MTES Balak Mandir, Sangli

MTES Balak Mandir, Sangli The official facebook account of MTE Society's Balak Mandir, Sangli

आईची सोबत म्हणजे आनंदाची खात्री! ​आईची साथ असेल मागे, तर आयुष्याचा प्रत्येक प्रवास हसत-खेळत पार पडतो. मुलांच्या आयुष्याच...
10/05/2026

आईची सोबत म्हणजे आनंदाची खात्री!

​आईची साथ असेल मागे, तर आयुष्याचा प्रत्येक प्रवास हसत-खेळत पार पडतो. मुलांच्या आयुष्याचा पाया भक्कम करणाऱ्या आणि त्यांना प्रेमाने घडवणाऱ्या सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #बुद्धपौर्णिमा  #ग...
01/05/2026

विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

#बुद्धपौर्णिमा #गौतमबुद्ध

मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची शान आहे. संतांच्या वचनातून, विचारवंतांच्या लेखणीतू...
01/05/2026

मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची शान आहे. संतांच्या वचनातून, विचारवंतांच्या लेखणीतून आणि छत्रपतींच्या पराक्रमातून समृद्ध झालेली ही मायमराठी आपल्याला संस्कार, स्वाभिमान आणि एकतेचा संदेश देते.
आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा अभिमानाने वापर करून, तिचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे.

चला, मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन मराठी भाषेचा गौरव करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिची श्रीमंती पोहोचवूया.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

#मराठीराजभाषादिन #माझीमराठी #मराठीअभिमान #मायमराठी #मराठीसंस्कृती #भाषादिन

जय महाराष्ट्र 🚩शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान जपूयाकष्टकरी हातांना मानाचा सलाम 🙏महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हा...
01/05/2026

जय महाराष्ट्र 🚩
शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान जपूया
कष्टकरी हातांना मानाचा सलाम 🙏
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

"अक्षय्य सुखाचा दिलासा, मनात कर्तृत्वाचा भरवसा..लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा, शुभेच्छांना मिळो मुहूर्त हवाहवासा..."सर...
19/04/2026

"अक्षय्य सुखाचा दिलासा,
मनात कर्तृत्वाचा भरवसा..
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा,
शुभेच्छांना मिळो मुहूर्त हवाहवासा..."

सर्वांना अक्षय्य तृतीया सणाच्या मंगलमय शुभेच्छा..!

प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित...
14/04/2026

प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी केली. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी अखंडपणे सत्याची आणि न्यायाची बाजू त्यांनी लावून धरली. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन..

क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!शिक्षणाचा मंगल प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवून, साम...
11/04/2026

क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

शिक्षणाचा मंगल प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवून, सामाजिक समता आणि न्यायासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देत, अंधश्रद्धेला आव्हान दिले आणि शोषितांसाठी आवाज उठवला. जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन..

जगाला शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारे, जैन धर्मीयांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना वि...
31/03/2026

जगाला शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारे, जैन धर्मीयांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या जीवनातून कुटुंबवत्सलता, सत्यवचनता,...
26/03/2026

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या जीवनातून कुटुंबवत्सलता, सत्यवचनता, कर्तव्यपालन, शुद्ध आचरण हे आदर्श मानुन अंगीकारण्याचा संकल्प करुया.

24/03/2026

लहानगी पावले, मोठी स्वप्ने! 🎓✨
आज एम.टी.ई.एस. बालक मंदिर, विश्रामबाग येथील चिमुकल्यांचा 'पदवीदान समारंभ' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनातील हा पहिला टप्पा पार करताना या बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून खरोखरच अभिमान वाटला.
या सर्व छोट्या दोस्तांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

Address

Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when MTES Balak Mandir, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MTES Balak Mandir, Sangli:

Shortcuts

Share

Category