साथींनो, डॉ. नितीन हांडे लिखित सायंटिस्ट खोपडी _२ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि प्रत्येक विज्ञानप्रेमीने वाचलं पाहिजे असं हे पुस्तक, ज्यामध्ये शास्त्रज्ञांच्या कथा सांगताना वैज्ञानिक दृष्टिकोनाची देखील मांडणी केली आहे. सायंटिस्ट खोपडी_१ प्रमाणे या पुस्तकाचे देखील तुम्ही मनापासून स्वागत कराल याची खात्री आहे. कुतूहल जागं असलेली आणि आपल्या अवतीभवतीच्या निसर्गाकडे चौकसपणे पाहणारी पिढी तयार व्हावी यासाठी सायंटिस्ट खोपडी हे पुस्तक हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ✊
या पुस्तकाची किंमत ३५० रुपये असून २५ एप्रिल पर्यंत नोंदणी केल्यास तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळेल, अर्थात टपाल खर्च घेतला जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला 7887997904 या नंबरवर पैसे आणि पत्ता पाठवावा लागेल. 🙏या पुस्तकाच्या चार पेक्षा जास्त प्रती हव्या असतील, किंवा इतर डॉ. नितीन हांडे लिखित कोणतीही चार पुस्तके हवी असतील तर एकूण किंमतीवर २० टक्के सवलत देऊन फ्री होम डिलिव्हरी दिली जाईल.
त्यांच्या सर्व पुस्तकांची यादी देते.
१) सायंटिस्ट खोपडी - २ जेन झी पासून रिव्होल्युशनरी जनरेशन पर्यंत
विषय : भारतीय आणि परदेशी २१ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी
न्यू इरा प्रकाशन
किंमत ३५०/-
२) सायंटिस्ट खोपडी - १.. बेलपासून नोबेलपर्यंत..
विषय : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी
न्यू इरा प्रकाशन
किंमत ३००/-
३) की की की की कीटक
विषय : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांची रंजक माहिती
(कृष्णाई कुंडल पुरस्कार)
न्यू इरा पब्लिकेशन
किंमत : २०० रुपये
४) आपले भवताल
विषय : आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला आणि त्यांचा जगातील विविध संस्कृतींशी संबंध यांची रंजक माहिती. विविध संस्कृतीमधील मानवानं आपल्या भवतालच्या विश्वाचा घेतलेला शोध आणि लावलेला अर्थ.
न्यू इरा पब्लिकेशन
किंमत : २०० रुपये.
५) इस्रो : द प्राईड ऑफ इंडिया
विषय : इस्रो या भारतातील अग्रगण्य संस्थेची इत्यंभूत माहिती. तिच्या स्थापनेमागची भूमिका, संस्थेची वाटचाल आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे. इस्रोला आकार देणारे शिल्पकार महत्वाच्या मोहिमा यांचे तपशील.
न्यू इरा पब्लिकेशन
किंमत : ३०० रुपये.
६) मिथकांचे जग
विषय : जगभरातील मिथककथांची रंजक सफर. जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीमधील सृष्टीची जन्मकथा आणि ती निर्माण करणाऱ्या देवांची धमाल माहिती
न्यू इरा पब्लिकेशन
किंमत : ३८० रुपये
७) मेलुहा ते भारत
विषय : हजारो वर्षापूर्वी जे ज्ञान भारतात जन्मले आणि त्याचा जगभर प्रसार झाला अशा विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, गणित खगोल, आयुर्वेद, वास्तुकला संगीत,नृत्य इत्यादी बाबींचा वेचक आढावा.
न्यू इरा प्रकाशन
किंमत ३००/-
८) पाथमेकर्स
विषय : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची कहाणी..
(मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार)
सकाळ प्रकाशन
मूल्य : २७०/- रुपये
९)ज्ञानाचा प्रवाहो चालिला
लेखक :डॉ. सूनिती धारवाडकर, डॉ. नितीन हांडे
विषय: पोलिओ, देवी, रेबीज या लसींपासून कोरोना लसपर्यंत जीवरसायनशास्त्राचा झालेला प्रवास, उत्क्रांती आणि डीएनए यावर सखोल विवेचन
न्यू इरा प्रकाशन
किंमत : २०० रुपये.
१०) डीप थिंकिंग
लेखक: गॅरी कास्पारोव्ह, अनुवाद: डॉ. नितीन हांडे
विषय : भविष्यात जग व्यापणाऱ्या कृत्रिम प्रज्ञा या विषयाकडे कसे पाहायचे यावर सुलभ सकारात्मक मांडणी
मनोविकास प्रकाशन
किंमत: ४५० रुपये
११) गिधाडांची मेजवानी
लेखक: जोसी जोसेफ, मराठी अनुवाद: डॉ नितीन हांडे
मनोविकास प्रकाशन
विषय : दलाल, राजकारणी आणि कॉर्पोरेट एजेंट यांसारख्या भारतीय लोकशाहीचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचा पुराव्यानिशी केलेला भांडाफोड..
किंमत : ३५० रुपये.
१२) लर्न टू अर्न
लेखक: पिटर लिंच, अनुवाद: डॉ. नितीन हांडे
मनोविकास प्रकाशन,
विषय : शेअर बाजाराकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन.. त्याच्याकडे जुगाराचा अड्डा न बघता गुंतवणुकीचे उत्तम साधन म्हणून कसं पाहावं यावर भाष्य
किंमत: ३७० रुपये.
RMK industries
शेतीविषयक वस्तू, दुग्धजन्य खाद्य पदार्थ, हॅण्ड बॅग,
Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Devrukh
Ratnagiri
415804