Ratnabhoomi Journalism Institute

Ratnabhoomi Journalism Institute

Share

Journalism and Human Right Course Available
Contact- 9763047787

01/05/2025

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

08/08/2023

#पत्रकार व्हायचं आहे?
मग ही बातमी तुमच्या साठीच....
पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) कोर्स Admission मुदतवाढ शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023
संपर्क : (WhatsApp) 9763047787

16/07/2023

मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर; महेंद्र खांबल जिल्ह्यात प्रथम
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीचे प्रवेश सुरु

रत्नागिरी, दि.१६ (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. या मध्ये मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर झाला असून रत्नागिरी येथील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट चा मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. मानवी हक्क शिक्षणक्रम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उपयुक्त असा अभ्याक्रम मानला जातो.
रत्नागिरी जिल्ह्यातून मानवी हक्क अभ्यासक्रमासाठी एकूण २९ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून श्री. महेंद्र शंकर खांबल (७९.३३%) हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत तर व्दितीय क्रमांक सौ. संपदा नितीन किर (७७%) आणि सौ. मैथिली संदेश लांजेकर (७६.६७%) या तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. अभ्यासक्रमातील सर्वच विद्यार्थी फर्स्ट क्लास गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व सेंटरचे केंद्रसंयोजक अंकुश कदम यांनी अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीचे प्रवेश प्रक्रिया सुरु
पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन उपयुक्त अभयसक्रमांचे नवीन बॅचसाठीचे प्रवेश प्रक्रिया १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे. यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक १ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विनाविलंब शुल्क सुरु राहणार आहे.
पत्रकार (Journalist) होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.
या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी ई-मेल - [email protected] संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६०, येथे संपर्क साधावा.

15/07/2023

#पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर; संगीता कदम, आप्पासो मदने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीचे प्रवेश सुरु

रत्नागिरी, दि.१५ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. या मध्ये पत्रकार पदविका कोर्सचे निकाल जाहीर झाले असून रत्नागिरी येथील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट चा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी एकूण ३४ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून सौ. संगीता अशोक कदम (८५%) आणि श्री. आप्पासो ईश्वर मदने (८५%) हे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत तर व्दितीय क्रमांक सौ. अश्विनी तुकाराम वाघमारे (८४.५०%) आणि सौ. कल्पना भगवान दडस (८४.५०%) व कु. सायली सुरेश कदम (८४.५०%) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. अभ्यासक्रमातील सर्च विद्यार्थी फर्स्ट क्लास गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व सेंटरचे केंद्रसंयोजक अंकुश अशोक कदम यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन उपयुक्त अभयसक्रमांचे नवीन बॅचसाठीचे प्रवेश प्रक्रिया १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे. यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक १ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विनाविलंब शुल्क सुरु राहणार आहे.
पत्रकार (Journalist) होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.
या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी ई-मेल - [email protected] संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६०, येथे संपर्क साधावा.

04/07/2023

पत्रकारिता पदविका, मानवी हक्क अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

रत्नागिरी, दि. ०१ (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे. यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज दिनांक १ जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विनाविलंब शुल्क सुरु राहणार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि सामाजिक क्षेत्रात उपयुक्त मानवी हक्क शिक्षणक्रम (Human Right) या कोर्सचे प्रवेश रत्नागिरीतील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट येथे या शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु आहेत.
पत्रकार (Journalist) होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल.
या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी ई-मेल - [email protected] संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६०, येथे संपर्क साधावा.

15/01/2023

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा...

30/06/2019

Journalism Admission Open

30/06/2019

दैनिक रत्नभूमि बातमी

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Ratnagiri
415639