VED EDUCATION

VED EDUCATION IBPS PO SSC EXAMS
सरकारी बँकेतील भव्य-दिव्य करिअ Banking Exams,IBPS,SBI-CLK,RBI,RRB,SSC,INSURANCE AND MANY.

02/05/2026
30/09/2024
ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जाळे निर्माण केलेले आहे. कर्जाची सहज प्रक्रिया असल्यान...
22/12/2023

ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जाळे निर्माण केलेले आहे. कर्जाची सहज प्रक्रिया असल्याने अनेक महिला 40-50 हजाराचे लोन घेतात. किरकोळ गरज असते, थोड्या कालावधी साठी पैसे हवे असतात म्हणून कर्ज घेतले जाते. परंतु याचा व्याजदर 24 % असतो याकडे दृर्लक्ष केले जाते.

दैनंदिन जीवनात आर्थिक समस्या निर्माण होते, महिना दोन महिन्यासाठी पैसे लागणार असतात, बँक लोनची प्रक्रिया खूपच किचकट वाटते मग भिशी वा खाजगी सावकरा कडून लोन घेतले जाते ज्याचे व्याजदर 3% / 5% / 10% असते.

परंतु तुमच्या घरात असणारी LIC ची पॉलिसी ही छोटी आर्थिक गरज पूर्ण करू शकते.

LIC च्या पाॕलिसीवर तुम्हाला कोणतीही बँक लोन देते तसेच LIC ही लोन देते.
◼️ पॉलिसीला पेड-अप व्हॕल्यू असावी.
◼️ पेडअप व्हॕल्यूच्या 85-90% लोन मिळते
◼️ व्याजदर वार्षिक 10% - सहामाही देय
◼️ कर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी एक ते दोन दिवस

⏭️ आवश्यक कागदपत्रे

◼️ ओरिजनल पॉलिसी बाँण्ड
◼️ बँक डिटेल्स
◼️ आधार कार्ड
◼️ लोन अॕपलिकेशन अर्ज ( आॕफिस मध्ये मिळतो )

⏭️ तुमच्या पॉलिसी पेड-अप व्हॕल्यू जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क करा किंवा inbox मध्ये मेसेज करा

पॉलिसीवर लोन सुविधा सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी संपर्क..
______________________________________________________________________________
श्री. दत्तात्रय कोळी
विकास अधिकारी ( LIC )
आर्थिक सल्लागार

🔰  नुकतीच पदवी झाली, पहिली नोकरी शोधात आहात ❓️💹 सध्याच्या नोकरी मधील पगार कमी वाटतो, जादा पगाराची नोकरी हवी ❓️🔰 एकाच पदा...
05/07/2022

🔰 नुकतीच पदवी झाली, पहिली नोकरी शोधात आहात ❓️

💹 सध्याच्या नोकरी मधील पगार कमी वाटतो, जादा पगाराची नोकरी हवी ❓️

🔰 एकाच पदावर काम करून कंटाळा आलाय, प्रमोशन हवं आहे ❓️

▪️ सरकारी नोकरी विषयक माहिती हवी आहे ❓️

तर मग ही पोस्ट तुमच्यासाठी आहे✌️

नोकरी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. नवीन पदवी घेतलेलेल्याना पहिल्या नोकरीच अपरूप असतं, दोन-चार वर्ष नोकरी केलेल्याना पगार वाढीची अपेक्षा असते. 10-15 वर्ष नोकरीचा अनुभव असलेल्याना प्रमोशनची अति गरज असते.

प्रत्येकजण आपली नोकरी आनंदायी करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु नोकरीमध्ये पॉसिटीव्ह चेंज झाला तरच नोकरी आनंदायी होते.

यासाठी वेद प्लेसमेंट & ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी.
▪️ तुमच्या भागातील नोकरी विषयक माहिती
▪️Higher Managment post
▪️करिअर विषयक टिप्स

इत्यादी विषयक माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचा WhatsApp Group जॉईन करा.

यामध्ये तुम्हाला नोकरी विषयक माहिती, करिअर विषयक माहिती, विविध ऑनलाईन कोर्स मोफत मिळतील.

चला तर मग करा क्लिक व व्हा जॉईंन आपल्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी.... ✌️

WhatsApp Group Invite

वेद प्लेसमेंट मध्ये नोंदणी करा - नोकरी विषयक माहिती मोफत मिळवा.वेद प्लेसमेंट ही सांगली- कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कंपन...
04/03/2022

वेद प्लेसमेंट मध्ये नोंदणी करा - नोकरी विषयक माहिती मोफत मिळवा.

वेद प्लेसमेंट ही सांगली- कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कंपनीमध्ये व शिक्षण संस्था मध्ये आवश्यक असणारी मॅनपॉवर पुरवणारी प्लेसमेंट सेवा संस्था आहे.

Aspiring Candidates व Company मधील दुवा म्हणून ही संस्था काम करते.वेद प्लेसमेंट खालील आस्थापनांच्यामध्ये मॅनपॉवर प्रोव्हाइड करते.

🔸 विविध शाळा

🔸 शैक्षणिक अकॅडमी

🔸 कोचिंग क्लासेस

🔸 हॉस्पिटल

🔸 डायगनोस्टिक लॅब

🔸 Manufacturing Companies

🔸 IT companies

🔸 Insurance Companies

या विविध सेक्टरमधील जॉब विषयक माहिती तुम्हाला मोफत मिळत जाईल.

⏺️ त्याचबरोबर प्लेसमेंट मध्ये नोंदणी करणाऱ्यांना खालील विषयावरील ऑनलाईन सेशन प्रत्येक आठवड्याला मोफत मिळतील

🔸 Soft Skill Training

🔸 Business Etiquettes

🔸 Google Sheet, Google Slide, Google Doc

🔸 Leadership & Team Skills

🔸 Office Protocol

🔸 Motivational Training

वरील सर्व बेनिफिट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून, सर्व माहिती भरून तुमची नाव नोंदणी करा.

https://surveyheart.com/form/6221c2f0a17fec6a86046e96

⏺️ नोकरी विषयक माहिती व नोकरी साठी आवश्यक असलेले ट्रेनिंग आम्ही मोफत देत असतो. गरजूना याचा लाभ व्हावा म्हणून हा मेसेज तुमच्या संबंधित व्यक्तींना तसेच ग्रुपवर पाठवा

Candidate Data Sheet

▪️ हेल्थ इन्शुरन्स खरेच गरजेचा आहे का?▪️ हेल्थ इन्शुरन्स किती प्रकारचे असतात?▪️ हेल्थ इन्शुरन्स कितीचा घ्यावा?▪️ कोणत्या...
28/06/2021

▪️ हेल्थ इन्शुरन्स खरेच गरजेचा आहे का?
▪️ हेल्थ इन्शुरन्स किती प्रकारचे असतात?
▪️ हेल्थ इन्शुरन्स कितीचा घ्यावा?
▪️ कोणत्या कंपनीचा घ्यावा?
या विषयी माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

सर्वांनाच हेल्थ इन्शुरन्स गरजेचा आहे असे मार्केटिंग सध्या इन्शुरन्स कंपन्या कडून केले जात आहे. परंतु अगदी सर्वा....

यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनांतील फरक▪️ यशस्वी माणूस नेहमीच समस्येचे निराकरण करण्याच्या मागे असतो; अयशस्वी माण...
07/05/2021

यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनांतील फरक

▪️ यशस्वी माणूस नेहमीच समस्येचे निराकरण करण्याच्या मागे असतो; अयशस्वी माणूस मात्र अडचणींचाच बाऊ करत राहतो.

▪️यशस्वी माणूस काम करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो; अयशस्वी माणूस काम टाळण्यासाठी सबबी सांगत राहतो.

▪️यशस्वी माणूस म्हणतो," चला, तुमचं हे काम मी करून देतो'; अयशस्वी माणूस उत्तर देतो,“ ते माझं काम नाही.

▪️यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असते; अयशस्वी माणूस मात्र प्रत्येक उत्तरावर नवी समस्या शोधून काढतो.

▪️यशस्वी मनुष्य म्हणतो,“ ही गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे', अयशस्वी माणूस म्हणतो,“ हे शक्य असेल पण फार कठीण आहे".

▪️यशस्वी माणूस चूक केल्यानंतर म्हणतो,“ मी चुकलो”;
अयशस्वी माणूस म्हणतो,“ त्यात माझं काही चुकलं नाही.'

▪️यशस्वी माणूस वचनबद्ध असतो; अयशस्वी माणूस फक्त आश्वासने देतो . .

▪️यशस्वी माणसं स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून काम करतात;
अयशस्वी माणसं केवळ कागदी घोडे नाचवतात.

▪️यशस्वी माणूस म्हणतो,“ मीच अमुक गोष्ट केली पाहिजे";
अयशस्वी माणूस म्हणतो,"काहीतरी व्हायला पाहिजे".

▪️यशस्वी माणूस काही विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या गटाचा भाग असतो;
अयशस्वी माणूस अशा कुठल्याही गटापासून दूर राहतो.

▪️ यशस्वी माणसं समोर दिसणाऱ्या यशाचा विचार करतात;
अयशस्वी माणसं यशप्राप्तीसाठीच्या कष्टांचीच धास्ती घेतात.

▪️यशस्वी माणसं सकारात्मक शक्यतांचा विचार करतात;
अयशस्वी माणसं समस्यांवर अडून बसतात.

▪️यशस्वी माणसं आपल्याबरोबर इतरांनाही यशप्राप्ती होईल या विचाराने काम करतात;
अयशस्वी माणसं आपल्या यशासाठी कोणाला तरी अयशस्वी व्हावे लागेल असा विचार करतात.

▪️यशस्वी माणूस सुप्त यशाचा विचार करतो;
तर अयशस्वी माणूस भूतकाळात रमतो.

▪️यशस्वी माणूस परिस्थिती - नियंत्रकासारखा;
तर अयशस्वी माणूस परिस्थितीनुसार खाली - वर होणाऱ्या निर्देशकासारखा असतो.

▪️यशस्वी माणूस बोलण्याआधी विचार करतो;
अयशस्वी माणूस आधी बोलतो आणि मग विचार करत बसतो .

▪️यशस्वी माणूस कटू गोष्ट सौम्य शब्दांत सांगतो;
अयशस्वी माणूस सौम्य गोष्टदेखील कटू शब्दांत सांगतो.

▪️यशस्वी माणसं किरकोळ तडजोडी करतात पण मूल्यांच्या बाबतीत दृढ असतात;
अयशस्वी माणसं किरकोळ गोष्टीबाबत आग्रही असतात आणि मूल्यांच्या बाबतीत तडजोड करतात.

▪️यशस्वी माणसं सहानुभूतिपूर्वक दुसऱ्याचा विचार करून म्हणतात:" इतरांनी तुमच्याशी करू नये असे वर्तन तुम्ही इतरांशी करू नका"; अयशस्वी माणसाचे तत्त्वज्ञान असतं: " इतरांनी तुम्हांला धक्का देण्याआधी तुम्हीच त्यांना धक्का दया"

▪️यशस्वी माणसं गोष्टी स्वत: घडवून आणतात;
अयशस्वी माणसे घडणाऱ्या गोष्टींकडे पहात बसतात .

▪️यशस्वी माणसं जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक तयारी करतात . त्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष तयारी महत्त्वाची असते .

✒️ श्री. शिव खेडा लिखित *आपण जिंकू शकता* या पुस्कातील काही भाग

🍂🍁🌿🍁🍂🍂🍂🍁🌿🌿🍁🍂🍂🍁🍁🌿

चला तर मग आपणही यशस्वी दृष्टिकोन ठेवू, व वरील अयशस्वी कृती टाळायला सुरवात करू. सगळे एकाच वेळी होणार नाही पण रोज यातील एकच गोष्ट अंमलात आणली तर 15 दिवसातच आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगला बदल घडेल.

श्री. दत्तात्रय कोळी
विकास अधिकारी (LIC)
करिअर मार्गदर्शक
आर्थिक सल्लागार

@ 7020708559
@ 8390325740

http://www.dkfinology.in

या वेबपोर्टलवर माझे सर्व लेख तुम्ही वाचू शकता.

चला अर्थसाक्षर होऊया..!

Address

बालाजी पदम, हॉटेल व्हाईट हाऊस शेजारी, विश्रामबाग सांगली
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

8390325740

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VED EDUCATION posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to VED EDUCATION:

Shortcuts

Share

Category