18/12/2025
सांगली शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष कै. जनार्दन लिमये यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण...
ज्या सभागृहात लिमये सरांच्या उपस्थितीमध्ये अनेक सभा झाल्या, ज्या सभागृहात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले गेले त्या संस्थेच्या कार्यालयातील सभागृहाचे आज "कै. जनार्दन भास्कर लिमये संचालक सभागृह" असे नामकरण लिमये सरांचे मित्र आणि संस्थेचे सभासद मा. श्री. प्रसाद जोग यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष मा. श्री. नितीन खाडिलकर यांनी देणगी दिली. या समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. आर्कि. श्रीराम कुलकर्णी, उपाध्यक्ष मा. श्री. विजय भिडे, कार्यवाह मा. श्री. शिरीष गोसावी, श्री. सुहास करंदीकर, माजी कार्यवाह श्री. शशिकांत देशपांडे, श्री. केदार खाडिलकर यांच्यासोबत सर्व संचालक व व काही शाळांचे मुख्याध्यापक हजर होते. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...