31/12/2023
आपल्या केंद्रशाळेचे शिक्षक श्री उमेश पांडुरंग डावरे यांच्या कवितांचं पुस्तक "इवलेसे रोप" ह्याचा प्रकाशन समारंभ आज त्यांच्याच शाळेत संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकरजी, को म सा प देवरुख शाखेचे अध्यक्ष दीपकजी लिंगायत यांच्यासह केंद्रीय प्रमुख दिव्या भाटकर मॅडम, माजी मुख्याध्यापक अभिमन्यू शिंदे, माजी केंद्रीयप्रमुख सहदेव पाटील सर आधी मान्यवर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमात कबनुरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन सादर केले. नववितिल विद्यार्थी वैभवी लाड, कार्तिकी झोरे, नीरजा पांचाळ आणि कौस्तुभ बने यांनी ह्या कविता सादरीकरणात भाग घेतला. डावरे सरांच्या पुस्तकातल्या कविता सादर केल्या. प्रमुख पाहुणे लोटणकर सर, लिंगायत सर यांची विशेष दाद ह्या सादरीकरणाला मिळाली. चारही विद्यार्थ्यांकडे काव्यवाचनाची कला अप्रतिम आहे, अशी दाद उपस्थितांनी दिली.
वेगळी जागा, साहित्य क्षेत्रातली ज्येष्ठ, अशांसमोर काव्य सादरीकरणाचा हा प्रयोग खूप रंगला.
26/12/2023
राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कबनूरकर स्कूलला ९ पदके
शोतोकॉन डो असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या कराटे राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत कबनूरकर स्कूलला ९ पदके मिळाली आहेत. यात ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.
शोतोकॉन डो असोसिएशन ऑफ इंडिया ह्या संस्थेतर्फे ११वी रास्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा निपाणी येथे घेण्यात आली. ह्या स्पर्धेत कोंडगाव येथील कबनूरकर स्कूलचा ९ स्पर्धकांचा संघ सहभागी झाला होता.
ह्या स्पर्धेत कौस्तुभ बने, कार्तिकी झोरे आणि गौरीज बने यांनी सुवर्ण पदके मिळवली.
आधीश कबनूरकर, पार्थ घोगरे यांना रौप्य आणि राज चव्हाण, उमंग भिंगार्डे, पायल मावेनूर आणि श्रावणी गांगण यांना कांस्य पदके मिळाली.
ह्या सर्व विद्यार्थ्यांना शोतोकॉन डो असोसिएशनचे प्रशिक्षक तेजस साळुंखे आणि अध्यक्ष रमेश पिसाळ यांनी मार्गदर्शन केले होते.
विद्यार्थ्यांच्या ह्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका लिना कबनूरकर, चेअरमन श्रीधर कबनूरकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
08/12/2023
शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका प्राजक्ता गद्रे यांची बालभारतीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड झाली आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या हिंदी विषयासाठी इयत्ता सहावी ते आठवीसाठी करण्यात आली आहे.
प्राजक्ता गद्रे ह्या गेली अकरा वर्षे शाळेत शिक्षिका आहेत. क्रमिक अभ्यासक्रमाच्या बाहेर जावून मुलांमधील विद्यार्थी घडवणार्या शिक्षिका म्हणून शाळेत आणि केंद्रात त्या ओळखल्या जातात.
कोरोना काळानंतर शाळा सुरू झाल्यावर शिक्षण विभागातर्फे सेतु अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. कोरोना काळात शिक्षणाची झालेली हानी भरून काढण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम आखण्यात आला होता. प्राजक्ता गद्रे यांनी सहावीच्या हिन्दी विषयाच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तक लेखनत केले होते.
प्राजक्ता गद्रे ह्या आधीही विविध उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. हिन्दी विषय मंचातर्फे शंभर दिवसात दहावी हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्या उपक्रमात कृती पत्रिका तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. व्याकरण विषय त्यांनी प्रभावीपणे हाताळला होता. केंद्रीय हिन्दी मंडळ आग्रा तर्फे शिक्षण प्रणालीतील बदलणारी हिन्दी ह्या विषयाच्या प्रशिक्षणासाठी राज्यभरातून मोजकेच शिक्षक निवडण्यात आले होते. त्यात प्राजक्ता गद्रे यांचा सहभाग होता.
गद्रे यांच्या ह्या निवडीबद्दल नुकताच शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका लिना कबनूरकर यांनी विशेष सत्कार केला. गद्रे यांची आशा प्रकारे निवड होणे ही आहाळेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना मुख्याध्यापिका कबनूरकर यांनी व्यक्त केली.
15/07/2023
आपल्या शाळेचा विद्यार्थी कौस्तुभ दीपक बने याने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कौस्तुभ याला २१४ गुणांसह ७१.८१ टक्के गुण मिळाले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या मेरिट लिस्ट नुसार कौस्तुभ याने तालुक्यात सहावा क्रमांक मिळवला आहे.
ह्या परीक्षेत पार्थ घोगरे आणि आधिष कबनुरकर हे आठवीचे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना अनुक्रमे १८२ आणि १४६ गुण मिळाले आहेत.
कौस्तुभ तसेच पार्थ आणि आधिष यांच्या ह्या यशाबद्दल मुख्याध्यापिका लीना कबनुरकर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
14/07/2023
जगात घडणाऱ्या वैज्ञानिक घटना विद्यार्थ्यांना समजणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातून ती घटना आपल्या देशाची असेल तर हे महत्व आणखीनच वाढतं.
आजचा दिवस भारतील खगोलशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. आज चांद्रयान ३ ह्या मोहिमेचा आरंभ झाला.
हा ऐतिहासिक आणि महत्वाचा क्षण विद्यार्थ्यांना पहाता यावा म्हणून आपल्या शाळेत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सगळ्या मुलांना एकत्र करून त्यांना टीव्हीवरून हे प्रक्षेपण थेट दाखवण्यात आले.
10/07/2023
सामाजिक उपक्रामात विद्यार्थ्यांचा सहभाग हे नेहेमीच कबनुरकर स्कूलचं वेगळेपण राहिलं आहे.
काही वर्षांपूर्वी गावातून वाहणाऱ्या काजळी नदीचा गाळ उपसा करण्यात आला. त्यानंतर नदीची पाठशाळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाणी तज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉक्टर राजेंद्र सिंह ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खरंतर हा कार्यक्रम मोठ्यांचा पण पाणी हा विषय गंभीर असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनीही ह्या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.
आता पुन्हा एकदा असाच एक सहभाग विद्यार्थ्यांनी नुकताच नोंदवला आहे.
दर वर्षी पावसात काजळी नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे साफ करून काढलेला गाळ पुन्हा हळूहळू नदीत जाण्यास प्रारंभ झाला आहे. त्यावर उपाय म्हणून गाळाच्या भरावावर वृक्षलागवड केल्यास होणाऱ्या झिजेला काही प्रमाणात आळा बसेल ह्या संकल्पनेतून नदी किनारी वृक्षलागवड करण्यात आली. देवरुख पंचायत समितीच्या पुढाकारातून कोंडगाव ग्रामपंचायतीच्या योगदानाने ही लागवड करण्यात आली.
ह्या लागवडीत कबनुरकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः खड्डे खणून वृक्ष लागवड केली.
18/06/2022
https://youtu.be/2hgICgUZ0AM
साखरपा कोंडगाव येथील डी के इंग्लिश स्कूल १० वीचा निकाल १००टक्के
ोकणातील ताज्या घडामोडींचे अपडेट देणारं कोकणचं हक्काचं व्यासपीठ "माझे कोकण". कोकणातील व तुमच्या परि....
29/01/2022
नमस्कार ,
आज दिनांक *29/01/2022 (शनिवार)* रोजी आपल्या शाळेत *स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15000 सूर्यनमस्कारांचा* संकल्प सोडण्यात आला होता.आजच्या कार्यक्रमासाठी देवरुख पंचायत समितीचे सभापती मा. श्री जयसिंग माने साहेब , आपल्या गावचे उपसरपंच श्री. प्रविण जोयशी सर तसेच व्यापार संघटनेचे माजी अध्यक्ष श्री.काका कोलते सर व आपल्या शाळेचे कमिटी अध्यक्ष श्री. कबनुरकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यामध्ये आपल्या शाळेव्यतिरिक्त केंद्रशाळा व पुर्ये तर्फे देवळे ह्या शाळांनीही सहभाग घेतला होता. त्याचबरोबर पालकवर्गही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. तसेच आपल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही आपला सहभाग दर्शवला.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहाने झाली. सर्वांनी खूप हिरीरीने सहभाग घेतला.एक एक म्हणता सुर्यनमस्कारांचा आकडा *15000* च्या पुढे कधी गेला हे समजलेच नाही. आजच्या संकल्प सर्वांच्या सहभागाने अगदी सहजरित्या यशस्वीपणे पूर्ण झाला.
यामध्ये ज्यांनी जास्त सूर्यनमस्कार घालून आपले विक्रम बनवले त्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. आज केंद्र शाळेतील शिक्षक श्री. बाबासाहेब लाड यांनी आपल्या शाळेचे *D.K. म्हणजेच Deep Knowledge* असे कौतुक केले ते शब्द ऐकून खूप छान वाटले. आपण राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे आज विशेष कौतुक करण्यात आले आणि त्यामुळे शाळेचा उत्साह आणखी वाढला. आज आपण राबवलेल्या कामाची एक पोचपावतीच जणू आपल्याला मिळाली व आपल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटले.
आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले *श्री.अतुल शिर्के , श्री.वैभव भोसले , श्री. भिकाजी पवार , श्री.कांबळे , श्री. कालसेकर , श्री. राजेंद्र जोशी , श्री.प्रजापती , श्री. सुनिल वाघधरे* तसेच *सौ.घोगरे , सौ. मानसी पवार, सौ झोरे ,मैथिली रेमणे , सौ. जोगळेकर , सौ सुर्वे* या सर्व पालकांचे विशेष आभार. तसेच *सौ. भाटकर मॅडम , सौ पाटील , सौ.वेल्हाळ मॅडम , श्री. लाड सर* या सर्व शिक्षकवृंदाचे देखील विशेष आभार .आपले असेच सहकार्य शाळेला लाभावे अशी आशा आहे.
29/12/2021
चतुरंग गोडबोले हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो.डी.के.इंग्लिश मिडीयम शाळेची कु. गायत्री संदिप सावंत ही पहिली हा पुरस्कार मिळवणारी विद्यार्थिनी ठरली आहे.२३ जानेवारी २०२२ ला ह्या पुरस्काराचे वितरण अच्युत गोडबोले यांच्या मुख्य उपस्थित होणार आहे. जिल्ह्यातून १६७ विद्यार्थी ह्या पुरस्कार पात्रता फेरी साठी अर्ज केले होते.त्यातील २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
14/10/2021
https://youtu.be/VwfKc4Jo-rs
वाचन प्रेरणा दिन (15 ऑक्टोबर 2021) निमित्त सातवीच्या विद्यार्थ्यांनी केलेले कथा वाचन. सहभाग : नीरजा पांचाळ, कार्तिकी झोरे, आधिष कबनूरकर आणि कौस्तुभ बने. संकल्पना : अमित पंडित
वाचन प्रेरणा दिन (दि 15 ऑक्टोबर, 2021)
कथा वाचन इयत्ता 7 वी सहभाग - निरजा पांचाळ, कार्तिकी झोरे, आधीश कबनूरकर आणि कौस्तुभ बने संकल्पना - श्री. अमित पंडित