दि.०५ एप्रिल १९५९ रोजी पुणे विद्यापीठातर्फे त्यांना 'साहित्याचे विशारद' या पदवीने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती केली. काही सामाजिक संस्था व सहकार चळवळीशी त्यांचा संबंध होता. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय हे सातारा येथे असून त्याच्या जवळपास ६८९ शाखा संपूर्ण राज्यात पसरलेल्या आहेत.तसेच ४.४२ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.

12/06/2013

so true...!

21/05/2013

Our excellent students!! Our great school!

कर्मवीर भाऊराव पाटीलLike : रयत शिक्षण संस्था सातारा | Rayat Shikshan Sanstha Satara!Read, Like and share. :)
22/04/2013

कर्मवीर भाऊराव पाटील

Like : रयत शिक्षण संस्था सातारा | Rayat Shikshan Sanstha Satara!

Read, Like and share. :)

कर्मवीर भाऊराव पाटील

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
[संपादन]रयत शिक्षण संस्था सातारा | Rayat Shikshan Sanstha Satara
पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्य ा नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -
शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे

19/04/2013

सुभाषिते आवडतात? तर मग करा Like आणि Share करा आपल्या Wall/Pages वर सुभाषितमाला..!!!!

The सुभाषित (Subhash*ts) are the two line poems depicting moral values, various good t

Remember your AKV days??Thank you Mr. Dhananjay P Sarode for sharing this picture.
18/04/2013

Remember your AKV days??
Thank you Mr. Dhananjay P Sarode for sharing this picture.

18/04/2013

सुभाषिते आवडतात? तर मग करा Like आणि Share करा आपल्या Wall/Pages वर >>>> सुभाषितमाला

23/02/2013

मित्रांनो, आपल्या शाळेतील कोणता असा अविस्मरणीय क्षण आहे जो तुम्हाला प्रथम आठवतो..??

Address

Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annasaheb Kalyani Vidyalaya, Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category