27/07/2024
एका क्लाएंटने तीन चार दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होता पण त्यावेळी वेळ मिळाला नाही लिहायला.
की, तुम्ही तर सगळ्या ठिकाणी महादेव ह्यांच नाव घेता. तरीही तुम्ही श्री राम ह्यांच्या विषयी पण बोलता लिहिता (क्लाएंट एफबी वरील आहे)
सगळ्यात महत्वाचं मी महादेव ह्यांची भक्त आहे. पण मी शैव वैष्णव शाक्त ह्यामध्ये स्वतःला अडकवून घेत नाही. मी वेळ मिळेल तसे इस्कॉन मध्ये जाते. जिथं फक्त श्री कृष्ण एकमेव आहे हे सांगितल जातं. मी वेळोवेळी देवीच नवरात्र मध्ये करते.
माझी एवढी उंची नाही, ना ही मी खूप अभ्यासू, तत्वज्ञानी आहे, अध्यात्म मध्ये मी एक टक्का सुद्धा नाही, पण असा वाद घालणाऱ्या लोकांचे हसू येते.. खरचं ह्यांना परमात्मा समजला का??
#भगवान शिव म्हणजे विध्वंस, नाश, अंत .... काही #अंत झाला तरच नव्याचा आरंभ आहे, सुरुवात आहे. भोळा भाबडा आहे, तो सगळ्यांचा आहे. भुतांचा, पिशाच्च, माणूस, गण सगळ्यांचा. लगेच प्रसन्न होणारा,पण तरीही, रुद्रावतार धारण करणारा.
#आरंभ नी अंत ह्यामधील जो प्रवास आहे, तो पालन करणारा, सांभाळणारा, बॅलन्स ठेवणारा असा #पालन हार म्हणजे श्री विष्णू. सहज भक्तीमुळे प्रसन्न होणारा जरी असला तरी लगेच विचार न करता #वर न देणारा. पालन करायचं आहे त्यामुळे सगळ्यांचा विचार करून, भोळे पणाने नाही तर विचारपूर्वक निर्णय घेणारा असा हा श्री विष्णू...
दोन्ही देवतांना वेळोवेळी मदतीला उभी राहणारी ती म्हणजे #शक्ती त्याच आपल्या देवी. दुष्टांचा संहार करीत आरंभ नी अंत ह्यामधील प्रवासातील शिवशक्ती रूप....
जिथं सीता देवी #महादेव ह्यांची पूजा भक्ती करून श्री राम ह्यांच्या सारखा पती देव मिळवते, तर सीता मातांच्या पती देव ह्यांचा #रुद्र अवतार शिव स्वरूप, #मारुती राया श्री राम (श्रीविष्णू) ह्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परम भक्त बनतात.
जिथं श्री विष्णू, महादेव एकमेकांची भक्ती करतात, उपासना करतात . वेळप्रसंगी महादेव #देवी शक्ती समोर बाल रूप घेऊन शरणागती पत्करतात, तिथं देवांवरून वाद घालणाऱ्यांना खरच #परमात्मा समजले का?? हा प्रश्न पडतो.
कोणाचेही नामस्मरण करा, कोणाचीही पूजा करा. फक्तं जे कराल ते मनोभावे करा. हृदयातून निघणारी साधना करा. भक्ती भाव सदैव राहू द्या. तो एकच आहे ... भक्तीमध्ये तल्लीन होणारा. कोण वरचढ, कोण श्रेष्ठ नी कोण शक्तिमान हे त्यांनी कधी केलं नाही.वेळोवेळी एकमेकांची पूजा, प्रार्थना, साधना केली.तर आपण त्यांची तुलना करणारे कोण?? त्यांच्या सारखेच नाही होऊ शकलो तरीही, भक्ती तर हृदयातून तुलना न करता करूच शकतो.
🚩हर हर महादेव 🚩🔱
🚩 श्री राम 🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
दिप्ती जोशी 🌷🍃