LKR Rodge Prince English School & Jr. College Selu

LKR Rodge Prince English School & Jr. College Selu CBSE AFFILIATION NO. 1130582 SCHOOL CODE. 30513 school which serves its students and parents by esta The best school in maratwada region

15/01/2026
एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलचा एलिमेंटरी व इंटरमीडिएट परीक्षेत शंभर टक्के निकालसेलू: श्रीराम प्रतिष्ठान सेलू ...
12/01/2026

एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलचा एलिमेंटरी व इंटरमीडिएट परीक्षेत शंभर टक्के निकाल

सेलू: श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू या शाळेने एलिमेंटरी व इंटरमीडिएट ग्रेड परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी A ग्रेड प्राप्त करून विशेष यश मिळवले. A ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्या गायकवाड, अमृता लाटे, दर्शन गिराम, हर्षदीप चव्हाण, ईश्वर पौळ, श्रीचीता गवळी, तेजश्री चौधरी, तत्वमासी शिंदे, समर्थ तेलभरे व आर्या गजमल यांचा समावेश आहे. उर्वरित 12 विद्यार्थी B ग्रेडसह उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच इंटरमीडिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण 6 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पाच विद्यार्थ्यांनी A ग्रेड प्राप्त करून उल्लेखनीय यश मिळवले. A ग्रेड प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रणव मुजमुळे, कृष्णा काकडे, पृथ्वीराज हरकळ, राम डावरे, यश साडेगावकर यांचा समावेश आहे.

या यशामागे कला शिक्षक महादेव बोरकर यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे मोलाचे योगदान लाभले.

या उत्कृष्ट यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला तसेच प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

22/12/2025
✨ सुरभी महोत्सव २०२५ ✨श्रीराम प्रतिष्ठान, सेलू आयोजित सुरभी महोत्सव २०२५ अंतर्गत वैयक्तिक नृत्य स्पर्धा साई नाट्य मंदिर,...
14/12/2025

✨ सुरभी महोत्सव २०२५ ✨

श्रीराम प्रतिष्ठान, सेलू आयोजित सुरभी महोत्सव २०२५ अंतर्गत वैयक्तिक नृत्य स्पर्धा साई नाट्य मंदिर, सेलू येथे उत्साहात संपन्न झाली.

प्रिन्स इंग्लिश स्कूल, उत्कर्ष विद्यालय, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्रॉस्परस इंग्लिश स्कूल, क्युरियस किड्स, फीन किड्स व जिज्ञासा बालविहार या घटक संस्थांतील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. 💃🕺

या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. 🌟






Sanjay Rodge Patil

Address

Sailu
431503

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919490004144

Alerts

Be the first to know and let us send you an email when LKR Rodge Prince English School & Jr. College Selu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to LKR Rodge Prince English School & Jr. College Selu:

Shortcuts

Share

Category