M B More ACS WOMEN College

M B More ACS WOMEN College This college and institution aims to make women self confident,non-reliant and independent and ready to face the ever challenging world.

this college works for the betterment of this society. This is the first ever women college in Roha Taluka.

मोरे महिला महाविद्यालयाचा एनएनएस जिल्हा नियोजन कार्यशाळेत सहभाग मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभाग...
20/08/2026

मोरे महिला महाविद्यालयाचा एनएनएस जिल्हा नियोजन कार्यशाळेत सहभाग

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील रायगड जिल्हा नियोजन कार्यशाळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, न्यू पनवेल येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी मा. प्रा. सुशील आर. शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक होते. या नियोजन सत्रामध्ये शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयाच्या एनएनएस उपक्रमांचे नियोजन, स्वयंसेवकांचा सहभाग, सामाजिक बांधिलकीच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि वर्षभरातील कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या एनएनएस युनिट्सच्या कार्यक्रम अधिकारी या उपस्थित होते.

एम. बी. मोरे फाऊंडेशनचे सौ वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, धाटाव, रोहा येथील एनएनएस कार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी जाधव आणि प्रा. ऋतुजा पवार यांनी नियोजन कार्यशाळेत सहभाग घेतला.

19/08/2026

🛑 Fashion Designing course jointly launched by M B More Foundation, Dhatav, Roha and Rivia Foundation, Mumbai.

Contact Prof. Akshata Thakur & Prof Priyanka Ghule for more info.

Wishing you all a very Happy Independence Day 2026! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳As India prepares to celebrate its 80th Independ...
15/08/2026

Wishing you all a very Happy Independence Day 2026!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

As India prepares to celebrate its 80th Independence Day on August 15, 2026, we reflect on the sacrifices, dreams, and determination that have shaped our nation. More than just patriotic songs and waving flags, this day invites us to consider what freedom truly means.

A free India is a gift, our ancestors gave us liberty; — now it’s our turn to give India glory. Let’s repay it with love, service, and respect.

Let’s celebrate the courage of our heroes and the unity of our people.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मोरे महिला महाविद्यालयात लायन्स क्लबतर्फे विद्यार्थी संवाद सत्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक व व्यक्तिमत्त्व विकास...
15/08/2026

मोरे महिला महाविद्यालयात लायन्स क्लबतर्फे विद्यार्थी संवाद सत्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक व व्यक्तिमत्त्व विकासाला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ रोहा आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घडताना बिघडताना’ या विद्यार्थी संवाद सत्राचे आज, शुक्रवार दि 14/08/2026 रोजी आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री. संजय विष्णू गोविलकर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.

वेळेचे नियोजन, संवाद कौशल्यांचा विकास, ध्येय निर्धारण, सतत नवीन शिकण्याची सवय, उत्तम आरोग्य, आर्थिक नियोजन आणि ताण-तणाव व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांवर श्री गोविलकर यांनी विद्यार्थ्यांशी प्रभावी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वक्त्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. महिला महाविद्यालयातील 90 विद्यार्थीनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे 95 विद्यार्थी दोन सत्रात सहभागी होते.

महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) कार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी जाधव आणि सहायक प्रा ममता बिंदा यांनी सत्राचे आयोजन केले.

मोरे महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धाएम. बी. मोरे फाउंडेशनच्या सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणि...
14/08/2026

मोरे महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा

एम. बी. मोरे फाउंडेशनच्या सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, धाटाव, रोहा येथे गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी 'स्वातंत्र्याचे रंग' या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शालेय, कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या चित्रकला स्पर्धेत स्वतंत्र स्तर आणि विषय देण्यात आले होते. रोहा तालुक्यातील रोहा शहर, सानेगाव, अष्टमी, रोठ आणि माणगाव तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील तिन्ही स्तरांमध्ये एकूण १०८ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. रोह्यातील प्रसिद्ध चित्रकार आणि रांगोळी कलाकार श्री. रुपेश कर्णेकर यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे परीक्षण केले.

विद्यार्थ्यांनी रंगांच्या माध्यमातून देशभक्ती, स्वातंत्र्य आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर चित्रण केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव मिळाला, तसेच त्यांच्यात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएनएस) च्या कार्यक्रम अधिकारी प्रा. माधुरी जाधव आणि सदस्या प्रा. ममता बिंद यांनी स्पर्धेचे नियोजन केले.

तत्त्वज्ञानी प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक...
13/08/2026

तत्त्वज्ञानी प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील, माळव्याच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपलया राजधानीतून इ.स. १७६६ ते इ.स. १७९५ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.

अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, पुरी जगन्नाथ मंदिर व परळी वैजनाथ या तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली. आहिल्यादेवी नी आपल्या सेन्या मध्ये पुरुषा ना संधी देत त्याच प्रमाने महिलानाही संधी मिळत आणि म्हणुनच आहिल्यादेवी नी सेन्या मध्ये महिला ची ही एक मोठी तुकडी खास सामावुन घेतली.

या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. म्हणून इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

13/08/2026
मोरे महिला महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनएम. बी. मोरे फाउंडेशनच्या सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य...
13/08/2026

मोरे महिला महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

एम. बी. मोरे फाउंडेशनच्या सौ. वरदा सुनील तटकरे कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, धाटाव, ता. रोहा, जि. रायगड येथे ग्रंथपाल दिनानिमित्त आज, बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालय ग्रंथालय समितीच्या वतीने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. 'एक्सपोलरर नॉलेज इन्स्पायर लर्निग' या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड, ज्ञानाची जिज्ञासा आणि ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी हा पुस्तक प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश होता. या प्रदर्शनामध्ये संदर्भ पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, कथा पुस्तके, करिअर मार्गदर्शन पुस्तके, विश्वकोश तसेच दुर्मिळ व मौल्यवान पुस्तके अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थिनींनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची पाहणी केली.

“एक चांगले ग्रंथालय हे उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करते” या विचाराला साकार करणारे हे पुस्तक प्रदर्शन विद्यार्थिनींसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरले. प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ निर्मला थोरात यांनी केले.

Wishes on Librarian's Day! 💐Shiyali Ramamrita Ranganathan was an Indian librarian and mathematician. He was born on 12 A...
12/08/2026

Wishes on Librarian's Day! 💐

Shiyali Ramamrita Ranganathan was an Indian librarian and mathematician. He was born on 12 August 1892 in Mayiladuthurai district, Tamil Nadu. His most notable contributions to the field were his five laws of library science and the development of the first major faceted classification system, the colon classification. He is considered to be the father of library science, documentation, and information science in India.

The 'Five Laws of Library Science' are :
1. Books are for use
2. Every reader has his/her book
3. Every book has its reader
4. Save the readers’ time
5. Libraries are growing organizations.

India celebrates August 12 as 'Librarian's Day' in his honour.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Address

Dhatav MIDC
Roha
402116

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M B More ACS WOMEN College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to M B More ACS WOMEN College:

Shortcuts

Share