Potkar Guruji Vidyamandir, Dorle, Ratnagiri

Potkar Guruji Vidyamandir, Dorle, Ratnagiri

Share

This School is situated in Dorle Village Near by Ratnagiri City.

23/06/2017

India has essentially grown along the banks of major rivers. Our ancient civilizations were born along the waters, and they perished when the rivers shifted course. This is a culture that never saw rivers and water as a commodity. We realized that this was a fundamental building block of life.

Rivers have always been the bedrock of our civilization and the lifelines of India. But in just one generation, most of our rivers have suffered dangerous levels of depletion. For a nation with 1.3 billion people, we cannot turn a blind eye to this grave crisis of our times.

For many millennia, we maintained the sanctity of this relationship. But in the last few decades, due to the pressures of population and development, our perennial rivers are becoming seasonal. Many of the smaller rivers have already vanished. The Ganga and Indus are two of the world’s most endangered rivers, according to WWF. The Narmada, Krishna and Kaveri do not reach the sea four months of the year. Water levels in almost every major river have declined severely.

Our well being and the nation’s well being are intimately connected to the well being of our rivers. If we do not act now to reverse the serious decline of these lifelines, the next generation will pay a very heavy price.

12/05/2017

आयसिस म्हणजे काय?

या लोकांच्या दुर्दैवाच्या कहाणीची सुरुवात झाली ती दीड वर्षांपूर्वी. २०१४ मधला जूनचा महिना. मोसूल हे इराकमधलं उत्तरेकडचं शहर. तिग्रीस नदीकाठी वसलेलं. रमझानचा महिना होता. त्या दिवशी नमाजानंतर ४४ वर्षीय अबु बाकर अल् बगदादी हे इसिसचे प्रमुख चौथऱ्यावर चढले. त्यांनी जगभरातल्या मुस्लिमांना आवाहन केलं, इस्लामी राज्याकडे धाव घेण्याचं! आधी इराक आणि लेव्हंट (सीरिया आणि लेबनॉन या दोन देशांचा एकत्रित भाग!) या भागावर जम बसवून इस्लामी राज्य स्थापन करायचं आणि मग चहुबाजूने राज्यविस्तार करायचा, हे इसिसचं ध्येय. ते साध्य करण्यासाठीचं साधन म्हणजे दहशतवाद. त्यांनी स्वत:ला मुस्लिमांचा खलिफा घोषित केलं. त्या दिवसापासून जिवावर उदार होऊन इस्लामी राज्याच्या स्थापनेसाठी जगभरातून लोक इराक आणि सीरियाकडे धावू लागले. आणि इथले मूळ रहिवासी जीव वाचवण्यासाठी इथून पळ काढू लागले. तेव्हापासून इसिसबद्दल जगभरातल्या लोकांना प्रश्न अनेक पडू लागले. इसिस ही मुळात अल् कैदासारखी दहशतवादी संघटना. पण तिचा हेतू केवळ दहशतवाद पसरवणं एवढाच नाही, तर त्या जोरावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचा आहे. वेगवेगळय़ा नावांनी तिची ओळख. एक नाव- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’ म्हणजेच इसिस. दुसरं नाव- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड लेव्हंट’ म्हणजे इसिल. या संघटनेला आणि तिच्या नावातल्या ‘राज्य’ या शब्दाला कडकडून विरोध करणारे अरब तिचा ‘दाईश’ असा उल्लेख करतात. फ्रान्सनेही याच नावाला मान्यता दिली आहे. ‘दाईश’ या शब्दाचा अरबीमध्ये ‘पायाखाली चिरडणं’ असा नकारात्मक अर्थही आहे. अलीकडे फक्त आयएस म्हणजे ‘इस्लामी स्टेट’ असाही तिचा उल्लेख होऊ लागलाय. या संघटनेचा जन्म तसा पंधरा वर्षांपूर्वीचा. जॉर्डनमधला पॅलेस्टिनी निर्वासित अबु मुसाब अल् झरकावी हा या संघटनेचा संस्थापक. या दहशतवाद्याने २००० साली जॉर्डनच्या राजेशाहीविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. इस्लामी तत्त्वात राजेशाहीला स्थान नाही, हे त्यामागचं कारण. राज्याचा प्रमुख हा धार्मिक नेता म्हणजे खलिफाच असायला हवा, हा त्याचा आग्रह. हे बंड फसलं आणि झरकावी पाकिस्तानातल्या पेशावरमाग्रे अफगाणिस्तानात पोहोचला. तेव्हा तालिबानची राजवट अशा मंडळींसाठी अफगाणी गालिचे अंथरण्यात आघाडीवर होती आणि ओसामा बिन लादेनने त्यांना दहशतवादाचे धडे देण्यासाठी तिथे बैठक मारली होती. अफगाणिस्तानमध्ये त्याचा जम बसतो- न बसतो तेवढय़ात २००३ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्यानंतर कर्दाशी हातमिळवणी करून झरकावीने इराकच्या उत्तरेकडे आपला तळ ठोकला. अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. पुढे तो २००६ मध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. पण त्याने स्थापन केलेली संघटना टिकली. इराकवर अमेरिकेने केलेला हल्ला हे खरं तर ‘इसिस’ जिवंत राहण्याचं मूळ. सद्दामनंतर अमेरिकेचं सैन्य इराकमध्ये शिरल्यानंतर तिथं निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत अल् कैदाने इराकमध्ये प्रवेश केला. इसिसच्या प्रश्नाचं कूळ-मूळ समजून घेण्यासाठी इराक आणि सीरिया या दोन देशांचं राजकारण समजून घेणं आवश्यक ठरतं. इराकचा पट हा धर्म, पंथ, वंश यांच्या गोतावळय़ाने भरलेला. इराकच्या पश्चिमेकडचा अनबार प्रांत हा सुन्नींचा बालेकिल्ला. जॉर्डन आणि सीरियाला लागून असलेला हा भाग. सद्दाम हुसेन यांचा पाडाव झाल्यावर इथं अल् कैदाने आपली ठाणी उघडली. अल् कैदाचा बीमोड करण्यासाठी तेव्हा अमेरिकेने स्थानिक सुन्नींनाच लष्करी प्रशिक्षण देऊन फौज उभी केली. या फौजेचं नाव होतं- ‘इराकपुत्र’! इराक सरकारला ही डोकेदुखी बहाल करून २०११ मध्ये अमेरिकेने या वाळवंटातून आपला पाय काढला. इसिसला आयतीच ही प्रशिक्षित फौज लाभली. २००६ मध्ये झालेल्या निवडणुकांपासून इराक धुमसतोय. इराकमध्ये शिया बहुसंख्याक; त्यामुळे निवडणुकीनंतर शिया पंथीयांच्या हातात सत्ता गेली. शतकानुशतके सत्ता उपभोगणारे सुन्नीपंथीय बाजूला फेकले गेले. सुन्नीपंथीयांचा सरकारविरुद्ध रोष वाढला. दोन पंथांमधली ही दरी बुजवण्यात इराकचं सरकार अपयशी ठरलं. त्यात इसिसचं फावलं. त्यात शेजारच्या सीरियात क्रांतीचं वादळ उठल्यावर तिथलंही वाळवंट तिला आपसूकच मिळालं. सीरियावर असाद घराण्याची पकड १९७१ पासूनची. गेल्या चाळीस वर्षांपासून जनतेचा उठाव यशस्वीपणे चिरडण्याचा असाद घराण्याला दांडगा अनुभव आहे. सीरिया हा सुन्नीबहुल देश. पण राज्यकर्ते असाद मात्र अल्पसंख्याक असलेल्या शिया पंथातल्या अलवीत या उपपंथाचे. सीरियाच्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम दहा टक्के अलवीत पंथीय. असाद यांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी सीरियन जनता अनेकदा प्रयत्न करून थकली होती. बशर अल् असाद यांना बंड चिरडण्याचा वारसा पिता हाफीज अल् असाद यांच्याकडून मिळालेला. १९८२ ची घटना.. हाफीज अल् असाद अध्यक्ष असताना सीरियातल्या हमा या शहरात उठाव झाला. त्यांनी शहरवासीयांना महिनाभर कोंडून ठेवलं. सगळं शहर नेस्तनाबूत केलं. नंतर त्यावर बुलडोझर फिरवला. एका अंदाजानुसार, त्यांनी दहा हजारांच्या आसपास लोक मारले. तेव्हापासून सीरियन जनतेने उठावाची धास्तीच घेतली. पण २०११ मध्ये आजूबाजूच्या देशांमधल्या हुकूमशहांना पळता भुई थोडी झाली हे बघून सीरियन जनता पुढे सरसावली. यावेळी तरी आपल्याला यश मिळेल अशी तिला मोठी आशा होती. पण.. सुरुवातीला सीरियन क्रांतिकारक एका वेगळ्याच भ्रमात वावरत होते. लिबियाच्या मुहम्मर गद्दाफींना ठेचण्यासाठी धावलेले पाश्चात्त्य आपल्यालाही मदत करतील, अशी त्यांना आशा होती. त्या आशेवरच तर पूर्वानुभव विसरून ते धाडसाने रस्त्यावर आले. परंतु आपल्या भूमीत लिबियासारखं उत्तम प्रतीचं तेल नाही, याचा या सामान्य लोकांना विसर पडला. आपल्याला मदत करून पाश्चात्त्यांना काय बरं लाभ होणार आहे? हा साधा विचारही त्यांच्या मनात आला नाही. शिवाय, बुश यांच्या युद्धखोरीनंतर अमेरिका आर्थिक विवंचनेत सापडलेली. त्यामुळे बराक ओबामा यांनी पुन्हा युद्धाच्या भानगडीत पडण्याचं टाळलं. त्यात भरीला हुकूमशहा असाद यांच्या पाठीवर इराण आणि रशियाने हात ठेवलेला. पाश्चात्त्य देशांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत असादांच्या विरोधात पाऊल उचलायची तयारी केली की रशियाने त्यात अडथळा आणायचा, हे ठरलेलंच. असंच चित्र अरबजगतातलं. इराणची असाद यांना भरभरून मदत, तर सुन्नी राजवटींची उठावकर्त्यांना! जागतिक राजकारणातल्या ताणतणावांचं प्रतििबब सीरियाच्या क्रांतीत पडलं. पण परिस्थिती सुधारण्याची शक्यता तर दूरच राहिली; उलट सीरियातल्या या गोंधळाचा लाभ इसिसने घेतला. तिचे लढवय्ये इराकमधून इकडे वळले. त्यांचा मार्ग सोपा होता- आपल्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना आणि संघटनांना ठेचून काढायचं. दहशतीचं राज्य आलं. ‘विलायत अल् रक्का’ हा सीरियातला तुर्कस्तानला लागून असलेला प्रांत. सीरियन लष्कराकडून हा भाग बळकावल्यापासून रक्का हे इसिसचं राजधानीचं शहर झालंय. इसिसचा काळा झेंडा इथे जागोजागी फडकतोय. स्त्रिया बुरख्यात गुंडाळून घरात बंदिस्त झाल्या आहेत. पुरुषांना दाढी ठेवणं बंधनकारक झालंय. रस्त्यारस्त्यांवर इसिसची फौज करडी नजर ठेवून उभी. शाळांमधून विज्ञान, कला, इतिहास हे विषय बाद झालेत. शहरातल्या ख्रिश्चनांवर जिझिया कर लादला गेलाय. विरोध केला, कायदा मोडला तर भर चौकात मृत्युदंडाची शिक्षा ठरलेली. – विशाखा पाटील‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील ‘भय इथले संपत नाही’ या लेखाचा संपादित अंश २६/११ ची पुनरावृत्ती पॅरिसमधील ‘शार्ली हेब्दो’ या विविध मुद्दय़ांवर उपरोधिकपणे भाष्य करणाऱ्या साप्ताहिकावर दहशतवादी हल्ला होऊन अकरा महिने पूर्ण होत नाहीत तोच त्याच पॅरिसमध्ये अतिरेकी हल्ले करून दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना वेठीला धरले. पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री ९ वाजता सुरू झालेली ही हल्ल्यांची साखळी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या साधारण चारेक तासांच्या हल्ल्याने मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची आठवण मात्र करून दिली. ‘अतिरेकी हल्ला’ हे एवढेच आठवणीचे कारण नसून पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याचे स्वरूपही मुंबईच्या हल्ल्याप्रमाणे असल्याचे अनेक तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. पॅरिसमधील हल्ल्याचे स्वरूप बघता हा हल्ला निश्चितच २६/११ ची आठवण करून देणारा आहे. मुंबईप्रमाणेच पॅरिसमध्येही रात्री ९ च्या सुमारास हल्ल्यांना सुरुवात झाली. सात वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ला नोव्हेंबरमध्येच दिवाळी झाल्यानंतर झाला होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ९च्या सुमारास दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ले सुरू केले, तर पॅरिसमध्ये रात्री दहा वाजता हल्ले सुरू झाले. दहशतवादांनी मुंबईतील लिओपोल्ड कॅफेतील लोकांना ओलीस धरले होते. तिथेच त्यांनी गोळीबारालाही सुरुवात केली होती. पॅरिसमध्ये बॅटाक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये संगीताचा एक कार्यक्रम सुरू होता. तिथे आलेल्यांची संख्या १५०० च्या आसपास होती. तिथे घुसून दहशतवाद्यांनी तिथल्या प्रेक्षकांना ओलीस धरत बेछूट गोळीबार केला. एकाच वेळी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करणे हेही मुंबई आणि पॅरिस हल्ल्यांतील एक साम्य म्हणता येईल. मुंबईतही काही मिनिटांच्या फरकाने एकाच वेळी ताज हॉटेल, ट्रायडेंड हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल अशा ठिकाणी हल्ले होत होते. त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात घबराट पसरवण्यात दहशतवाद्यांना यश मिळाले होते. तसेच चित्र पॅरिसमध्येही बघायला मिळाले. बॅटाक्लान कॉन्सर्ट हॉल, नॅशनल स्पोर्ट स्टेडिअम, कॉफी शॉप, काही हॉटेल्सच्या बाहेरील भाग अशा विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार आणि बॉम्बहल्ले केले. हल्ले झालेली दोन्हीकडची ठिकाणे पाहिली तर असे लक्षात येईल की, लोकप्रिय आणि गर्दीच्या ठिकाणांची दहशतवाद्यांनी निवड केली आहे. मुंबईतले ताज, ट्रायडेंट हॉटेल किंवा पॅरिसमधील बॅटाक्लान कॉन्सर्ट हॉल म्हणजे भरपूर लोक असण्याची खात्री. बॅटाक्लान हॉलमध्ये एक सांगीतिक कार्यक्रम सुरू असल्यामुळे तिथे पंधराशेच्या आसपास लोक असण्याची खात्री असल्यामुळेच तिथल्या काहींना दहशतवाद्यांनी ओलीस धरले. लोकांना ओलीस धरण्याचा प्रकार मुंबईतील ताज हॉटेलमध्येही घडला होता. पॅरिसमधील अतिरेक्यांची दोन गटांमध्ये विभागणी हे मुंबईवरील हल्ल्यांप्रमाणेच दिसून आले. यामुळेच त्यांनीही एकाच वेळी अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बहल्ले घडवून आणले. लोकांना ओलीस ठेवण्याचा प्रकारही मुंबईप्रमाणेच पॅरिसमध्ये दिसला. जास्तीत जास्त लोकांना ओलीस ठेवण्याच्या हेतूने लोकप्रिय आणि गर्दीच्या ठिकाणांना दोन्हीकडच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. मुंबईतला अतिरेकी हल्ला तीन दिवस सुरू होता, तर पॅरिसमध्ये जवळपास तीनेक तासांत हा हल्ला थांबला; पण मृतांची संख्या साधारणपणे सारखीच आहे. तसेच कमीत कमी साधने वापरून जास्तीत जास्त परिणामकारक दहशत पसरवणे हेही दोन्ही हल्ल्यांतील साधम्र्य आहे. अनेक वरिष्ठ आणि तज्ज्ञ मंडळींनीही मुंबई आणि पॅरिस हल्ल्यांत साधम्र्य असल्याचे नमूद केले आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख जॉन मिलर यांनी ‘सीएनए’ या वाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये २६/११ चा मुंबईवरील हल्ला आणि पॅरिसवरील हल्ला यात साधम्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जॉर्जटाऊन विद्यापीठातील राष्ट्रीय सुरक्षाविषयक कार्यक्रमाचे प्रमुख ब्रुस हॉफमन यांनीही मुंबई आणि पॅरिस हल्ल्याचा संदर्भ जोडला. पॅरिस हल्ल्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात वापरलेल्या एके-४७. खरे तर फ्रान्समध्ये एके-४७ ला बंदी आहे; पण या हल्ल्यात प्रामुख्याने एके-४७ चा वापर झालेला दिसतो. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातही याच शस्त्राचा प्रामुख्याने वापर करण्यात आला होता. एके-४७ चा वापर करत अंदाधुंद गोळीबार करण्याची पद्धतही मुंबई-पॅरिस हल्ल्यांमध्ये सारखी होती. हॉटेल्स, कॉफी शॉप, थिएटर्स, सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रेक्षागृह यांसारख्या ठिकाणांना लक्ष्य करत तेथील लोकांना ओलीस धरणे, एकामागे एक वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार, बॉम्बस्फोट करणे, दहशत पसरवणे, गोळीबारासाठी रात्रीची वेळ गाठणे ही सगळी प्रक्रिया पाहता पॅरिसमधील हल्ला हा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यासारखाच असल्याचे दिसून येते. मुंबईतील हल्ल्यासाठीचा शस्त्रसाठा समुद्रमार्गे मुंबईत आणला गेला होता. पॅरिसच्या हल्ल्यासाठी लागलेला शस्त्रसाठा कोणत्या मार्गाने आला हे अद्याप कळले नाही. मुंबईतील याआधीचे दहशतवादी हल्ले, पॅरिसमधील जानेवारी महिन्यात झालेला ‘शार्ली हेब्दो’ या साप्ताहिकावरील हल्ला, पॅरिसवरील नुकताच झालेला हल्ला अशा जगातल्या अनेक महत्त्वाच्या हल्ल्यांमुळे दहशतवाद ही जागतिक समस्या ठरली आहे हे स्पष्ट दिसून येते. संकलन : चैताली जोशी मुस्लीम समाजाकडे झालेले दुर्लक्षच कारणीभूत! कल्याणमधून चार युवक बेपत्ता झाले आणि इराक-सीरियातील ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे स्पष्ट होण्याआधीच धर्माधानुकरणाची समस्या महाराष्ट्रातील काही भागांना पोखरून काढत असल्याचे स्पष्ट झाले होते. कल्याणची घटना उघड झाली; परंतु उघड न झालेल्या घटना किती असतील, याचा पोलीस यंत्रणेलाही अंदाज नाही. मात्र या घटनेनंतर राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने आयसिसशी संबंधित वा जिहादी चॅटरूमवर करडी नजर ठेवली. परंतु आक्षेपार्ह काहीही न आढळल्याने फक्त लक्ष ठेवणेच त्यांच्या हाती राहिले. राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पोलीसप्रमुख बनल्यापासून धर्माधानुकरण हा विषय किती संवेदनक्षम आहे, याचे वेळोवेळी विवेचन केले. आपल्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी या प्रश्नावर मात करण्यासाठी येनकेनप्रकारेण प्रयत्न केले. मुस्लीम समाजाकडे आतापर्यंत सर्वच थरांवर झालेले दुर्लक्षच धर्माधानुकरणाला खतपाती घालीत असतात, असे दयाळ यांचे ठाम मत आहे. पोलीस दलात अधिकाधिक मुस्लीम तरुण भरती होणे गरजेचे आहे, सरकारी गृहप्रकल्पात अल्पसंख्याकांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देणे तसेच शिक्षण आणि प्रशासन पातळीवर अल्पसंख्याकांना विशेषत: मुस्लीम समाजाला आपण मुख्य प्रवाहात आहोत, असे वाटले पाहिजे, याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी सर्वसमावेशक योजना तयार करून राज्य शासनाला पाठविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेत स्वारस्य दाखविल्याचे दयाळ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सांगितले होते. मुस्लीम तरुणांना पोलीस दलात सामावून घेण्याबाबत अधिक स्पष्ट करताना दयाळ म्हणतात : पोलीस दलात अधिकाधिक मुस्लीम तरुणांची भरती झाली तर पोलिसांबद्दल असलेला गैरसमज दूर होण्यास मदत होईल. पोलीस भरतीच्या वेळी शेकडोने मुस्लीम तरुण शिपाई होण्यासाठी येतात. मैदानी चाचण्यांमध्ये ते सरस ठरतात; परंतु लेखी परीक्षेत केवळ मराठी नीट येत नसल्यामुळे मार खातात. वास्तविक त्यासाठी मुस्लीम तरुणांना शाळेच्या पातळीवर वा मदरशात मराठीचे आवश्यक ते प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. अंजुमान इस्लामसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, यासाठी आपण प्रयत्नही केले. मदरशातही मराठी शिकविले गेले तर केवळ पोलीसच नव्हे तर सरकारी नोकरीतही मोठय़ा प्रमाणात मुस्लीम तरुणांना संधी मिळेल. शासन नेमके कसे वागते आहे याबाबतचा जो जिहादी संकेतस्थळांच्या माध्यमातून अपप्रचार केला जात आहे तो दूर करण्यास त्यामुळे हातभार लागेल. औरंगाबाद, यवतमाळ आदी परिसरांत धर्माधानुकरणाचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. किंबहुना गुप्तचर यंत्रणांची तशी माहिती आहे. या परिसरात शालेय स्तरावरच मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस दलाने युथ पार्लमेंटसारखे कार्यक्रम राबविले. अशा कार्यक्रमांतून डाव्या विचारांतील दहशतवाद, जातीय सलोखा, दहशतवादी कारवाया आणि जातिभेद आदी विषयांवर मुलांना बोलते केले. त्यातून त्यांच्या मनात असलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली गेली. या विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन लाभले तर नक्कीच त्यात फरक पडू शकतो, असे दयाळ यांना वाटते. – निशांत सरवण

25/12/2015

आजचे आपले पहिले नोबेल पारितोषिक विजेते आहेत गुरु रवींद्रनाथ टागोर.

रवींद्रनाथ टागोर हे भारतातील व आशियातील पहिले नोबेल विजेते होते.१४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने "सर" ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालीन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्याया शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी येथे पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो.

रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, अँन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी , पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.

24/12/2015

नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती...

# त्यांच्या सरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे चार व्यक्तींनी हा पुरस्कार नाकारला. यापैकी तीन जर्मन (हिटलरमुळे), तर चौथी व्यक्ती रशियन लेखक बोरीस पास्तेर्नाक (साहित्यातील नोबेल) याने सरकार सूड उगवेल या भीतीपोटी हा पुरस्कार नाकारला.

# उत्तर व्हियेतनामच्या लु डक थो याने (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नाकारले.

24/12/2015

सुरुवातीला आपण समजून घेवूयात नोबेल पारितोषिकाविषयी.........

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले.

आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी ही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके जगात सर्वोच्च सन्मानाची समजली जातात. आल्फ्रेड नोबेल याच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजेच १० डिसेंबर, इ.स. १९०१ पासून ही पारितोषिके देण्यास आरंभ झाला. भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान (वैद्यक), साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (शांतता) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दिली जातात.

इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते.

या मृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली.

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये -

भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,

वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,

साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि

शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी

या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.
पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती नेमण्यात येते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्‍ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.

मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो.

01/08/2013

तुमच्या भेटीला लवकरच येत आहे भारतातील नोबेल पारितोषिक विजेते व त्यांच्या लेखांची मालिका..... So Stay Tuned

कहाणी मलालाची... , the story of Malala 01/08/2013

कहाणी मलालाची... , the story of Malala तालिबान्यांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात १४ वर्षाची मलाला युसुफजई गंभीर जखमी झालीय. आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. उपचारासाठी तिला थेट इंग्लडला हलविण्यात आलंय. या चिमुरडीसाठी आज सगळं जग प्रार्थना करतंय. पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातल्या या लहान मुलीसाठी अवघ्या जगाला घोर लागलाय...

Photos 01/08/2013

आमच्या गावची शाळा-आमची शाळा

school, students, school building, teacher | Loksatta 01/08/2013

http://www.loksatta.com/vasturang-news/school-students-school-building-teacher/

school, students, school building, teacher | Loksatta मुलांच्या सामाजिक जीवनातला पहिला टप्पा म्हणजे शाळा. शाळेतल्या शिक्षकाबरोबरच महत्त्वाची ठरते ती शाळेची वास्तू, तिची मुलांना आपलीशी वाटणारी रचना. पाच सप्टेंबर या शिक्षकदिनानिमित्त मुलांच्या सामाजिक, बौद्धिक आणि मानसिक जडणघडणीत शाळेची वास्तूरचना किती मोलाची भर घालू शकते, हे नमूद करणाऱ्या संकल्पनेविषयी....

Photos 01/08/2013
Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


At Post : Dorle, Tal: Lanja, Dist: Ratnagiri
Ratnagiri

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 7am - 2pm