Dr. Annasaheb Shinde Vidyalay, Deogaon

Dr. Annasaheb Shinde Vidyalay, Deogaon डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय ही देवगावमधील इयत्ता पाचवी ते दहावी शिक्षण देणारी शाळा आहे.

आंतरशालेय क्रीडा स्पर्धा - डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय, देवगाव #देवगाव  #खेळ  #शाळा  #शिक्षण
15/11/2025

आंतरशालेय क्रीडा स्पर्धा - डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय, देवगाव

#देवगाव #खेळ #शाळा #शिक्षण

27/01/2025
मंगळवार दिनांक १६ जुलै२०२४ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शालेय दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीमध्ये भक्ती तनपुरे (विठ्ठल रूप...
16/07/2024

मंगळवार दिनांक १६ जुलै२०२४ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शालेय दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीमध्ये भक्ती तनपुरे (विठ्ठल रूपात), तर श्रूती कोटकर (रूक्मिणी रूपात) दिंडीत सहभागी झाल्या होत्या. विठ्ठल नामाचा गजर करत अभंग, गवळणी सादर करण्यात आल्या.

शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीचा आनंद रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांनीही घेतला. शालेय दिंडीत जाखुरी गावातील ह.भ.प. अलकाताई देशमुख व देवगावच्या ह.भ.प छायाताई कोटकर यांनी अभंगाचे गायन केले. त्यास मॄंदगाचार्य ह.भ.प. वाडगे महाराज यांनी साथ दिली. जि.प. शाळेचे बुळेसर यांनी अभंगातील पदरचना सादर केली.

रिंगण सोहळ्यात मुलं मुली व शिक्षक यांनी फुगड्या खेळून वारीचा आनंद घेतला.‌ भक्तीमय वातावरणात ‌ विद्यार्थ्यांनी गवळणी अभंग सादर केले. दिंडीची सांगता पसायदानाने करण्यात आली.

वृत्तांकन - पानसरे सर

#देवगाव #वारी #वारकरी

डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव येथे  इ.१०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पै. राजन शिंदे, युवामंच संगमनेर खुर...
25/06/2024

डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव येथे इ.१०वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पै. राजन शिंदे, युवामंच संगमनेर खुर्द,जि.प.गण यांच्या हस्ते व संस्था अध्यक्ष रावसाहेब कोटकर, तसेच देवगावच्या सरपंच अर्चना लामखडे, डॉ. ॠषिकेश अभंग, नानासाहेब वर्पे (सरपंच, निमगाव टेंभी), नितीन पानसरे (सरपंच, जाखुरी), ज्योती पवार (सरपंच ,खराडी), परमानंद खर्डे (उद्योजक, रायतेवाडी), प्रा. दत्तात्रय कोटकर, माजी सैनिक प्रकाश कोटकर, अशोक पावसे, ग्रामस्थ,पालक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी संस्थेच्या वतीने शाळेसाठी खेळ साहित्य वितरण संस्था अध्यक्ष रावसाहेब कोटकर व संस्था संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक थोरात सर यांनी केले, प्रकाश कोटकर, उद्योजक परमानंद खर्डे यांनी आपली मनोगते व्यक्त केली, तसेच राजन शिंदे यांनी आपल्या भाषणात शाळेविषयी आदरभाव व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

राजन शिंदे यांच्या तर्फे ‌गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल्स देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पानसरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोखरकर ‌मॅडम यांनी केले.

डॉ अण्णासाहेब शिंदे विद्यालय स्पोर्ट्स अकॅडमी उद्घाटन समारंभ आणि खेळ साहित्य वितरण...
22/06/2024

डॉ अण्णासाहेब शिंदे विद्यालय स्पोर्ट्स अकॅडमी उद्घाटन समारंभ आणि खेळ साहित्य वितरण...

डॉ अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव इयत्ता १० वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम...
22/06/2024

डॉ अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव इयत्ता १० वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम...

18/11/2023

मी शिवाजी गडाख खरंच किती बदनशीब आहे मी उद्याचा येवढा आनंदाचा क्षण माझ्या नशीबात नाही. कालपर्यंत शासकीय सुट्या होत्या.आणि आज सुट्या संपल्या आहे. त्यातल्या त्यात नेमकी आमच्या ऑफिसमधील सर्व अधिकारी वर्गाची क्राईम मिटींग 11 वाजता आहे. परंतु माझ्या विद्यार्थी मित्रांना दिवाळी व भाऊ बीजच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व गुरूजनवर्गा चरणी नतमस्तक होऊन सर्वाना माझे दंडवत.

आपल्या विद्यालयातील खूप खूप आठवणी माझ्या मनात आजून ही ताज्या आहे. आमच्या वेळी विद्यालयाची ईमारत सुद्धा नव्हती. कधी मारूती मंदिरात तर कधी सोसायटी च्या ईमारतीत तर कधी चावडी त शेळया ची कोबड्या ची घाण साफ करून बसावे लागायचे.त्या परिसरात आपल्या शिक्षकांनी खूप हालाकिचे दिवस काढले. संस्था त्यांना फार कमी पगार देत आहे.कसा तरी आपला उदारनिर्वाह करत आसे. खेळात आम्ही कधी आमच्या पुढच्या व मागच्या बॅचेसला जिंकून दिले नाही. कोणत्याही खेळात आम्ही हारलो नाही. तालुका पातळीवर सुद्धा आपल्या विद्यालया च नाव आम्ही पहिल्या क्रमांकावर झळकवले होते. आपल्या सर्व शिक्षकांनी सुद्धा आहो रात्र मेहनत करून आपल्या शाळेचे नाव उंच शिखंरावर नेऊ ठेवले आहे.माझा सर्व मित्रांना एकच सल्ला आहे. जिवनात पैसा कमवा पण तो मेहनती व नियतीने कमवा आणि पैसे या बरोबर मानसही कमवा. आणि निरवेसनी जिवन जगा.कारण आता आपल्या जीवनाचा खरा संर्घ 45 वया नतंर सुरू होतो.आपण कमावलेला पैसा व प्रॉपर्टी सुख घेण्या साठी आपल्या शरीराने साथ दिली पाहिजे ना.म्हणून निरवेसनी जिवन जगा.आणि ज्या आई वडिलांच्या जिवावर आपण लहान पणा पासून मजा करीत आलो .त्या आई वडिलांनी आता आपल्या जिवावर मजा केली पाहिजे आस सुख त्यांना द्या.मुलाना खूप शिकवा मुलीला स्वतः च्या पायावर उभे केले शिवाय मुली चे लग्न करू नका.आणि शेवट ची माझा गुरुना एकच विनंती आहे.आपला नगर जिल्हा तून दरवर्षी अधिकारी सर्वात जास्त पास होतात.कुठलेही आरक्षण न घेता आपला जिल्हा महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आसतो.कुठल्याही भरती साठी धावणे फार गरजेचे असते त्या साठी परिपाठ झाला की विद्यार्थ्यांना आधी 3 चक्कर नतंर 5 चक्कर आसा सराव जर घेतला व खेळा च्या तासाला जर आधी 2 किलो चा गोळा फेक व सराव झाला वर 4 कीलो चा जर घेतला तर आपले विद्यार्थी आजून पुढे जातील व तसेच माजी सैनिक व एखाद्या पोलीस अधिकारी चे महिने ला मार्गदर्शन घेत राहावे.हीच आपणास विनंती.

18/11/2023

मी जयश्री उल्हास वर्पे. मी १९९८ च्या बॅच ची विद्यार्थिनी आहे.काही कारणास्तव मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे खुप वाईट वाटतं...इतकी चांगली संधी मी आज गमावली आहे.

बाकीच्या मित्र मैत्रिणीचे गेट टुगेदर बघितलं की खूपदा वाटायचं की आपल्याही शाळेने असा कार्यक्रम अरेंज करावा...आणि आज तो योग आलाही पण मला येता आले नाही ...असो पण माझे सर्व मित्र मैत्रिणी आज हा कार्यक्रम अनुभवत आहे ही खुप आनंदाची गोष्ट आहे.

सर्व प्रथम मी त्या सर्व आयोजकांचे आभार मानते,ज्यांना ही इतकी सुंदर कल्पना सुचली आणि त्यावर अथक परिश्रम घेतले...आपल्याला एक दोन वेळा फोन वर बोलण्याचा कंटाळा येतो पण आपले सर जेव्हा आम्हा विद्यार्थ्यांना कर्यांक्रमाच आमंत्रण देत होते फोन वर तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये खुप आपुलकी जाणवली ...जसा घरच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो तितक्या आपुलकीने सर बोलत होते.

खर तर माझ्या सारखे बरेच विद्यार्थी असतील जे प्रत्यक्षात कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नसतील पण आज मनाने तिथेच असतील ...त्यांच्या सर्वांच्या वतीने ह्या भावना मी पोहचते आहे.

खर तर शाळेबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर आण्णासाहेब शिंदे विद्यालय हे आम्हा सर्वांसाठी वरदानच होत तेव्हा आणि आजही आहे यात शंकाच नाही...कारण १९९५/९६ .... तेव्हाची परिस्थिती बघता पुरेशा सुखसोयी नसल्यामुळे तेव्हा आम्ही निमगाव खराडी जखुरी ह्या विद्यार्थ्याना शिक्षण घेणं शक्यच नव्हतं ...पण आपल्या ह्या शाळेमुळे ते शक्य झालं.. खरंच आम्ही नेहमीच आपल्या शाळेचे शतशा: ऋणी आहोत.

आपल्या ह्या शाळेने खुप काही शिकवलं आम्हाला ..खर तर तेव्हा शाळा नवीन होती शिक्षक नवीन होते ...आणि आर्थात विद्यार्थी तर नवीनच असतात नेहमी ... पण प्रतिकूल परिस्थिती मध्येही कस adjust करायचं ही पहिली मोलाची शिकवण आपल्या शाळेने दिली ...ना बसायला वर्ग ,ना washroom ची सोय ना पाणी पिण्यासाठी नळ..पण तरीही ह्या गोष्टींची कधी कमतरता नाही वाटली ...शिक्षण घ्यायला भेटतं हीच खुप मोठी गोष्ट होती.

त्यावेळी आपले वर्ग आपले ग्राउंड आजूबाजूचा परिसर मूल स्वतः साफसफाई करायचे यातून किती मोठी शिकवण होती आपली काम आपण स्वतः करायची....रोज परिपाठ व्हायचा ..प्रत्येक मुलाने समोर येऊन एक तरी लाईन बोलायची...यातून स्टेज डेअरिंग आत्मविश्वास हे गुण विकसित व्हायला मदत झाली ..आणि ह्या शिकवणीची शिदोरी आयुष्यभर उपयोगाला येतेय आम्हाला.

आता मुख्य आभार मानान गरजेच आहे ते आपल्या सर्व शिक्षकांचे....शाळेचे आधारस्तंभ....इतक्या प्रतिकूल प्रतिकुल परिस्थितीमध्ये त्यांनी माघार घेतली नाही ..आज शाळेला इथपर्यंत पोहचवण्याचे कार्य ह्या सर्व शिक्षकांनी केले आहे ...त्यांना सर्वांना कोटी कोटी प्रणाम.

खर तर ८ वी ते १० वी हे वय बाल्यावस्था मधून किशोर आवस्थेमधे जाणार वय असत..आणि मुख्य आयुष्याची दिशा दाखविण्याच काम हे ह्या वयात आपली शाळा शिक्षक करत असतात ...आणि ते काम आपले सर्व शिक्षक खुप उत्तम करतात ..पंख फुटण्याच वय असत हे ..त्या पंखांना बल देण्याचं काम ही शाळा शिक्षक करतात .ह्या ३ वर्षात पंख मजबूत झाले की पुढे उंच भरारी घेत येते.

माझी आपल्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की जेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा जी शिकवण तुम्ही आम्हाला देत होते तीच शिकवण आजच्या अनुकूल परिस्थितीतील मुलांना ही द्यावी ...एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे ते आत्मसात करून जुन्या नव्याची सांगड घालून एक उज्ज्वल पिढी तुम्ही निर्माण करणार यात काही शंकाच नाही.

परत एकदा सर्व शिक्षकांचे आयोजकांचे खुप खुप आभार🙏

- जयश्री उल्हास वर्पे (माजी विद्यार्थी)

18/11/2023

डॉ.अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव विद्यार्थी स्नेह मेळावा देणगी यादी

सन 2000-2001 बॅच

1.अनिता कोटकर=500
2.सुनिता कोटकर=500
3.वनिता शिंदे =500
4.अनुराधा पानसरे=500
5.जयश्री कोटकर =500
6.रोहिणी शिंदे=100
7.फुला पांडे=150
8.मंगल लामखडे=100
9.भारती मोरे=100
10.मनिषा शिंदे=500

एकूण=3450

सन -1995-1996

1.रमेश वर्पे( पोलीस पाटील) =500 Rs

सन= 2011-12

रोहम प्रतीभा
रोहम शामल
मयुरी पवार
पुनम कोटकर
पुजा करंजेकर
निकिता कोटकर

एकूण =550

धन्यवाद

18/11/2023

डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना माजी सैनिक प्रकाश कोटकर...

18/11/2023

डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना माजी विद्यार्थी शंतनु वर्षा विजय कोटकर...

18/11/2023

डॉ. अण्णासाहेब शिंदे विद्यालय देवगाव आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना माजी विद्यार्थी दत्तात्रय कोटकर...

Address

Deogaon
Sangamner
422605

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7:30am - 12:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Annasaheb Shinde Vidyalay, Deogaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category