28/02/2018
गुरुवार दि. 22/2/2018 रोजी सायंकाळी कोल्हेवाडी रोड, संगमनेर येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये स्नेहसंमेलन संपन्न झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक शांताराम डोंगरे सर, शिक्षण विस्तार अधिकारी के.के.पवार, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुभाष पवार, विस्तार अधिकारी गजाकस, धोत्रे इ. उपस्थित होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिलेला गार्ड अॉफ अॉनर अत्यंत सुंदर होता.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले बँड पथक, डंबेल्स,रिंग, फ्लॅगच्या कवायती, पिरॅमिड्स सरावाने उपस्थितांची मने प्रसन्न झाली .
विद्यार्थ्यांनी नृत्यासह सादर केलेले गीत व विविधतेतून दिलेला एकतेचा व राष्ट्रप्रेमाचा संदेश सर्वांना आवडला. ज्या शिक्षकांनी तयारी करुन घेतली, त्या शिक्षकांच्या कल्पकतेला आणि विद्यार्थ्यांचे कृतीचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमा निमित्त केलेल्या रोषणाईमुळे व बलून आकाशात सोडण्याच्या कल्पकतेमुळे कार्यक्रमाने मोठी उंची गाठली .
संस्थे मार्फत विद्यार्थांना पारितोषिके देऊन कौतुक तर केले पण त्याही पेक्षा रक्तदान केलेल्या दोन महिला पालकांचा मोमेंटो देऊन केलेला गौरव सर्व पालकांचे स्मरणात राहील.
पालक शाळेकडे फिरकण्यास अनुत्सुक असतात अशा पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात महिला पालक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या , हे आपल्या संस्थेचे संस्थापक यांनी केलेले परीश्रम व मिळवलेला विश्वास याचे प्रतिकच म्हणावे लागेल
प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी घेतलेल्या परिश्रमांची वाहवा झाली .