Rani Saraswatidevi Kanya shala Sangli

Rani Saraswatidevi Kanya shala Sangli Admission process purpose
School Activity purpose

09/10/2025
16/08/2025

वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, सांगली या ठिकाणी आज इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या माननीय उपाध्यक्षा सौ. स्मिताताई केळकर उपस्थित होत्या, तसेच शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सरिता माणकापूरे, उपमुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण शेंडगे, पर्यवेक्षक श्री. गोविंद धुमाळ, उच्च–माध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख सौ. उज्वला पाटील उपस्थित होत्या.

याप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. स्मिताताई केळकर यांनी || विद्या विनयेन शोभते || या संस्थेच्या ब्रीद वाक्याचा अर्थ सांगून त्याप्रमाणे आपली वाटचाल आपल्या ध्येयाकडे करावी असा अत्यंत मौलिक सल्ला दिला. आपल्या संस्थेची उभारणी ज्या संस्थापकांनी केली त्यांचे सदैव स्मरण ठेवावे, मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे अन्यथा त्यातून आपले नुकसान संभवते, कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपले संपूर्ण लक्ष आपल्या करिअर कडे व ध्येयाकडे असले पाहिजे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सरिता माणकापुरे यांनी केले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना शाळेमध्ये असताना सर्व विद्यार्थिनींनी शाळेची शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगून विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी इयत्ता दहावी मध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. तसेच काही विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतामधून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

उच्च–माध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख सौ. उज्वला पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

समारंभाचे सूत्रसंचालन श्री. तुषार कुलकर्णी यांनी केले.

याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक–शिक्षकेतर सहकारी व इयत्ता अकरावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थिनी व काही पालक उपस्थित होते.

राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल  यशशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्य...
12/07/2025

राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश

शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेतील चार विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत झळकल्या यामध्ये
कुः कोरे मयुरी मच्छिंद्रनाथ - जिल्ल्यात. १४ वी
कुः कांबळे सृष्टी गजानन - जिल्हयात - ३१ वी
कु. सपकाळ तेजश्री अजित - जिल्हयात - ४१ वी
कु. चौगुले स्वरांजली अभिजीत जिल्हयात. ५१ वी

या यशस्वी विद्यार्थिनींना वुईमेन्स एज्यूकेशन सोसायट सांगली. संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. डॉ. लताताई देशपांडे, उपाध्यक्षा सौ स्मिता केळकर, कार्यवाह सौ यशश्री आपटे, सहकार्यवाह सौ गायत्री कुलकर्णी तसेचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम, सरिता माणकापुरे, उपमुख्याध्यापक श्री बाळकृष्ण शेंडगे ,पर्यवेक्षक श्री गोविंद धुमाळ, शिष्यवृत्ती विभागातील शिक्षक सौ अस्मिता पोटे, सौ. प्रांजली कुलकर्णी, सौ अंबिका जंबगी श्री विजय उंटवाले व शिक्षकेतर सहकाऱ्यांचेही मार्गदर्शन लाभले.

आपल्या संस्थेच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विभागामध्ये...
10/07/2025

आपल्या संस्थेच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विभागामध्ये आज गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय मंगलमय व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सांगली मधील प्रसिद्ध अशा दंतवैद्य डॉ. निलिमा लिमये उपस्थित होत्या.

तसेच याप्रसंगी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सरिता माणकापुरे यादेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

डॉ. सौ. लिमये यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थिनींना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या शारीरिक स्वच्छतेसोबतच मानसिक स्वच्छता ही देखील अतिशय महत्त्वाची आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत हे जास्त महत्वाचे आहे. आपला देह व देव या दोन्हींच्या मध्ये देश आहे व आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे सदैव आपल्या स्मरणात असले पाहिजे. या वयामध्ये आपल्याकडून कोणतेही चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही याची प्रत्येकीने दक्षता घ्यावी. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे हे ठरवून त्याप्रमाणे ध्येयाकडे आत्तापासूनच वाटचाल करावी असे सांगून मोबाईल आणि प्रलोभने यांपासून नेहमी लांब रहा असाही सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही काही भेटवस्तू, गुलाबपुष्प इत्यादी गोष्टी शिक्षकांसाठी आणल्या असतील, पण ज्यावेळी तुम्ही स्वतः कमवायला लागाल, तेव्हा त्या पैशातून तुम्ही एखादी भेटवस्तू शिक्षकांना दिली तर तो शिक्षकांचा खरा सन्मान आहे अशा भावना व्यक्त केल्या.

श्री. अनिलकुमार धायगुडे यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. नीलिमा लिमये यांची ओळख सर्वांना करून दिली. विभाग प्रमुख सौ. उज्वला पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

इयत्ता 12 वी ची विद्यार्थीनी कु. वैष्णवी घोरपडे हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

13/05/2025

🎀 वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी संचलित राणी सरस्वती देवी कन्या शाळा , सांगली. 🎀
🏅🏆 उज्वल यशाची परंपरा
कायम 🏆🏅
इ. १०वी बोर्ड परिक्षेचा निकाल ९९.११ %*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
🏆प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी🏆
🥇 कु. पाटील आकांक्षा सिद्धेशवर ९८.०० %
🥈कु.मुजावर सबा जाफर ९४.६० %
🥉कु.खिलारे मृणाल मनोज ९३.८० %
🎖️कु.पाटील दिव्या संदीप ९३.२० %
🎖️कु. पाटील सृष्टी राजेश ९२.८० %
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
संस्कृत १०० पैकी १०० गुण प्राप्त विदयार्थीनी

*१.कु. पाटील दिव्या संदीप*

💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे, शिक्षक व शिक्षकेतर यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐

वुइ मेन्स एज्युकेशन सोसायटी चीराणी सरस्वतीदेवी कन्याशाळा सांगली .इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती अंतरीम निकाल :-प...
26/04/2025

वुइ मेन्स एज्युकेशन सोसायटी ची
राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा सांगली .
इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती अंतरीम निकाल :-

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनी 22

पात्र झालेल्या विद्यार्थिनींची संख्या 10

पात्र झालेल्या विद्यार्थिनींची नावे :-

1]कोरे मयुरी मच्छिंद्रनाथ- 258
2]कांबळे सृष्टी गजानन- 242
3]चौगुले स्वरांजली अभिजीत- 234
4]सपकाळ तेजश्री अजित- 238
5]सपकाळ वैष्णवी संजय- 204
6]खताळ निलोफर फिरोज- 176
7]मोकाशी प्रतीक्षा परगोंड - 156
8]अनपट समृद्धी सागर- 142
9]चौगुले सृष्टी नितीन -152
10]मगदूम स्वराली सुकुमार- 168

शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांची नावे :-
1) सौ अस्मिता पोटे.
2) सौ प्रांजली कुलकर्णी
3) सौ अंबिका जम्बगी
4) श्री विजय उंटवाले

पात्र झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐

11/04/2025

५ वी ते १० वी प्रवेश सुरू आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा

*एन .एम .एम. एस. परीक्षेमध्ये राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे यश*शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या *एन एम एम एस* परीक्षेमध्ये *रा...
03/04/2025

*एन .एम .एम. एस. परीक्षेमध्ये राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे यश*
शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या *एन एम एम एस* परीक्षेमध्ये *राणी सरस्वती कन्या शाळेच्या* चार विद्यार्थिनी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या आहेत.
*कु. चौगुले स्वरांजली अभिजीत- जिल्ह्यात 15 वी*
*कु. सपकाळ तेजश्री अजित जिल्ह्यात -39 वी*
*कु.कांबळे सृष्टी गजानन जिल्ह्यात- 79 वी*
*कु.कोरे मयुरी मच्छिंद्रनाथ जिल्ह्यात -21 वी (ई डब्ल्यू एस)*
सर्व विद्यार्थिनींना संस्थेचे पदाधिकारी ,शाळेचे अधिकारी मा. मुख्याध्यापिका माणकापुरे मॅडम उपमुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर पर्यवेक्षक श्री शेंडगे सर एन एम एम एस विभाग प्रमुख सौ.राज्योपाध्ये, सौ .गुर्जर सौ.निलाखे ,सौ. पाटील श्री ब्रम्हे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर सहकार्यांचेही मार्गदर्शन लाभले.

प्रवेश सुरू!!
29/03/2025

प्रवेश सुरू!!

Address

Tanaji Chowk Peth Bhag
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rani Saraswatidevi Kanya shala Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rani Saraswatidevi Kanya shala Sangli:

Shortcuts

Share

Category