11/03/2024
एक प्रवासी भेट
शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही
मी गरीब आहे पण स्वाभिमानी आहे...हे सांगता येईल
महत्त्वाचे बंदोबस्त वरून परत येताना सांगली पुणे हायवे वर हेवी ट्रॅफिकचा रोड असताना त्यातून एक मुलगा पायी चालला होता भर उन्हात तो चालत होता मला माहित नाही पण मला वाटते त्याच्या स्वाभिमानी स्वभावामुळे तो कोणत्याही गाडीला हात करत नव्हता आणि तो त्या मोठ्या नॅशनल हायवेने पाई चालत चालला होता त्याला आष्टा या ठिकाणी जायचे होते आणि ज्या ठिकाणी तो मला भेटला त्या ठिकाणाहून ते अंतर अंदाजे 11 किलोमीटर होते त्याच्या पाठीवर स्कूल बॅग घातल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे असेल म्हणून मी माझी गाडी थांबवली रोडच्या बाजूला घेतली आणि त्याला विचारले तुला कुठे जायचे आहे मी युनिफॉर्मवर असल्यामुळे तो थोडा घाबरला पण जास्त विश्वासमध्ये घेऊन त्याला विचारले असत त्याने सांगितले की तो या ठिकाणी दहा हजार रुपये महिन्यावर एका बगीचा मध्ये काम करतो त्याचे नाव कुंभार असून वडील मयत आहेत घरी आई एकटी असते लहान भाऊ शाळेत असतो लहान भावाला खूप मोठे शिकवायचे आहे म्हणून तो इतक्या कमी वयात शिक्षण सोडून जॉब करत आहे त्याला गाडीत बसून घरपर्यंत सोडले ज्यावेळेस तो गाडीत बसला त्यावेळेस तो पूर्ण घामाघुन झाला होता मग त्याला कम्फर्टेबल वाटल्यानंतर विचारपूस केली मस्त वाटले तो उतरल्यानंतर वारंवार थँक्यू सर थँक्यू सर म्हणत होता
त्याला म्हणालो अशीच भविष्यामध्ये एखाद्या गरजूला गरज पडली तू पण नक्की त्याची मदत कर गाडीत बसून या गाडीवर बसून यावे असे काही नाही एखांद्याला तहान लागली पाणी पाज एखाद्याला रस्ता क्रॉस करायचा मदत कर ... असे कोणाला तरी काही पण मदत कर
नॉर्मली सांगायची तर एक मदतीची चैन तयार करण्याचा प्रयत्न
बाकी काही नाही
तुमचे वय किती तुम्ही किती शिकला तुमच्या घरची परिस्थिती काय आहे तुमचे मित्र किती तुमचे नातलग किती तुमचा भाग भांडवल किती हे सगळे वेगळे आहे..... जबाबदारी सर्व काही शिकवते इतके मात्र खरे..आहे....