Nivedita Cares

Nivedita Cares Bhagini Nivedita Pratisthan Sangli

Admissions open for new job oriented courses ..** NSDC -SKILL INDIA certificate only 2000 fees for any course
07/05/2025

Admissions open for new job oriented courses ..

** NSDC -SKILL INDIA certificate
only 2000 fees for any course

भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या डॉ. कुसुमाताई घाणेकर कौशल्य विकास संस्थेच्या नर्सिंगच्या आठव्या व ओ टी टेक्निशियन च्या सहा...
26/10/2024

भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या डॉ. कुसुमाताई घाणेकर कौशल्य विकास संस्थेच्या नर्सिंगच्या आठव्या व ओ टी टेक्निशियन च्या सहाव्या बॅचच्या शपथविधीचा कार्यक्रम..
डॉ. शरद पाटील व डॉ. अशोक देशपांडे यांचं मार्गदर्शन..

01/10/2024

भगिनी निवेदिता ची कथा.. सेवागाथा वर 😃🙏🏻

सेवागाथा या पोर्टलवर आज भगिनी निवेदिता प्रतिष्ठानची कथा आली आहे.
कै. कुसुमताईंच्या योगदानाची योग्य स्थानी दखल घेतली गेली याचे समाधान वाटते व जबाबदारी वाढल्याची भावना येते.
अवश्य वाचा..

भगिनी निवेदिता ची कथा.. सेवागाथा वर 😃🙏🏻

https://www.sewagatha.org/parivartan-yatra/bhagani-nivedita-pratishthan-sangali

Happy to share..100 % result of Nursing and O. T. Technician courses..Congratulations Students! Great job done, teachers...
19/08/2023

Happy to share..
100 % result of Nursing and O. T. Technician courses..
Congratulations Students!
Great job done, teachers!

भारताची नाइटिंगेल : बेला दत्तआज नर्सेस डे ..वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी युद्धआघाडीवर जाऊन जखमी सैनिकांची शुश्रुषा करणा...
12/05/2023

भारताची नाइटिंगेल : बेला दत्त

आज नर्सेस डे ..
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी युद्धआघाडीवर जाऊन जखमी सैनिकांची शुश्रुषा करणारी बेला दत्त..
फ्लोरेन्स नाइटिंगेल सारखीच धाडसी आणि मायाळू.
तिच्या सेवेचा लाभ झालेले सैनिक म्हणत ती आमच्या आईहूनही अधिक काळजी घेते..
आझाद हिंद फौजेच्या झाशीची राणी पथकात भरती होऊन परिचारिका म्हणून कामगिरी बजावलेली बंगालची बेला दत्त हिची ही अज्ञात कहाणी..

ब्रह्मदेशातील रंगूनच्या उत्तरेला तीनशे मैलांवर असलेलं थंड हवेचं रम्य ठिकाण मेमियो ...त्याचं रुपांतर धगधगत्या रणभूमीत झालं होतं .आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी रेजिमेंटमधली परिचारिकांची एक तुकडी या आघाडीवर सेवा देण्याकरता पोहोचली .बंगालची कन्या बेला या पथकात होती.या मुलींना आघाडीवर पोचताना अनेक अडचणी आल्या. जवानांसारखंच लपत-छपत, रांगत-सरपटत त्यांना जावं लागे.

मेमियोची आघाडी धगधगत होती त्यामुळं हॉस्पिटल जवानांनी भरून वहात होतं .घायाळ झालेल्या आणि अन्य रोगांनी ग्रस्त जवानांची संख्या हजारावर पोचली .कुणाच्या जखमा चिघळल्यात, कुणाला मलेरिया वा अतिसारानं थकवा आलाय . या सगळ्या जवानांचा एकच लकडा, मला आधी पहा, मला लवकर बरं करा, मला युद्धावर परत जाऊद्या !

बेलादत्त ही अवघ्या सोळा वर्षाची परिचारिका तिथं काम करत होती .रुग्णांचा ओघ वाढतच होता .आघाडीवर असताना परिचारिका ,औषधं, सुविधा सारंच मर्यादित असे .जुलाबाची साथ सुरु झाली आणि पहाता पहाता रुग्णांची संख्या पंचाऐंशीला पोचली .या विभागाकरता बेला एकमेव सेविका होती .जुलाबानं या जवानांना इतकं गलितगात्र करुन टाकलेलं असायचं की त्यांना स्वतःचे कपडे बदलायलाही मदतीची गरज लागे .बेलानं एकटीनं या पंचाऐंशी जवानांची सेवा केली .
त्यांना स्पंजिंग करणं, त्यांचे वारंवार खराब होणारे कपडे व बिछाने बदलणं व ते धुणं हे सगळं तिनं हसतखेळत पार पाडलं .

एक दिवस नेताजी या रुग्णालयाला भेट द्यायला आले .बेला त्यांच्यासोबत फिरून प्रत्येक रोग्याची तपशीलवार माहिती देत होती . पण सगळे रुग्ण नेताजींशी स्वतःविषयी बोलण्याऐवजी बेलाचं कौतुक करु लागले ! ते सांगू लागले , "आमच्या आईंदेखील केली नसती इतकी मायेनं ही आमची बहीण आमची सेवा
करत आहे ! " तिची कर्मनिष्ठा, अपार कष्ट ऐकताना नेताजींचे डोळे भरुन आले ! त्यांनी त्याच दिवशी बेलाची नाईक पदावरुन हवालदार पदावर बढती केली .

पण असेही प्रसंग येत होते की तिकडं आघाडीवर जखमी जवानांचा खच पडत असे व त्यांना रुग्णालयापर्यंत आणणारी यंत्रणा अपुरी पडत असे .बेला स्वतः आघाडीवर जाई .वरतून बाँबचा वर्षाव व जमिनीवर अखंड मशीनगन्सचा मारा यातून एकेक रुग्ण सुखरूप घेऊन येणं हे सोपं काम नव्हतं .बेला तेही निर्भयपणे करत होती .एकदा अशीच रुग्णाला आणण्याकरता आघाडीवर गेली असताना जोराचा बाँब हल्ला झाला .बेलाच्या आसपासच्या इमारती कोसळल्या व ती एका दगडमातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली .त्याही क्षणी तिच्या मनात हेच सुरु होतं की मीच अडकून पडले तर मी जवानांना मदत कशी करणार ? तिनं सर्व शक्ती पणाला लावून हळूहळू आपला एक हात त्या ढिगार्‍याबाहेर काढला .तिच्या सुदैवानं एका जवानाला तो जिवंत हात दिसला .त्यानं तो ढिगारा हलवून बेलाला सुखरुप बाहेर काढलं .त्याचे आभार मानताक्षणी बेला आपल्या कर्मभूमीकडे धावत सुटली !

अशी कर्मनिष्ठ बेला भारताची नाइटिंगेलच म्हणावी लागेल!

विनीता तेलंग

03/12/2022
सहाव्या बॅचचा शपथविधी कार्यक्रम नर्सिंग क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकानं व्यवसायनिष्ठेची शपथ घ्यायलाच हवी मग कोर्स कि...
03/12/2022

सहाव्या बॅचचा शपथविधी कार्यक्रम
नर्सिंग क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकानं व्यवसायनिष्ठेची शपथ घ्यायलाच हवी मग कोर्स कितीही छोटा असूदे - ही आमच्या शिक्षकांची प्रामाणिक तळमळ होती .
अतिशय सुरेख नियोजन केलेला Lamp Lighting चा कार्यक्रम म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता .
वृद्धांचं जगणं सुंदर व्हावं याकरता झटणारे आणि सहा वर्षात साडेचारशे आई बाबांना सांभाळलेले डॉक्टर दिलीप शिंदे सरांच्या हातून हा सेवाभावाचा दीप मुलांनी प्रज्वलित केला .नक्कीच ही प्रेरणा त्यांच्या मनात सदैव जागी राहील !

जानेवारीपासून जेरिअॅट्रिक केअर अर्थात वृद्धसेवेचं स्वतंत्र प्रशिक्षण देणारा कोर्स सुरू होत आहे .इच्छुकांनी अवश्य संपर्क साधावा .

नवरात्रीनिमित्त निवेदिता केअर्सची  'अक्षय ज्ञानदीप'  योजना या नवरात्रात आपल्या शुभसंकल्पाने एका सामान्य कन्येला समर्थ कर...
26/09/2022

नवरात्रीनिमित्त निवेदिता केअर्सची 'अक्षय ज्ञानदीप' योजना

या नवरात्रात आपल्या शुभसंकल्पाने एका सामान्य कन्येला समर्थ करूया.
करूया संकल्प ज्ञानदीप अखंड तेवता ठेवण्याचा !

या करता निवेदिता केअर्स च्या माध्यमातून शिकणार्‍या होतकरू परंतु वंचित मुलींना विविध योजनांद्वारे सहकार्याचा हात देऊया !

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली ही ५२ वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था महिला व मुलींना विविध कौशल्यविकासाच्या कोर्सेस द्वारा सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवते.

नर्सिंग केअर /अॉपरेशन थिएटर टेक्निशिअन /आयसीयू टेक्निशिअन/ जेरिअॅट्रिक केअर
असे पॅरामेडिकल कोर्स चालवले जातात.

अत्यल्प फी / 'शिका कमवा व परत करा' योजना हा आधार मिळाल्याने गेल्या ६ वर्षात १०० हून अधिक मुली स्वावलंबी झाल्या आहेत.

काही मुली अथवा त्यांचे पालक खर्च करू शकतात .
परंतु पूर्ण अनाथ वा अत्यंत विपरीत परिस्थितीतील मुली तेवढेही करू शकत नाहीत.

नवरात्रात या ज्ञानयज्ञातील काही भार आपल्यासारख्या सज्जन शक्ती ने उचलावा असे नम्र आवाहन ! आपण वैयक्तिक अथवा गट बनवून देणगी देऊ शकता.

देणगीला 80 G सवलत लागू आहे.
शक्यतो रक्कम चेक वा अॉनलाईन ट्रान्सफर द्वारे द्यावी.
दात्याचे संपूर्ण नाव फोन नंबर पत्ता पॅन नंबर व आधार नंबर आवश्यक आहे.

🔴 महालक्ष्मी योजना
एका मुलीचा एका वर्षाचा पूर्ण खर्च ₹ ६५,०००
(फी ,स्टेशनरी ,युनिफॉर्म व होस्टेलसह )

⚪ महासरस्वती योजना
मुलींच्या शैक्षणिक शुल्काकरता सहाय्य(कोर्सनुसार फी)
₹ १५००० /१२०००/१००००

🔵अन्नपूर्णा योजना
एका मुलीचा एका वर्षाचा होस्टेलचा खर्च
₹ ३०,०००

यापैकी आपल्याला रुचेल त्या मार्गाने निवेदिता केअर्सच्या विदयादानाला अर्थसहाय्य करावे हे नम्र आवाहन .

आपला स्नेह या ज्ञानदीपाला अखंड तेवता ठेवेल !
धन्यवाद ! नवरात्रीच्या शुभेच्छा !

ACCOUNT HOLDER NAME- BHAGINI NIVEDITA PRATISHTHAN SANGLI
ACCOUNT NUMBER- 062230100000281
IFSC CODE- JSBP0000062
JANATA SAHAKARI BANK LTD PUNE
BRANCH
CITY PALACE ,SHIVAJI CHOUK, SANGLI

संपर्क
शीला लादे 77690 84427

निवेदिता केअर्स ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !
15/08/2022

निवेदिता केअर्स
७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

*Please Circulate* ! 🌱 *निवेदिता केअर्स सांगली* 🌱*शासकीय* कोर्सेसला *प्रवेश* सुरु ! 🎯*दहावी वा बारावीनंतर *एक* *वर्षात*स...
18/06/2022

*Please Circulate* !

🌱 *निवेदिता केअर्स सांगली* 🌱

*शासकीय* कोर्सेसला *प्रवेश* सुरु !

🎯
*दहावी वा बारावीनंतर *एक* *वर्षात*
स्वतःच्या *पायावर* उभे रहा !

*शासनमान्य* कौशल्य विकास कोर्सेस...

🚑 *नर्सिंग असिस्टंट*
१ वर्षाचा पूर्णवेळाचा कोर्स

🏥 *अॉपरेशन थिएटर टेक्निशिअन* १ वर्षाचा पूर्णवेळाचा कोर्स

🦽 *वृद्धसेवा प्रशिक्षण* (जेरिअॅट्रिक केअर)
सांगलीत प्रथमच,*तीन* महिन्यांचा व लगेच *उत्तम रोजगार* व समाधान देणारा कोर्स !

*अत्यल्प फी*

*उत्तम प्रयोगशाळा*

*मुलींकरता वसतीगृह*

*अनुभवी स्टाफ*

अत्याधुनिक *मल्टिस्पेशालिटी* हॉस्पिटलमधे ट्रेनिंग

केवळ आमच्याकडेच -
Professional *English*
and *communication* skills
Basic *computer* for *hospital* software
हे कोर्स सोबत शिकवले जाते.

आतापर्यंत झालेल्या पाचही बॅचेसचे विद्यार्थी *चांगल्या पगारावर* हॉस्पिटल्समधे *जॉब* करत आहेत .

*मर्यादित* जागा !
आजच प्रवेश निश्चित करा !

या शिवाय -
देशाबाहेर करिअर करु इच्छिणार्‍यांकरता दोन वर्षाचा *आंतराष्ट्रीय आरोग्यसेवा सहायक*
*International Care Giver* हा कोर्स सुरु आहे.
विदेशी भाषा + केअर गिव्हिंग प्रशिक्षण .पुढील सर्व प्रक्रियेचे मार्गदर्शन व सहकार्य.अधिक माहितीकरता संपर्क साधा !

संपर्क :
डॉक्टर कुसुमताई घाणेकर कौशल्य विकास संस्था
द्वारा :
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ,
भारत सूत गिरणीच्या मागे
स्कायलार्क इंग्लिश स्कूल जवळ
यशवंतनगर सांगली.

फोन : सौ .शीला लादे
*77690 84427*

आवश्यक कागदपत्रे -
*आधार* कार्ड
दहावी /बारावी *मार्कलिस्ट*
*लीव्हिंग* सर्टिफिकेट
२ *फोटो*

नर्सिंग दिवसाप्रीत्यर्थ सर्व रुग्णसहाय्यकांना कृतज्ञ नमस्कार ! तुमच्या सेवाभामुळे विश्व निरामय होवो ! भगिनी निवेदिता प्र...
12/05/2022

नर्सिंग दिवसाप्रीत्यर्थ सर्व रुग्णसहाय्यकांना कृतज्ञ नमस्कार !
तुमच्या सेवाभामुळे विश्व निरामय होवो !

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली संचलित
डॉक्टर कुसुमताई घाणेकर कौशल्य विकास केंद्र

गेल्या पाच वर्षांतील पॅरामेडिकल कोर्सेच्या उत्तम प्रतिसादानंतर यावर्षीपासून

वृद्धसेवा प्रशिक्षण : Geriatric Care Training
हा नवीन कोर्स सुरु करत आहोत.

श्री चैतन्य माऊली केंद्र माधवनगर यांच्या सहकार्याने पहिली बॅच दि १ जुलै २०२२ पासून यशवंतनगर येथे सुरु होत आहे .

वाढणार्‍या आयुर्मानामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे आणि तरुण व मध्यमवयीन पिढीची व्यस्तताही वाढते आहे. यामुळे जे वृद्ध अंशतः वा पूर्णतः परावलंबी आहेत त्यांची काळजी घेणे हे कौटुंबिक स्तरावर अवघड होत चालले आहे.

अशा वृद्धांकरता निवासी वा अर्धवेळच्या वृद्धाश्रमांचा पर्याय उपलब्ध आहे परंतु तो शेवटचा उपाय आहे.
शक्यतो घरी राहून वृद्धांची योग्य देखभाल केली जावी फक्त त्याकरता प्रशिक्षित वृद्धसेवकाची मदत घ्यावी हा मध्यम मार्ग सर्वत्र स्वीकारला जातो आहे.

वृद्धत्व व त्यातील वाढणारी गुंतागुंत, नवनवे आजार व त्याची काळजी, वृद्धांच्या मानसिक-भावनिक गरजा हे सारे लक्षात घेता वृद्धसेवेच्या क्षेत्राकरता विशेष प्रशिक्षणाची गरज समोर येत आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावर जेरिअॅट्री मधील स्पेशलायझेशन उपलब्ध आहे .परंतु घरोघरी, वृद्धाश्रमांमधे ,जेरिअॅट्रिक वाॅर्डमधे वृद्धांना प्रत्यक्ष हाताळणार्‍या स्टाफचेदेखील प्रशिक्षण होण्याची गरज आहे.
ही गरज लक्षात घेऊन आम्ही तीन महिन्यांचा "सर्टिफिकेट कोर्स इन जेरिअॅट्रिक केअर " हे विशेष प्रशिक्षण सुरु करत आहोत.

आठवी पास असलेल्या व वृद्धसेवेची तळमळ असलेल्या महिला व पुरुषांकरता हे प्रशिक्षण आहे.तीन महिने पूर्णवेळाच्या या कोर्समधे संपूर्ण थिअरी व प्रत्यक्ष कामाचा अनुभव अंतर्भूत आहे.तज्ञ डॉक्टर व अनुभवी सेवक यांचे मार्गदर्शन कोर्सच्या विद्यार्थ्यांना मिळेल व प्रत्यक्ष वृद्धाश्रमात काम करण्यातून सेवेचे प्रत्यक्ष शिक्षण मिळेल.

नर्सिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टाफकरता देखील हे विशेष प्रशिक्षण उपयुक्त आहे.त्यांच्याकरता हा कोर्स शनिवार रविवार उपलब्ध असेल.

दोन्ही कोर्सेस करता अत्यल्प म्हणजे केवळ एक हजार रुपये शुल्क आहे.

१ जुलै पासून यशवंतनगर येथे दुपारी १२ ते ५ या वेळात प्रशिक्षण असेल.शुक्रवार शनिवार वृद्धाश्रमात ट्रेनिंग होईल.
प्रवेशावेळी शेवटचे शैक्षणिक प्रमाणपत्र / मार्कलिस्ट
आधार कार्ड व दोन फोटो आवश्यक .

याशिवाय

१.जीेएनएम असिस्टंट : १वर्ष
२.अॉपरेशन थिएटर टेक्निशिअन : १ वर्ष
३.आयसीयू टेक्निशिअन : ६ महिने
४.आंतरराष्ट्रीय आरोग्य सहायक : २ वर्ष

हे सर्व कोर्सेस जुलैपासून सुरु होत आहेत.
अत्यल्प फी !
लर्न - अर्न - रिटर्न योजना .
मुलींकरता वसतीगृह.
अद्ययावत लॅब .अनुभवी स्टाफ .
आधुनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधे ट्रेनिंग.कोर्स संपताच जॉबची हमी !
बदलत्या वैद्यकीय सुविधांचे ट्रेनिंग
कोर्समधे कम्युनिकेशन स्किल व बेसिक कॉम्प्युटरचे शिक्षण अंतर्भूत .

दहावी पास मुलामुलींनी अवश्य संपर्क करा .

एक वर्षात स्वावलंबी होऊन सेवा व अर्थार्जन असे दुहेरी समाधान मिळवा !

प्रवेशाकरता संपर्क
सौ शीला लादे 7769084427

Address

Bhagini Nivedita Pratishthan, Yashwant Nagar, Kupwad
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919890928411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nivedita Cares posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share