13/07/2026
गुरुजी ट्युशन सेंटर, रत्नागिरी.
गुरुजी ट्युशन सेंटर, रत्नागिरी.
13/07/2026
13/07/2026
मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी कु. ओवी प्रथमेश आंबेकर हिचे मनःपूर्वक अभिनंदन
रत्नागिरी, दि. १२ जुलै २०२६ : शासनमान्य राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ २०२६ मध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेली कु. ओवी प्रथमेश आंबेकर हिने केंद्रस्तरावर ७ वा व तालुकास्तरावर ९ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
ओवीच्या शैक्षणिक प्रवासाशी माझे विशेष नाते आहे. ती इयत्ता दुसरीत असताना तिचा वर्गशिक्षक म्हणून अध्यापन करण्याचे भाग्य मला लाभले. त्याचबरोबर ती इयत्ता चौथीत शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी माझ्या मार्गदर्शनाखाली करण्याची संधीही मला मिळाली. तिची अभ्यासातील सातत्य, मेहनत, शिस्त आणि जिद्द पाहता ती भविष्यातही मोठे यश संपादन करेल, याची मला खात्री आहे.
आज तिच्या यशाचा सन्मान होताना शिक्षक म्हणून मन अभिमानाने भरून आले. विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचे खरे समाधान आणि आनंद दडलेला असतो.
कु. ओवी प्रथमेश आंबेकर हिचे तसेच तिच्या आई-वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. ती शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येही यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास आहे.
– श्री. सूर्यवंशी सर
मार्गदर्शक शिक्षक 🌹
13/07/2026
मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत इयत्ता दुसरीच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश
रत्नागिरी, दि. १२ जुलै २०२६ : शासनमान्य राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ २०२६ रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात इयत्ता दुसरीतील कु. दर्शना लिलाधर कुंभार, कु. उन्नती विश्वास सुर्वे आणि कु. स्वानंदी कमलेश सुर्वे या तीन विद्यार्थिनींनी केंद्र, तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीत उल्लेखनीय स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले.
या तिन्ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याची संधी लाभल्याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या संधीचे सोनं करत उल्लेखनीय यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल दर्शना, उन्नती आणि स्वानंदी या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे तसेच त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या शैक्षणिक क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
– श्री. सूर्यवंशी सर
मार्गदर्शक शिक्षक
गुरुजी ट्युशन सेंटर, रत्नागिरी.
इयत्ता तिसरी कविता शोधीशी मानवा
गुरुजी ट्युशन सेंटर, रत्नागिरी जाहिरात
आज दिनांक १६/०६/२०२६ रोजी
गुरुजी ट्युशन सेंटर, रत्नागिरी येथे नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करून करण्यात आला. या प्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टिळा व आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. नवीन शैक्षणिक प्रवासाची सुरुवात ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वासाने करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
"विद्यार्थ्यांचा विश्वास, हाच माझा श्वास!" ✨
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
मोरया निवास शिर्के हायस्कूल जवळ, रत्नागिरी
Ratnagiri
415612