Rajur

Rajur gav maze rajur chan loksankhya ahi 15000 taluka honar parantu rajkarn

21/07/2014

जागतिक वन दिन विशेष



देशातील सर्वात मोठा आणि दुर्मिळ लोध वृक्ष कुठे आहे असा प्रश्न कुणी विचारला, तर त्यांना सांगा की असा वृक्ष आमच्या नगर जिल्ह्य़ात आहे. अकोले तालुक्यातील भैरवगड, कोथळा परिसरात असलेल्या देवराईत हा ‘लोध’ (फायकस नवरेसा) वृक्ष उभा आहे. त्याच्या बुंध्याचा घेर तब्बल ५ मीटर असून उंची सुमारे १०० फूट आहे.

नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक व्ही. के. मोहन यांनी या झाडाची माहिती दिली. संगमनेर येथील प्रा. डॉ. मोहन वामन यांनी पी. एचडी. करताना सह्य़ाद्रीतील पश्चिम घाटातील वृक्षसंपदेचा अभ्यास केला, त्यावेळी या झाडाची माहिती त्यांना समजली. जागतिक ख्यातीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एम. आर. अल्मेडा यांनी नगर जिल्ह्य़ातील जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तक लिहिले, त्यातही या वृक्षाचा उल्लेख आहे. हे झाड वड, उंबर या गटातील असून त्याचा वनौषधी म्हणूनही उपयोग होतो, असे प्रा. वामन म्हणाले. या वृक्षाला फुले येतात. त्याच्या पानांचा उपयोग राब जाळण्यासाठीही केला जातो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाईचं शिखर, त्याच्या पायाशी पसरलेलं ३६ हजार १८१ हेक्टरवरील बिबटय़ांचं अभयारण्य, संगमनेर तालुक्यातील पेमगिरीचा अजस्र वटवृक्ष, जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात असलेलं कर्जत तालुक्यातील काळविटांचं रेहेकुरी व माळढोक अभयारण्य, जायकवाडीचं पक्षी अभयारण्य.. हे सगळं नगर जिल्ह्य़ाचं वनवैभव आहे. याला पर्यटनाची जोड देण्याचा वन विभागाचा प्रयत्न असून त्यासाठी भरीव निधी मात्र उपलब्ध व्हायला हवा.

नगर जिल्ह्य़ाचे भौगोलिक क्षेत्र १७ लाख ४ हजार ८०० हेक्टर असून त्यापैकी वनक्षेत्र १ लाख ९१ हजार ५५९ हेक्टर म्हणजे सुमारे ११.२३ टक्केच आहे. जंगलांचं प्रमाण तुलनेने कमी असलं, तरी जैववैविध्यामुळे नगर जिल्हा वैशिष्टय़पूर्ण बनला आहे. जिल्ह्य़ाच्या उत्तरेत बिबटे, तर दक्षिणेत हरणं आहेत. दुर्मिळ होत चाललेला माळढोक हे एकेकाळी जिल्ह्य़ाचं वैभव होतं. मयूर अभयारण्य जिल्ह्य़ात नसलं, तर वृद्धेश्वर परिसरात भरपूर मोर आहेत. शिवाय बीड जिल्ह्य़ात असलेलं नायगावचं मयूर अभयारण्य नगर जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवरच आहे. जायकवाडीच्या बॅकवॉटर भागात म्हणजे शेवगाव, नेवासे तालुक्यातही बरेच पक्षी पाहायला मिळतात.

निसर्गाच्या या ठेव्याचा उपयोग पर्यटनवाढीसाठी करण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे. नगरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदबिबी महाल परिसरात, तसेच जिल्ह्य़ात सिद्धटेक (कर्जत), बेलवंडी (श्रीगोंदे), मुकिंदपूर (नेवासे), वृद्धेश्वर (पाथर्डी) येथे निसर्ग पर्यटन केंद्रे उभारण्यात आली आहेत. नगर-पुणे रस्त्यावर जातेगाव (पारनेर), खर्डा (जामखेड) व शिवाजीनगर (राहुरी), हिवरेबाजार (नगर) येथेही अशाच प्रकारचे निसर्ग पर्यटन विकसीत करण्यात येणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक डी. डी. गुजेला व सहाय्यक वनसंरक्षक नंदकिशोर रामदिन यांनी दिली. सन २०११ हे वर्ष महाराष्ट्रात ‘पर्यटन वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या वर्षांच्या निमित्ताने सुटीच्या दिवशी वनसहलींचे आयोजन केल्यास मुलांना नगर जिल्ह्य़ातील वनसंपदेची माहिती होऊन वृक्षांची लागवड व संगोपन करण्याची आवड निर्माण होऊ शकेल. रेहेकुरी अभयारण्यात जाण्यासाठी सध्या पुण्याहून परवानगी आणावी लागते. ही व्यवस्था नगरमध्ये करावी, अशी निसर्गप्रेमींची मागणी आहे.

जागतिक वन दिन विशेषजागतिक वन दिन विशेष

जागतिक वन दिन विशेषजागतिक वन दिन विशेष

जागतिक वन दिन विशेष

25/08/2013
25/08/2013
09/08/2013

धर्म आणि कुटुंब व्यवस्था धोक्यात

राजूर : एकविसाव्या शतकात फक्त मी आणि माझेच या भोवती व्यक्ती सिमित होत आहे. त्यामुळे देशातील धर्म आणि कुटुंब व्यवस्था धोक्यात येत असल्याची खंत समाज प्रबोधनकार अँड. अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केली.
येथील सरपंच हेमलता पिचड यांनी केलेल्या समाज कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार, सवरेदय विद्या मंदिरचे प्राचार्य प्रकाश टाकळकर यांच्या सेवापूर्तीबद्दल श्री स्वामी सर्मथ सेवा संस्थेने या दोघांना अँड. रामतीर्थकर यांच्या हस्ते सन्मानित केले.
यानंतर उपस्थित असलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले होते.
नागरिकांशी संवाद साधताना रामतीर्थकर म्हणाल्या की, आज उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. घरे सजवली जात आहेत, त्यातील वस्तू वाढत चालल्यात पण माणसांची संख्या दोनवरच आहे. सुख दु:ख सांगायला किंवा ऐकायला कोणाला वेळ नाही. त्यामुळे धर्म व्यवस्था कोलमडत चालली तर भारतीय कुटुंब व्यवस्था व संस्कृती यांची मृत्यूघंटा वाजत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शाळांमध्ये संवेदना आणि नम्रता निर्माण करणारे शिक्षण दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले. सूत्रसंचालन किरण भागवत यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विलास महाले यांनी मानले. परिसरातील बहुसंख्य महिलांनी या कार्यक्रमास गर्दी केली होती.
(वार्ताहर)

29/04/2013

शनिवार 27 एप्रिल 2013
मोदींचा दंगलीत हात? हे तर तीस्ताचे कुभांड

कुठल्याही सेक्युलर, पुरोगामी नेता किंवा विचारवंताच्या तोंडी आपण हिटलर किंवा त्याचा प्रचारमंत्री गोबेल्सचे नाव नित्यनेमाने ऐकत असतो. गोबेल्स म्हणायचा सतत खोटे लोकांच्या कानीकपाळी मारावे. मग हळूहळू त्यांना तेच खरे वाटू लागते. आणि एकदा अशा खोट्यावर विश्वास बसला, की बुद्धी चालेनाशी होते व खरे ऐकायचीही भिती वाटू लागते. असा हा हिटलर ज्य़ु धर्मियांची कत्तल करण्यासाठी इतिहास प्रसिद्ध झाला. परंतू ज्यूधर्मियांचा समूळ नाश करायचे त्याचे उद्दीष्ट होते काय? शत्रूला संपवण्याचे उद्दीष्ट म्हणजे नेमके काय असते, त्याबद्दल हिटलरचे मत जाणून घेण्य़ासारखे आहे, मग त्याचे किती काटेकोर पालन आपल्याकडले सेक्युलर व पुरोगामी करतात, त्याचा अंदाज येऊ शकेल. एकदा कोणीतरी हिटलरला विचारले, ज्यूधर्मियांचा संपुर्ण निर्वंश करावा असे तुझे मत आहे काय? त्यावर हिटलर उत्तरला-

छे छे, ज्य़ू नावाचा कोणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची असेल तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल असा कोणीतरी हाडामासाचा खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केव्ळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही. (हर्मान रॉशनिंग यांच्या ‘हिटलर स्पिक्स’ पुस्तकातून)

ज्यांना समाजात दुफ़्ळी माजवून लोकांना चिथावण्या द्यायच्या असतात; त्यांना कोणीतरी खरा खोटा शत्रू दाखवून लोकांमध्ये आधी भिती निर्माण करावीच लागते. मग त्या भितीच्या पोटी लोकांना चिथावण्या देऊन आपल्याला हवे तसे झुंजवता येत असते. पण त्यासाठी लोकांना भयभीत करील असा शत्रू लोकांच्या डोक्यात भरवावा लागतो, त्याचे अक्राळविक्राळ रूप लोकांसमोर मांडावे लागते. तसा कोणी खराच नसला तरी बिघडत नाही. पण तो आहे व अत्यंत भयावह आहे, असे लोकांच्या डोक्यात भरवावे लागते. मुस्लिमांची मते मिळवायची तर असा कोणीतरी शत्रू त्यांच्या डोक्यात भरवायला हवा होता आणि म्हणूनच गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून असा चेहरा लोकांसमोर आणायची संधी आयती एनडीएच्या काळात हतबल सेक्युलर पक्ष व विचारवंतांना मिळाली. कारण अगदी हिंदूत्वाचा अजेंडा भाजपाने सोडला होता. अयोध्येतील मंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवला होता. त्यामुळे कॉग्रेसला भाजपावर मात करणे राजकीय दृष्टीने शक्य नव्हते. अशावेळी मग गुजरातची दंगल झाली आणि त्यात नवे काही नसले, तरी ती मुख्यमंत्री मोदींच्याच इशार्‍यावर झाली अशी एक आवई उठवण्यात आली. नेमका त्यावेळी हा मुख्यमंत्री नवखा होता. त्याला प्रशासनाचा किंवा सरकार चालवण्याचा अनुभव अजिबात नव्हता. त्यामुळेच अशा प्रसंगी लोकमताला किंवा माध्यमांना कसे सामोरे जावे, त्याविषयी अनभिज्ञ होता. त्याचा फ़ायदा उठवून माध्यमे व स्वयंसेवी संस्थांना पुढे करून त्याची मुस्लिमांचा खाटीक अशी प्रतिमा रंगवण्याचे कारस्थान शिजवण्यात आले. तसे पाहिल्यास त्यात काडीचेही तथ्य वा सत्य नव्हते. गुजरातमध्ये अशा दंगलीचा इतिहास जुनाच होता आणि तिथले प्रशानस जुन्या अनुभवानुसारच मुस्लिमांच्या बाबतीत तटस्थपणे वागत होते. त्याला नरेंद्र मोदी हा नवखा मुख्यमंत्री अजिबात जबाबदार नव्हता. त्याचा थोडाफ़ार हात असेल तर तो जुन्या परंपरेला छेद देऊन दंगल आटोक्यात आणायचा प्रयत्न करीत होता. पण अनुभवात कमी पडत होता. आणि म्हणूनच अकरा वर्षे होऊन गेली, तरी त्याच्या विरोधात एकही पुरावा समोर येऊ शकलेला नाही. नुसते आरोप व बिनबुडाचे आक्षेप यापेक्षा काही सिद्ध होऊ शकलेले नाही. उलट आजवर कधी झाले नाही, इतके दंगलखोरांवर गुन्हे नोंदले गेले, खटले भरले गेले व अनेकजण शिक्षाही भोगायला गेले. यापुर्वी कधी असे गुजरातमध्ये झालेले नाही. पण तरीही मोदींना मुस्लिमांचा शत्रू म्हणून रंगवण्याचे काम अव्याहत चालू आहे. यालाच हिटलरचा सिद्धांत म्हणतात. मात्र आता त्या गैरसमजातून गुजरातचा मुस्लिम बाहेर पडला आहे. कारण त्याचा अनुभवच त्याला सत्यापर्यंत घेऊन गेला आहे. पण देशातल्या मुस्लिमांना त्या सत्याला अजून सामोरे जायला वेळ लागणार आहे.

आता कारस्थान असे विधान मी केले, मग अनेकांना मी सुद्धा बिनबुडाचा आरोप करतो असेच वाटेल. पण तो माझा स्वभाव नाही आणि मी पुरोगामी सेक्युलर सुद्धा नाही. त्यामुळे खोटे बोलण्या-लिहिण्याचे स्वातंत्र्य मला घेता येत नाही. मोदी यांना मुस्लिमांचा शत्रू व कत्तलखोर असे आरोप करून त्यांचे तसे भयावह रूप उभे करण्याला मी कारस्थान का म्हणतो? तर तसे सुप्रिम कोर्टातल्या एका वकीलानेच म्हटले आहे. मोदी यांनीच दंगली घडवून आणल्या व मुस्लिमांच्या कत्तलीला प्रोत्साहन दिले; असा त्यांच्यावर सतत आरोप झालेला आहे आणि तसा आरोप करण्यात मुंबईच्या स्वयंसेवी संस्थाचालक तीस्ता सेटलवाड यांचाच पुढाकार राहिला आहे. त्यांच्याच पुढाकाराने तीनदा मोदींच्या विरोधात सुप्रिम कोर्टाने विशेष तापस पथक नेमलेले आहे आणि प्रत्येकवेळी तपास केल्यावर त्या पथकाने मोदी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. आधी हायकोर्टाने व दोनदा सुप्रिम कोर्टाने अशी पथके; ज्याला एस आय टी असे म्हटले जाते, त्यांची नेमणूक केली होती. शिवाय त्यात मोदी सरकारने हस्तक्षेप करू नये, असाही दंडक घातला होता. अखेर नेमलेल्या पथकामध्ये मुद्दाम कधीही गुजरातमध्ये काम न केलेल्या निवृत्त माजी पोलिस अधिकार्‍यांचा समावेश केलेला होता. त्यांनीही कसून तपास केला व खुद्द मुख्यमंत्री मोदी यांचीही जबानी घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवालात तीस्ता सेटलवाड यांनी हे सर्व कुभांड रचल्याप्रमाणे कारस्थान घडवून आणल्याचा अहवाल दिलेला आहे. म्हणूनच मूळ अर्जदार झकीया जाफ़री यांना त्या अहवालाची प्रत देताना, त्याची प्रत तीस्ता सेटलवाड यांना देऊ नये असे बंधन सुप्रिम कोर्टाने घातले होते. आता त्यावर फ़ेरविचार व्हावा असा अर्ज झाकीया जाफ़री यांच्या वतीने पुन्हा तीस्ताच्या पुढाकारने सुप्रिम कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी खुद्द तपास पथकाच्या अधिकार्‍यांवरच संशय घेतला आहे. म्हणजे तीन तीन खास पथके नेमली, तपास केला, पण कुठलाही पुरावा मिळु शकलेला नाही किंवा तीस्ताही कुठला पुरावा देऊ शकलेली नाही. नसेल तर पुरावा मिळणारच कसा?

याचा अर्थ इतकाच, की पोलिस वा तपास पथकाने कोणता तरी खोटा पुरावा मोदी विरोधात निर्माण करावा आणि त्यात मोदी यांना गुंतवावे; असाच एकूण आग्रह आहे. कायदा पुराव्यानुसार वाटचाल करतो. तुम्हाला काय वाटते वा तुमच्या मनात शंका व संशय आहे, म्हणून कोणाला गुन्हेगार ठरवता येत नसते, दोषी मानता येत नसते. तीस्ता यांना नुसते आरोप करता आले, पण पुरावे देता आलेले नाहीत. कारण जे घडलेच नाही, त्याचे पुरावे मिळणार तरी कुठून? आणि आता चौथ्यांदा कोर्टात पुन्हा तेच नाटक करायला गेलेल्या तीस्ताचा मुखवटा पुरता फ़ाटला आहे. कारण शेवटचा तपास ज्या पथकाने केला; त्या पथकाच्या वकीलांनी आता थेट तीस्तावरच खोटेपणाचा व कोर्टासह लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप कोर्टातच केला आहे. गेल्या गुरूवारी सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठासमोर चौथ्यांदा चौकशीच्या मा्गणीसाठी सुरू असलेल्या फ़ेरसुनावणीच्या वेळी जामौर हे एस आय टीचे वकील म्हणाले, झाकीयाच नव्हेतर अनेक प्रकरणात तीस्ताने पुरावे व निवेदनांसह कबूली जबाबात खोटेपणा केलेला आहे. त्यांनी मोदी विरोधात निव्वळ कुभांड रचून हा खेळ चालविला आहे. मोदी यांनी कधीही दंगल करा व माणसांना बेधडक मारायचे आदेश दिले नाहीत. दंगल करणार्‍या लोकांना अडवू नका असे पोलिसांना आदेश दिले नाहीत, कारण तसे ठामपणे सांगणारा व त्याला पुरक पुरावा देणारा एकही साक्षीदार नाही, असे या वकीलाने कोर्टात सांगितले.

वकीलाच्या या आरोपाला महत्व एवढ्यासाठीच आहे, की तो वकील मोदी सरकारने नेमलेला नाही. ती एस आय टी मोदी सरकारने नेमलेली नाही आणि तशी मागणीही मोदी सरकारची नाही. ती मागणी तीस्ताच्याच आग्रहाने वा अर्जावर सुप्रिम कोर्टाने केलेली होती. म्हणजेच हे लोक तीस्ताच्याच विश्वासाचे आहेत. इतकेच नाही, तर या पथकाने मोदींना साक्ष वा जबानी द्यायला बोलावले म्हणजेच मोदी कसे गुन्हेगार आहेत, असे सांगण्यात तीस्ताने दाताच्या कण्या केल्या होत्या आणि तमाम सेक्युलर माध्यमांनी आठ तास मोदींवर प्रश्नांचा कसा भडीमार झाला, त्याची रसभरीत वर्णने प्रक्षेपित केलेली होती. पण त्यातून मोदीना अडकवता येत नाही, म्हटल्यावर आता त्याच पथकावर तीस्ताने आरोप सुरू केले आहेत. म्हणजे जणू गुजरातच्या दंगलीविषयी त्यातल्या पिडीत वा बळी असणार्‍यांपासून कोर्ट व तपासकाम करणार्‍यांपर्यंत सगळे खोटे आहेत आणि कसलाही पुरावा देऊ न शकणार्‍या तीस्ताचा शब्द त्यात पुरावा आहे. हा निव्वळ बनाव झाला ना? त्यांच्याच विश्वासातला एक वकील आता तीस्तावर मोदी विरोधात कुभांड रचल्याचा आरोप करतो आहे. आणि हा पहिलाच माणुस नाही. यापुर्वी तीस्तावर बदमाशी व खोटेपणाचे आरोप तिच्या अनेक सहकार्‍यांनी केलेले आहेत. पण अशा बातम्या आपल्याला मुख्यप्रवाहातील वाहिन्या व वृत्तपत्रात वाचायला ऐकायला मिळणार नाहीत. तीस्ताने केलेल्या खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी मिळते. पण तीस्तावरच खोटेपणा केल्याचा सुप्रिम कोर्टात आरोप झाला; त्याची बातमी दोन दिवसात कुठे आली का? का येऊ नये? सेक्युलर पुरोगामी माध्यमे व पत्रकार तीस्ता इतकेच खोटारडे असल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा आवश्यक आने काय? हीच नाही, झाकीया जाफ़रीच्या गुलमर्ग सोसायटीतून तीस्ताला मुस्लिम रहिवाश्यांनी हाकलून लावल्याची बातमी तरी कुठल्या पुरोगामी माध्यामने दिली होती? त्यांना सत्याचेच वावडे आहे ना? अशा माध्यमांकडून गुजरातविषयी सत्य समोर येऊ शकेल काय? ( क्रमश:)
भाग ( १५५ ) २८/४/१३

29/04/2013

फ़ुले आंबेडकरांची चळवळ काय शिकवते?

चळवळ असा एक शब्द आपण अनेकांच्या तोंडून नेहमी ऐकत असतो. कधी ती स्त्रीमुक्तीची वा सामाजिक परिवर्तनाची; तर कधी युवक वा विद्यार्थी चळवळ असते. पण चळवळ म्हणजे तरी नेमके काय असते? प्रस्थापित जी व्यवस्था आहे, त्यात समाधानी नसलेल्या लोकांच्या समुहाने आपल्या असमाधानाबद्दल उठवलेला अवाज म्हणजे चळवळ. आपण जे आपल्या वाट्याला येते आहे वा यायला हवे असूनही येत नाही; त्याकडे जगाचे लक्ष वेधण्याचा केलेला प्रयास म्हणजे चळवळ असते. सहाजिकच त्यात सहसा अन्यायपिडीत लोकच सहभागी होत असतात वा ज्यांना त्या पिडीतांविषयी कळवळा असतो, त्यांचा त्यात सहभाग असतो. म्हणूनच चळवळीचे प्राधान्य नेहमी ज्याच्या वाट्याला अन्याय, अत्याचार वा असमाधान आले, त्या बाजूला चळवळीचा कल असावा लागतो. त्यात सहभागी झालेल्याकडून कुठल्याही स्वरूपाचा अन्याय अत्याचार होऊ नये याकडे भर असावा लागतो. मग त्या चळवळीत सहभागी झालेल्यांना प्रथम याची काळजी घ्यावी लागते, की त्यांच्यावरच अन्यायाचा आरोप होता कामा नये. दुर्दैवाने चळवळीत वावरणार्‍या व मिरवणार्‍यांना आजकाल त्याचाच विसर पडला आहे. त्यातले नेते वा म्होरके स्वत:च चळवळीला एक प्रस्थापित व्यवस्था असल्याप्रमाणे वागवू लागले आहेत. त्यातूनच मग लक्ष्मण माने यांच्यासारखी संशयास्पद प्रकरणे चव्हाट्यावर येतात. अशा बाबतीतले सगळेच आरोप डोळे झाकून खरे मानायचे कारण नाही. पण असे आरोप खोटे सिद्ध करण्याचा केवळ कायदेशीर मार्ग चोखाळता येत नाही. अगदी त्यामागे कुठले कुभांड वा कारस्थान असले; तरी केवळ कायदेशीर मार्गानेच त्याचा निचरा होऊ शकत नाही. किंबहूना कायदेशीर मार्गाचा आडोसा घेऊन केलेले युक्तीवाद प्रस्थापिताला शोभणारे असतात. कारण साक्षीपुरावे अशा मार्गने कुठलाही गुन्हेगार जातच असतो. त्यातून कोणाचीच सुटका नसते. तुम्ही सामान्य माणूस असा किंवा चळवळीतले नेता वा गुन्हेगार असा. जेव्हा पोलिस वा कायदा तुमच्यावर कारवाई करू लागतो; तेव्हा त्याची सर्वांना समान वागणूक असायचा दंडक आहे. म्हणूनच अन्य सामान्य माणसे वा गुन्हेगार यापेक्षा आपण वेगळे व निर्विवाद आहोत; हे दाखवण्याची खास जबाबदारी चळवळीत सहभागी असलेल्या व्यक्तीवर येत असते. तशी कायद्याची सक्ती नसते. पण चळवळीच्या पावित्र्याची सत्वपरिक्षा म्हणून तो मार्ग चळवळीतल्या लोकांना घ्यावा लागत असतो. कारण तेही चळवळीतले एक महत्वपुर्ण कार्य असते. चळवळीचे सर्वात मोठे भांडवल तिचे पावित्र्य व सच्चेपणा हेच असते. त्यामुळेच आरोप झाले, मग त्याला थेट सामोरे जाऊन आपला सच्चेपणा सिद्ध करायची अपुर्व संधी आरोपांमुळे मिळत असते. त्याला थेट सामोरे जाण्यातून तुमच्या सच्चेपणाची पहिली साक्ष तुम्हीच लोकांना देत असता.

चळवळीतल्या लोकांचा दावा ते लोककल्याण साधण्यासाठी झटत असल्याचा असतो. त्यामुळेच त्यांच्या वागण्यातून तो साधेपणा व कृती दिसणे अगत्याचे असते. जेव्हा असा कुठलाही गंभीर आरोप होतो, तेव्हा त्याला सामोरे जाऊन तो खोटा पाडणे, हे अग्नीदिव्यच असते. पण अशा दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्याने तुमच्या कार्याची व चळवळीची झळाळी अधिक तेजस्वी होत असते, हे विसरता कामा नये. सतत इतरांवर अन्याय होतो म्हणून अन्यायकर्ता वर्गाच्या विरोधात आवाज उठवणारा कार्यकर्ता तरी काय करत असतो? जे कोणी गरीब, पिडीत अन्याय निमूट अन्याय सहन करत असतात, त्यांना अन्यायाची जाणीव निर्माण करून त्याच्या विरोधात संघर्षाला उभे रहायची चिथावणीच देत असतो ना? तसा कोणी चालना, प्रोत्साहन व प्रेरणा देणारा नसेल; तर असे पिडीत ग्रासलेले लोक कधी अन्यायाच्या विरुद्ध उभे राहू शकतील काय? ते निमूट आपले नशीबच तसे अशी समजूत करून घेतात व बिनतक्रार अन्याय अत्याचार सहन करीत जगतात. त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाहीत, की संघर्ष करीत नाहीत. कर्मभोग व नशीब अशा कालबाह्य समजूतीने वा अनुभवाने त्यांची अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्तीच निश्क्रिय व निष्प्रभ झालेली असते. आणि हे केवळ दलित मागासांपुरतेच सत्य नाही. आजच्या पुढारलेल्या समाजातही अशी हतबलता आपण बघत असतो. लाचखोरी म्हणजे काय असते? काम अडवून पैसे काढणारा वा धमक्या देऊन खंडणी उकळणारा असतो, त्याच्याशी दोन हात करण्याची कुवत नसते; म्हणून लोक निमूट अन्याय सहन करीत नाहीत काय? आपल्याला कोणी मदतीचा हात देणार नाही आणि लढायला गेलो तर जीवावर बेतले तर कोणी वाचवायला धावणार नाही, अशी स्थिती लोकांची नाही काय? मग त्याच्याविरोधात लोकांना संघटीत करून आवाज उठवायला जे पुढे सरसावतात; त्यांना चिथावणीखोर म्हणायचे, की चळवळकर्ते म्हणायचे? दुबळ्यांना लढायची हिंमत देणे व त्यांच्यात तसे धाडस निर्माण करण्यालाच चळवळ म्हणतात, ती हिंमत निर्माण होत नाही व त्यावर पुढे सरसावून दोन हात करायचा निर्धार होत नाही, तोवर कोणी मुळात अन्यायाच्या विरोधात तक्रारच करायला पुढे येत नाही. म्हणूनच अशा पिडीत अन्यायग्रस्तांना संघर्षाला प्रवृत्त करणे व अन्यायाविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण करणे हे कारस्थान नसते, तर तीच चळवळ असते.

लक्ष्मण माने प्रकरणात त्यांच्यासकट त्यांच्या अन्य जुन्या नव्या सहकार्‍यांची निवेदने बघितली व ऐकली तर त्याचेच आश्चर्य वाटते. बाबा आढाव यांचे सर्व आयुष्य चळवळीत गेलेले आहे आणि त्यांच्यासारखा माणूस चळवळीची हानी होऊ नये, असा पवित्रा घेऊन त्या तक्रारींकडे बघतो, तेव्हा म्हणूनच मोठे नवल वाटते. सर्व हयात चळवळीत घालवल्यावर बाबांना मुळात चळवळ या शब्दाचा हेतू व आशय तरी कळला आहे काय; याचीच शंका येते. आपल्या आरोपीत सहकार्‍याला वाचवण्यासाठी त्यांना पिडीत महिलांचा टाहो शंकास्पद वाटावा आणि अशा आरोपांमागे कारस्थान भासावे, ही चमत्कारिक बाब नाही काय? यात शंकाच नाही, की कोणीतरी ठामपणे पाठीशी उभा राहिल्यावरच त्या महिला इतक्या उशीरा तक्रार द्यायला पुढे आलेल्या आहेत. मग त्यांना अशी हिंमत देणारा बोलविता धनी कोणीही असो, त्याला खरा चळवळकर्ता म्हणायला हवे. कारण त्याने निमूट बिनतक्रार अन्याय सोसणार्‍या महिलांना लढायची प्रेरणा दिलेली आहे. आणि त्याची पाठ थोपटण्याऐवजी जुनेजाणते त्याच कोणा अज्ञात व्यक्तीला कारस्थानी म्हणतात, हे नवल नाही? खरेतर ज्याने कोणी अशा चिथावण्या दिल्या व त्या महिलांना तक्रार देण्यापर्यंत हिंमत दिली; त्यानेही माने यांच्याप्रमाणेच तोंड लपवून बसायचे काय कारण आहे? खरेच कोणी अशी चिथावणी देऊन त्या महिलांना पोलिसांपर्यंत जायला प्रवृत्त केले असेल, तर ते पाप नसून तीच चळवळ आहे, त्याने तोंड लपवून अज्ञात रहायची गरज नाही. छातीठोकपणे समोर येऊन त्याने आपणच हे काम केल्याचे अभिमानाने सांगावे. अशा कुठल्याही व कितीही जुन्या अन्यायाला वाचा फ़ोडण्यातून महात्मा जोतिबा फ़ुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिवर्तनाच्या चळवळीचा पाया घातलेला आहे. त्यांच्याकडे लोक आदराने बघतात आणि बघितलेच पाहिजे. कारण अन्यायाची जाणीव समाजात निर्माण करणे व त्याच्या विरोधात संघर्षाला उभे रहाण्याची हिंमत जोपासणे; हे चळवळीतले प्राथमिक पवित्र असे कार्य आहे. दुर्दैव असे, की इथे ज्याने हे काम केले, तोही अज्ञातवासात राहिलेला आहे.

त्यामुळे खर्‍या परिवर्तनाच्या कार्यावर कारस्थान वा कुभांड अशी चिखलफ़ेक होत आहे. वास्तवात चळवळीच्या मुखवट्यात चाललेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फ़ोडणे हे मोठे कार्य आहे. आणि म्हणूनच लक्ष्मण माने यांच्या समर्थक पाठीराख्यांनी अशा आरोपाचे अग्नीदिव्य करण्यासाठी माने यांना हिंमत दिली पाहिजे. याचे कारण असे, की समजा हे आरोप पुर्णत: खोटेच असतील तर त्यालाही सामोरे जाण्याने माने व चळवळीचे सामर्थ्यच सिद्ध झाले असते. पण ती संधी आढावांपासून माने यांच्यापर्यंत सर्वांनी गमावली आहे. कारण त्यातला प्रत्येकजण महिलांपेक्षा माने व त्याच्यामुळे चळवळीची प्रतिष्ठा धुळीला मिळणार म्हणून दबून गप्प बसला. ज्या कारणास्तव आज हे माने समर्थक वा चळवळीचा नामजप करणारे गप्प आहेत, नेमक्या त्याच कारणाने त्या वा तत्सम महिला अन्याय सोसून गप्प असतात. ते कारण म्हणजे प्रतिष्ठा व इज्जतीचे खोटे थोतांड. ज्यावर आरोप होऊ शकतात, त्या संस्था किंवा चळवळीच्या कुठल्या प्रतिष्ठेला बाबा आढाव वगैरे मंडळी जपू बघत आहेत? परिवर्तनाच्या व सामाजिक न्यायाच्या चळवळीतच अन्याय अत्याचार होण्याची तक्रारच इज्जतीला काळीमा फ़ासून गेली नाही काय? तिची काळजी घेण्यापेक्षा कारस्थानाचे आरोप तथाकथित मनूवादी वृत्तीचेच उदगार नाहीत काय? जेव्हा फ़ुले आंबेडकरांसारख्या महात्म्यांनी सामाजिक विषमता व अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला; तेव्हा त्यांच्यावर धर्म बुडवण्याचे पाप व कारस्थान केल्याचे आरोप तात्कालीन धर्ममार्तंडांनी केलेले नव्हते काय? समाजाला धर्माच्या विरुद्ध चिथावण्या दिल्याचे त्यांच्यावरचे आरोप आणि आज त्या महिलांना चिथावण्या दिल्याचे आरोप, यात नेमका कितीसा गुणात्मक फ़रक आहे? आणि असे करणार्‍या व आक्षेप घेणार्‍यांना चळवळीचे महात्म्य तरी कितीसे कळले आहे? त्याच धर्ममार्तंडांच्या आवेशात हे पुरोगामी व माने समर्थक चळवळीची चिंता करताना दिसत नाहीत काय? मग ही परिवर्तनाची चळवळ आहे की पुराणमतवादी प्रतिगामी चळवळ आहे? ( क्रमश:)
भाग ( १३९ ) १२/४/१३

Address

Swami Nivas Rajur Tal . Akole Dist Ahmednagar
Rajuri
422604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rajur:

Shortcuts

Share

Category