Krushi Sanjivani by Vishal Raskar

Krushi Sanjivani by Vishal Raskar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krushi Sanjivani by Vishal Raskar, Educational consultant, Satara.
(2)

कृषी संजीवनी हा फक्त एक ग्रुप नाही तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभी केलेली एक चळवळ आहे.

आपणास शेतीविषयक अगदी कमी खर्चातली पण शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न असतो. इथे कोणत्याही कंपनी चे किंवा प्रॉडक्ट चे प्रोमोशन केले जात नाही. जे गरजेचे आहे तेच सांगितले जाते.

आपलें शेती विषयक काहीही प्रश्न असल्यास आपण ग्रुप वर विचारू शकता. जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळेल 🙏🏻🙏🏻

09/07/2026
06/07/2026

कृषी संजीवनी शेतकरी कार्यशाळा

केसर आंबा शेतीत भरपूर उत्पन्न घेण्यासाठी त्यात इतर आंबा जातीची झाडे लावावी लागतात.

केसर आंबा जातींचे पराग कण आपले बीज फलित करण्यासाठी पूर्णपणे सक्षम नसतात, त्यामुळे बागेत इतर आंबा जातींचे पराग कण उपलब्ध असतील तर परागिभवन चांगले होऊन उत्पन्न चांगले मिळते.

कृषी संजीवनी हायटेक ऍग्री सोल्युशन्स.
वॉट्सअप 9120389120

युट्युब चॅनेल लिंक https://youtube.com/?si=3uiGVYAiKYB90Mte

फॉलो वॉट्सअप चॅनेल: ‎🌻🌾 कृषी संजीवनी 🌾🌻 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaheq2wHAdNRcb3XoI0O

केसर आंबा शेती. थोडक्यात पण महत्वाचे. वॉट्सअप चॅनेल लिंक... 🌻🌾 कृषी संजीवनी 🌾🌻  https://whatsapp.com/channel/0029Vaheq2w...
05/07/2026

केसर आंबा शेती. थोडक्यात पण महत्वाचे.

वॉट्सअप चॅनेल लिंक...
🌻🌾 कृषी संजीवनी 🌾🌻 https://whatsapp.com/channel/0029Vaheq2wHAdNRcb3XoI0O

04/07/2026

आंबा बागायतदार होण्याचा प्रवास इथून सुरु होतो.

पावसाला सुरुवात झाली आहे, आता लागवड केली तर 2028 ला उत्पन्न सुरु होते...

आणि अजून वाट पाहत बसलात तर वर्ष वाया जाते....
हलक्या आणि मुरमाड जमिनीत संघन आंबा लागवड करून चांगले उत्पन्न घेता येते.

आपले पण आंबा बागायतदार होण्याचे नियोजन असेल तर...

कृषी संजीवनी हायटेक ऍग्री सोल्युशन्स.
091203 89120

02/07/2026

छोट्या 1 वर्षाच्या आंबा कलमाची लागवड... 15 दिवस झाले...

शेतकरी पैसे वाचवायचे म्हणून आंबा लागवड करण्यासाठी छोटया रोपांची म्हणजे अगदी 8-12 महिने वयाची निवड करतात. पण दीर्घकालीन गुंतवणूकीत रोपांवर पैसे वाचवने कितपत योग्य.

छोटी रोप नाजूक असतात, त्यामध्ये नवीन वातावरणात तग धरण्याची क्षमता कमी असतें, तसेच अशी रोपे नर्सरी मध्ये ह्यूमिक आणि झायटॉनिक वर वाढवलेली असतात त्यामुळे नवीन वातावरणात आली कि त्यांची मर व्हायला सुरुवात होते. ह्या रोपांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने ह्यावर रोगाचा प्रादुर्भाव लगेच होतो. शेतकऱ्यांना सुरुवातीला फवारण्या काळत नाहीत आणि झाडे मारायला लागतात.

त्यातच जमिनीचा pH 8 च्या पुढे आणि CaCO3 (चुन खड) 7-8 च्या पुढे असेल तर छोट्या झाडांना सफेद मुळी तयार होताच त्याचा इन्टेक थांबतो आणि झाडे पिवळी पडायला लागतात आणि झाडे मारायला लागतात....

त्यामुळे छोट्या रोपांच्या लागवडीमध्ये मर होण्याचे प्रमाण अगदी 20% किंवा त्यापेक्षा जास्त जाते.

त्याउलट 18-24 महिन्याचे 12*11 इंच पिशवीतील रोपांचे रिसल्ट चांगले आहेत.

विशाल रासकर
BSc MBA ऍग्री
कृषी संजीवनी हायटेक ऍग्री सोल्युशन्स
वॉट्सअप 9120389120

29/06/2026

हलक्या आणि मुरमाड जमिनीत भरपूर उत्पन्न देणारी शेती. सघन आंबा लागवड.

कृषी संजीवनी हायटेक ऍग्री सोल्युशन्स.
9120389120

वॉट्सअप चॅनेल लिंक ‎
Follow the 🌻🌾 कृषी संजीवनी 🌾🌻 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaheq2wHAdNRcb3XoI0O

आंबा बाग छाटणी कशी करावी... शेतकरी स्वतः करू शकतात. आणि कोणती खते द्यावीत
22/06/2026

आंबा बाग छाटणी कशी करावी... शेतकरी स्वतः करू शकतात. आणि कोणती खते द्यावीत

मे महिन्यात आंब्याची काढणी झाल्यावर बागेत छाटणीचे आणि खताचे नियोजन ...

22/06/2026

खात्रीशीर कलम ते उत्पन्न, पूर्ण मार्गदर्शन.
आंबा बागायतदार होण्याचा प्रवास इथून सुरु होतो....

20/06/2026

मलेशियन ग्रीन डवर्फ खात्रीशीर रोप
9120389120

मलेशियन ग्रीन ड्वार्फ (Malaysian Green Dwarf) नारळ नारळाची जात सध्या शेतकरी आणि बागायतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या...
20/06/2026

मलेशियन ग्रीन ड्वार्फ (Malaysian Green Dwarf) नारळ

नारळाची जात सध्या शेतकरी आणि बागायतदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या जातीबद्दलची महत्त्वाची माहिती:

​१. मुख्य वैशिष्ट्ये:
​लवकर उत्पादन: ही जात लावल्यानंतर साधारण ३ ते ४ वर्षांत फळे देण्यास सुरुवात करते.

​कमी उंची: ही बुटक्या (Dwarf) प्रकारची जात असल्याने झाडाची उंची खूप वाढत नाही. साधारणपणे 20 ते 25 फूट (५-७ मीटर) पर्यंत झाडाची उंची मर्यादित राहते, ज्यामुळे फळे काढणे (हार्वेस्टिंग) सोपे जाते.

​उत्पादन क्षमता: योग्य निगा राखल्यास या झाडापासून चांगले उत्पादन मिळते. एका झाडापासून वर्षाला अंदाजे 200 ते 225 किंवा त्यापेक्षा जास्त नारळ मिळू शकतात.

​नारळाचा दर्जा: या जातीचे नारळ मध्यम आकाराचे असून त्यातील पाणी गोड आणि चविष्ट असते. तसेच, त्यात तेलाचे प्रमाणही चांगले असते.

२. लागवड आणि हवामान:
​हवामान: ही जात उष्ण आणि दमट हवामानात (Tropical climate) उत्तम वाढते. कोकण, मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागांसाठी ही जात अत्यंत फायदेशीर मानली जाते.

​जमीन: पाण्याचा निचरा होणारी, सुपीक आणि सेंद्रिय घटक असलेली जमीन याच्या वाढीसाठी उत्तम असते. जिथे पाणी साचून राहते, अशी जमीन लागवडीसाठी टाळावी.

​अंतर: झाडांची योग्य वाढ होण्यासाठी दोन झाडांमध्ये साधारण ५ ते ६ मीटरचे अंतर ठेवणे फायदेशीर ठरते.

​३. काळजी आणि व्यवस्थापन:
​पाणी: झाडांना नियमित पाणी देणे गरजेचे असते, विशेषतः उन्हाळ्यात झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

​खत व्यवस्थापन: चांगल्या उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा. दरवर्षी गरजेनुसार NPK खतांचे डोस दिल्यास झाडाची वाढ आणि फळधारणा चांगली होते.

​देखभाल: झाडाच्या बुंध्याभोवती स्वच्छता ठेवावी आणि वाळलेली पाने वेळोवेळी काढावीत.

​४. मलेशियन ग्रीन ड्वार्फचे फायदे:
​कमी जागा: कमी जागा असलेल्या बागा किंवा घराच्या परसबागेसाठी ही जात अतिशय उत्तम आहे.

​मार्केटिंग: या नारळाच्या पाण्याची मागणी बाजारात जास्त असल्याने, व्यावसायिक शेतीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

​** लवकर परतावा:** इतर पारंपारिक नारळाच्या जातींच्या तुलनेत हे झाड लवकर उत्पादन देऊ लागते, त्यामुळे गुंतवणुकीचा परतावा लवकर मिळण्यास मदत होते.

खात्रीशीर रोपांसाठी संपर्क.
कृषी संजीवनी हायटेक ऍग्री सोल्युशन्स.
091203 89120

Address

Satara

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi Sanjivani by Vishal Raskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share