08/08/2015
निवेदन
कोकणातील शैक्षणिक चळवळ वृद्धिंगत करणा-या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य कै. डॉ. व्ही.के. बावडेकर यांचा स्मृतिग्रंथ निर्माण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या त्यांच्या शिष्यांसाठी सुहृदांसाठी आणि नातेवाईकांसाठी हे निवेदन आहे.
ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाच्या डॉ. बावडेकर यांनी आदर्श शिक्षक, उत्तम प्रशासकीय कर्तृत्वाचे प्राचार्य आणि संशोधक म्हणून आपले आयुष्य व्यतीत केले. शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता आणि निस्वार्थी वृत्ती यातून त्यांनी आपले स्वत:चे असे एक स्थान निर्माण केले होते. आपल्या जीवनशैलीने त्यांनी अनेकांना प्रेरित केले होते. ते अनेकांचे प्रेरणास्थान, आश्रयस्थान आणि आदराचे स्थान होते. शिक्षक कसा असावा, प्राचार्यांची कार्यशैली कशी असावी याचे त्यांनी आपल्या वर्तनातून मापदंड तयार केले होते. ते पुढच्या पिढ्यांना अत्यंत आवश्यक आहेत. त्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी पुढाकार घेऊन एक चांगला स्मृतिग्रंथ निर्माण करणार आहे. ज्यांच्याकडे बावडेकर सरांबद्दल आठवणी असतील त्यांनी कृपया त्या खालील पत्त्यावर किंवा ई-मेल वर पाठवाव्यात. त्यावेळचे आपले सहकारी, सहाध्यायी यांची नवे, पत्ते, फोन नंबर्स व ई-मेल माहीत असतील तर पाठवावे, कारण आम्ही संपर्क साधणार आहोत.
कृपया एक चांगला स्मृतिग्रंथ सिद्ध होण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.
आपले लेखन १५ ओगस्ट २०१५ पूर्वी पाठवावे. असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले आहे.
संपर्क पत्ता: र.ए.सोसायटी, द्वारा ओ.पी.जिंदल छात्रावास, एन.व्ही.जोशी मार्ग, रत्नागिरी. ४१५६१२.
ई-मेल.: [email protected] ; दूरध्वनी : ०२३५२-२२४७१६.
19/06/2015
आज दिनांक १९ जुन२०१५ रोजी, २१ जून जागतिक योगादिन कार्यक्रमानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस र.ए.सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, उपकार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन तसेच कार्यवाह अॅड. प्राची जोशी यांनी संबोधित केले. याप्रसंगी रत्नागिरी शहरातील प्रमुख दैनिकांचे व टी.व्ही. वाहिनीचे पत्रकार बंधू - भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्धी पत्रक देण्यात आले.
19/06/2015
स्पर्धा परीक्षांतील यशाची गुरुकिल्ली - मार्गादर्शक मा. अविनाश धर्माधिकारी (EX-IAS)
सर्वांनी लाभ घ्यावा.
13/06/2015
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आयोजित जागतिक योग दिन -२१ जून आपणांस आग्रहाचे निमंत्रण.
12/06/2015
अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी माहितीपत्रक
12/06/2015
र.ए.सोसायटीच्या गोगटे - जोगळेकर महावियालायाचे भूतपूर्व प्राचार्य कै.डॉ.व्ही.के.बावडेकर यांचा स्मृतिग्रंथ निर्माण करण्यासाठी सरांबद्दलच्या आठवणी पाठवण्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या त्यांच्या शिष्यांसाठी, सुहृदांसाठी आणि नातेवाईकांसाठी आवाहन...
11/06/2015
दहावीच्या निकालात कोकण बोर्डाने ९६.५४ एवढे गुण मिळवून सलग चौथ्यांदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोकणातील विद्यार्थी हुषार होतेच परंतु कोकण बोर्डाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले. कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांना संधी मिळाली. स्वत:चा चेहरा मिळाला. कोकण बोर्डाची मागणी न्याय्य व उचित होती यावरही या निकालाने शिक्कामोर्तब झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. नापास विद्यार्थ्यांच्या मागे राहण्याची व समाजाने त्यांना धीर देण्याची गरज आहे. त्याही विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळता येतील. पुनश्चः एकदा हार्दिक अभिनंदन आणि नवीन करिअर साठी शुभेच्छा!
-अॅड. विलास पाटणे, कार्याध्यक्ष र.ए.सोसायटी, रत्नागिरी.
05/06/2015
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
05/06/2015
आज दिनांक ५ जून २०१५ रोजी संस्थेच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तारित नवीन इमारतीच्या तिसरा मजल्याचे ( ३ रा स्लॅब) बांधकाम सुरु करण्यात आले. यावेळी र.ए.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव पानवलकर, कार्याध्यक्ष अॅड.विलास पाटणे, कार्यवाह अॅड.प्राची जोशी, नियामक मंडळ सदस्य अॅड.विजय साखळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आदी पदाधिक-यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले, याप्रसंगी शिक्षक व कर्मचारी देखील उपस्थित होते.
28/05/2015
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रु./ मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ९५.६८ % गुण मिळवून कोकण बोर्ड सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम आले आहे. एकूण ३२८०९ पैकी ३०३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकणातील विद्यार्थी बुद्धिमान होतेच परंतु कोकण बोर्डाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्राच्या राज्यस्तरीय नकाशावर त्यांनी आपली मोहोर उमटवत यशाची परंपरा कायम राखली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा ९५.८ % तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ९६.७२% निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
-अॅड. विलास पाटणे, कार्याध्यक्ष, रत्नागिरी, एज्युकेशन सोसायटी.
19/05/2015
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा. ना. श्री. अनंत गीते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. रविंद्र वायकर ( राज्यमंत्री - गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण) यांनी काल दिनांक १८ मे. २०१५ रोजी सायंकाळी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह अॅड.प्राची जोशी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर व सोवत संस्थेचे विश्वस्त मंडळ सदस्य श्री.रवींद्र (मुन्नाशेठ) सुर्वे.