P. P. Gagangiri maharaj vidyalaya

P. P. Gagangiri maharaj vidyalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from P. P. Gagangiri maharaj vidyalaya, School, pimparne, Sangamner.

*असतो मा सद्गमय* *तमसो मा ज्योतिर्गमय* तेजाची, प्रकाशाची उपासना करणारी आपली भारतीय संस्कृती. *अपदीप भव* *स्वयं दीप हो* अ...
03/09/2022

*असतो मा सद्गमय*
*तमसो मा ज्योतिर्गमय*
तेजाची, प्रकाशाची उपासना करणारी आपली भारतीय संस्कृती.
*अपदीप भव*
*स्वयं दीप हो* असा संदेश देणारी, दीपज्योती नमोस्तुते म्हणून दिव्यासमोर नतमस्तक होणारी आपली संस्कृती. मानवी जीवनाला उपयुक्त ठरणाऱ्या सजीव निर्जीव सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी आपली संस्कृती. त्यातीलच एक भाग म्हणजे आजचे म्हणजेच आषाढातील अमावस्येचे दीपपूजन पण या आषाढी अमावस्येला अलीकडे विकृत रूप आले आहे. संस्कृती विसरून विकृतीच वाढत चाललेली आहे असे समाजात चित्र दिसते. सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी विद्यार्थ्यांपर्यंत कुणालाही विचारले तरी हेच उत्तर येतं की आषाढीअमावस्या म्हणजे गटारी अमावस्या. मांसाहार आणि मद्यप्राशन यासाठीचा हा दिवस असे चित्र सध्या दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आपल्या आसपासची अनेक कुटुंब व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होत आहेत. अगदी तरुण वयातच घरातील कर्ते पुरुष व्यसनाच्याआहारी गेल्याने अल्पायुषी ठरून कुटुंब खऱ्या अर्थाने निराधार होत आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला पहावयास मिळतात. ही विकृती पुसली जाऊन खऱ्या अर्थाने दीपपूजनाचा संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी पिंपरणे तालुका संगमनेर येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयामध्ये दरवर्षी आषाढातील अमावस्येला दिव्यांचे प्रदर्शन भरविले जाते. दीपपूजन केले जाते. अनेक उद्देश या उपक्रमातून साध्य करता येतात. विद्यार्थी आपल्या घरातील जुने अडगळीत पडलेले दिवे शोधून काढतात. ते स्वच्छ करतात आणि विद्यालयात घेऊन येतात. वैविध्यपूर्ण आकार ,रचना असणारे हे दिवे विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात. या वर्षी सुद्धा हे दीपप्रदर्शन विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. विविध धातूंचे दिवे यात होते. त्याचबरोबर मातीचे, दगडाचे, लाकडाचे असे दिवे ही या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. अनेक आकारांच्या, रंगांच्या पणत्यांपासून तर मोठ्या समई पर्यंत दिवे होते. टांगून ठेवणारे, भिंतीवर लावता येणारे असे दिवे सुद्धा यामध्ये होते. हातात दिवा आणि पाठीवर लहान मूल घेऊन चालणारी आदिवासी महिला असा एक वैशिष्ट्यपूर्ण दिवा या प्रदर्शनात होता. जणू ती सांगत होती आमच्या आयुष्यातील अज्ञान ,दारिद्र्य, अंधश्रद्धा मिटवण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाशच उपयुक्त ठरणार आहे. तसेच नट बोल्ट आणि तारांपासून बनवलेला कावड घेऊन चालणाऱ्या श्रावण बाळासारखाही दोन्हीकडे पणत्या लावलेला दिवा यात होता एलईडी बल्ब पासून तर सौर कंदीला पर्यंत अशी विविध प्रकारच्या दिव्यांची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहिले व त्यामागील प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप: हा भावही समजून घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व पूजन करून करण्यात आले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थी, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री ललित शेळके सर श्रीमती कविता ढोमसे मॅडम तसेच कलाशिक्षण श्री एकनाथ विरकर सर, श्री चैतन्य भडकवाड ,दत्तात्रय ठोसर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी असे विविधतापूर्ण उपक्रम आयोजित करण्यामागे संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब देशमुख व संचालक मंडळाची प्रेरणा असते. संस्थेचे सचिव श्री कैलासशेठ काळे यांनी या प्रदर्शनास भेट देऊन त्याचे कौतुक केले. प्राचार्य मुकुंद डांगे यांचे मार्गदर्शन या उपक्रमास लाभले

Address

Pimparne
Sangamner

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when P. P. Gagangiri maharaj vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category