14/05/2026
*मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात*
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १४ मे , २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक आदर्श राजा आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते.छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. आपल्या अफाट शौर्याने आणि पराक्रमाने त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले होते आणि 'बुधभूषण' सारख्या ग्रंथाची निर्मिती करून आपल्या विद्वत्तेची चुणूक दाखवली होती. आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल १२० लढाया केल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत, हे त्यांच्या अद्वितीय युद्धकौशल्याचे प्रतीक आहे. धर्माभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा यासाठी त्यांनी सोसलेले बलिदान आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहते. त्यांच्या पराक्रमाची कहाणी म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ती एक ज्वलंत प्रेरणा आहे जी प्रत्येक पिढीला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देते. त्यांचे धैर्य, निडरपणा आणि निष्ठा आजही युवकांसाठी आदर्श मानले जातात.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
12/05/2026
*मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला दापोलीतील पत्रकारांची भेट*
"मत्स्य शिक्षणावर चर्चा: मच्छिमारांनी मत्स्य शिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन"
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ७ मे रोजी दापोलीतील १६ पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी विशेष प्रक्षेत्र भेट दिली.
दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय आणि संशोधन कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. के. जे. चौधरी यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत केले. त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालायची माहिती दिली. मत्स्यकी शिक्षण संधी मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी/बारावी न करता थेटपणे व्यावसायिक शिक्षण घेतल्यास मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेती मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार संधी उपलब्ध असून त्यांचा जास्तीत-जास्त फायदा मिळवून देण्यासाठी महाविद्यालय करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी या शासकीय तंत्रनिकेतन च्या विविध प्रयोगशाळा, खेकडा संवर्धन यूनिट आणि ॲक्वापोनिक्स यूनिटला भेट देऊन माहिती घेतली.
विद्यापीठाचे डॉ. एस. डी. देसाई यांनी या दौऱ्याचे नियोजन केले. या भेटीमुळे विद्यापीठाचे संशोधन आणि तंत्रज्ञान सामान्य मच्छिमार व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या दौऱ्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले असून, कृषि आणि मत्स्य क्षेत्रातील नवनवीन प्रयोग समाजासमोर आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ, शिक्षण संचालक डॉ सतीश नारखेडे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मार्गदर्शन लाभले.
12/05/2026
*प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!!*
*शासकीय मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी*
या महाविद्यालयात शै. वर्ष 2026-27 करिता प्रवेश सुरू.
मोजक्याच जागा शिल्लक.
लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.
अभ्यासक्रम : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा डी. एफ. इ
(मत्स्य अभियांत्रिकी पदविका )
कालावधी : तीन वर्ष (पूर्णवेळ)
माध्यम : इंग्रजी
पात्रता : दहावी पास, मेरीट लिस्ट प्रमाणे थेट प्रवेश
नवीन शैक्षणिक धोरण २०२० प्रमाणे अभ्यासक्रम’ अनुभव-आधारित शिक्षण (इएल)
*महाविद्यालयाची वैशिष्ट्ये :*
१) 100% टक्के स्वयंरोजगार अथवा रोजगाराची हमी.
२) एस सी, एस टी, ओ बी सी च्या सर्व विद्यार्थ्यांना समाज कल्याणची शिष्यवृत्ती.
३) दर्जेदार व अनुभवी शिक्षक वर्ग.
४) सुसज्ज मुलभुत प्रशिक्षण लॅब.
५) सुसज्ज कॉम्पुटर लॅब.
६) ऍडव्हान्स ट्रेनिंग करिता नौका आणि कार्यशाळा.
७) कमवा आणि शिका तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत.
८) प्रशस्त फ्रंट ऑफिस
9) विद्यार्थी कौशल्य विकासावर भर.
१0) मत्स्य शेती अभ्यास दौरा तसेच दक्षिण भारत भेट आणि प्रशिक्षण
११) विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी स्वतंत्र सुसज्ज होस्टेल सुविधा उपलब्ध
*अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर चे फायदे :*
१) मत्स्य शेती, कोळंबी शेती, मत्स्य प्रक्रिया कारखाने मध्ये नोकरी करण्याची संधी.
२) मत्स्य पदवीधर म्हणजे बी एफ. एस सी करिता थेट दुस-या वर्षात प्रवेश संधी.
३) स्वतःसाठी व इतरांसाठी रोजगार निर्मितीची संधी.
४) महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागात “मत्स्य प्रगणक” पदावर काम करण्याची संधी, तसेच भविष्यात सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी पदावर काम करण्याची संधी.
५) सागर मित्र म्हणून मत्स्य व्यवसाय विभाग आणि कांदळ वन कक्ष मध्ये नोकरीची संधी.
६) पुढील उच्च शिक्षणाकरिता संधी उपलब्ध.
*प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :*
*10वी चे गुणपत्रक
*शाळा सोडल्याचा दाखला,
*आधारकार्ड
*मागासवर्गीय विद्यार्थी असेल तर जातीचा दाखला.
*शेतकरी पाल्य असल्यास नवीन ७/१२ उतारा (अतिरिक्त १२ टक्के गुण करिता)
*अधिवास दाखला.(Domicile certificate)
*मच्छिमार पाल्य असल्यास जिल्ह्याच्या “सहाय्यक आयुक्त (मत्स्य)” यांचा दाखला (अतिरिक्त १२ टक्के गुण करिता)
आपल्या प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी आजच खालील नंबरवर फोन करून प्रवेश निश्चित करा
शासकीय मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, जि.रत्नागिरी 415612.
**संपर्क फोन नंबर..........*
कार्यालय अधीक्षक श्री सचिन जाधव 8767201220
कार्यालय : 02352 299378
प्राचार्य डॉ केतन चौधरी 9422441178
Email lD - [email protected]
06/05/2026
*मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा*
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी तसेच दोन महाराष्ट्र नेवल यूनिट एनसीसी, रत्नागिरी या कार्यालयामार्फत आयोजित शिबिरामध्ये सहभागी झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक, शैक्षणिक व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण घेत आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे व योगदानाचे कौतुक करण्यात आले. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षित कामाचे वातावरण आणि कौशल्य विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य साधून संस्थेतील श्री. सिद्धेश कांबळे यांचा सर्वोत्कृष्ट कार्यालयीन कर्मचारी तसेच श्री. अमर सनगरे यांचा सर्वोत्कृष्ट मजूर कर्मचारी म्हणून त्यांच्या कार्याचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि रोख बक्षीस देवून गौरव करण्यात आला.
शेवटी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व कामगारांच्या सन्मानासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजन प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले.
20/04/2026
*मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात*
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १९ एप्रिल, २०२६ रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वर महाराज हे एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि 'लिंगायत चळवळी'चे संस्थापक होते. समाजासाठी भगवान बसव यांचे प्रमुख योगदान म्हणजे जातिव्यवस्थेविरुद्ध केलेली समाजसुधारणा, महिला सक्षमीकरण, 'अनुभव मंटपा'ची स्थापना आणि 'लिंगायत संप्रदाया'ची उभारणी.
त्यांची जयंती ही केवळ स्मरणाचा दिवस नसून, ती समाजपरिवर्तनाची शपथ घेण्याची संधी आहे. त्यांच्या समतेच्या, श्रमसंस्कृतीच्या आणि मानवतेच्या विचारांचा स्वीकार केल्यासच आपण एक सुसंस्कृत, न्याय्य आणि प्रगत समाज घडवू शकतो.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
20/12/2025
🌊 West Coast of India Study Tour 2025-26: Immersive Learning in Kochi, Kerala!
Tour Leader: Dr. Rakesh Jadhav
Colleague: Smt. Mayuri Dongare
Our educational voyage along the coast continues! Our second major stop brought us to Kochi, Kerala – a true powerhouse of fisheries research and training in India.
Over these days, our students from Fisheries Engineering Polytechnic, Ratnagiri, Maharashtra, India visited several premier national institutions:
🏛️ ICAR-Central Institute of Fisheries Technology (CIFT) ⛵Central Institute of Fisheries Nautical and Engineering Training (CIFNET) 📊Fishery Survey of India (FSI) 🏭National Institute of Fisheries Post Harvest Technology and Training (NIFPHATT) 🔬ICAR-Central Marine Fisheries Research Institute (CMFRI) 🎓The Kerala University of Fisheries and Ocean Studies (KUFOS)
The exposure was phenomenal! Students explored: 🔸Fishing Gear & Craft Technology 🔸Chinese Dip Net Operation 🔸Workshop Machinery & Marine Engines 🔸Life Raft & Safety Systems 🔸A guided visit on a Research Vessel 🔸Marine & Freshwater Aquariums & Museums
The depth of knowledge and the operational scale witnessed here has been truly inspiring. Our students absorbed every detail with immense enthusiasm.
A profound thank you to all the scientists, faculty, and staff at these prestigious institutes for their time, expertise. A special thanks to Mr. Swapnil Somwanshi, Ph.D. Scholar for his cooperation and warm hospitality during all the visits in Kochi.
The journey of learning continues! Next, we head south to Kanyakumari and Bangaluru.
18/12/2025
🚀 West Coast of India Study Tour 2025-26: First Stop – Mangalore!
Led by me, Dr. Rakesh Jadhav and my dedicated colleague Smt. Mayuri Dongare, our students kicked off in Karnataka at the renowned College of Fisheries, Mangalore.
Our students from Fisheries Engineering Polytechnic, Ratnagiri, Maharashtra, India had an immersive session exploring the Technology Division, focusing on: ✅Fisheries Engineering Department ✅Fish Canning Machinery
✅Cold Storage & Preservation Technology
A special thank you to Dean, College of Fisheries, Mangalore for his gracious welcome, Dr. Varadraju S., Head of Dept., Fisheries Engineering for the insightful guidance, Dr. Kumar Nayak, Associate Professor, and Dr. Girish for his exceptional support during the visit.
Inspired and enriched, we now proceed to our next destination: Kochi, Kerala!
14/08/2025
Admissions are still Open for 2025-26