जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज वडगांव

  • Home
  • India
  • Satara
  • जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज वडगांव

जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज वडगांव जयराम स्वामी विद्यामंदिर या आपल्या शाळेच्या अधिकृत फेसबुक पेज वर आपले स्वागत आहे.

NDRF पथकाकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडेरेस्क्यू ऑपरेशन, आग नियंत्रण, कृत्रिम श्वसनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्...
18/09/2026

NDRF पथकाकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

रेस्क्यू ऑपरेशन, आग नियंत्रण, कृत्रिम श्वसनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग

वडगाव, ता. खटाव, जि. सातारा, दि. १५ सप्टेंबर २०२६ :
जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, वडगाव येथे ५ बटालियन, NDRF, मुख्यालय पुणे यांच्या पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संदीप कदम, रा. गोरेगाव, हे सेवेतून हेड कॉन्स्टेबल पदावरून निवृत्त होत असल्याच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून हा उपयुक्त व मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने उपस्थित NDRF अधिकारी व जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. अण्णासाहेब घार्गे उपस्थित होते.

NDRF पथकातील ASI/GD रितेश कुमार, ASI/RO दुर्वेश कुमार, HC/GD तुळशिदास वानडे तसेच रेस्क्यू पथकातील भानुशे प्रकाश, गोकुळ वाघ, सत्यवान इंदलकर, तुषार भोसले, दत्ता पाटील आदी अधिकारी व जवानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ASI रितेश कुमार यांनी NDRF चे कार्य, आपत्तीच्या काळातील पथकाची भूमिका तसेच आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर NDRF जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन, आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या पद्धती, भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी, आपत्कालीन बचावकार्य, कृत्रिम श्वसन (Artificial Breathing), दोरीच्या साहाय्याने बचावकार्य तसेच आपत्तीग्रस्त व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनाही विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी करून घेत प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे, याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, स्वयंरक्षण, धैर्य, प्रसंगावधान आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली. NDRF जवानांनी दिलेले प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संदीप कदम यांचे विशेष आभार मानण्यात आले. NDRF अधिकारी व जवानांनी दिलेल्या अमूल्य प्रशिक्षणाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जे. बी. घार्गे सर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. बी. पवार सर यांनी केले.

18/09/2026
जयराम स्वामी विद्यालयातील इ.१० वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा  वडगाव (ज.स्वा.), ता. खटाव : जयराम स्वा...
09/07/2026

जयराम स्वामी विद्यालयातील इ.१० वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

वडगाव (ज.स्वा.), ता. खटाव : जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, वडगाव (ज.स्वा.) येथे सन २०२५–२६ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत विद्यालयात प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या व 90% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विद्यालयाच्या विकासासाठी ₹१,००,००० (एक लाख रुपये) देणगी दिलेल्या श्रीमती राजमती जगन्नाथ कोरे यांचा आज विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ संपन्न झाला.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत कु. राजनंदिनी किशोर नागमल (९५.६०%) हिने प्रथम, कु. सानिका आप्पासाहेब भोसले (९४.६०%) हिने द्वितीय, तर कु. अनुष्का अनिल माळी (९३.६०%) व कु. प्रतीक्षा धनाजी पवार (९३.६०%) यांनी संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त करून विद्यालयाच्या यशात भर घातली.
तसेच इयत्ता बारावी (कला शाखा) परीक्षेत कु. मगर वसुधा भिकू (६४%) हिने प्रथम, कु. पौर्णिमा किसन उबाळे (६१.३३%) हिने द्वितीय, तर रुद्र ज्ञानेश्वर उमापे (६०.८३%) याने तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला.
याच कार्यक्रमात विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कोरे मॅडम यांनी एक लाख रुपयांची उदारहस्ते देणगी प्रदान केली. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त करत टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यवेक्षक श्री. एस. के. पुजारी यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा घेतला व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य श्री. जे. बी. घार्गे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच कोरे मॅडम यांचे आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि उच्च ध्येय ठेवण्याचा संदेश दिला. त्यांनी देणगीदारांचे योगदान हे विद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. एस. ए. जाधव सर व श्री. ए. ए. शिंदे सर यांनी केले, तर श्री. डी. एच. गोरे सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी व देणगीदारांचे आभार मानले.
या प्रसंगी , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि विद्यालयाच्या विकासासाठी लाभलेले आर्थिक योगदान यामुळे संपूर्ण विद्यालयात आनंदाचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज वडगाव !! 🌹🌹 शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त  धमाका 🌹🌹 आपल्या विद्यालयाचे ...
04/07/2026

जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज वडगाव !!

🌹🌹 शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त धमाका 🌹🌹

आपल्या विद्यालयाचे 8 वी स्कॉलरशिप गुणवत्ता याद्दी मध्ये मध्ये 16 विद्यार्थी ✌️✌️
तसेच एक विद्यार्थिनी राज्यात आठवी. 🙏
सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ✨
- Team JSVV

🎉 जयाराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, वडगाव (जि. सातारा) चा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ चा उत्कृष्ट निकाल! 🎉📚 श...
08/05/2026

🎉 जयाराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, वडगाव (जि. सातारा) चा एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२६ चा उत्कृष्ट निकाल! 🎉

📚 शाळेचा निकाल : ९७.१४%
👨‍🎓 परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी : १४०
✅ उत्तीर्ण विद्यार्थी : १३६

उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम! 🌟

भविष्यातील वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! 🚀📖

- Team JSVV

02/05/2026

आजच प्रवेश घ्या..
प्रवेश मर्यादित !!
- Team JSVV

Address

Jayram Swami Vidyamandir & Junior College Vadgaon, Tal-Khatav
Satara
415512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जयराम स्वामी विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज वडगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category