Vishwajit mhaiskar

Vishwajit mhaiskar Health and Wellness Community where we provide health related education

02/06/2022

आंबेहळद चे फायदे

1) आंबेहळद हा प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते.

2) आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.

3) कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात.

4) शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

5) अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मुरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.

6) चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करून चेहर्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

02/06/2022
02/06/2022

रिठा चे फायदे

1) अंगाचा दाह होत असल्यास रिठ्याचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो.

2) पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल गुळातून घाटवल्यास कृमी पडून जातात.

3) कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडा सा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.

4) मनुष्य फेफरे येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे.

5) कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष उतरते.

6) मसालायुक्त शिकेकाई करताना रिठे वापरले जातात. त्यामुळे नैसर्गिक कंडिशनरचे काम होते.

7) रिठे भिजत घालून त्या पाण्यात सोन्याचे अथवा चांदीचे दागिने भिजवून ठेवल्यास चिकटलेला मळ निघून दागिना स्वच्छ व चमकदार होतो.
8) रिठे पाण्यात भिजवून ते चांगले कुस्करून पाणी अंगाला चोळल्यास अंगावर पित्त उठण्याचा त्रास कमी होतो.

9) अकस्मात मूत्र कोडले असता खाकरेची बी आणि रिठ्याची बी पाण्यात उगाळून ओटीपोटाच्या सभोवती लेप लावावा आणि शेक द्यावा. यामुळे लघवी साफ

amezing weight loss
23/05/2022

amezing weight loss

अश्वगंधा1) हे झाड अर्धा ते एक मीटर उंचीचे, सदैव हिरवेगार असते.2) पावसाळी, दमट वातावरणात व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत...
23/05/2022

अश्वगंधा

1) हे झाड अर्धा ते एक मीटर उंचीचे, सदैव हिरवेगार असते.

2) पावसाळी, दमट वातावरणात व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते. पावसाळ्यामध्ये बियांपासून लागवड करावी. साधारणतः 15-20 दिवसांनी बी उगवते. लागवडीनंतर 18 महिन्यांनी अश्वगंधाचे मूळ व्यवस्थित तयार होते. झाडाची पाने पिकू लागली व फळे तांबडी झाली, की मुळ्या काढल्या जातात.
उपयोग –

1) अश्वगंधाचे मूळ वातरोगांमध्ये, तसेच शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असते.

2) शुक्राणू कमी असणे, सांधेदुखी, अशक्तता, मांसक्षय, रक्तविकार वगैरे रोगांमध्ये अश्वगंधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.

3) वजन वाढण्यासाठी, विशेषतः मांसधातूचे पोषण होण्यासाठी अश्वगंधा मुळाचे चूर्ण तूप-साखरेसह किंवा लोणी-साखरेसह घेता येते.

4) अश्वगंधा क्षीरपाक म्हणजे अश्वगंधा, दूध वा पाणी एकत्र उकळवून तयार केलेले सिद्ध दूधसुद्धा मांसधातू, शुक्रधातूच्या पोषणासाठी उत्तम असते.

No diet no gym no any products
19/05/2022

No diet no gym no any products

19/05/2022

मूळव्याध

1) पोटात घ्यावयाचे औषध: १/२ चमचा आल्याचा रस, १/२ लिंबाचा रस, एक चमचा मध आणि १/२ चमचा पुदिन्याची पाने एकत्र मिसळून घ्यावीत.

2) सुके अंजीर भिजत घालून, त्यात थोडेसे दूध घालून त्याचा लेप तयार करावा. तो लेप मुळव्याधीच्या जागी लेपल्याने तेथील त्रास कमी होतो.

3) वाटलेला पांढरा मुळा आणि मध यांच्या मिश्रणाचे नियमित सेवनाने फरक वाटू लागतो.

4) सुक्या आणि वाहत्या मुळव्याधींसाठी कांदा हे नामी औषध आहे.

5) कांद्याची साले काढून ती भाजावीत आणि वाटून त्यांचा लेप लावावा उत्तम फायदा करुन देतो.

6) कोमट पाण्याने स्नान : दिवसातून तीन वेळा गरम पाण्याने स्नान करावी किंवा पाण्यात थोड्यावेळासाठी बसावे. त्या जागेवरची त्वचा ठीक होईल आणि जळजळ देखील कमी होण्यास मदत मिळेल.

7) संतुलित आहार घ्या : पाईल्स बरे करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संतुलित आहार घेणे सुरू केले पाहिजे. ज्यामुळे कब्ज् व पोटदुखी इत्यादीची समस्या दूर होते. जेवणात हिरव्या भाज्या, पाले भाज्या, ब्राउन राईस, दूध, सुजी इत्यादीचे सेवन करा.

8) बर्फाचा शेक द्या : ज्या भागात जळजळ होत असेल, तेथे बर्फाचा तुकडा ठेवा, याने आराम मिळेल व सूज कमी होण्यास मदत मिळेल.

9) एलोवेरा: पाईल्स झाल्यावर एलोवेरेला कापून आतला गर त्या जागेवर लावल्याने फायदा होतो. याचे जेल, जळजळ शांत करतो आणि सूज देखील कमी करण्यास मदत करतो.

10) लिंबाचा रस : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल, पण पाईल्स झाल्यावर लिंबाचा रस त्या जागेवर लावल्याने फार फायदा होतो. सुरुवातीत जळजळ होते पण थोड्यावेळाने आराम मिळतो.

11) जैतूनाचे तेल : जैतूनाचे तेल फारच उपयोगी असत. यात एंटीऑक्सींडेंट असत जे त्वचेची जळजळ शांत करत. पाईल्स झाल्यावर कॉटन बॉलमध्ये तेल घेऊन प्रभावित जागेवर लावायला पाहिजे. याने आराम मिळेल.

12) इतर प्राकृतिक उपाय: बर्या च वेळेपर्यंत ऐकाच मुद्रेत बसून राहणे टाळावे. व्यायाम करावा आणि रक्त आल्यावर लगेचच डॉक्टरांना सल्ला घ्यावा.

18/05/2022

जाडेपणा हि सगळ्यांसाठीच एक समस्या आहे यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा लोक आपल्यावर हसतात. जाडेपणा मुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी साठल्यामुळे आपण जाडे होतो. आज आपण जाडेपणा वर घरगुती उपचार पाहूयात ज्यामुळे आपला वाढलेला वजन कमी करण्यास मदत होईल. आपली खराब जीवनशैली, आपल्या खाण्या पिण्याच्या सवई उदा. जास्त वसायुक्त (fatty) पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात दारू पिणे, शारीरिक श्रम कमी करणे, तेलकट पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, कमी झोपणे आणि अनुवांशिक तसेच हार्मोनल समस्यांमुळे पोटाची चरबी वाढणे यामुळे आपण जाडे होतो.

जाडेपणा वर उपचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे आपल्याला इतर आजार देखील होतात उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदया संबंधी विकार इत्यादी आणि या समस्या निवारणासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत व आपल्या खाण्या पिण्याच्या सवई मध्ये बदलाव करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्याला नियमित व्यायाम व योगा करणे आवश्यक आहे. कारण असे केल्यामुळे आपण निरोगी व तंदुरुस्त होऊ

17/05/2022

वजन कमी करण्याच्या टिप्स क्रमांक 1
1. संयम ठेवा :-
लक्षात ठेवा की आज जे तुमचे weight आहे ते काही एक-दोन दिवस किंवा एक-दोन महीन्यात वाढलेले नाही. हे तर फार काळापासून चालत आलेल्या तुमच्या life-style चे परिणाम आहे. आणि जर तुम्हाला weight loss करायचे असेल तर निश्चित पणे संयम ठेवा. ब्रेजामिन फ्रैंकलिन चे म्हणणे “ज्याच्या कडे संयम आहे तो जे पाहीजे ते मिळवू शकतो.” हे नेहमीच मला प्रेरणा देते. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की या कामामध्ये वेळ लागेल. कदाचित पहिल्या एक-दोन आठवडयात तुम्हाला तुमच्या वजनामध्ये काही फरक जाणवणार नाही पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही संयम ठेवून आपले प्रयत्न सुरु ठेवले पाहीजे.

17/05/2022

उन्हाळ्यात केसांची निगा | Summer hair care tips in Marathi
1) उन्हाळ्यात उन वाढतं तसं त्याचा परिणाम शरीरावरही पडतो. विशेषतः केसांची तर उन्हाळ्यात फार काळजी घेतली पाहिजे. कारण धूळ, माती व घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. परिणामी केसात कोंडा आणि डोक्यावरील त्वचा रुक्ष होते. पण खाली दिलेल्या काही टिप्सचा वापर केलात तर या काळातही तुम्ही केसांची निगा राखू शकता.

2) केसांना धूळ-माती आणि उन्हापासून वाचवण्यासाठी घराबाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा.

3) आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा केस धुणे गरजेचे आहे. तुमचे केस तेलकट असतील तर प्रत्येक दुसर्याड दिवशी केस धुतले तरी चालतील.

4) केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून 20 मिनिटापर्यंत ठेवावे. मग गार पाण्याने केस धुऊन टाकावे. कोंडा काढण्याचा हा सर्वांत उत्तम उपाय आहे.

5) केसांना आवळा लावल्यानेसुद्धा केस चांगले रहातात.

6) केसांवर सारखे कंगवा फिरवायला हवा. त्यामुळे केसांमधील धूळ, माती निघून जाईल.

7) केसांना हर्बल ऑइलने मसाज केल्यास उत्तम.

8) शॅंपूंचा जास्त वापर केल्यास केस कोरडे होतात. म्हणून चांगल्या कंपनीच्या शँपूचा वापर करावा.

9) मेंदीत लिंबाचा रस आणि एक अंडं फेटून पॅक तयार करून केसांना लावा. त्यामुळे केसांची चमक तर वाढतेच आणि गरमीत आरामही मिळतो.

10) केसांना जास्त गरम किंवा थंड पाण्याने धुऊ नये.

11) केसांना धुतल्यानंतर कंडिशनर लावावा.

12) केसांची पोनी किंवा फ्रेंच नॉट केल्याने केस व्यवस्थित राहतात. घामामुळे खराबही होत नाही.

Address

A/p/vasagade Tal/palus Dist/sangli
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwajit mhaiskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vishwajit mhaiskar:

Shortcuts

Share