जि.प.शाळा देवरुख पर्शराम वाडी

जि.प.शाळा देवरुख पर्शराम वाडी

Share

जि.प.शाळा देवरुख पर्शराम वाडी

Photos from जि.प.शाळा देवरुख पर्शराम वाडी's post 19/02/2026

आज आपल्या जि.प.शाळा व अंगणवाडीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान योद्धा व प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवराय, राजमाता जिजाऊ व मावळे यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन सर्वांना शिवचरित्राची आठवण करून दिली. मुलांनी घोषवाक्ये, भाषणे व सांस्कृतिक सादरीकरणातून शिवरायांच्या शौर्य, धैर्य व स्वाभिमानाचा संदेश दिला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रेरणा मिळाली. अशा उपक्रमांमुळे आपल्या मुलांना इतिहासाची ओळख व संस्कारांची जपणूक करण्याची संधी मिळते, ही आनंदाची बाब आहे.
🚩 जय शिवराय! जय हिंद! 🚩
#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज

Want your school to be the top-listed School/college in Ratnagiri?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


At/Post Devrukh Parsharam Wadi
Ratnagiri
415804