28/04/2026
पुन्हा एकदा संगमनेर कॉलेज क्रीडा क्षेत्रात अव्वल
🥇
Official Page of Sangamner College Official Community of Sangamner College.
28/04/2026
पुन्हा एकदा संगमनेर कॉलेज क्रीडा क्षेत्रात अव्वल
🥇
26/04/2026
डिजिटल ज्ञानसेवेत संगमनेर महाविद्यालयाची राष्ट्रीय झेप; DELNET कडून ग्रंथालयाचा विशेष गौरव
महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने डिजिटल ज्ञानसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर विशेष सन्मान मिळविला आहे. दिल्ली येथील DELNET (Developing Library Network) संस्थेकडून महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला “Best Practices – Data Sharing and Accessibility 2025-26” या उपक्रमांतर्गत गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने तब्बल 51 हजार 183 ग्रंथालय नोंदी डिजिटल स्वरूपात DELNET प्रणालीत समाविष्ट करून ज्ञानवाटपाच्या राष्ट्रीय मोहिमेत मोलाचे योगदान दिले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांना देशभरातील विविध ग्रंथालयांतील पुस्तके, ई-संसाधने, संशोधन साहित्य आणि शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होत आहे.
ज्ञानयुगातील बदलत्या गरजा ओळखून महाविद्यालयाने पारंपरिक ग्रंथालयाला आधुनिक डिजिटल ज्ञानकेंद्राचे स्वरूप दिले आहे. येथे Web OPAC सुविधा, ई-रिसोर्सेस, ऑनलाइन डेटाबेस, डिजिटल कॅटलॉगिंग, नेटवर्क आधारित माहितीवहन प्रणाली यांचा प्रभावी वापर केला जात आहे. त्यामुळे माहिती शोधणे, मिळवणे व वापरणे अधिक जलद, अचूक आणि सुलभ झाले आहे.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात एक लाखांहून अधिक पुस्तके, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके, वर्तमानपत्रे आणि मासिकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी तो भक्कम आधार ठरत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली.
या यशानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे “DELNET : Resources and Services” या विषयावर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वेबिनारचे नुकतेच आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय पाटील यांनी केले. प्रस्तावना प्रा. डॉ. श्रीहरी पिंगळे यांनी मांडली, तर पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीनिवास भोंग यांनी करून दिला. सदर वेबिनारमध्ये DELNET, नवी दिल्ली येथील डॉ. रोहिदास राठोड व श्रीमती रंजना यांनी मार्गदर्शन केले. श्रीमती रंजना यांनी Union Catalogue, Inter Library Loan (ILL), ई-पुस्तके, ई-जर्नल्स, डिजिटल डेटाबेस आणि संशोधनासाठी उपयुक्त ऑनलाइन साधने याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच Web OPAC चा वापर, माहिती शोध कौशल्ये आणि डिजिटल साधनांद्वारे संशोधन अधिक सक्षम कसे करता येईल, यावर प्रकाश टाकला.
या उल्लेखनीय यशासाठी ग्रंथपाल श्री. व्ही. व्ही. जाधव तसेच ग्रंथालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयाचे ग्रंथालय राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरले आहे. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी, व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, भविष्यातही डिजिटल साधनांच्या साहाय्याने ज्ञानप्रसार अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
Idea Showcase Competition
The Idea showcase competition witnessed diverse entries ranging from AI-driven waste reduction in retail to
carbon-neutral supply chain models. Students demonstrated high levels of creativity, proving that
they view technology not just as a profit-maker, but as a tool for social and environmental good.
The event successfully bridged the gap between theoretical commerce education and the rapidly
evolving digital landscape.
24/04/2026
स्वायत्ततेचा लाभ विद्यार्थ्यांना; संगमनेर महाविद्यालयाचा निकाल १५ मेपर्यंत
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान मिळालेल्या संगमनेर महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वरिष्ठ महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गांचा निकाल दि. १५ मे २०२६ पर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली.स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून परीक्षा नियोजन, पारदर्शक परीक्षा पद्धती आणि वेळेत निकाल जाहीर करण्याला महाविद्यालयाने सातत्याने प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करून गेल्या चार वर्षांपासून वेळेत निकाल लावण्याची परंपरा महाविद्यालयाने यशस्वीपणे जपली आहे.
14/04/2026
भारतातील प्रत्येक नागरिकाला कुठलीही रक्तरंजित क्रांती न करता न्याय,बंधुता आणि समतेद्वारे प्रस्थापित भारतीय घटने द्वारे मूलभूत अधिकार प्रदान करणारे भारतरत्न,विश्वरत्न, क्रांतीसुर्य,बोधिसत्व, महामानव,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त महाविद्यालयातर्फे साहेबाना विनम्र अभिवादन.🙏🏽🙏🏽🇮🇳🙏🏽🙏🏽
29/03/2026
Department of Business Administration organise
“BUSINESS IDEA HACKATHON” Competition - 2026
*Placement Drive* organized by Department of Zoology and Enzyrich Biotech Solutions Pvt. Ltd.
5 students zoology and 2 students of Commerce faculty were selected as Junior Trainee after successful group discussion and personal interview.
The department signed an official MoU with Enzyrich Biotech Solutions Pvt. Ltd. to support On Job Training and Placements of the students.
24/03/2026
वंदे मातरमच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्त जिल्हास्तरीय स्पर्धांचा समारोप संपन्न
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे - श्री. सागर वैद्य (व्यवस्थापन परिषद सदस्य, स.पु.पु.वि.)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा तसेच पोस्टर प्रदर्शन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत ‘वंदे मातरम’च्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय महत्त्वावर प्रभावी मांडणी केली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि देशभक्तीपर भावनांचा सुंदर संगम या स्पर्धांमधून अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री. सागर वैद्य (व्यवस्थापन परिषद सदस्य, स.पु.पु.वि.) यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत स्वयंसेवकांना राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा व समाजसेवेची जाणीव यांविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
डॉ. अजय दुबे (जनसंपर्क अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी ‘वंदे मातरम’च्या इतिहासावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
तसेच स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
19/03/2026
संशोधन प्रकल्प एक झलक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता विभागाच्या वतीने विभागीय स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन संगमनेर महाविद्यालयामध्ये संपन्न झाले.
| Monday | 9:30am - 5:30pm |
| Tuesday | 9:30am - 5:30pm |
| Wednesday | 9:30am - 5:30pm |
| Thursday | 9:30am - 5:30pm |
| Friday | 9:30am - 5:30pm |
| Saturday | 9:30am - 1pm |