Shatrunjay Group

Shatrunjay Group

Share

Shatrunjay Group started its activities with establishing Shatrunjay Institute in 1997. Since establ

26/01/2026

*शत्रुंजय मध्ये 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा*
दरवर्षीप्रमाणे भारतीय प्रजासत्ताक दिन शत्रुंजय मध्ये साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शत्रुंज मधील ग्राफिक डिझायनर विद्यार्थिनी कु. कौमुदी खेटमार हिच्या शुभहस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर एकत्रित राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
याप्रसंगी केंद्रप्रमुख सुप्रिया कोष्टी,ॲनिमेशन विभाग प्रमुख श्री भाविन पालेजा, फॅशन डिझायनिंग विभाग प्रमुख हर्षदा तसेच फॅकल्टी हेडर संजीव जोशी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Photos from Shatrunjay Group's post 23/01/2026

सांगली मधील राणी सरस्वती कन्या शाळा येथे शत्रुंजय इन्स्टिट्यूट मार्फत विद्यार्थिनींना AI व Robotics प्रशिक्षणाची कार्यशाळा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी पार पडली.

यामध्ये ChatGPT, CutOut Pro, Adobe Firefly अशा अनेक AI टूल्स ची माहिती व प्रात्यक्षिके विद्यार्थिनींना दाखवण्यात आली. तसेच रोबोटिक्स मधील कार पार्किंग, सिग्नल सिस्टीम, लेझर लाईट, ऑफ मेंटेन रियालिटी, ड्रोन टेक्नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटिक आर्म, इत्यादी प्रोजेक्ट्स चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

शत्रूंजय चे सी.टी.ओ. श्री भाविन पालेजा व श्री दिग्विजय सर यांनी रोबोटिक्सचे तर श्री संजीव जोशी यांनी AI Tools चे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले.

प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री शेंडगे सर यांनी या कार्यशाळेचे नियोजन केले. याप्रसंगी शाळेचे संगणक विभागप्रमुख श्री उंटवाले सर व संगणक शिक्षिका सौ चिवटे मॅडम उपस्थित होत्या.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक तसेच दैनंदिन जीवनामध्ये नक्की होईल असे मनोगत सौ. चिवटे मॅडम यांनी व्यक्त केले.

01/01/2026
Photos from Shatrunjay Group's post 06/12/2025

Blood Donation camp 2025

05/12/2025

शत्रूंजय एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री स्वप्निल शहा सर यांचा जन्मदिन (5 डिसेंबर) Innovative IDEA DAY म्हणून साजरा.

पुण्यामधील गुडविल इंग्लिश स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने शाळेमध्ये श्री स्वप्निल शहा सर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून Innovative IDEA DAY साजरा करण्यात आला.

यामध्ये गुडविल इंग्लिश स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञान, तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स मधील विविध नवनवीन प्रकल्पांचे सादरीकरण केले.
या प्रकल्पांसाठी विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून उत्साहाने तयारी करत होते, प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शाळेतील शिक्षकांनी प्रकल्पांसाठी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पालक व शिक्षकांकडून या Innovative IDEA DAY मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.




Pune
Innovation
STEMEducation
Robotics
ScienceProjects
TechnologyLearning
StudentInnovation
CreativeKids
FutureEngineers
SchoolEvent
EducationForAll
Inspiration
LearningByDoing
ProjectBasedLearning

Photos from Shatrunjay Group's post 05/12/2025

शत्रूंजय एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री स्वप्निल शहा सर यांचा जन्मदिन (5 डिसेंबर) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

दरवर्षीप्रमाणे शत्रुंजय इन्स्टिट्यूट,सांगली तसेच गुडविल इंग्लिश स्कूल, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदात्यांनी सरस्वती पूजनाने केले. विद्यार्थी, मित्रपरिवार व शिक्षक बंधू-भगिनी अशा एकूण ७० लोकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.

दरवर्षीप्रमाणे स्वतः श्री स्वप्निल शहा यांनी देखील रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला. सरांनी दिलेल्या प्रेरणेमधून अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी प्रथमच रक्तदान केले व इथून पुढे दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प केला.

जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी विद्यार्थी या सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून व सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री. स्वप्नील शहा सर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या सर्वांचे श्री. स्वप्निल शहा सरांनी आपल्यावरील स्नेह व प्रेम असेच वृद्धिंगत होऊदे अशी आशा व्यक्त करून मनःपूर्वक आभार मानले.

#शत्रूंजयएज्युकेशनलचॅरिटेबलट्रस्ट
#स्वप्निलशहासर



#रक्तदान


















03/12/2025

03/12/2025

29/09/2025

दुःखद निधन
आपल्या शत्रूंजय एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक ज्येष्ठ सदस्य, निसर्गप्रेमी श्री.सुरेशभाई शांतिलाल शहा (वय ८२) (आपल्या संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शहा यांचे वडील) यांचे अल्पशा आजाराने आज दु:खद निधन झाले.

Photos from Shatrunjay Group's post 15/08/2025

शत्रुंजय मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

संस्थेचे विद्यार्थी हे केवळ विद्यार्थी नसून ते देशाचे भवितव्य आणि राष्ट्रीय संपत्ती आहेत. ही संपत्ती देशभक्त असावी म्हणून शत्रूंजय ग्रुप नेहमीच भारतीय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण विविध संस्थांमधून साजरे करतो.

यावर्षी शत्रुंजय ग्रुपचे चेअरमन श्री. स्वप्नील शाह यांच्या उपस्थितीत, ध्वजारोहण श्री. रवींद्र कदम यांच्या हस्ते पार पडले. तसेच अ‍ॅनिमेशन व रोबोटिक्स विभागप्रमुख श्री. भाविन पालेजा यांच्या सोबत विद्यार्थी एकत्र येऊन देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा केला.

Want your school to be the top-listed School/college in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Why ShatrunjayGroup?

Shatrunjay Group started its activities with establishing Shatrunjay Institute in 1997. Since established the main aim was to provide quality education and services to the society.
Looking towards the current market requirements it always upgraded and improvised the educational boundaries in different fields.
We mainly believe in “Quality”. For us Quality is not Just “A standard”, its an Attitude”.

Location

Telephone

Address


College Corner
Sangli
416416