07/05/2021
यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनांतील फरक
▪️ यशस्वी माणूस नेहमीच समस्येचे निराकरण करण्याच्या मागे असतो; अयशस्वी माणूस मात्र अडचणींचाच बाऊ करत राहतो.
▪️यशस्वी माणूस काम करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो; अयशस्वी माणूस काम टाळण्यासाठी सबबी सांगत राहतो.
▪️यशस्वी माणूस म्हणतो," चला, तुमचं हे काम मी करून देतो'; अयशस्वी माणूस उत्तर देतो,“ ते माझं काम नाही.
▪️यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असते; अयशस्वी माणूस मात्र प्रत्येक उत्तरावर नवी समस्या शोधून काढतो.
▪️यशस्वी मनुष्य म्हणतो,“ ही गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे', अयशस्वी माणूस म्हणतो,“ हे शक्य असेल पण फार कठीण आहे".
▪️यशस्वी माणूस चूक केल्यानंतर म्हणतो,“ मी चुकलो”;
अयशस्वी माणूस म्हणतो,“ त्यात माझं काही चुकलं नाही.'
▪️यशस्वी माणूस वचनबद्ध असतो; अयशस्वी माणूस फक्त आश्वासने देतो . .
▪️यशस्वी माणसं स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून काम करतात;
अयशस्वी माणसं केवळ कागदी घोडे नाचवतात.
▪️यशस्वी माणूस म्हणतो,“ मीच अमुक गोष्ट केली पाहिजे";
अयशस्वी माणूस म्हणतो,"काहीतरी व्हायला पाहिजे".
▪️यशस्वी माणूस काही विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या गटाचा भाग असतो;
अयशस्वी माणूस अशा कुठल्याही गटापासून दूर राहतो.
▪️ यशस्वी माणसं समोर दिसणाऱ्या यशाचा विचार करतात;
अयशस्वी माणसं यशप्राप्तीसाठीच्या कष्टांचीच धास्ती घेतात.
▪️यशस्वी माणसं सकारात्मक शक्यतांचा विचार करतात;
अयशस्वी माणसं समस्यांवर अडून बसतात.
▪️यशस्वी माणसं आपल्याबरोबर इतरांनाही यशप्राप्ती होईल या विचाराने काम करतात;
अयशस्वी माणसं आपल्या यशासाठी कोणाला तरी अयशस्वी व्हावे लागेल असा विचार करतात.
▪️यशस्वी माणूस सुप्त यशाचा विचार करतो;
तर अयशस्वी माणूस भूतकाळात रमतो.
▪️यशस्वी माणूस परिस्थिती - नियंत्रकासारखा;
तर अयशस्वी माणूस परिस्थितीनुसार खाली - वर होणाऱ्या निर्देशकासारखा असतो.
▪️यशस्वी माणूस बोलण्याआधी विचार करतो;
अयशस्वी माणूस आधी बोलतो आणि मग विचार करत बसतो .
▪️यशस्वी माणूस कटू गोष्ट सौम्य शब्दांत सांगतो;
अयशस्वी माणूस सौम्य गोष्टदेखील कटू शब्दांत सांगतो.
▪️यशस्वी माणसं किरकोळ तडजोडी करतात पण मूल्यांच्या बाबतीत दृढ असतात;
अयशस्वी माणसं किरकोळ गोष्टीबाबत आग्रही असतात आणि मूल्यांच्या बाबतीत तडजोड करतात.
▪️यशस्वी माणसं सहानुभूतिपूर्वक दुसऱ्याचा विचार करून म्हणतात:" इतरांनी तुमच्याशी करू नये असे वर्तन तुम्ही इतरांशी करू नका"; अयशस्वी माणसाचे तत्त्वज्ञान असतं: " इतरांनी तुम्हांला धक्का देण्याआधी तुम्हीच त्यांना धक्का दया"
▪️यशस्वी माणसं गोष्टी स्वत: घडवून आणतात;
अयशस्वी माणसे घडणाऱ्या गोष्टींकडे पहात बसतात .
▪️यशस्वी माणसं जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक तयारी करतात . त्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष तयारी महत्त्वाची असते .
✒️ श्री. शिव खेडा लिखित *आपण जिंकू शकता* या पुस्कातील काही भाग
🍂🍁🌿🍁🍂🍂🍂🍁🌿🌿🍁🍂🍂🍁🍁🌿
चला तर मग आपणही यशस्वी दृष्टिकोन ठेवू, व वरील अयशस्वी कृती टाळायला सुरवात करू. सगळे एकाच वेळी होणार नाही पण रोज यातील एकच गोष्ट अंमलात आणली तर 15 दिवसातच आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगला बदल घडेल.
श्री. दत्तात्रय कोळी
विकास अधिकारी (LIC)
करिअर मार्गदर्शक
आर्थिक सल्लागार
@ 7020708559
@ 8390325740
http://www.dkfinology.in
या वेबपोर्टलवर माझे सर्व लेख तुम्ही वाचू शकता.