Jaihind Career Academy - जयहिंद करिअर अकॅडेमी

  • Home
  • India
  • Sangamner
  • Jaihind Career Academy - जयहिंद करिअर अकॅडेमी

Jaihind Career Academy - जयहिंद करिअर अकॅडेमी We have a dream of progressive and economically viable Maharashtra. To achieve this dream we have founded the Jai hind movement.

08/07/2020
 #जयहिंद_लोकचळवळ आयोजित मा.सौ.दुर्गाताई तांबे (नगराध्यक्षा - संगमनेर नगरपरिषद) यांच्या वाढदिसानिमित्त  #वृक्षसंवर्धन_दिन...
05/07/2020

#जयहिंद_लोकचळवळ आयोजित मा.सौ.दुर्गाताई तांबे (नगराध्यक्षा - संगमनेर नगरपरिषद) यांच्या वाढदिसानिमित्त #वृक्षसंवर्धन_दिन !
----------------------------------------
सुदृढ समाजाची संकल्पना, अंगी प्रचंड मेहनत करण्याची क्षमता, पर्यावरण प्रेम, अत्यंत साधेपणाने व आदबिने वागण्याचे कौशल्य, संघटन जे काही दिले ते आमच्या ताईंनिच. दरवर्षी आपण आदरणीय ताईंचा वाढदिवस हा 'वृक्ष संवर्धन' दिन म्हणून साजरा करत असतो या वेळेस पण आपण त्यांचा वाढदिवसानिमित्त जयहिंद लोकचळवळ अंतर्गत सांस्कृतिक व पर्यावरण विभागांमार्फत वृक्षदत्तक योजनेची सुरवात करून प्रत्येकाने एक झाड लावून त्याची संवर्धनाची जबाबदारी देऊन साजरा करणार आहोत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून (सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर ) करून वृक्षारोपण करणार आहोत.

तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवावा ही विनंती.

#स्थळ : सोमवार दि. ६ जुलै सकाळी ८:०० वा. (गोल्डन सिटी, गुंजाळ वाडी संगमनेर) व सकाळी ९:३० वाजता सिध्देश्वर मंदिर, जयहिंद टेकडी, गोडसेवाडी (धांदरफळ ) ता. संगमनेर जि. अहमदनगर
----------------------------------------
#जयहिंद_लोकचळवळ
जागर लोकशाहीचा, निर्धार तरुणांचा, संकल्प सुदृढ समाजाचा..!!

04/07/2020

"स्वामी विवेकानंद" यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

जयहिंद करिअर अकॅडमी संगमनेरचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!(संगमनेर) जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आ.डॉ.सुधीर तांब...
09/03/2020

जयहिंद करिअर अकॅडमी संगमनेरचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!

(संगमनेर) जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून जयहिंद करिअर अकॅडमी संगमनेर येथे वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.या स्पर्धांमध्ये वकृत्व, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, सामान्यज्ञान, अबॅकस, गायन या स्पर्धांचा समावेश होता. दिनांक 8 मार्च रोजी महिलादिनाचे औचित्य साधून सौ.दुर्गाताई
तांबे (नगराध्यक्षा,संगमनेर) यांच्या अध्यक्षतेखाली भा.सं. थोरात महाविद्यालयाच्या के.बी.देशमुख सभागृहात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

याप्रसंगी सौ.सूमित्राताई दिड्डी ,सौ.सौदामिनी
कान्होरे, प्राचार्य डॉ.दीनानाथ पाटील, श्री राणीप्रसाद मुंदडा, श्री.चांगदेव खेमनर, श्री बंटी साळवे, श्री संदीप खताळ , श्री राहुल गुंजाळ, श्री विरेश नवले ,श्री ज्ञांनेश्वर पिंगळे,श्री मनोज हासे श्रीम.कडलग मॅडम व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा आवश्यक असून विद्यार्थांना त्यांच्या कलानुसार शिक्षण द्यावे असे प्रतिपादन सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले व महिलादिनानिमित्त उपस्थित महिलांचे स्वागत त्यांना करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र
देऊन विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. कु.ईशिता शिंदे,कु.समीक्षा गोर्डे,प्रज्ञेय नवले, कृष्नेंदू पावडे, श्रेयस देशमुख, कु.शरयू शेळके, कु.प्रांजल खतोडे,देव जोंधळे, कु.स्वरदा कडलग, कु.सायली कांबळे, कु.पायल देशमुख, कु.धनश्री सातपुते, विराट खाडे, कु.तेजस्वी क्षिरसागर,
कु.आर्या उपरे, स्वरुप हासे, आदित्य घिगे, हर्षल मुळे, कु.हर्षदा जाधव, कु.अक्षदा जाधव, कु.ईश्वरी आंबेकर, रुद्राक्ष सातपुते, आरुष शिंदे, शिवराज कडलग, सोहम देशमुख, मिताली पानसरे, सिद्धी पावडे रितेश सातपुते,अनिश कुलकर्णी ,धैर्य सौदागर, प्रणव कोष्टी, मधुर आरोटे या
विद्यार्थांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.

Address

Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaihind Career Academy - जयहिंद करिअर अकॅडेमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category