06/10/2024
Physics association,Willingdon college,Sangli
Education
06/10/2024
21/11/2020
प्रख्यात भारतिय #नोबेल_पारितोषिकांनी सन्मानीत महान वैज्ञानिक #भारतरत्न सी. वी. रामन यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनंम्र अभिवादन आणि आदरांजली...!!
💐🌷🌹🙏🏻🙏🏻🌷🌹💐
23/11/2019
प्रख्यात भारतीय #वनस्पती_शास्त्रज्ञ आणि #भौतिक_शास्त्रज्ञ #जगदीशचंद्र_बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन आणि आदरांजली...!!
💐🌷🌹🙏🏻🙏🏻🌷🌹💐
30/10/2019
"हिंदुस्थानातील #अणुशास्त्राचे_जनक #डॉ. #होमी_जहांगीर_भाभा" यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतिस विनंम्र अभिवादन् आणि आदरांजली...!!
💐🌷🌹🙏🏻🙏🏻🌹🌷💐
#जे_आले_ते_रमले.. : #अणुऊर्जा_विकासाचे_जनक #डॉ. #होमी_जहांगीर_भाभा
आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.
#डॉक्टर_होमी_भाभा...
भारतीय अणुऊर्जा आणि अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता, पारशी समाजातले डॉ. होमी भाभा आपले इंजिनिअरिंग, गणित आणि न्यूक्लीयर फिजिक्सचे शिक्षण पूर्ण करून १९३९ साली भारतात परतले. काही काळ भाभांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये काम केल्यावर १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास त्यांनी मदत केली. आपले संशोधन कार्य सांभाळत असतानाच होमी भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भाभांनी या संशोधन संस्थेसाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टकडून मोठय़ा रकमेची देणगी मिळवून ‘कॉस्मिक रे रिसर्च युनिट’ सुरू केले. त्याच दरम्यान त्यांनी स्वतंत्ररीत्या अण्वस्त्रविषयक संशोधन सुरू केले. यातूनच त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारचे अॅटॉमिक एनर्जी कमिशन म्हणजेच अणुऊर्जा आयोगाची स्थापना मुंबईत १९४८ साली करण्यात आली. डॉ. होमी भाभा या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. याच वर्षी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाच्या पुढच्या योजनांची जबाबदारी भाभांवर सोपवून अण्वस्त्रनिर्मितीची योजना तयार करण्यास सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यानंतर होमी भाभांनी जगभरात विखुरलेल्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अणुऊर्जा आयोगासाठी भारतात येऊन संशोधन करण्याचे आवाहन केले आणि त्यातून त्यांना होमी सेठना, विक्रम साराभाईंसारखे सहकारी शास्त्रज्ञ मिळाले. होमी भाभांच्या अथक परिश्रमांमुळेच भारतात अणुभट्टीची स्थापना झाली. पुढे अनेक ठिकाणी अणुभट्टय़ा सुरू होऊन त्यांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग होऊ लागला. अणुशक्तीचा वापर शांततेच्याच मार्गाने व्हावा असे मत संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ठामपणे मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.
संयुक्त राष्ट्रांच्या सभेला ते जात होते. २४ जानेवारी १९६६ रोजी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान आल्प्स पर्वतावर कोसळून त्यांचे निधन झाले. त्यानंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव ‘भाभा अणू संशोधन केंद्र’ असे करण्यात आले.
28/02/2019
#राष्ट्रीय_विज्ञान_दिन
१००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे #जगप्रसिद्ध_शास्त्रज्ञ_थॉमस_एडिसन यांची आज जयंती...
विनम्र अभिवादन!!
----------------------------------
त्याला दोन्ही कानाने ऐकू येत नव्हतं. पण आता तो इतका श्रीमंत झाला होता की, त्याला आपल्या दोन्ही कानांचा उपचार करून ऐकता येणार होते. मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला म्हटले, ‘‘दोन्ही कानांची शल्यचिकित्सा करून घेऊ या!’’ तो म्हणाला, ‘‘मुळीच नको. मला स्तुतीपण ऐकावयाची नाही आणि टीका सुद्धा. आजूबाजूचा कलकलाट ऐकीन तर माझ्या कामात व्यत्यय येईल.’’ शोध करत राहण्यासाठी ज्याने बहिरेपणा आयुष्यभर जपले त्याची ही कथा. १८८९ साली पॅरिसमधे एका विशाल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दोनपैकी एका पूर्ण भागात फक्त एकाच माणसाच्या संशोधनाने मंडप व्यापून टाकला होता ती थोर व्यक्ती म्हणजे, ‘थॉमस अल्वा एडिसन’. या वैज्ञानिकाला पॅरिसला सादर आमंत्रित केले होते आणि त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ११ फेब्रुवारी १८४७ हा जन्मदिवस आहे त्याचा....
वयाच्या १० व्या वर्षीच एडिसनने घरातील कोठारात एक प्रयोगशाळा थाटली. पैसे कमी पडू लागले म्हणून याने ग्रँड ट्रंक रेल्वेच्या धावणार्या आगगाडीत वर्तमानपत्र व चॉकलेट विकावयास सुरुवात केली. एके दिवशी धावपळीत आगगाडी सुटली. गाडी पकडण्याच्या प्रयत्न असलेल्या एडिसनच्या दोन्ही हातात वस्तू होत्या, म्हणून एका सहप्रवाशाने त्याचा एक कान धरून त्याला गाडीत ओढले. या धडपडीत त्याचा एक कान निकामी झाला. पण याच एका वर्षाच्या कालावधीत एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत एक सर्वसाधारण टेलिग्राफ मशीन निर्माण करण्यात यश संपादन केलं होतं.
१८६२ मधे एडिसनला एक लहान मुलगा रुळावर खेळताना आढळला. आपला जीव धोक्यात घालून एडिसनने त्याला वाचवले. त्यामुळे स्टेशनमास्तर असलेले त्या मुलाचे वडील खुश झाले आणि बक्षीस म्हणून त्यांनी एडिसनला टेलिग्राफी शिकविली. १८६८ उजाडताच एडिसनने आपले पहिले टेलिग्राफ तयार करून आपले पहिले पेटेंट मिळविले. आपलं टेलिग्राफ उपकरण त्याने एक्सचेंजच्या अध्यक्षाला या अपेक्षेने विकले की, त्याला २,००० डॉलर तरी मिळतील. एक्सचेंजच्या अध्यक्षाला ते टेलिग्राफमशीन इतके भावले की, त्यांनी एडिसनला या टेलिग्राफ मशीनचे ४०,००० डॉलर दिले. ही घटना एडिसनला एका निर्णायक दिशेने घेऊन जाण्यात कारणीभूत ठरली.
एडिसन यांनी बल्बचा शोध लावला आणि सा-या घरांना व जगाला प्रकाशमान करून टाकलं. याचं सर्वसामान्यांना भारी कौतुक वाटतं. या एकाच शोधानं एडिसन यांचं नाव घराघरातून अजरामर झालेलं आहे. पण बल्बव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक शोध लावलेले आहेत. आज आपण गाणी डिजिटल म्युझिक सिस्टमवर ऐकतो. पण आधीच्या काळी ज्या ग्रामोफोनवरून आपण गाणी ऐकायचो त्या ग्रामोफोनचा शोध एडिसन यांनी लावला होता. त्याचबरोबर चित्रपट बनवण्यासाठी लागणारा कॅमेरा, स्वयंचलित टेलिग्राफ प्रणाली, कार्बन -हिओस्टॅट (विद्युत उपकरणात काही घटक नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. जसं म्युझिक सिस्टममध्ये आवाज कमी-जास्त करण्यासाठी -हिओस्टॅटचा वापर केला जातो), पॅराफिन कागद, टेलिफोन ट्रान्समीटर इत्यादी. त्यांच्या नावावर एक हजार एकशेच्या आसपास पेटंट नोंदवलेली आहेत. हा एक प्रकारचा विश्वविक्रम आहे. कोणाही एका व्यक्तीच्या नावावर इतकी पेटंट्स(एडिसन यांच्याशिवाय) नावावर नाहीत.
बॅटरी तयार करण्याच्या प्रयत्नात त्याचे ८००० प्रयोग फसले. एकाने त्यांना म्हटले ‘‘विनाकारण वेळ गेला हे ८००० प्रयोग करण्यात!’’ एडिसनने उत्तर दिले, ‘‘अरे मला ८००० शोध लागलेत की या पदार्थांच्या संयोगाने चांगली बॅटरी बनू शकत नाही.’’ याला म्हणतात शोधकर्ता!
कधी कधी महान शास्त्रज्ञसुद्धा अगदी बालिशपणे वागतात. कोणे एकेकाळी दिलीपकुमार श्रेष्ठ की अभिताभ बच्चन श्रेष्ठ,असा वाद त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असे. हा वाद तसा आजही सुरू आहे. पण त्यात आणखी दोन-चार अभिनेत्यांच्या नावांची भर पडलेली आहे. एडिसन व टेस्ला यांच्या चाहत्यांतसुद्धा हा अशा प्रकारचा वाद आजही सुरू आहे. कोण मोठा शास्त्रज्ञ आहे? एडिसन डायरेक्ट करंट (DC)चा खंदा समर्थक. परंतु टेस्ला अल्टर्नेट करंट (AC) तंत्रज्ञानावर दृढ विश्वास असणारा (आणि टेस्लाचच बरोबर होतं!). एडिसन व टेस्ला यांच्यात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. एडिसन हे ‘व्यावहारिक’ शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनाचा सारा कल या एकाच गोष्टीवर अवलंबून होता. ज्या शोधाचा उपयोग सर्वसामान्यांच्या मदतीसाठी होत नसेल व त्यातून कोणतीही अर्थप्राप्ती होत नसेल तर त्या शोधाकडे ते ढुंकूनही पाहत नसत. याच कारणास्तव ते शास्त्रज्ञ-व्यापारी किंवा धंदेवाईक शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. आपल्या कार्याची व्याप्ती वाढण्यासाठी व नवनवीन संशोधनाचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पदरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांची फार मोठी फौज जमा केली होती. हे सारे वेगवेगळय़ा प्रश्नांवर काम करत राहायचे व एखादा शोध लागला की, त्याचं पेटंट एडिसन यांच्या नावावर जमा व्हायचं.
टेस्ला यांची ही विद्युत प्रणाली अधिक लोकप्रिय झाली तर त्यांना त्यांच्या एक दिशा विद्युत पद्धतीचा गाशा गुंडाळावा लागेल याची एडिसनना मनोमन खात्री पटली. त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याकारणानं टेस्ला यांची पद्धत कशी व किती धोकादायक आहे व या प्रणालीचा त्रास कशाप्रकारे होऊ शकेल हे दाखवून व पटवून देण्यासाठी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मुक्या जीवांना व प्राण्यांना ‘शॉक’ देऊन मारण्याचा उपद्व्याप सुरू केला. त्यांच्या या हीन कृत्यांतून अनेक कुत्रे, मांजरी, गाई, म्हशी, घोडे व एका हत्तिणीला हकनाक प्राण गमवावे लागले. ६ ऑगस्ट १८९० रोजी पहिल्यांदा एडिसनच्या आग्रहाखातर एका कैद्याला प्रत्यावर्ती करंटच्या साहाय्याने हाल हाल करून मारण्यात आले. एडिसनचा हा सारा खटाटोप स्वत:चे व्यापारी हित जोपासण्यासाठी होता. एवढे करूनही त्यांना हवा तो परिणाम साधता आला नाही. आज टेस्ला यांची प्रत्यावर्ती विद्युत प्रणाली सरस ठरलेली आहे. पुढे एडिसनला त्यांचे पूर्व सहयोगी टेस्ला सोबत नोबेल पारितोषिक मिळणार होतं, परंतु टेस्लाने एडिसनसोबत पारितोषिक घेण्यास नकार दिला आणि दोघेही नोबेलपासून वंचित राहिले.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शोध करण्याची मानसिकता ठेवणारा हा महान वैज्ञानिक अत्यंत मृदुभाषी होता. त्याचं खालील वाक्य त्याची नम्रता सांगून जाते.
‘‘माझ्या यशात विद्वत्तेची भूमिका १ टक्का आणि परिश्रमाची भूमिका ९९ टक्के आहे!’’ पण जर कोणी निकोला टेस्ला यांना हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी जिनियस म्हणजे नव्याण्णव टक्के स्फूर्ती व एक टक्का मेहनत असं उत्तर बहुधा दिलं असतं. अशा प्रकारची परस्परविरोधी उत्तरं थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला यांच्या अंगभूत गुणवैशिष्टय़ांना समर्पकपणे अधोरेखित करतात. ते दोघेही अतिशय महान वैज्ञानिक होते.
अमेरिकेतले १,०९३ पेटेंट घेणार्या या वैज्ञानिकाला इतर देशांच्या २००० च्या वर पेटेंट मिळविण्याचा मान मिळाला. एक हजारापेक्षा जास्त शोध लावणार्या एडिसनच्या सन्मानार्थ बोलणार्या एका वक्त्याने म्हटले की, ‘‘एडिसनने इतके शोध लावलेले आहेत की, आता जणू शोध करावयास जगात काहीही उरलेच नाही. मानवी इतिहासात इतके शोध आजतागायत कोणीही लावलेले नाहीत.’’
संदर्भ :- शिरीष उऱ्हेकर यांचा एडिसनवरील लेख
23/11/2018
प्रख्यात भारतिय #वनस्पती_शास्त्रज्ञ व #भौतिक_शास्त्रज्ञ #जगदीशचंद्र_बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन आणि आदरांजली...!!
💐🌷🌹🙏🏻🙏🏻🌷🌹💐
07/11/2018
कई दशक पहले की गई वैज्ञानिक खोज हो, जिसे वर्षों पहले नोबेल पुरस्कार से नवाजा गया हो और जो गुजरते वक्त के साथ और भी प्रासंगिक होती जा रही हो, तो उससे जुड़े वैज्ञानिकों को बार-बार याद और भी महत्वपूर्ण हो जाता है।
दक्षिण भारत के त्रिचुनापल्ली में पिता चंद्रशेखर अय्यर व माता पार्वती अम्मा के घर में 07 नवंबर 1888 को जन्मे भौतिक शास्त्री चंद्रशेखर वेंकट रमन माता पिता की दूसरी संतान थे। उनके पिता चंद्रशेखर अय्यर महाविद्यालय में भौतिक विज्ञान के प्रवक्ता थे। ब्रिटिश शासन के दौर में भारत में किसी प्रतिभाशाली व्यक्ति के लिए भी वैज्ञानिक बनना आसान नहीं था। एक शिक्षार्थी के रूप में भी रमन ने कई महत्वपूर्ण कार्य किए थे। वर्ष 1906 में रमन का प्रकाश विवर्तन (डिफ्रेक्शन) पर पहला शोध पत्र लंदन की फिलोसोफिकल पत्रिका में प्रकाशित हुआ था।
कॉलेज के बाद रमन ने भारत सरकार के वित्त विभाग की एक प्रतियोगिता में हिस्सा लिया। इसमें वे प्रथम आए और फिर उन्हें जून 1907 में असिस्टेंट एकाउटेंट जनरल बनाकर कलकत्ता भेज दिया गया। एक दिन वे अपने कार्यालय से लौट रहे थे कि उन्होंने एक साइन-बोर्ड देखा - इंडियन एसोसिएशन फॉर कल्टीवेशन ऑफ साइंस। इसे देख उनके अंदर की वैज्ञानिक इच्छा जाग गई। रमन के अंशकालिक अनुसंधान का क्षेत्र ‘ध्वनि के कंपन और कार्यों का सिद्धांत’ था। रमन का वाद्य-यंत्रों की भौतिकी का ज्ञान इतना गहरा था कि 1927 में जर्मनी में छपे बीस खंडों वाले भौतिकी विश्वकोश के आठवें खंड का लेख रमन से ही तैयार कराया गया था। इस कोश को तैयार करने वालों में रमन ही ऐसे थे, जो जर्मनी के नहीं थे। प्रकाश के क्षेत्र में अपने उत्कृष्ट कार्य के लिए सर सीवी रमन को वर्ष 1930 में नोबेल पुरस्कार दिया गया था। उन्हें विज्ञान के क्षेत्र में नोबल पुरस्कार प्राप्त करने वाले पहले एशियाई होने का गौरव भी प्राप्त है। उनका आविष्कार उनके नाम पर ही रमन प्रभाव के नाम से जाना जाता है। रमन प्रभाव का उपयोग आज भी वैज्ञानिक क्षेत्रों में किया जा रहा है। जब भारत से अंतरिक्ष मिशन चंद्रयान ने चांद पर पानी होने की घोषणा की तो इसके पीछे भी रमन स्पैक्ट्रोस्कोपी का ही कमाल था।
चंद्रशेखर वेंकटरमन या सर सीवी रमन एक ऐसे ही प्रख्यात भारतीय भौतिक-विज्ञानी थे। फोरेंसिक में भी रमन प्रभाव काफी उपयोग साबित हो रहा है। अब यह पता लगाना आसान हो गया है कि कौन-सी घटना कब और कैसे हुई थी। सीवी रमन ने जिस दौर में अपनी खोज की थी, उस समय काफी बड़े और पुराने किस्म के यंत्र हुआ करते थे। रमन ने रमन प्रभाव की खोज इन्हीं यंत्रों की मदद से की थी। विज्ञान की सेवा करते करते 21 नवंबर 1970 को बेंगलुरू में उनका निधन हो गया। वो भले ही आज हमारे बीच नहीं, लेकिन उनका प्रभाव सदैव मौजूदा तकनीक में नजर आएगा। रमन प्रभाव ने ही तकनीक को पूरी तरह बदल दिया है। अब हर क्षेत्र के वैज्ञानिक रमन प्रभाव के सहारे कई तरह के प्रयोग कर रहे हैं।
30/10/2018
" #हिंदुस्थानामधील_अणुशास्त्राचे_जनक #डॉ. #होमी_जहांगीर_भाभा" यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतिस विनंम्र अभिवादन् आणि आदरांजली...!!
💐🌷🌹🙏🏻🙏🏻🌹🌷💐💐
30/10/2017
भारतामधील अणुशास्त्राचे जनक डॉ.होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन...!!
24/12/2016
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Sangli
416416